Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गोकुळ’चे पडसाद ‘केडीसीसी’तही

$
0
0
जिल्ह्याची आर्थिक सत्ताकेंद्रे असलेल्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुका एकाचवेळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या दोन्ही संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना एकाचवेळी फिल्डिंग लावावी लागणार आहे.

रेकॉर्ड ब्रेक गर्दी

$
0
0
चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्ताने कणेरी येथे श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावरील देशी गायी, सेंद्रीय शेती, राजर्षी शाहू कलादालन आदींसह आरोग्य धाम प्रदर्शन सोमवारपासून खुले झाले.

राज्य सरकारची पहिली ग्रीन बिल्डिंग

$
0
0
येथील ख्यातनाम आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी डिझाईन केलेल्या पुण्यातील नवीन सर्कीट हाउसच्या इमारतीला ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसस्मेंट (ग्रिहा) या संस्थेचे ग्रीन बिल्डींगासाठीचे रेटिंग मिळाले आहे.

प्राध्यापकांना सात तास काम

$
0
0
सीनिअरच्या प्राध्यापकांना पाच तासांऐवजी कॉलेजसाठी सात तास द्यावे लागणार आहेत. अध्यापनासह दोन वाजेपर्यंतच्या कामाचा अहवालाची तपासणी शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून केली जाणार आहे. त्यामुळे दोन तास काम करुन घरी जाणाऱ्या प्राध्यापकांना लगाम बसणार आहे.

‘लोकसहभागा’तून विकास कधी?

$
0
0
पदावर नवीन आल्यानंतर अनेकांना लोक​प्रिय घोषणा करण्याची मोठी हौस असते, त्यानंतर काही काळ त्याचा पाठपुरावा देखील केला जातो. पण नंतर त्याचा पाठपुरावा बंद होतो, पदाधिकारी बदलल्यानंतर तर योजनांचे तीन तेरा वाजतात.

महापालिकेला मिळेनात प्रायोजक

$
0
0
लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रायोजक शोधण्यात पोलिसांनी बाजी मारली असतानाच महानगरपालिका मात्र अद्याप अंधारात चाचपडत आहे. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व अ​धिकारी शहराच्या विकासाबाबत उदासीन असल्याचे चित्रच या निमित्ताने समोर आले आहे.

जिल्हा बँकांचे रणांगण मेमध्ये

$
0
0
कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्हा बँकांची निवडणूक घेण्यासाठी ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर हे ठराव सहकार सह निबंधकांकडे सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर मेमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

कणेरीत संस्कृतीचा महासोहळा

$
0
0
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविलेल्या नागरिकांच्या उपिस्थितीत कणेरी मठावर चौथ्या भारत विकास संगम संमेलनाला प्रारंभ झाला.

नैराश्याने युवतीची आत्महत्या

$
0
0
वडिलांचा मृत्यूमुळे निराश झालेल्या रविवार पेठेतील माधुरी सदाशिव जाधव (वय २०, रा. टेंबे रोड) या युवतीने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. माधुरी हिने शिवाजी पुलावरून नदीत उडी मारली, मात्र लगतच सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या भरावावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मीच महापौरपदी राहणार

$
0
0
‘मला सहा महिन्यांसाठी महापौरपद मिळाले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत आहे. यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. नेत्यांच्या आदेशानंतरच राजीनामा देईन. अद्याप तसा कुठल्याही प्रकारचा आदेश नाही, यामुळे फेब्रुवारीपर्यंत मीच महापौरपदी असेन,’ असे महापौर तृप्ती माळवी यांनी स्पष्ट केले.

‘चला, उद्या हेरिटेज समजावून घेऊ’

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने ‘सेलिब्रेट कोल्हापूर’ अंतर्गत शनिवारी (ता. १७ जानेवारी) हेरिटेज टूर आयोजित करण्यात आली आहे. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून चालत सुरू होणारी ही टूर भवानी मंडपात संपणार आहे.

श्रीधर फडके यांची रंगणार मैफल

$
0
0
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांची ‘फिटे अंधाराचे जाळे’ ही मैफल ‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने आयोजित केली आहे.

येत्या रविवारीही ‘हॅपी स्ट्रीट’

$
0
0
रस्ता वाहनांसाठी आहेच, पण याच रस्त्यावर वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचाही अधिकारी आहे. याची जाणीव होण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट्स’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

फिल्मिंग दिसेना पोलिसांना

$
0
0
वाहनांच्या काचेवर कोणत्याही रंगाची जादाची फिल्म लावण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी केली असली तरी काळी फिल्म लावलेली वाहने शहरात राजरोस फिरतात. कारवाई होऊनही अनेक वाहनधारक पुन्हा फिल्म लावून फिरत आहेत.

डीपीडीसीची नव्याने ‘मांडणी’

$
0
0
जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन व निधी वाटपासारखे महत्त्वाचे काम करणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी भाजपच्या १९ निष्ठावंताची नावे राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे.

प्रार्थनास्थळांचा वाहतुकीला अडथळा

$
0
0
अरुंद रस्ते, वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी होत असताना त्यातच नव्याने निर्माण झालेली व वाढीव बांधकाम केलेल्या प्रार्थनास्थळांचा वाहतुकीच्या नियोजनाला अडसर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

पाइपलाइन मार्गावर

$
0
0
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेसाठी वापरण्यात येणारे पाइप कोल्हापुरात येण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेकडून पाइपचा दर्जा, क्षमता यासंबंधी तपासणी करण्यात आली आहे.

म.टा. आता दरमहा फक्त ५० रु.

$
0
0
गेल्या अडीच वर्षापासून शहराच्या अनेक प्रश्नांना थेट भिडून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालेला आणि अल्पावधीत कोल्हापूरकरांच्या मनात रूजलेला महाराष्ट्र टाइम्स कोल्हापुरात ‘नववर्ष धमाका ऑफर’ची न्यू इअर गिफ्ट घेऊन आला आहे.

आमीरच्या भावाची जमीन खोट्या दस्ताद्वारे विकली

$
0
0
खोट्या दस्ताद्वारे आमीर खानचा भाऊ मन्सूर नासीरहुसेन खान आणि शोभा राजकुमार राजपाल यांच्या मालकीची भिलार (ता. महाबळेश्वर) येथील जमीन एका महिलेने विकल्याचे उघड झाले आहे. संशयित महिला आणि तिचा मुलगा यांचा शोध सुरू आहे.

कृषी-पशू प्रदर्शनाचे छत कोसळले

$
0
0
सांगलीतील ‘रिसोर्सेस’च्या कृषी प्रदर्शनाचे छत शुक्रवारी सकाळी कोसळले. शंभरपेक्षा अधिक स्टॉल्स जमीनदोस्त झाल्याने जीव वाचविण्यासाठी अनेकजण सैरावैरा धावले. छताचे लोखंडी अँगल अंगावर कोसळल्याने कोणाचे डोके फुटले तर कोणाचे खांदे निखळले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images