Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लाइफलाइन’सांभाळत ध्येय

$
0
0
‘दादा आशीर्वाद पाहिजे तुमचा. नाही तर, सगळा गोंधळ होतोय बघा,’ अशी विनंती कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डाव्या लोकशाही समितीचे उमेदवार रघुनाथ कांबळे वर्तमानपत्र टाकत भेटणाऱ्या प्रत्येकाला करतात.

‘मटा बिग रिवॉर्ड्‍स’ची धूम

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा ‌बिग रिवॉर्डस्’ योजनेतील पहिला साप्ताहिक लकी ड्रॉ मंगळवारी सकाळी राजारामपुरी येथील व्यकंटेश्वरा गारमेंट्समध्ये काढण्यात आला. या लकी ड्रॉमधून २० भाग्यवंत विजेते निवडण्यात आले.

उमेदवारांचा टीकेवरच जोर

$
0
0
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, पंधरा दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखलफेक करण्याचे लोण सर्वच ठिकाणी दिसते.

प्रचारावर फिरले पाणी

$
0
0
आठवड्याच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शहराला झोडपून काढले. यावेळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासोबत सुटलेल्या जोरदार वाऱ्याने पावसाची तीव्रता आणखी वाढवली. दिड तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन ठप्प करुन टाकले.

प्रश्नांसाठी या निष्पक्ष मंचावर!

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीतील व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या धबाडग्यात शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा मूळ मुद्दा कोल्हापूरच्या विकासाचा झाला पाहिजे, अशी महाराष्ट्र टाइम्सची भूमिका आहे.

‘जावयां’च्या प्रचारात ‘सासुरवाडी’च्या फौजा

$
0
0
‘जावई आमचा चांगला, त्याच्या प्रचाराला चला,’ अशी साद घालतच आपल्या गावाचा ‘जावई’ आमदार झालाच पाहिजे, यासाठी ‘सासुरवाडी’ची मंडळी जोरदार कामाला लागली आहेत. बहुरंगी लढती असल्याने सरासरीने ६० हजार मते ज्यांना मिळतील त्यांचा विजय नक्की आहे. त्यामुळे एक-एक मत लाख मोलाचे ठरू लागले आहे.

‘मातोश्री’च्या मर्यादा ओलांडू नका

$
0
0
‘पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरेंचा आदर करून टीका करणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून संयम राखला जात नाही. आम्हाला अफजखानाची फौज संबोधणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या मर्यादा ओलांडू नयेत,’ असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी सांगलीत दिला.

पाच वर्षांत विकास करून दाखवू

$
0
0
‘लोकसभेत जनतेने मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने सरकार दिले, त्याच प्रमाणे महाराष्ट्रात भाजपाप्रणीत समविचारी पक्षाचे स्पष्ट बहुमताचे सरकार निवडून दिल्यास पाच वर्षांत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करुन दाखवू’ असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मतदार स्लीप वाटप आजपासून

$
0
0
मतदारांना प्रशासनाच्या वतीने थेट घरात मतदार स्लीप देण्याचे काम गुरुवारपासून (ता.९) सुरु केले जाणार आहे. घरोघरी जावून प्रशासनाचे कर्मचारी स्लीप देणार असल्याने मतदारांना मतदानाच्या दिवसापूर्वीच नेमके केंद्र कळण्यास मदत होणार आहे.

निर्यातीला चालना देऊ

$
0
0
पर्यटन क्षेत्रानंतर केंद्र सरकार वस्त्रोद्योगाकडे अधिक लक्ष देत आहे. देशाचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढण्याबरोबरच येथील मालाच्या निर्यातवाढीला मदत होईल, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांनी व्यक्त केला.

अंबानी-अदानींचे अच्छे दिन

$
0
0
‘देशात फक्त अंबानी आणि अदानीसारख्या मूठभर भांडवलदारांसाठीच अच्छे दिन आले असून सामान्य नागरीकांसाठी अच्छे दिन नाहीतच. अच्छे दिनचे आश्वासन देवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा पूर्वीचा मित्रपक्ष शिवसेना यांना अच्छे दिन कुठे आहेत असा जाब सर्वसामान्य जनतेने विचारावा,’ असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य माजी खासदार नीलोत्पल बसू यांनी बुधवारी येथे केले.

जपले पोस्टाशी नाते

$
0
0
माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याअगोदर संपर्कासाठी केवळ टपाल, आंतर्देशीय पोस्टकार्ड आणि तार या संपर्क साधनांना महत्त्वाचे स्थान होते. मात्र, माहिती तंत्रज्ञानानंतर मोबाइल क्रांती घडली.

काँग्रेसच्या वनवासातून मुक्त व्हा

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या १५ वर्षांत जनतेच्या संयमचा अंत पाहिला आहे. आता या वनवासातून बाहेर पडायचे असेल तर भाजपला महाराष्ट्रात बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

लोकशाहीला हुकूमशाहीचा धोका

$
0
0
सुसंस्कृत लोक राजकारणात येत नाहीत. आले तर टिकत नाहीत. यापुढे सुसंस्कृत लोक राजकारणात आले नाहीत तर हुकूमशाहीचा धोका आहे, अशी भीती प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे व्यक्त केली.

मतदान यंत्र सांगणार ‘वेळ’

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांना टायमर सिस्टीमची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेमुळे मतदानाचा नेमका कालावधी कळणार आहे. टायमर सिस्टीममुळे मतदानाची वेळ कमी किंवा जास्त केली तर सबंधित अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा द्यावा लागणार आहे.

लुटीला ‘बंटी-बबली’ची साथ

$
0
0
फायलींवर सही करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ मिळत नव्हता. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेवटच्या एका महिन्यात अनेक अनाधिकृत फायलींवर सह्या केल्या आहेत. वर्षा निवासस्थानावर मध्यरात्री १२ ते चार या वेळेतील फुटेज पाहिल्यानंतर हे स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीच्या ‘नाकी नऊ’

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे आहे. दहापैकी कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवारच नाहीत. शिरोळ आणि चंदगडमध्ये गृहकलहामुळे पक्ष अडचणीत आहे.

कोल्हापूरचे प्रश्न ऐरणीवर

$
0
0
एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जागृत कोल्हापूरकरांच्या प्रश्नांच्या फैरींना सामोरे जावे लागले. कोल्हापूरची समस्यांच्या जंजाळातून सोडवणूक करून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भूमिका राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडली.

तुम्ही सीमेवर गेला होतात?- मोदी

$
0
0
तुम्ही संरक्षणमंत्री असतानाही पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती सुरूच होत्या. मग शरदराव, तेव्हा तुम्ही सीमेवर गेला होतात का?, असा सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांसह सर्वच टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. बारामतीतील सभेत त्यांनी पवार काका-पुतण्याला लक्ष्य केलं.

‘नोटा’चा वापर करणारः देशपांडे

$
0
0
‘राज्यातील ९४ महिला उमेदवारांना महिला लोक आयोगाने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ज्या ठिकाणी महिला नसतील तेथे नोटाचा वापर करून निषेध व्यक्त करणार आहोत,’ असे राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष अॅड. वर्षा देशपांडे यांनी जाहीर केले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images