Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साहित्यिक अनंत तिबिले यांचे ​निधन

$
0
0
ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील कादंबरी लेखन आणि रहस्यमय कथांच्या माध्यमातून मराठी सारस्वतांत वेगळी मुद्रा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक अनंत दत्तात्रय तिबिले (वय ८०) यांचे निधन झाले.

पूरक्षेत्रातील बांधकामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

$
0
0
पंचगंगेच्या पूरक्षेत्रात झालेली बांधकामे व अनधिकृत भराव टाकल्याचे निदर्शनास आणून देऊनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रस्ता सुरक्षा समितीत ‘गैरशिस्त’

$
0
0
रस्ता वाहतूक व सुरक्षेबाबत महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे मंगळवारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतून दिसून आले.

रस्त्यांची लागली ‘वाट’

$
0
0
कुठल्याही शहराची ओळख ही त्या शहरातील रस्त्यावरून ठरविली जाते. कोल्हापुरात प्रवेश करताना शिरोली जकात नाका ते कावळा नाका, दाभोळकर कार्नर चौकापर्यंतचा मार्ग हा शहराचे प्रवेशव्दार आहे.

सांगली, साता-यात संततधार

$
0
0
सांगली शहर आणि जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरीचे काही दिवस पावसांने विश्रांती घेतल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीही झपाट्याने खाली आली होती.

कोयना पाणलोटात जोर वाढला

$
0
0
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कराड व पाटण तालुक्यात बुधवारी पावसाचा जोर वाढूनही धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली असली तरी धरणाचे सहाही वक्र दरवाजे चार फुटांवरच स्थिर ठेवण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या भूमिकेमुळे जनावरांचे हाल

$
0
0
आटपाडी आणि जत तालुक्यांचा परिसर अद्यापही कोरडाच आहे. त्यात चार दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने छावणी चालकांना छावणी बंद करण्याची नोटीस बजावली होती.

साता-यातील मंडईत घाणीचे साम्राज्य

$
0
0
येथील महात्मा फुले भाजी मंडईत व्यापाऱ्यांनी व भाजी विक्रेत्यांनी टाकलेल्या भाजीपाल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे टाकलेल्या भाज्या कुजल्या आहेत.

अ. ब. करवीरकरांचे आयुष्य उपेक्षित शिलालेखासारखे

$
0
0
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी आयुष्य झिजवणारी माणसं हातपाय धड असतात तोवर समाजाच्या नजरेत असतात. काम कितीही मोठं असलं तरी ते थांबलं की समाजाच्यादृष्टीने ती अडगळीत जातात.

तासगाव कारखाना गणपती संघाकडेच

$
0
0
तासगाव कारखान्याचा ताबा गणपती जिल्हा संघाकडेच राहिल, असा आदेश बुधवारी हायकोर्टाने न्या. कानडे व न्या. श्रीराम यांच्या खंडपीठाने दिला आहे.

विरोधक व सत्ताधा-यांच्या विरोधात एल्गार

$
0
0
शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सत्ताधारी व विरोधक यांनी डोळेझाक केल्याने आता त्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेऊन आंदोलन छेडले जाणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केले.

टोलविरोधी समितीला प्रतिवादी का करत नाही?

$
0
0
टोल विरोधी कृती समितीच्या आंदोलनामुळे जर रस्ते विकास प्रकल्पाच्या टोल वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसेल तर समिती व त्यातील व्यक्तींना प्रतिवादी का करत नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने आयआरबीकडे केली.

बनावट कागदपत्रांद्वारे कर्जदारांची फसवणूक

$
0
0
बनावट कागदपत्रे तयार करून हातकणंगले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सादर करून कर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पार्श्वनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह संचालकांच्या चौकशीचे आदेश पेठवडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाघ यांनी नुकतेच दिले.

फरार कांगटानीच्या जावयाला अटक

$
0
0
पोटदुखीसाठी वापरल्या जाणा-या स्पॅस्मो प्रॉक्सिवॉन या निर्बंध असणा-या औषध विक्रीप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी प्रकाश प्रतापचंद कांगटानी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमधून मंगळवारी रात्री फरार झाला.

कादंबरीकार अनंत तिबिले यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ कादंबरीकार अनंत दत्तात्रय ​तिबिले (८०) यांचे बुधवारी येथे निधन झाले. गेले तीन दिवस त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दुपारी बारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

महसूलचे लेखणी बंद आंदोलन

$
0
0
नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीच्या प्रमाणासाठी कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारी लेखणी बंद आंदोलन केले.

रेड झोनच्या ठरावाला बगल

$
0
0
रेड झोन आणि नाल्यांच्या परिसरात ‘नो डेव्हलपमेंट झोन’बाबत प्रशासनाने मांडलेल्या नवीन प्रस्तावात संदिग्धता आहेत.

‘सर्वोदय’चे मूल्य १४६ कोटी

$
0
0
आमदार संभाजी पवार गटाला सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला १४६ कोटी ८० लाख रुपये मोजावे लागतील.

‘MBBS’च्या ५० जागा वाढल्या

$
0
0
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील आठ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’च्या प्रत्येकी ५० अशा एकूण ४०० जागा वाढवल्या आहेत.

कोयना परिसरातील पर्यटनाला गालबोट

$
0
0
कोयनानगर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र गेल्या काही वर्षापासून येथे येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांकडून हुल्लडबाजीचे प्रकार होत असल्याने पर्यटनाला गालबोट लागत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>