Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उरमोडी धरणात मुलाचा बुडून मृत्यू

$
0
0
जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील उरमोडी धरणात पाय घसरून पाण्यात पडल्याने एका अकरा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. अनिकेत अरुण यादव (रा. यादववाडी ता. सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे.

डीटीएड विद्यालयांचा तपासणी अहवाल गुलदस्त्यात

$
0
0
राज्यातील अध्यापक पदविका अभ्यासक्रमाची (डीटीएड) विद्यालयांची तपासणी अहवालाचे काम संथ गतीने सुरु आहे. डीटीएडची यंदाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. मात्र, तपासणी अहवाल आल्यावर काही विद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई-बेंगळुरू व्हाया कोल्हापूर एसी स्लिपरकोच आजपासून

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई आगारातर्फे मुंबई ते बेंगलोर शिवनेरी व्होल्वो वातानुकूलीत स्लिपरकोच सेवा बुधवार (दि. ५) पासून सुरु होत आहे. मुंबई येथून ही व्होल्वो दुपारी १ वाजता सुटेल. बेंगलोर येथे सायंकाळी ७ वाजता पोहोचेल.

व-हाडाचा टेम्पो उलटून ६ ठार, ३४ जखमी

$
0
0
लग्न आटोपून गावी परतणारा वऱ्हाडाचा टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार, तर ३४ जण जखमी झाले. मृतांमध्ये बालिकेसह तीन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमी सर्वजण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. अपघात बांबवड्याजवळील खुटाळवाडी फाटा येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.

बालवाडीच्या अर्जांची आजपासून छाननी

$
0
0
बालवाडी आणि पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज विक्रीची मुदत मंगळवारी संपली. बुधवारपासून अर्जाची छाननी सुरु होत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेत कोणत्या कारणांमुळे नाकारला, याची माहिती पालकांना आणि मनपा शिक्षण मंडळाला द्यावी लागणार आहे.

टोलमुक्तीसाठी शिवसेनेचे गणरायाला साकडे

$
0
0
कोल्हापूर टोल मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सुबुध्दी द्यावी यासाठी शिवसेनेने बुधवारी गणरायाला साकडे घातले. बिनखांबी गणेश मंदिर येथे जिल्हाध्यक्ष संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली साकडे घालून महाआरती करण्यात आली.

राजकीय कारकीर्दीतील अपयशातून टीका

$
0
0
'माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या ताब्यात आमदारकी व तालुक्यातील आर्थिक संस्था असूनही त्यांना परिसराचा विकास करता आला नाही. या अपयशयाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी माजी आमदार नरसिंगराव पाटील हे निराधार वक्तव्ये करत आहेत' असे प्रत्युत्तर पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले आहे.

जगातील सतरा उंच शिखरे सर करणार

$
0
0
'माझे यशाचे श्रेय आई-वडील व कुटुंबीयांना देतॆ. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ही अवघड कामगिरी पार पाडू शकले. या बरोबरच समस्त सातारकांनी मला जे मोठे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते.

हेमंत गायकवाडचा खून खंडणीतून

$
0
0
हेमंत गायकवाड व त्याचा भाऊ शशिकांत यांनी एक्साईज इन्स्पेक्टर राजेंद्र सावंत यांच्या मुलांकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणातून हेमंतचा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

सत्तेवर येताच सिंचन घोटाळ्याची चौकशी

$
0
0
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या सुखी व समृद्ध महाराष्ट्रावर सध्याच्या सत्ताधारी कपाळकरंट्या राजकारण्यांनी तब्बल २ लाख ८७ कोटींच्या कर्जाचा बोजा वाढवला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य महादिवाळखोरीत काढले आहे.

वीजेपासून रहा जपून

$
0
0
मान्सूनच्या प्रतिक्षेत सर्वजण असताना वादळी पाऊस दक्षिण महाराष्ट्राला झोडपून काढत आहे. चकाकणारी वीज कानठळ्या फोडणार आवाजाने छाती दडपल्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. वीज का पडते, वीज पडताना आवाज का होतो.

छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला झळाळी

$
0
0
रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून मंगळवारी सकाळी हा पुतळा पुन्हा खुला करण्यात आला. नूतनीकरणानंतर या पु्तळ्याला झळाळी प्राप्त झाली आहे. येथील ‌शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

पेरणीसाठी बि-बियाणे खते खरेदीला वेग

$
0
0
मागील वर्षी पाऊसमान कमी झाल्यामुळे वाया गेलेल्या खरिपाचा हंगाम यंदा चांगला जाण्याची आशा शेतकरी वर्गांतून व्यक्त होत आहे. मृग नक्षत्र सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे बळीराजाची खरिपाच्या पेरणीसाठीची लगीन घाई सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे मातब्बर काँग्रेसच्या संपर्कात

$
0
0
'सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी इतर पक्षांतील कार्यकर्त्यांची फोडाफोडी करीत आहे. अनेकांना उमेदवारीचे आणि पॅकेजचे अमिष दाखविले जात आहे. त्यांच्या आमिषांची मात्रा फार काळ टिकणार नाही.

एकाच छताखाली, एकाच दिवसी मिळाले दाखले

$
0
0
दहावी-बारावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे जिल्हा प्रशासन स्तरावरील सर्व प्रकारचे दाखले एकाच दिवशी एकाच छताखाली देण्याचा उपक्रम जिल्हा आणि दहा तालुक्यांच्या स्तरावर बुधवारी राबविण्यात आला.

'यशवंत वन उद्यान'च्या रुपाने कोयनाकाठ बहरणार

$
0
0
कोयनानगरजवळील रासाटी येथे 'यशवंत वन उद्यान'हा महत्त्वकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. कोयना प्रकल्पाच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कोयना काठावर आता त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

अजगर आडवे आल्याने अपघात

$
0
0
बेळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या स्कार्पिओच्या आडवे अजगर आल्याने झालेल्या अपघातात बेळगाव येथील पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत. निपाणीजवळ बुधवारी सकाळी तवंदी घाटात लकडी पूलावर ही घटना घडली. जितेंद्र बकेरी (वय-४२), पत्नी हेमाली (वय-३७), मुलगा ग्रिसीम (वय- 6), मुलगी ग्रिष्मा (वय- १२) अशी त्यांची नावे आहेत.

तत्काळ, तत्परता आणि सेवाभाव

$
0
0
शाहूवाडी तालुक्यात भीषण अपघात झाला असून, जखमींची संख्या मोठी असल्याची माहिती कळताच अख्खं सीपीआर प्रशासन पूर्वतयारीत गुंतलं. घटनेची तत्परता दाखवत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी सर्जरी, ऑर्थोपेडिक विभागप्रमुखांसह निवासी डॉक्टरांना 'आणीबाणीचा' संदेश दिला.

व्यापा-यास लुटलेल्या आठजणांना अटक

$
0
0
पुणे-बंगळुरू हायवेवर व्यापाऱ्याकडील बारा लाख रुपये लुटल्याप्रकरणी आठजणांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील ५ लाख ८३ हजार रुपये हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. लुटारूंमध्ये एकूण अकराजणांचा समावेश आहे.

डीटीईचा सर्व्हर क्रॅश

$
0
0
मुंबई तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) वतीने बुधवारी जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात टेक्निकल बोर्ड फेल ठरले. विद्यार्थ्यांनी एकाच वेळी संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी गर्दी केल्याने सर्व्हर क्रॅश झाला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images