Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खड्डेमय कोल्हापूर

$
0
0
कोल्हापूर शहरात प्रवेश करताना आयआरबी कंपनीने तयार केलेल्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील खडबडीत रस्ते लागल्यावर आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे बाहेर गावच्या वाहनचालकांना लक्षात येते. आयआरबीने तयार केलेल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते रस्ते संपले की पुन्हा सुरू होते खड्ड्यांची मालिका.

शाहू कॉलेज देणार विद्यार्थ्यांच्या हाताला काम

$
0
0
शिकायची इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थिती नाही. काम करायचे आहे पण संधी नाही अशा गरजू विद्यार्थ्याच्या मदतीला राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजने मदतीचा हात दिला आहे. सामान्य कुटुंबांतील मुलांची आर्थिक ओढाताण होऊ नये यासाठी कॉलेजमध्येच चार तास काम व त्या मोबदल्यात प्रति तास दहा रूपये अशी योजनेचे स्वरूप आहे.

निकृष्ट काम हाच वादाचा विषय

$
0
0
कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस अर्थात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा विविध सामाजिक संघटनांचा आक्षेप मान्य व्हावा अशी स्थिती जन्मस्थळावर आहे. जन्मस्थळाच्या इमारतीवरील कौले, भिंतींना दिलेला गिलावा आणि वास्तूरचनेत केलेला बदल हा एखाद्या रिसॉर्टसारखा झाला आहे.

इस्लापूरमधील रस्त्यांसाठी ८५ कोटीचा निधी

$
0
0
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामासाठी ८५ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

चारा छावण्यांबाबत प्रशासनाला लेखी आदेशाची प्रतीक्षा

$
0
0
‘चारा छावण्या सुरू ठेवण्याबाबत अद्याप सरकारचे लेखी आदेश आलेले नाहीत. परंतु, पालकमंत्र्यांनी सूचना दिल्याने काही दिवस चारा छावण्या सुरू राहतील,’ असे जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांनी सांगितले.

संशयित सीरियल किलर रत्नागिरीत ‘अॅडमीट’

$
0
0
संशयित सीरियल किलर दिलीप लहरिया याला गुरूवारी सकाळी उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. ‌लहरिया याच्यावर उपचाराची गरज असल्याचा रिपोर्ट पुण्याच्या ससून जनरल हॉस्पिटलने दिला होता. या रिपोर्टच्या अनुषंगाने मुख्य न्यायाधिश पाटील यांनी बुधवारी त्याच्यावर उपचाराचे आदेश दिले होते.

अंगणवाडी सेविकांच्या साड्या खरेदीवरून अधिकारी धारेवर

$
0
0
भुदरगड पंचायत समितीत ड्रेसकोड साठी केलेल्या साड्या खरेदी प्रकरणात दोन लाख रुपयांचा ढपला पाडल्याच्या आरोपावरून पदाधिकारी - अधिकाऱ्यांत पंचायत समिती कार्यालयात चांगली जुंपली. मागील आठवड्यात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्याकडून ड्रेसकोडच्या नावाखाली प्रत्येकी ४५० जमा करून ८० ते १०० रुपये किमतीच्या साड्या खरेदी केल्या होत्या.

चंदगडला दोन पूल पाण्याखाली

$
0
0
तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असून ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील दोन बंधारे व दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे चंदगडला दोन, अडकूर, मोरेवाडी, व गंधर्वगडला प्रत्येकी एक घराची भिंत पडल्याने सुमारे २ लाख १२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

‘अण्णा भाऊं’च्या साहित्यात शोषितांच्या वेदनांचा हुंकार

$
0
0
‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून शोषितांच्या वेदनांचा हुंकार उमटतो. त्यांनी दलित, उपेक्षित, कष्टकरी, कामगार वर्गाचा लढा उभा केला. देवाभोवती आ​णि देवळाभोवती फिरणारे साहित्य, अण्णा भाऊंमुळे माणसाबद्दल बोलू लागले. त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी भाषा समृध्द केली’ असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

इचलकरंजी पालिकेच्या सभेत गदारोळ

$
0
0
नगरपालिकेतील विविध कामांची टक्केवारी, विषयावरील चर्चेवेळी होणारे वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी अशा गदारोळातच येथील पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी झाली. लक्षवेधी विषयांवर तब्बल दोन तास आणि मूळ विषयावर एक तास चर्चा झाल्यानंतर सत्तारुढ काँग्रेस आघाडीने कचऱ्याचे कंटेनर खरेदी, वारणा नळ पाणीपुरवठा योजना व दुकानगाळ्यांचा लिलाव हे विषय बहुमताने मंजूर करुन घेतले.

चित्रपट महामंडळाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशीची मागणी

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करत चित्रपट महामंडळ संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारपासून उपोषणाला सुरूवात झाली. महामंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर संचालकांच्या फोटोंसह लावण्यात आलेल्या फलकावर संघर्ष समितीने पुण्यातील कार्यक्रमाला केलेल्या खर्चाबद्दल उधळपट्टीचा आरोप करत त्या खर्चाचा तपशीलही प्रसिध्द केला आहे.

राधानगरीचे दोन दरवाजे पुन्हा खुले

$
0
0
राधानगरी तालुक्यात आजही जोरदार अतिवृष्टी सुरु असून गेल्या दहा दिवसात शंभरच्या सरासरीने १०८९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा दुसऱ्यांदा खुले झाले असून तारळे,शिरगाव बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासातही १४६ मी.मी पाऊस पडला.

विद्यार्थ्यांनो, सांगा देवी-देवतांची नावे

$
0
0
शासनाने जातवैधतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून देवी-देवतांची नावे विचारली आहेत. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आजही देशात आडनावावरून जात तर, व्यवसायावरूनही धर्म ओळखले जातात. मात्र, अशाप्रकारे जात वैधतेसाठी थेट देवी-देवतांची नावे विचारल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

वाईच्या गणपती मंदीरात पाणी

$
0
0
जिल्ह्यात आणि प्रामुख्याने महाबळेश्वर आणि वाई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदीला पूर आला असून, वाई घाटावरील प्राचीन गणपती मंदिरात पाणी शिरले आहे. मंदिरास पाण्याने वेढा घातला आहे. पाणी गणपती मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचले आहे. पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळित झाले आहे.

कोयनेचे वक्र दरवाजे चार फुटांवर

$
0
0
कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात पाऊसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहाही वक्र दरवाजे चार फुटांवरच स्थिर ठेवून आणि पायथा विद्युत गृहासह २५ हजार ६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

सरकारी अॅम्ब्युलन्सला ‘जीपीएस’

$
0
0
एखादा अपघात किंवा गंभीर घटनेवेळी तत्काळ उपचारासाठी सरकारी अॅम्ब्युलन्सची मागणी केली तर त्याला असंख्य कारणे सांगून अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे भासवले जाते. अनेकदा अॅम्ब्युलन्सशी संबंधित घटक थापा मारून नागरिकांना फसवतात असाच प्रकार असतो. सरकारी यंत्रणेला जाब कोण आणि कसा विचारणार? हा सर्वसामान्यांसमोरचा प्रश्न.

टोमॅटोच्या सालीपासून लायकोपीन

$
0
0
टोमॅटोची वाया जाणारी साल आणि बियांमध्ये लाल रंगाचा लायकोपीन नावाचा घटक असतो. तो स्तनाच्या आणि आतड्याच्या कॅन्सरवर गुणकारी ठरू शकतो, तसेच मेडीसीनमध्ये वापरला जाणारा नैसर्गिक लाल रंग तयार होत असल्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने विकसित केले आहे.

साड्या खरेदीवरून अधिकारी धारेवर

$
0
0
भुदरगड पंचायत समितीत ड्रेसकोड साठी केलेल्या साड्या खरेदी प्रकरणात दोन लाख रुपयांचा ढपला पाडल्याच्या आरोपावरून पदाधिकारी - अधिकाऱ्यांत पंचायत समिती कार्यालयात चांगली जुंपली.

नागरिकांचा रस्त्यासाठी इचलकरंजीत मोर्चा

$
0
0
प्रभाग क्रमांक ९ मधील पि. बा. पाटील मळा परिसरातील रस्त्यांची नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनीयांच्या आश्वासनानंतरही दुरुवस्था कायम आहे.

बनावट ओळखपत्र : आणखी दोघांना अटक

$
0
0
ज्येष्ठ नागरिकत्वाचा लाभ मिळवून देतो असे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी वशिष्ठ पंढरीनाथ शिंदे (वय ५५, रा.बोधेगाव, ता.परळी, जि.बीड) व नारायण बलभीम खोडवे (वय १९, रा. आचार्य टाकळी, ता.परळी, जि. बीड) यांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images