Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पासपोर्ट कार्यालय कोल्हापुरातच हवे

$
0
0
दोन वर्षापूर्वी कोल्हापुरातून बंद केलेले पासपोर्ट कार्यालय पुन्हा येथेच सुरू करावे अशी मागणी पासपोर्टसाठी हेलपाटे मारलेल्या नागरिकांनी केली आहे.

तकलादू दिशादर्शक, पसरलेली खडी

$
0
0
सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या अर्धवट कामांमधील खडी पसरलेल्या रस्त्यांचा मोठा धोका आहे. या खडीवरुन दुचाकीस्वार दररोज घसरुन पडत आहेतच. पण त्याच रस्त्यांवर खोदून ठेवलेल्या गटारी तसेच शेजारील केलेली खोदाई मोठ्या वाहनांचे नियंत्रण बिघडून टाकत आहे.

डेंगीची दहशत कायम!

$
0
0
जिल्ह्यात डेंगी रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने आरोग्य विभाग शहरात प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा केला आहे. गेल्या दहा दिवसात ५६ प्रभागांत औषध फवारणी करण्यात आली आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात फवारणी होते.

सूर्यकिरणे अडखळली

$
0
0
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रविवारी ढगाळ वातावरणाचा अडथळा आला. पहिल्या दिवशी अंबाबाईच्या चरणापर्यंत पोहोचणारी सूर्यकिरणे गर्भकुटीपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळे भाविकांची मोठी निराशा झाली.

नवीन केएमटीला ‘ब्रेक’

$
0
0
पहिल्यांदा निविदा प्रक्रियेतील घोळ, त्यानंतर टाटा मोटर्सने महापालिकेच्या विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाकडे नव्याने येणाऱ्या बसेसला ‘ब्रेक’ लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कचरा उठावसाठी दीडशे कंटेनर

$
0
0
महापालिकेने कचरा उठावासाठी साधनसामग्री खरेदीचा निर्णय घेतला आहे. नवीन दिडशे कंटेनर आणि कचरा उठाव करण्यासाठी १५० तीनचाकी सायकली येत्या दोन महिन्यात आरोग्य विभागात दाखल होत आहेत. मात्र, आरोग्य निरीक्षक आणि मुकादमांच्या अपुऱ्या संख्येचा प्रश्न कायम आहे.

क्लीन सिटीसाठी ‘लोकल सर्कल’

$
0
0
स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक शहरात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे नागरी विकास खातेही सरसावले असून सोशल मीडियाचा आधार घेऊन ही मोहीम आणखी बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

...म्हणून आर. आर. पाटील रडले!

$
0
0
‘पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभार केला, तरीही कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत मला ‘ब’ वर्गानं पास केले. माझं काय चुकलं म्हणून मला कमी मते दिली?,’ अशी विचारणा कार्यकर्त्यांना करताना माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आबांचे हे अश्रू पाहून कार्यकर्तेही स्तब्ध झाले.

त्यांना फुलू द्या

$
0
0
सुजाताच्या मुलाने आत्महत्या केल्याची बातमी विनिताने मला फोन करून कळवली तेव्हा धक्काच बसला. काही सुचेनासे झाले. मग कॉलनीतल्या इतर काही मैत्रिणींना कळवले व सर्वानुमते ठरवून आम्ही सुजाताला धीर देण्यासाठी तिच्या घरी पोहोचलो.

आडव्या बाटलीला उभी करण्याचे प्रयत्न

$
0
0
मोठ्या महत्प्रयासाने व महिलांच्या पुढाकाराने आजरा तालुक्यातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाच्या गावातील दारूबंदीसाठी मतदान घेत बाटली आडवी करण्यात आली. यामुळे गावातील सर्व देशी दारू दुकाने आणि परमीट बार बंद झाले.

हत्तींच्या उपद्रवप्रश्नी सरकारला जाग

$
0
0
चंदगडसह आजरा तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरु आहे. हत्तींच्या रोजच्या नुकसानीने शेतकरी वर्ग त्रासला आहे. हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोफत फटाके व तिखट वाटप केले जाईल.

हळदीमध्ये भिंतींच्या जागेवरून मारामारी

$
0
0
हळदी (ता.कागल) येथे घराच्या भिंतीच्या जागेवरुन व्हराबंळे आणि पडवळे या दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली. यामध्ये तिघे गंभीर झाले आहेत.परस्पर विरोधी फिर्यादी मुरगूड पोलिसात दाखल्या झाल्या दोन्ही कुटुंबातील १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

बिर्ला ग्रुपच्या लिनन क्लबचे नूतनीकरण

$
0
0
प्रशस्त जागा, सजलेले शोरूम आणि प्रसन्न वातावरण अशा दिमाखात राजारामपुरी पहिल्या गल्लीतील आदित्य बिर्ला ग्रुपच्या लिनन क्लबचा नुतनीकरण सोहळा उत्साहात झाला. ओरिजनल युरोपियन लिननसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लिनन क्लबची तरुणात खास क्रेझ आहे.

साडेबारा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

$
0
0
‘चालू गळीत हंगामात साडेबारा लाख टन उस गाळपाचे श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे उद्दीष्ट असून इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला जाईल. शेतकरी हिताचा दृष्टीकोन ठेवून वेळेत ऊस बिले देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येईल.

पहिली उचल २५३५ रुपये

$
0
0
‘टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील गुरूदत्त साखर कारखाना चालू गळीत हंगामात आठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करेल. तसेच कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या ऊसास प्रतिटन २५३५ रूपये एकरकमी पहिली उचल देण्यात येईल,’ अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी केली.

अवैध प्रवासी वाहतूक रोखा

$
0
0
केमएटीच्या बस थांब्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केली जाते. त्यांना अटकाव करा. बसथांबा परिसरात मारलेल्या पट्ट्याच्या आत थांबणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करा असे आदेश सोमवारी स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांनी दिले.

ऊस नियंत्रण मंडळाला अधिकार द्या

$
0
0
ऊसाचे दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. या मंडळावर नियुक्त सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मंडळाला अधिकार देण्याची मागणी केली.

नागरिकांमुळे घोड्याला जीवदान

$
0
0
राजेंद्रनगर परिसरात नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाने मुक्या जीवाला जीवदान मिळाले. सर्वांच्या प्रयत्नांनी तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर खड्ड्यात पडलेल्या घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

शाहू चरित्र जर्मन भाषेत

$
0
0
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र जर्मन भाषेत प्रकाशित होत आहे. ग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या बुधवारी (ता.१२) शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात सकाळी अकरा वाजता होत आहे.

रोखणार ‌‌‌विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

$
0
0
अभ्यासाचा ताण, घरगुती भांडणे, परीक्षेत नापास होणे यांसह गावातील, शाळेतील किंवा प्रवासात होणारा त्रास यातून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्येत जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images