Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'फळबाग अनुदान तातडीने मिळावे'

$
0
0
जत तालुक्यात दुष्काळाची भीषण टंचाई आहे. पाणीच नसल्याने शेतकरी हबकून गेले आहेत. अन् उपलब्ध असलेल्या पाण्याचा थेंब न थेंब वापरात आणून द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा जगवण्यासाठी धडपडत आहेत.

'वाकुर्डेला दोनशे कोटी मिळणार'

$
0
0
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यासह कराड तालुक्याला वरदान ठरणारी वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्णत्वासाठी केद्र सरकारच्या 'एआयबीपी' योजनेमधून २०० कोटींचा निधी उपलब्ध करण्यासाठी संबधित केद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

भटका, विमक्त समाजाचा मोर्चा

$
0
0
दुर्लक्षित भटका विमुक्त समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणेचा धिक्कार करत भटका समाज मुक्ती आंदोलनाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पंधरा दिवसांत जर मागण्यांबाबत विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

धनंजय महाडिकांना घेऊन प्रचाराला येणार

$
0
0
'आणखी सात महिन्यांनी धनंजय महाडिक यांना घेऊन प्रचाराला येणार आहे' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी काँग्रेसचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

सांगलीत मान्सून दाखल

$
0
0
सांगली जिल्ह्यात मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत उन्हाळी पावसासह जिल्ह्यात सरासरी ४५ मीलीमीटर पाऊस पडला आहे. चारा छावण्या किंवा पाण्याचे टँकर बंद करण्याबाबतच्या कोणत्याही सूचना सरकारकडून आलेल्या नाहीत.

'परताळा' कामाची तपासणी करा

$
0
0
रंकाळा तलावाशेजारी परताळा परिसरातील बांधकामाची तपासणी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. रंकाळा व परताळ्यातील जैवविविधता धोक्यात येऊ दिली जाणार नाही हे स्पष्ट करत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही लाटकर प्रशासनाला दिला.

गायरान जमिनीवरील मालकीसाठी मोर्चा

$
0
0
वसगडे (ता. करवीर) येथील गायरान जमिनीवर झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मजूर संघात रंगणार न्यायालयीन लढाई

$
0
0
कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्था संघातील राजकारणाने टोक गाठल्याने अखेर चेअरमन मुकुंद पोवार यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव १२ विरुद्ध एक अशा फरकाने मंजूर करण्यात आला.

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) ९०.३६ टक्केवारी मिळवित कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. कोकण विभागाने ९३.७९ टक्केवारीसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

कल विज्ञानाकडे, धेय्य इंजिनीअरिंगचे

$
0
0
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली. बहुतांशी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडे जाण्याची पसंती दर्शविली आहे.

प्लास्टिक... धोक्याची टीक टीक... !

$
0
0
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला गुरुवारी झालेल्या दमदार वळीव पावसाने कोल्हापूर शहराचे तीन तेरा वाजविले. अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. गटर, ड्रेनेज चेंबर, नाले तुंबल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. इतके सारे अनर्थ प्लास्टिकमुळे घडले.

पाल्याचे शैक्षणिक ओझे पालकांना पेलवेना

$
0
0
वह्यांच्या किमती पंधरा ते वीस टक्यांनी वाढल्या आहेत. टप्प्याटप्याने प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याने पुस्तकांच्या किमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या. दप्तर, पेन, कंपास पेटी, आदींचे दरही दहा टक्क्यांपेक्षा जास्त झाले.

कोल्हापूर विभागात ४५३ शाळा शंभर नंबरी

$
0
0
दहावी आणि बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागातील ४५३ शाळा शंभर नंबरी ठरल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींच्या प्रयत्नामुळेच या शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याचे क्रेडिट दिले.

तयारी प्रवेशाची... विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही

$
0
0
प्रवेश अर्ज असा भरा, आरक्षणाची टक्केवारी इतकी आहे, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असल्याने अर्ज शंभर टक्के योग्य भरा अशा सूचना देत शनिवारी न्यू एज्यूकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉल आणि विवेकानंद कॉलेज येथे प्रशिक्षणाचे वर्गात पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मानेंना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी

$
0
0
जकातवाडीच्या शारदाबाई पवार आश्रम शाळेतील सहा महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात बलात्काराचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी फेटाळली

$
0
0
महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील खून खटल्याच्या फेरतपासादरम्यान भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन करत द्वेषबुद्धीने साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी कैदेत ठेवल्याची लेखी तक्रार या प्रकरणातील संशयित व माजी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्याकडे केली होती. पण ही तक्रार पोलिस अधीक्षकांनी फेटाळली.

कोल्हापूरच्या धडाडीवृत्तीने दिले पुस्तक लिहिण्याचे बळ

$
0
0
'कोल्हापूरकरांच्या नसानसात अन्यायाविरोधात चीड आहे, मैत्रीसाठी जीव देतील आणि शत्रूला पळता भुई थोडी करतील. देशसेवेसाठी वाहून घेणाऱ्या सैनिकांचीही कोल्हापूरला परंपरा आहे. इथल्या वास्तव्यात अनुभवलेल्या कोल्हापुरी धडाडीवृत्तीतच माझे सैनिक माझा लढा हे पुस्तक लिहीण्याची प्रेरणा मिळाली' असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख आणि अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल मेजर जोगींदर सिंग यांनी केले.

NCP च्या नेत्यांची लोकसभा टाळण्यासाठी स्पर्धा

$
0
0
लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकत दिल्लीत जागा वाढवण्याचा प्रयत्न म्हणून ज्येष्ठ मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याच्या फिल्डींगला पश्चिम महाराष्टात टाळी​ मिळेना अशी स्थिती आहे. ज्यांची नावे चर्चेत येत आहेत, ते आपला हात वर करत पर्यायी व्यवस्था भक्कम असल्याचा डिंगोरा पिटत आहेत.

गगनबावड्यात मुसळधार, तर हातकणंगले कोरडाच

$
0
0
जिल्ह्यात शनिवारी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गगनबावड्यात मुसळधार कोसळला, तर हातकणंगलेत थेंबही पडला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात मात्र दिवसभर ऊन-पाऊस अशा संमिश्र वातावरणात शहरवासीयांनी भुरभुरणाऱ्या पावसाचा आनंद लुटला.

टोल लागणारच, महापालिकेनेच मार्ग काढावा

$
0
0
कोल्हापूर शहरातील रस्ते विकास प्रकल्पावर टोल द्यावाच लागणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. टोलप्रश्नी मार्ग काढावा, अन्यथा महापालिकेनेच टोलवसुली करावी. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्नही वाढेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images