Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेतजमिनीतील गुंतवणूक

$
0
0
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असताना फ्लॅट, बंगलो, प्लॉट, शेतजमीनीत गुंतवणूक करता येते. प्रत्येकातील रिटर्नस वेगवेगळे असतात. शेतजमिनीतील गुंतवणूक करताना बरेच कायदेशीर सोपस्कार पार पाडावे लागतात. विशेषत: शेतजमीन नक्की कशासाठी घेत आहोत, याचा विचार पक्का करून ती विकत घ्यावी म्हणजे योग्य तो परतावा मिळतो.

राज्य नाट्य स्पर्धा रॉक्स

$
0
0
दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरला राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र मिळावे म्हणून झगडावे लागले होते. हौशी रंगकर्मी आणि प्रायोगिक रंगभूमीची खाण असलेल्या कोल्हापूरलाच राज्य नाट्य स्पर्धेच्या केंद्रासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा लागला होता.

मुली शिक्षणापासून वंचित राहतील

$
0
0
‘स्त्रियांना प्राथमिक शिक्षण तरी मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा आग्रह महात्मा जोतिबा फुले यांनी धरला होता. मात्र, आजच्या काळात इंग्रजी शाळांची दुकानदारी थाटल्यामुळे मराठी प्राथमिक शाळा वेगाने बंद पडत आहेत.

१५७ वाहनांवर कारवाई

$
0
0
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या १५७ वाहनांवर कारवाई करून १५ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. जानेवारी ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ३०१२ वाहनांवर नियमभंगप्रकरणी ३ लाख ४७ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने प्रसिद्धीपत्रकातून दिली.

पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी

$
0
0
शहरात स्वच्छतेअभावी डेंगीचे संकट जोरात घोंगावत असताना पिण्याच्या पाण्याच्या लाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने अनेक भागात प्रचंड दूषित पाणी येत आहे. वारंवार तक्रार करूनही अशा ठिकाणांचा शोध घेतला जात नसल्याने महिला नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर जोरदार टिका केली.

जैववैद्यकीय कचऱ्याचे निर्मूलन

$
0
0
गेल्या वर्षभरापासून वादात अडकलेल्या शहरातील जैववैद्यकीय कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने इचलकरंजीतील एस. एस. सर्व्हिसेस यांची निविदा मंजूर केली आहे.

मध्यम बांधकामांना परवानगी

$
0
0
महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानगीसाठी शुक्रवारी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नवीन चौथा टप्पा तयार केला. यापूर्वी अडीचशे चौरस मीटरपासून पुढील सर्व क्षेत्रांची परवानगी आयुक्तांकडे होती.

केबलसाठीची खोदाई थांबवली

$
0
0
शहरात केबल टाकलेल्या ठिकाणचा रस्ता न करता अन्य ठिकाणी खासगी कंपनीकडून सुरु असलेली खोदाई महापालिकेने थांबवली आहे. पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी रस्ता केल्यानंतरच पुढील खोदाई करुन दिली जाणार आहे.

व्याज आकारल्यास फौजदारी

$
0
0
‘सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या शून्य टक्के कर्जावर काही विकास सोसायट्या अॅडव्हान्स व्याज आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा व्याज आकारणाऱ्या संस्थांवर सरकारच्या वतीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील,’ असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत (केडीसीसी) झालेल्या बैठकीत दिला.

पक्षीवैभव आले दारी

$
0
0
नैसर्गिक देणगी लाभलेल्या कळंबा तलावावर दाट धुक्याची चादर, सूर्यकिरणांबरोबर वाढत जाणारा पक्ष्यांचा किलबिलाट दिसू लागला आहे.

सांडपाणी थांबेना, रंकाळा सुधारेना

$
0
0
ड्रेनेज लाइन पूर्ण झाल्याने रंकाळा तलावात सांडपाणी मिसळणार नसल्याच्या अपेक्षा या आठवड्यात फोल ठरली आहे. शाम सोसायटीतून येणाऱ्या नाल्यातील सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे.

खोत, जानकर यांना संधी

$
0
0
शिवसेनेला सत्तेत स्थान देतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षालाही संधी देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात सदाभाऊ खोत व महादेव जानकर यांना समावेश होणार करण्यात यणर आहे.

कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न

$
0
0
पूर्ववैमन्यसातून संपूर्ण कुटुंबालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न कोल्हापूरमध्ये घडला. रंकाळा टॉवर परिसरातील पानारी मळा येथे राहणा-या किशोर भोसले यांच्या घरावर मध्यरात्री दोन वाजता रणजीत मोरस्कर गटाच्या गुंडांनी रॉकेलचे पेटते बोळे फेकले आणि घराला आग लावून बाहेर दरवाजाला कडी लावली.

२०१५ ला सलग सुट्ट्यांचे योग

$
0
0
काम करणाऱ्याला माणसाला आठवड्यातून एक दिवस सुट्टी हवीच. पण सलग तीन चार दिवस सुट्ट्या मिळाल्या तर धमालच. सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांचे योग आहेत. एक दिवस रजा काढल्यानंतर सलग तीन ​ते चार दिवस सुट्टीचा आनंद लुटता येणार आहे.

शाहूवाडीच्या स्ट्रॉबेरीला पसंती

$
0
0
शाहूवाडीच्या लालचुटूक स्ट्रॅाबेरीचा हंगाम बहरू लागला आहे. पुण्यामुंबईतून किल्ले विशाळगड, पावनखिंड, आंबा घाट, मार्लेश्वर, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे आदी ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकाकडून स्ट्रॅाबेरी खायला मोठी गर्दी होत आहे.

क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम विकास प्रकल्प प्रमुखांची विद्यापीठास भेट

$
0
0
क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम विकास प्रकल्पाच्या प्रमुख आणि राष्ट्रीय पशुआरोग्य इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ संशोधक डॉ. सी. यामिला मार्टिनेझ झुबियॉर, प्रकल्प तज्ज्ञ अॅदिलॅदिस ऱ्युझ बार्सिनेझ यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. कुलगुरू डॉ. एन.जे.पवार यांनी विद्यापीठाचे बोधचिन्ह, शाहू चरित्रग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

जॉब प्लेसमेंटचे मायाजाल

$
0
0
महाविद्यालयांतील जॉब प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेवून नोकरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागण्याचे प्रकार काही एजन्सींकडून सुरू आहे. कोल्हापुरातील एका नामवंत कॉलेजमध्ये नुकताच असा प्रकार घडला असून एका एजन्सीने नोकरी देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी १९ हजार रुपये मागितले आहेत.

अंधश्रद्धा रोखण्यासाठी विवेकवादाची गरज

$
0
0
‘समाजात अजूनही अंधश्रद्धा फोफावत चालली असून हे रोखण्यासाठी समाजातील लोकांपर्यंत विवेकवाद पोहचणे आवश्यक आहे. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी मांडले.

‘जीवनदायी’चे ८५ लाख पडून

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी योजनेतील विमा कंपनीने मंजूर केलेल्या ८५ लाख रुपयांचे रितसर वाटप राजर्षी शाहू गव्हर्मेंट मेडीकल कॉलेज प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. हे पैसे वाटप न झाल्याने सीपीआरमध्ये या योजनेतून होणाऱ्या शस्त्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे. या मंजूर निधीचे वाटप का केले जात नाही याचे गौडबंगाल वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

चौपदरीकरण करा, अन्यथा आंदोलन

$
0
0
कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सात हजार विद्यार्थ्यांसह रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा उद्योगपती संजय घोडावत यांनी दिला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images