Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चित्री प्रकल्प भरला

$
0
0
आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प अखेर सोमवारी भरला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी महिनाभर आधीच हा प्रकल्प भरला असल्याचे विभागीय पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले.

ठेवीदारांनी वाचला अडचणींचा पाढा

$
0
0
‘आता आशा संपत चाललीया... पोटाला चिमटा काढून पै-पै साठवलेली रक्कम अडकून पडलीया. म्होरं सणवार हाईत... तुम्ही गडहिंग्लजचं ‘सायेब’ हाईसा, तवा आतातरी आमचे पैसे द्या’,अशा ऐनापूर (ता. गडहिंग्लज)येथील चन्नव्वा स्वामी यांच्या आर्त विनवणीमुळे शिवाजी सहकारी बँकेचे प्रशासक रंजन लाखे काहीकाळ निरुत्तर झाले.

कळंबा कारागृहात डासांची ‘दहशत’

$
0
0
बॉम्बस्फोटातील कुख्यात अतिरेकी, मुंबईतील नामचीन गँगस्टार, खुनाच्या प्रकरणातील आरोपी... ही मंडळी गुंड प्रवृत्तीची म्हणून ओळखली जातात. कैदी म्हणून तुरुंगात शिक्षा भोगतानाही त्यांचा दरारा कायम असतो.

निम्म्या नगरसेवकांकडून पर्यावरण अहवाल बेदखल

$
0
0
महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात शहराच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालाच्या सादरीकरणाच्यावेळी सोमवारी ४७ नगरसेवकांनी दांडी मारली.

नदी- नाल्यांशेजारी बांधकामाला परवानगी

$
0
0
नाल्याशेजारील व रेडझोनमधील बांधकामाला धक्का लागू नये म्हणून महापालिकेच्या नगररचना विभागाने नाल्यापासून ३० फूट तर नदीपासून ५० फूट अंतरावर बांधकामास परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

पंचगंगेत तरुण वाहून गेला

$
0
0
कुरूंदवाड येथे पंचगंगा नदीत पोहायला गेलेला तरूण वाहून गेला. अक्षय किशोर पाटील (वय १९, रा.कुरूंदवाड) असे या तरूणाचे नाव आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

‘दौलत’ रेणुका शुगर्सकडे?

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना रेणुका शुगर्सकडे चालविण्याला देण्यासंदर्भात सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेली बैठक सकारात्मक झाली.

शाहू जन्मस्थळाचे काम बंद पाडले

$
0
0
राजर्षी शाहू जन्मस्थळाचे नुतनीकरणाचे काम बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काम बंद पाडले.

‘पाट्या’ टाकल्याने पुन्हा खड्डेच

$
0
0
डांबर ओतून खड्डा खडीने भरुन घेणे इतकेच पाट्या टाकण्यासारखे काम महापालिकेकडून पॅचवर्कबाबत होत असल्याने रस्त्यांची पातळी बिघडून पुन्हा रस्ते उखडण्याचे प्रकार होत आहेत.

उठता है धुआँ यहाँ!

$
0
0
‘जो पितो सिगरेट, त्याची पडेल विकेट’ असे जरी म्हटले जात असले तरी सिगारेट ओढणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात दररोज सुमारे चाळीस हजार सिगारेटची पाकिटांची विक्री पानपट्टी आणि किरकोळ विक्रीच्या दुकानांतून होत आहे.

बारा जणांना जन्मठेप

$
0
0
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या इस्लामपूर येथील राष्ट्रीय हॉकीपटू महेश व उमेश जाधव बंधू खून खटल्यातील मुख्य आरोपी इस्लामपूरचा माजी उपनगराध्यक्ष जयवंत आनंदराव पाटील व त्याचा सख्खा भाऊ माणिक आनंदराव पाटील यांच्यासह बारा जणांना जिल्हा सेशन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जात पडताळणीसाठी रांगा!

$
0
0
सरकारी कर्मचाऱ्यांना जातपडताळणी वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली ३१ जुलैची मुदत जवळ आल्याने सोमवारी सामाजिक न्याय भवनचा परिसर गजबजून गेला होता.

दहा मिनिटांत खिचडी तयार

$
0
0
माध्यान्ह भोजनातून विषबाधा होण्याचा धोका टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने इन्स्टंट खिचडी विकसित केली आहे. आता या मिश्रणाचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

कोल्हापुरात हवे ‘आयटी पार्क’

$
0
0
आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरने कोल्हापुरात स्वतंत्र आयटी पार्क उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे.

कृती‌शिलतेचे धडे देणारी शाळा

$
0
0
कागल तालुक्यातील व्हन्नूर विद्या म‌ंदिर 'अ' श्रेणीतील जिल्हा परिषदेची शाळा. येथे असलेले नऊ शिक्षकांचे चांगले टीम वर्क आहे. २२६ विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत १ ली ते ७ वीच्या वर्गांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. उपक्रम, प्रयोग, प्रत्यक्ष अनुभवातून संकल्पना शिकवण, ई-लर्निंग आणि सामाजिक अनुभूतीतून संस्कार देणारी ही शाळा.

राजर्षींचा सच्चा वारस

$
0
0
छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म ३१ जुलै १८९७ रोजी झाला. १ मे १९२२ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला आणि २६ नोव्हेंबर १९४० रोजी त्यांचे निधन झाले. अवघ्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विकासविषयक संकल्पनांचा विस्तार केला.

साखर उद्योग आणि छत्रपती राजाराम

$
0
0
छत्रपती राजाराम महाराज यांची आज (३१ जुलै) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या आखलेल्या धोरणांपैकी साखर कारखानदारीसंबंधीचा ऊहापोह... कोल्हापूर संस्थान ऊस शेतीबाबतीत आघाडीवर होते. कोल्हापूरचा गूळ भारतात प्रसिद्ध आहे. १९३१ साली सरकारने साखर उद्योगाबाबत सहानुभूतीचे धोरण स्वीकारले.

मोनालिसाचे चित्र पडले पाच हजाराला

$
0
0
या वर्षीच्या मे महिन्यात आम्हा ४४ जणांसह युरोप सहलीला गेलो. या टूरमध्ये आम्ही नऊ देश पाहणार होतो. त्याची सुरूवात झाली इंग्लंडपासून. एवढा मोठा देश पाहण्यासाठी टूर कंपनीने आम्हाला एकच दिवस दिला होता. त्यामुळे पुढ्यात पक्वान्न वाढले आहे आणि एका मिनिटात ते खाऊन दाखवा असे म्हटल्यासारखे होते.

चिपळूणकर यांना पुरस्कार

$
0
0
नागदेववाडी येथील प्रताप चिपळूणकर यांना यंदाचा कृष्णा कृ‌षी साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला. सांगलीच्या कृष्णा काव्य गुंजन मंचतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनी १६ ऑगस्टला सांगली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

'वैद्यकीय अधीक्षक देशमुखांना निलंबीत करा'

$
0
0
पन्हाळा येथील उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक सुप्रिया देशमुख रूग्णांना उर्मट मानास्पद वागणूक देत असल्याने त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी ब्लॅक पँथरने केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>