Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मेहुण्या-पाहुण्यांची युती नाकारली

$
0
0
चंदगड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या उमेदवार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचे उमेदवार नरसिंगराव पाटील यांनी मेहुणे गोपाळराव पाटील यांच्याशी केलेल्या युतीला मतदारांनी नापसंती दर्शविल्याचे निकालावरुन दिसते.

आंबा, विशाळगड पर्यटकांनी गजबजला

$
0
0
दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाल्याने पर्यटकांनी निसर्गरम्य ठिकाणांना अधिक पसंती दिली आहे. निसर्गसमृद्ध आंबा गिरीस्थान, किल्ले विशाळगड आणि साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या रणसंग्रामातील पावनखिंड ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून ऐतिहासिक बाज ठेवलेल्या पावनखिंडीविषयी पर्यटकांना खास आकर्षण वाटू लागले आहे.

सार्वजनिक परिवहनला बळकटी हवी

$
0
0
कोल्हापुरातील वाहनांची संख्या प्रचंड संख्येने वाढत आहे. तुलनेने रस्ते, पार्किंगची सुविधा काहीच होत नाही. ही विसंगती टाळण्यासाठी सार्वजनिक परिवहन उपक्रमांचा वापर हा सर्वात चांगला पर्याय आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना मंत्रीमंडळात अथवा पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

लक्ष हंगामाकडे

$
0
0
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऊस गळीत हंगामाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे.

चार डॉक्टरांना डेंगी

$
0
0
छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांना डेंगीची लागण झाली आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने सीपीआर हॉस्पिटलची पाहणी करून स्वच्छतेबाबत सूचना देऊनही राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपाआर प्रशासन ढिम्म राहिल्याने संताप व्यक्त होत आहे.

बनवाबनवी चालणार नाही

$
0
0
‘जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करत असताना पोलिस प्रशासन मात्र निष्क्रीय व निष्काळजीपणे प्रश्न हाताळत आहे. कोल्हापुरात बनवाबनवी चालणार नाही. वर्दीची शान आणि कायद्याचा मान राखायचे सोडून आयआरबीची वकिली कशाला करता? आयआरबीच्या रांजणात पाणी भरायला सरकारी पगार घेता का? पोलिसांच्या अशा वर्तनाचा आणि आंदोलनकर्त्यांशी केलेल्या व्यवहाराचा जबाब द्यावा लागेल,’ असे खडेबोल टोल विरोधी कृती समितीचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल व शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना सुनावले.

आयआरबीविरोधात गुन्हा

$
0
0
आयआरबीविरोधात गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी फुलेवाडीजवळ रस्त्याला भगदाड पडल्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाला होता. याविरोधात आंदोलन करीत टोल विरोधी कृती समितीने आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

किल्ल्यांसाठी चढाओढ

$
0
0
दिवाळीची सुटी आणि बालचमूंचा किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणीचा कार्यक्रम असे अतूट नाते आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत गडकिल्ल्यांना विशेष स्थान आहे. सुटीचे निमित्त साधत उपनगरातील बालचूमंच्या गटांनी किल्ले साकारण्याचा आनंद घेतला आहे.

मोहरम महिन्याला सुरुवात

$
0
0
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मोहरमला सुरुवात झाली असून कुदळ पाडण्याचा विधी शनिवारी विविध ठिकाणी धार्मिक वातावरणात झाला.

‘...तरच भावी पिढी निरोगी, सुदृढ आणि कार्यक्षम’

$
0
0
‘३०० वर्षांपासून नवजात अर्भकाची काळजी घेतली जात होती. बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्याच्या वातावरणात नवजात अर्भकाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांच्या बरोबरीनेच पालकांनीसुद्धा जबाबदारीने अर्भकाची काळजी घेतली तरच भावी पिढी निरोगी, सुदृढ आणि कार्यक्षम घडेल,’ असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू नवजात शिशू व बाल शल्यचिकित्सक डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केले.

पोलिस ठाणी होणार सुविधांयुक्त

$
0
0
जिल्ह्यातील पोलिस ठाणी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्याचा परिणाम कामकाज तसेच आरोग्यावर होत असल्याने पोलिस ठाण्यांमध्ये स्वच्छ पाणी करणारी यंत्रे, टीव्ही व प्रिंटर देण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. २८ पैकी १५ पोलिस ठाण्यांत या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत.

मुहूर्ताच्या गुळाला ४७०० चा भाव

$
0
0
दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताने काढण्यात आलेल्या सौद्यात गुळाला फक्त ४७०० रुपयांच्या भाव मिळाला. विजयादशमीला काढण्यात आलेल्या दरापेक्षा ४०० रुपयांचा भाव यावेळी कमी मिळाला आहे. यामुळे पुढील हंगामात गूळ उत्पादकांना किती भाव मिळणार याचे संकेत मिळाले आहेत.

‘सिंगल डोनर प्लेटलेट’च्या मागणीत शहरात वाढ

$
0
0
पावसाळा संपल्यानंतर डेंगीसह विविध विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढ्यांमधून ‘सिंगल डोनर प्लेटलेट’ ची (एसडीपी) मागणी वाढू लागली आहे. शहरातील पाच रक्तपेढ्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

माझ्या प्रकृतीबाबतच्या अफवा खोडसाळपणातूनच

$
0
0
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीबाबत सोशल मी‌िडयावरुन उलटसुलट अफवा पसरवणाऱ्या अज्ञातांविरोधात शनिवारी शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. भूषण पाटील (रा. वाळवे खुर्द, कागल) व सोनाळी (ता.कागल) चे सरपंच सत्यजित पाटील यांनी ही तक्रार नोंदवली आहे. याबाबत सायबर क्राईमखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अपयशाचा धनी कोण ?

$
0
0
पक्षाला दणदणीत यश मिळवून देण्याची ज्यांची जबाबदारी होती, त्या विविध पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची विधानसभेसाठी दांडी उडाली आहे, त्यामुळे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अपयशाचा अहवाल द्यायचा तरी कसा या संभ्रमात पाच जिल्हाध्यक्ष आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील शक्य

$
0
0
भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगावल्या असताना मुख्यमंत्रीपदाबरोबरच प्रदेशाध्यक्षपदासाठीही जोरदार चर्चा सुरु आहे. विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ३० ऑक्टोबरला शपथविधी होणार असून त्यापूर्वी याबाबत निर्णय होणार आहे.

बळ‌िराजा हीच बहुजन संस्कृती

$
0
0
‘बहुजन नायक बळीराजा, बळीराम व सुभद्रा यांनी माणसांनी कसे वागावे हा आदर्श घालून दिला. हीच परंपरा देशातील बहुजनांची संस्कृती आहे. मात्र या बहुजन नायकांचा खोटा विकृत इतिहास लिहिला तरीही अभिजनांना या बहुजन नायकांचा प्रजाहितदक्ष, महिलांबाबतचा आदराचा इतिहास लपवता आला नाही. यातच बळीराजाच्या उज्ज्वल संस्कृतीचा पुरावा आहे.

डेंगीबाबत आरोग्य प्रशासन ‘सुस्त’

$
0
0
शहरात डेंगीसदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत असताना आरोग्य प्रशासन मात्र सुस्तच दिसत आहे. डेंगीसदृश्य परिसरात डासांचे नमुने किंवा अंडी नष्ट करण्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. आरोग्य सेवेचे मुख्यालय छत्रपती प्रमिलाराजे सिव्हील हॉस्पिटलचा (सीपीआर) परिसर हा डेंगीचे केंद्र असल्याचे दिसत आहे. कारण सध्या लागण झालेले रुग्ण हे सीपीआरमधीच डॉक्टर आहेत.

सर्वाधिक ध्वनिप्रदूषण राजारामपुरी परिसरात

$
0
0
एकीकडे आतषबाजी टाळून ध्वनी व वायूप्रदूषण टाळण्याबाबत प्रबोधन केले जात असताना राजारामपुरीसारख्या रहिवासी भागात लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वाधिक सरासरी ९४.३ डेसिबल ध्वनीची नोंद झाली. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्यावतीने दिवाळीच्या कालावधीत ध्वनी प्रदूषणासंदर्भात केलेल्या पाहणीत हे दिसून आले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images