Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ड्रायव्हर, कंडक्टरने जागवली माणुसकी

$
0
0
मंगळवारी बांबवडेजवळील खुटाळवाडी फाटा येथे वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. मात्र, अपघातस्थळी जखमींना मदत करण्यासाठी एकही खासगी वाहन थांबले नाही, पण तेथून जात असलेल्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखून माणुसकीचे नाते जपत प्रवासी सेवेचे कर्तव्य बजावत असतानाही अपघातग्रस्तांना मोलाची मदत केली.

विनापरवाना बांधकाम, अतिक्रमणे हटविली

$
0
0
राजारामपुरी विभागीय कार्यालयाने बुधवारी विनापरवाना बांधकाम व अतिक्रमणे काढून टाकली. हुतात्मा पार्क येथील रेणुका क्रेन यांचे विनापरवाना बांधकाम पाडले. उद्यमनगर येथील श्रीकांत गंगाराम भोपळे यांचे १२०० चौरस फुटांचे पत्र्याचे शेड काढून टाकले.

सांगली पालिकेसाठी तिहेरी लढत

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना गती आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

कोल्हापूर पोस्टिंग नको रे बाबा !

$
0
0
एकेकाळी बदलीसाठी 'फेव्हरिट' असलेले कोल्हापूर सध्या मात्र सरकारी अधिकाऱ्यांना नकोसे झाले आहे. कोल्हापुरात बदली नको, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत आहे.

निपाणीजवळ अपघातात चौघांचा मृत्यू

$
0
0
लग्नापूर्वी काढण्यात येणाऱ्या गुगळासह येडूर येथील वीरभद्रेश्वर देवाला निघालेल्या कुटुंबीयांची जीप उलटल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, बारा जण गंभीर जखमी झाले.

वाढदिवसाच्या खर्चाची बालसंकुलास देणगी

$
0
0
कदमवाडीतील दोन मित्रांनी वाढदिवसावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत बालकल्याण संकुलास दहा हजार रुपयाची देणगी दिली. अमोल शेंडगे व इकबाल बागवान यांनी हा वेगळा उपक्रम राबवला.

१९ गावांत तीव्र पाणी टंचाई

$
0
0
मेढ्यासह अन्य विभागांत वळीव पावसाने पाठ फिरविल्यामुळे १९ गावे १० वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू झाली असून, आठ टँकरने वरील गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

$
0
0
सातारा व सोलापूर जिल्ह्यात पूर्व मान्सून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. साताऱ्यात गुरुवारी शांत आणि अगदी संततधार पाऊस झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. सोलापुरात बुधवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजेच गुरुवारी पहाटेपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.

भाडेतत्वावरील केएमटी तोट्याची

$
0
0
केएमटीला हातभार देण्यासाठी वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या भाडेतत्वावरील बसेस केएमटीवर बोजा बनत आहेत. गेल्या महिन्यात या बसेसचे उत्पन्न खर्चापेक्षा तब्बल ३४ हजार रुपयांनी घटले आहे. यामुळे महिन्याकाठी दहा लाखांचा जादा बोजा पडला असून गेल्या वर्षभरातील अशा जादा खर्चामुळे केएमटी कंत्राटदारांचे जवळपास ३० लाख रुपयांचे देणे लागत आहे.

नगरसेवकाचे घड्याळ चोरले

$
0
0
नगरसेवक जालंदर शंकर पोवार यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या हातातील घड्याळ हिसकावून घेतल्याप्रकरणी संशयितास गुरुवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

गडकोटांसाठी सरकारवर दबाव आणू

$
0
0
तमाम शिवभक्तांच्या पाठबळावर महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य व केंद्र सरकारवर दबाव आणू, असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगड येथे गुरुवारी बोलताना दिला.

पंचगंगेतील मंदिरे पाहण्याची संधी

$
0
0
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने नदी पात्रातील मंदीरांची वैशिष्ट्ये उघड होऊ लागली आहेत. या मंदिरांवरील कोरीव काम आणि बांधकामातील कौशल्याचा वापर कशा पद्धतीने केला आहे हे यातून स्पष्ट होत आहे.

चार दिवसांपासून पाणीच नाही

$
0
0
गेल्या चार दिवसांपासून कणेरकरनगर, आपटेनगर, साळोखेनगर आदी भागात पाणीच न आल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या चार दिवसांत केवळ एक वेळ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सौजन्य महापालिकेने दाखविले आहे.

पालिका इमारतीचा लूक बदलणार

$
0
0
महापालिकेच्या हेरिटेज इमारतीचा लूक बदलण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी इमारतीची रंगरंगोटी, स्वच्छता, विद्युत रोषणाई, माहिती फलकाची उभारणी केली जाणार आहे.

'विशेष महिला' हॉस्पिटल

$
0
0
प्रसूती आणि नवजात शिशूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्ययावत असे विशेष महिला हॉस्पिटल कोल्हापुरात साकारणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आरोग्य संचालकांकडून जागेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली असून, याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

मसाई पठारावर प्लास्टिक कच-याचा ढिग

$
0
0
मसाई पठार येथील प्रसिद्ध लेणी परिसरात प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग लागला असून एकूणच हेरिटेज स्थळ तसेच, मसाई सारख्या पठारी परिसरांच्या प्रदुषणाबद्दल कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

तब्बल २० तासांनी सुमित सुखरूप बाहेर

$
0
0
विशाळगडावरील भुरभुरणाऱ्या पावसात, सुमारे ४५० फूट खोल दरीत पडलेल्या २४ वर्षीय सुमित आप्पासाहेब गुंजने (रा.चिकुर्डे,ता.वाळवा,जि.सांगली) याला समिट अॅडव्हेंचर्स व हिल रायडर्सच्या मदतीने तब्बल २० तासांनी जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

दुष्काळी भागातील पोरं हुशार

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील तब्बल ५५ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

साता-यात धरणग्रस्त व शेतक-यांचा मोर्चा

$
0
0
सातारा-जावली तालुक्यातील धरणग्रस्त व शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांसाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

'वसुली' आक्षेप प्रशासनावर

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणुकीपूर्वीची अखेरची विशेष सवसाधारण सभा गुरुवारी होऊन त्यात सरकारी लेखापरीक्षणातील 'वसुलीबाबतचे' आक्षेप प्रशासनावर ढकलण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कोणतेही धोरणात्मक निर्णय यावेळी मंजूर करता आले नाहीत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images