Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विनापरवाना वाळू उपसा

$
0
0
शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रेल्वे पुलाजवळ कृष्णा नदीपात्रातून विनापरवाना बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या उपशामुळे रेल्वे पुलास धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने मात्र याबाबत गांधारीची भूमिका घेतली आहे.

‘मटा’च्यावतीने आज ‘हेरिटेज टूर’ची पर्वणी

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत आयोजित हेरिटेज टूरच्या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळला आहे. शनिवारी (ता. १७ जानेवारी) सकाळी ८ वाजता हा अभिनव उपक्रम होणार आहे.

माशांचा खच; तेरवाडकरांच्या नाकी नऊ

$
0
0
पंचगंगा प्रदूषण वाढल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन इचलकरंजी ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत जवळपास पाच किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मेले आहेत. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू आहे. ग्रामस्थांनी नदीकाठी मेलेल्या माशांचे ढीग टाकले आहेत.

हुतात्म्याच्या मुलीची उपेक्षाच!

$
0
0
दरवर्षी १७ जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो. मात्र, निपाणीत ५६ वर्षांपूर्वी झालेल्या सीमालढ्यात पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झालेल्या कमळाबाई मोहिते यांची कन्या रंजना कणसी (वय ५७, सध्या रा. यमकनमर्डी) यांच्या वाटेला महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून उपेक्षाच पदरी आली आहे.

चला, ऑफबीट वीकेंडला!

$
0
0
करवीरवासियांना पुन्हा धमाल ‘हॅपी स्ट्रीटस’ची पर्वणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ या उपक्रमांतर्गत करून दिली आहे. ११ जानेवारीला मिळालेल्या तुफानी प्रतिसादानानंतर येत्या रविवारी (ता. १८ जानेवारी) सकाळी सात वाजता कला, क्रीडा, छंद या गुणांचे प्रकटन करण्याची संधी मिळणार आहे.

साखर कारखाने अडचणीत

$
0
0
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अर्धा संपला तरी अद्याप ऊसदराचा निर्णय झालेला नाही. पूर्ण महिन्याच्या साखरेवर बँकेकडून पैसे उचलायचे आणि शेतकऱ्यांना १५ दिवसांचे पैसे द्यायचे असा कारखान्यांचा सध्या प्रकार सुरू असून, या पद्धतीमुळे शेवटचे बिल अडकून बसण्याची शक्यता आहे.

२१० पवनचक्क्यांना ३५ कोटींचा दंड

$
0
0
साताऱ्यातील कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील २१० पवनचक्क्यांना ३५ कोटी दंड करण्याचा राज्य सरकार आणि सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीचा (सीइसी) निर्णय सुप्रीम कोर्टाने ‌कायम केला आहे.

महापालिकेत ज्येष्ठ अडगळीत

$
0
0
महापौरपद असो की स्थायी समिती सभापतीचे पद, बहुतेकवेळा आघाडीच्या नेत्यांनी मर्जीतल्या नगरसेवकांना संधी दिली जात आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याची खंत अनेक नगरसेवक आता खुलेपणाने बोलत आहेत.

रंकाळातीरी अवतरले ‘स्वरतीर्थ’

$
0
0
शब्द आणि स्वर जणू रम्य सायंकाळी हातात हात घालून आले आणि त्यानंतर तीन तास जी मैफल रंगली त्यामध्ये रंकाळ्याच्या काठावर ‘स्वरतीर्थ’ अवतरले.

हा तर ‘बाबां’च्या लोकबिरादरीचा सन्मान

$
0
0
‘हेमलकसा येथे जो डोलारा आज दिसत आहे, त्याचा कळस जरी आम्ही असलो तरी बाबांनी घातलेल्या पायावर हे कार्य उभे आहे,' अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदा आमटे यांनी भद्रकाली ताराराणी पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.

‘हॅपी स्ट्रीट’ची धमाल आज पुन्हा

$
0
0
करवीरवासियांना पुन्हा धमाल ‘हॅपी स्ट्रीट’ ची पर्वणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ या उपक्रमांतर्गत करून दिली आहे. ११ जानेवारीला मिळालेल्या तुफानी प्रतिसादानानंतर रविवारी ( ता. १८ ) सकाळी सात वाजता कला, क्रीडा, छंद या गुणांचे प्रकटन करण्याची संधी मिळणार आहे.

जीवघेणा राँग साइड प्रवास

$
0
0
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन, वाहतूक नियंत्रण पोलिस आदींकडून वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नियम तोडल्यास दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाईसुद्धा केली जाते.

कन्सल्टंटचे लाड कशासाठी?

$
0
0
थेट पाइपलाइन योजनेच्या मार्गात बदल करण्याचा प्रकार ही युनिटी कन्सल्टंटची गंभीर चूक आहे. त्यामुळे विलंब होत असूनही त्यांचे अधिकारी, इंजिनीअर उपलब्ध नसतात. वर्किंग सर्व्हे करण्याची जबाबदारी त्यांची असताना ते काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले.

हेरिटेज संवर्धनाची चळवळ

$
0
0
‘टूर’ ही काही नवी कल्पना नाही. मौजमजा, थोडा निवांतपणा आणि अभ्यासासाठी आपण वेगवेगळ्या टूरमध्ये सहभागी होतो. मात्र, ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‌शनिवारी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व समजून घेण्यासाठी टूर आयोजित केली होती.

भारतीय संस्कृती उत्सव आजपासून

$
0
0
चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्ताने कणेरी येथे श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाच्या वतीने भारतीय संस्कृती उत्सवास रविवारपासून (ता. १८) प्रारंभ होत आहे. सकाळी दहा वाजता शोभायात्रा व संत ज्ञानेश्वरांच्या पालखी मिरवणुकीने महोत्सवाची सुरवात होणार आहे.

थंडीमुळे यंदा साखर आणखी ‘गोड’

$
0
0
यंदा थंडीच्या हुडहुडीने नागरिक गारठले असले तरी साखर कारखान्यांना मात्र ही थंडी ऊबदार वाटणारी आहे. कारण कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांच्या उताऱ्यात घसघशीत वाढ सुरू झाली आहे.

बेबी शकुंतला यांचे निधन

$
0
0
बालकलाकार म्हणून चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केलेल्या मराठी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे कोल्हापुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कागलला पोटनिवडणुकीत ७२.५८ टक्के मतदान

$
0
0
येथील नगरपालिका प्रभाग चारच्या चार ‘क‘ या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ७२.५८ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती रंजना दिलीप सणगर व महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार देविका महादेव गोरडे यांच्यात ही लढत झाली.

केमिकल कंपनीत स्फोट, दोन ठार

$
0
0
कराडनजीकच्या तासवडे एमआयडीसीत निऑसीस प्रा. लिमिटेड या औषध निर्माण करणाऱ्या केमिकल कंपनीत कच्च्या मालाची चाचणी सुरू असताना झालेल्या स्फोटात होरपळून दोन जण जागीच ठार झाले. एक गंभीर असून, इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई मॅरेथॉनमध्ये खंडपीठासाठी धाव

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे या मागणीसाठी मंगळवार पेठेतील प्रसाद जाधव यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटरची शर्यत पूर्ण केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images