Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कांद्याच्या दरात घसरण

0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी एका दिवसात ८० ट्रक कांद्याची आवक झाली होती. समितीत काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये दहा किलोचा भाव ५० ते १२० रुपये मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात असणारा २० ते २५ रुपये कांद्याचा दर १० ते १२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. मेथी, पोकळा, चाकवत व शेपूच्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मोरस्कर गटातील संशयितांची पोलिस ठाण्यात सरबराई

0
0
रंकाळा टॉवर परिसरात रॉकेलचे बोळे टाकून घर पेटवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांच्या सहकार्यानेच सरबराई सुरू आहे. एका विद्यमान नगरसेविकेचा पती आणि माजी नगरसेवक, त्याचे समर्थक सरबराई करत आहेत. पोलिसांनी मात्र, बघ्याची भूमिका घेतली आहे.

चित्रपट महामंडळ बरखास्त करा

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील गैरव्यवहार, आर्थिक भ्रष्टाचाराविरोधात मराठी चित्रपट नाट्य व्यावसायिक कृती समितीच्यावतीने जागृती अभियान राबवून महामंडळातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्याचा इशारा समितीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी दिला.

सुसंस्कृत शिक्षकांचा अभाव

0
0
‘सध्या शिक्षण क्षेत्रात सुसंस्कृत शिक्षकांचा अभाव असून ते घडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी आपले काम हे अर्थाजन म्हणून न पाहता सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान न देता मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे. तरच भविष्यात महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या गळती कमी होईल’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

गडकोटांसाठी ५००० कोटी द्या

0
0
केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने मते मागितली आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. राज्यातील गडकोट, दुर्ग व शिवाजी महाराजांच्या रहिवासाशी संबंधित सर्व वस्तू, वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी सरकारने पाच हजार कोटींची तरतूद करावी, अशी मागणी पहिल्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संस्थेतर्फे पहिल्या गोलमेज परिषदेत करण्यात आली.

एक्स्प्रेसचा वेग वाढवा

0
0
कोल्हापूर ते मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्यांचा वेग वाढवण्याबरोबरच नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करावी. यासह कोल्हापुरातील नागरिकांच्या अन्य मागण्यांचे निवेदन अरिहंत जैन फौंडेशनच्यावतीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना दिले आहे.

बूमरँग केएमटीवरच

0
0
मिळकत कमी व खर्च जादा या विसंगत समीकरणाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी केएमटीने कंत्राटदारांच्या ३० बसेस बंद केल्या. ग्रामीण भागातील लांब पल्ल्याच्या १९ गावातील फेऱ्या थांबवल्या. जूनपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे रोजचा तोटा केवळ पन्नास हजारांनी कमी झाला. या प्रयत्नांमुळे बसेस कमी झाल्या.

आता स्वसंरक्षणासाठी कृती करू

0
0
कुणी मुलाने छेड काढली किंवा कमेंट केले, मानसिक त्रास होईल असे वर्तन केल्यास किंवा एकटेपणाचा फायदा घेऊन गैरवर्तन केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हा. केवळ स्वत:वर वेळ आल्यास नव्हे तर आपल्या आजूबाजूला कुणीही मुलगी अशा छेडछाडीच्या विळख्यात अडकली असेल तर तिच्या मदतीसाठी धावून जा. स्वसंरक्षण शिबिराचे पाच दिवस संपले असले तरी आता खरी कसोटी सुरू झाल्यामुळे सडक सख्याहरींना चोख उत्तर देण्याची कृती सुरू करा.

अवतरली अजिंठा-वेरूळची लेणी

0
0
भारतीय शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणून अजिंठा-वेरूळ येथील लेणींची ओळख. जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या लेणी नेहमीच छायाचित्रकार, चित्रकार इतिहासप्रेमींना भूरळ पाडतात.

दाहक प्रश्नांची नर्मविनोदी मांडणी

0
0
हरवत चाललेली मराठमोळी संस्कृती, प्रत्येक ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, आधुनिक किचनघराची व्यवस्था सांगत ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी अनेक सामाजिक प्रश्नांची मांडणी श्रोत्यांसमोर केली.

नापासाची भीती कशाला?

0
0
दहावी आणि बारावीनंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. दहावी आणि बारावी नापास झालो म्हणून विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पुढील शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे.

योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग हवा

0
0
विविध योजनांचा आराखडा तयार करून त्याची लोकसहभागद्वारे अंमलबजावणी झाली पाहिजे. योजना यशस्वी करायच्या असतील तर लोकांचा सहभाग घ्या, अशा सूचना खासदार राजू शेट्टी यांनी खातेप्रमुखांना केल्या.

शिवरायांच्या अखंड शिल्पाचे श्रेय करमरकरांचे

0
0
राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच शिल्पकार विनायक करमरकर मोठे झाले. छत्रपती राजाराम महाराज यांनी दाखविलेला विश्वासही महत्त्वाचा होता. त्यांच्या शिल्पकलेत प्रतिभासंपन्न अविष्कार शेवटपर्यंत कायम असून अनेक शिल्पे वात्सल्य संकल्पनेशी जोडलेली आहे.

परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

0
0
परीक्षा केंद्र अचानक बदलल्याचे समजल्याने शहाजी कॉलेज या परीक्षा केंद्रावर सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दूरशिक्षण विभागाच्या एम. ए. भाग एकच्या इतिहास पेपरच्या वेळी हा प्रकार घडला. पंधरा मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्र कमला कॉलेज येथे असल्याचे समजल्याने काही विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडाली.

एफआरपी दर जाहीर

0
0
सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिला नाही तर रस्त्यावर उतरण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे, तर सरकारनेसुद्धा एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर करावाईचा इशारा दिला आहे. आता कारखाने सुरू होऊन पंधरा दिवस झाले.

मिरज अद्याप भीतीच्या छायेत

0
0
मिरजेत गॅस्ट्रोमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत गेल्यानंतर उपचार, उपाययोजनांबरोबरच राजकारणही सुरू झाले. लोकप्रतिनिधींनी पहिल्यापासून गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच प्रशासन सुस्त राहिले. नंतर युध्दपातळीवर प्रयत्न झाले. पण तोपर्यंत त्याचा फैलाव वाढला होता.

‘डीवाय’ यांच्या वाटचालीचा दस्तावेज

0
0
‘माणसांना निर्व्याज मदत करण्याचा नैसर्गिक स्वभाव हा डॉ. डी. वाय. पाटील यांचा स्थायीभाव आहे. त्यांनी असंख्य माणसांना पाठबळ दिले आहे. निर्मळ मन आणि मानवतावादी दृष्टिकोण बाळगणाऱ्या डॉ. पाटील यांनी सर्वच क्षेत्रात प्रचंड काम करुन ठेवले आहे.

चौघा अट्टल चोरट्यांना इचलकरंजीत अटक

0
0
शहर व परिसरातील घरफोड्यांप्रकरणी चौघा अट्टल चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. सागर सुनिल आमणे (वय २३), मनोज रामदास काळे (वय २५), उदय मारुती शिंदे (वय २७), अनिल बाळू चव्हाण (वय २५, सर्व रा.साईनगर, कोले मळा) अशी त्यांची नावे असून त्यांनी इचलकरंजी व शहापूर येथे दोन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून चांदीचे दागिने, मोबाईल संच असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गारगोटीत कापड दुकानाला आग

0
0
गारगोटी (ता. भुदरगड) येथे शॉर्टसर्किटमुळे कापड दुकानाला लागलेल्या आगीत १८ लाख ४८ हजाराचे नुकसान झाले. भीषण आग लागल्याने व उशिरा पर्यंत आग लागल्याचे लक्षात न आल्याने दुकान पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.

हास्यामुळे होते जगणे सोपे

0
0
‘जीवन जगताना हास्याची नितांत आवश्यकता आहे. कारण हास्यामुळे जीवन सोपे होते. परमार्थ साधनातही विनोदाला स्थान आहे. हास्य असल्यानेच मानवी जीवन परिपूर्ण वाटते, असे मत प्रा. राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ब्राम्हण सभा करवीरतर्फे तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला प्रायव्हेट हायस्कूल येथे सुरु आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images