Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पट्ट्यांप्रमाणे नियमही झाले धूसर

$
0
0
शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर त्यावर पट्टे मारले गेले. पण ते पट्टे रस्ते आकर्षक दिसण्यासाठी नसून वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आहेत हे नागरिकांबरोबर बहुधा शहर वाहतूक नियंत्रण शाखाही विसरुन गेल्यासारखे शहरात चित्र आहे.

स्वच्छतेची ऐशीतैशी

$
0
0
जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय कचरापूर बनले आहे. वाढलेले गवत, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग असे चित्र या कार्यालयाच्या परिसरातील आहे.

पुन्हा बाजार समितीत गोंधळ

$
0
0
जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी सकाळी डॉ. महेश कदम यांना प्रशासक म्हणून पद स्वीकारण्याचा आदेश दिला. पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी प्रशासक समितीत दाखल झाले.

सोन्याची पत घसरली

$
0
0
सोन्याचे दर घसरत असल्याने सामान्य नागरिक आनंदी असले तरी सोनेतारण कर्जात मात्र कमालीची घट झाली आहे. अस्थिर बाजारामुळे फटका बसू नये यासाठी सोन्याच्या दराच्या निम्मेही कर्ज दिले जात नाही.

उच्चस्तरीय समिती तातडीने नेमा

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबरपर्यंत उच्चस्तरीय समिती नेमावी. एका महिन्याच्या आत उपाययोजना आखण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचा अंतरिम आदेश हायकोर्टाने सोमवारी दिला.

‘मी नथुराम...’वर बंदी घाला!

$
0
0
मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. या नाटकावर बंदी न घातल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

अभ्यासपूर्ण, निर्णयामुळे शेअर्समध्ये निश्चितपणे फायदा

$
0
0
‘निश्चित दिशा, अभ्यासपूर्ण व वेळेवर अचूक निर्णय घेतला तर शेअर्स बाजारामध्ये निश्चितपणे फायदा होतो, याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी अल्पशिक्षित व कोणताही व्यवसाय करणारी व्यक्ती या व्यवसायात चांगला परतावा मिळवू शकते.

विचित्र अपघातात निपाणीत एक ठार

$
0
0
वडाप वाहनाला वाचवण्याच्या नादात दोन ट्रकच्यामध्ये सापडून गायकनवाडी (ता. चिकोडी) येथील दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. गणपती रघुनाथ खोत (वय-४८) असे त्याचे नाव आहे.

कमी मतदानाबाबत आत्मपरीक्षण करा

$
0
0
‘सातारा-जावली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विद्यमान आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया योग्य नव्हती. सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मनापासून काम केले.

सांगलीत किरकोळ कारणावरून खून

$
0
0
घरात भांडणे लावत असल्याच्या कारणावरुन हॉटेल कामगार आकाश सुभाष घस्ते (वय २२) या तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी समोर आली.

माईघाटाच्या ‘स्वच्छतेचे भगीरथ’

$
0
0
सर्व प्रकारच्या टाकाऊ वस्तू टाकण्याचे हक्काचे ठिकाण, अशीच अवस्था शहरांतून जाणाऱ्या नद्यांची आहे. प्रत्येकाला वाटते, आपल्या एकट्याच्या एवढ्याशा टाकाऊ वस्तूंनी इतक्या मोठ्या नदीला काय फरक पडणार आहे? त्यामुळे किती जणांना, कोणी आणि कितीवेळा समजावून सांगायचे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

गणराया अवॉर्डला मुहूर्त कधी?

$
0
0
गणेशोत्सवानंतर ‘गणराया अवॉर्ड २०१४’च्या पुरस्कारांचे वितरण ताबडतोब केले जाईल, अशी घोषणा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी केली होती. मात्र, गणेशोत्सव होऊन दोन महिने उलटले तरी गणराया अवॉर्डला मुहूर्त मिळालेला नाही.

बनावटगिरीला चाप

$
0
0
सरकारने इमारत बांधकाम कामगार व इतर कामगांराच्या सोयीसुविधेसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या या कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी बांधकाम कामगारांना आता ग्रामसेवकांचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे.

माजी उपनगराध्यक्षांना जाळून ठार मारण्याची धमकी

$
0
0
येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांची दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिली. तर बंगला पेटविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बंगल्याच्या आवारात मिळालेल्या चिठ्ठीत कुराडे कुटुंबियांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने शहरात खळबळ माजली आहे.

ई-पंचायत प्रकल्पात कोल्हापूर अव्वल

$
0
0
केंद्र सरकारच्यावतीने सुरु असलेल्या ई-पंचाईत प्रकल्पामध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) या नावाने सुरु असलेल्या राज्यातील या ऑनलाइन नोंदीमध्ये ४८ लाख ९६ हजार २५५ इतक्या नोंदी कोल्हापुरातील ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेल्या आहेत.

शेअर, सोने गुंतवणुकीत समन्वय हवा

$
0
0
सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होत आहे, तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये चांगलाच उठाव आलेला आहे. इतिहास पाहिला तर शेअर बाजारात मंदी असताना सोने तेजीत असते, तर जेव्हा शेअर बाजारात तेजी असताना सोन्यामध्ये पडझड झाल्याचे दिसते.

नव्या अध्यक्षांसमोर आव्हानेच

$
0
0
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर यांची निवड झाली असली तरी त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातील पहिले आव्हान हे आपले अध्यक्षपद कायदेशीर असल्याचे त्यांना सिद्ध करावे लागेल.

‘पीयूसी’ वाहनधारकांकडून आउटडेटेड

$
0
0
प्रचंड धूर ओकणारे वाहन असूनही त्याच्यावर कारवाई होत नसल्याने वाहनधारकांनी पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) सर्टिफिकेट घ्यायचे जवळजवळ बंदच केले आहे.

किरणोत्सवाला ढगांची काजळी

$
0
0
सुमारे चार हजार ८८० लक्ष तीव्रतेने आलेले किरण अंबाबाईच्या गाभाऱ्याशी पितळी उंबऱ्याला स्पर्श करताच ढग आले आणि किरणोत्सव सोहळ्यासाठी जमलेल्या शेकडो भाविकांच्या पदरी निराशा टाकून परतले.

जातनिहाय ठरतेय दराचे गणित

$
0
0
जात वैधता प्रमाणपत्रासाठी शैक्षणिक, नोकरी या प्रकारात विभागीय जात पडताळणी कार्यालयात भ्रष्टाचार सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत दक्षता पथकाचा अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप बामणे रंगेहात सापडला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images