Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

देशमुख अकराव्यांदा विजयी

$
0
0
शहर उत्तर मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी हॅटट्रिक केली तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी सलग १२ वेळा निवडणूक जिकण्याचा इतिहास रचला आहे.

कराड, मलकापूरने चव्हाणांना तारले

$
0
0
कराड दक्षिणमधील अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठीत लढतीत कराड आणि मलकापूर शहरांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तारले आहे. प्रारंभीच्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी ४८७५ मते घेत विलासराव उंडाळकर यांच्यावर २००१ मतांची आघाडी घेतली.

कोणत्या गाडीत बसू?

$
0
0
राष्ट्रवादीची भाजपला पाठिंबा देण्याची घाई म्हणजे, लग्नाला येऊ नको म्हटले तरी, कोणत्या गाडीत बसू, अशातला प्रकार आहे, अशी टीका करीत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी केली आहे. यापुढे काँग्रेस असंगाशी संग करणार नाही, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

अंतर्गत गुणदानासाठी सॉफ्टवेअर

$
0
0
विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिकांच्या अंतर्गत गुणाची प्रक्रिया अचूक पद्धतीने होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने ‘इंटर्नल मार्क्स एन्ट्री सॉफ्टवेअर’ (आयएमईएस) विकसित केले आहे. त्यामुळे निकालाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मदत होणार आहे.

न झालेल्या भेटीची चर्चा

$
0
0
भाजपचे आमदार अमल महाडिक मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिसले आणि सर्वांचेच डोळे विस्फारले. शरद पवारांच्या भेटीला महाडिक आल्याची चर्चा वेगावली. क्षणार्धात वृत्तवाहिन्यांवर झळकलेल्या बातमीने कोल्हापुरात वेगळीच चर्चा सुरू झाली.

मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणीला वेग

$
0
0
भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून कुणाकुणाला संधी द्यायची यासंबंधी वरिष्ठ पातळीवरून चाचपणी सुरू आहे.

‘हात’च्या ३ जागा गमावल्या

$
0
0
जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकेसह अनेक साखर कारखाने, गोकुळसारखी दूध संस्था ताब्यात असतानाही काँग्रेसचा एकही उमेदवार जिल्ह्यात निवडणूक आणता आला नाही.

दिवाळीचे प्रकाशपर्व सुरू

$
0
0
घरोघरी उजळलेले आकाशकंदिल आणि पणत्यांनी अश्विन कृष्ण व्दादशीच्या वसुबारस सणाने दीपावलीची सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी तर बुधवारी नरक चतुर्दशी आहे. दिवाळी खरेदीसाठी बाजारात फील गुड वातावरण आहे आणि घरोघरी फराळाची लगबग अशा मंगलमय वातावरणात सणाची सुरुवात झाली आहे.

प्रवास महागला

$
0
0
दिवाळी सुटीनिमित्त मुंबई व पुण्याहून गावी येत असलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडूनही बसेस फुल्ल होत आहेत. रेल्वेचेही बुकिंग मिळत नसल्याने खासगी आराम बसकडे ओढा वाढला आहे. मुंबई व पुण्याहून कोल्हापूकडे येणाऱ्या बसेसचे दर दुप्पट करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवातील दान पाऊण कोटींचे

$
0
0
शारदीय न​वरात्रौत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भक्तांनी दिलेल्या विविध स्वरूपातील देणगीतून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या तिजोरीत तब्बल ८३ लाख ९ हजार ३८० रुपयांचा रोख खजिना जमा झाला. पाऊण कोटीहूनही अधिक रोख रक्कम फक्त नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या १३ लाख भाविकांकडून मिळाली आहे.

काँग्रेसचे पाईक; सेना, भाजपचे नाईक

$
0
0
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात हात-पाय पसरताना याच पक्षांच्या संस्कृतीत वाढलेल्या नेत्यांना आपल्या तंबूत आणून शिवसेना, भाजपने आपला झेंडा फडकला. पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते लढवून पराभव किती दिवस सहन करायचा, असा सवाल करत सेना, भाजपने राजकीय सोय म्हणून उसन्यांना संधी देऊन आपला डाव यशस्वी केला.

अंबाबाईच्या शालू साडेपाच लाखांना

$
0
0
शारदीय नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला आलेल्या मानाच्या शालूचा लिलाव करण्यात आला. यावेळी पाच लाख पंचावन्न हजारांची अंतिम बोली लावत हालेवाडी (ता. आजरा) येथील शुगर ट्रेडिंग व्यावसायिक मानसिंग गणपतराव खोराटे यांनी घेतला.

सर्किट हाउसची शताब्दी

$
0
0
बालपणीच आलेल्या वैधव्यामुळे कुढत न बसता आधुनिक स्त्री शिक्षणाचा विचार पेरणाऱ्या इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या कारकीर्दीचा साक्षीदार असलेल्या सर्किट हाउसला शंभर वर्षे झाली. कोल्हापुरातील अनेक देखण्या इमारतींपैकी एक असलेल्या या इमारतीचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी घातला होता.

कास पठारावर सुरक्षा रामभरोसे

$
0
0
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या कास पठारावर आठ दिवसांपूर्वी सांगलीहून फिरायला आलेल्या युगुलाला लुटण्याचा प्रकार घडला. भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने कासवरील पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फुलेवाडीजवळ रस्त्याला भगदाड

$
0
0
रस्ते विकास प्रकल्पातंर्गत आयआरबीने तयार केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याच्या कारणावरून टोल विरोधी कृती समितीकडून आंदोलन सुरू असतानाच रंकाळा-फुलेवाडी रोडवर सुमारे शंभर मीटर रस्ता खचला. शंभर मीटर लांब आ​णि अडीच ते तीन फूट रूंदीचे भगदाड पडल्यामुळे फूटपाथ आ​णि मुख्य रस्ता दुभंगला आहे. त्यामुळे काही ठिकाणी फूटपाथ आणि रिटेनिंग वॉलही कोसळली आहे.

ऊसतोडणी मजूर अद्याप गावातच

$
0
0
गेल्यावर्षी दुष्काळामुळे जवळपास महिनाभर आधी येऊन थांबलेले ऊसतोडणी मजूर यंदा मात्र निवडणूक, पाठोपाठ आलेल्या दिवाळीमुळे अजून आपापल्या गावातच आहेत. त्यामुळे कारखान्यांनी बॉयलर पेटवले असले तरी परिसरात मात्र अजूनही हंगामाची चाहूलही लागलेली नाही.

नगरसेवकांना घरभेदीपणा भोवणार

$
0
0
प्रभाग उत्तरेत परंतु प्रचारासाठी दक्षिणेत, काहीजण पक्षशिस्त मोडून विरोधी उमेदवाराच्या प्रचारात तर काही थेट प्रतिस्पर्धी उमेदवारासोबत. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधातील हा घरभेदीपणा नगरसेवकांना आता चांगलाच भोवणार आहे.

आजरेकरांची भूमिका निर्णायक

$
0
0
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या काट्याच्या लढतीत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या संजय घाटगेंना पराभूत केले असले तरी या मतदारसंघाला जोडलेल्या उत्तूर विभागात मुश्रीफ यांनी दाखविलेली बेरजेच्या राजकारणाची मुत्सद्देगिरीच कामी आल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे.

आजरा सूतगिरणीचा कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनस

$
0
0
आजरा येथील अण्णा-भाऊ आजरा सहकारी सूतगिरणीतर्फे यवर्षाकरीता सूतगिरण कर्मचा-यांना १६ टक्के बोनस देण्यात येत असल्याची माहिती वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक अशोक चराटी यांनी दिली. सूतगिरणीच्या विस्तारीकरणातील मशीनरीचे पूजन अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी यांच्या हस्ते झाले.

गडहिंग्लज कारखाना सुस्थितीत

$
0
0
‘एखादा कारखाना बंद पडला तर शेतकरी व कामगारांचे काय हाल होतात याचे ‘दौलत’ हे उत्तम उदाहरण आहे. मात्र सुदैवाने गडहिंग्लज कारखान्याच्या बाबतीत ही वेळ आली नाही. ब्रिस्कच्या माध्यमातून आजचा दिवस पाहायला मिळतो आहे,’ असे प्रतिपादन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images