Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कोजिमाशि’तील ‘दादा’गिरी मोडा

0
0
‘कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतील दादागिरी मोडून काढून सर्वसामान्य सभासदांच्या हाती सत्ता देण्यासाठी सभासदांनो जागे व्हा’, असा इशारा मेळाव्याचे निमंत्रक राजेंद्र रानमाळे यांनी दिला.

कोयनेचे दरवाजे दहा फुटांवर

0
0
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात ४६ हजार ७५० क्सुसेक पाण्याची आवक होत आहे.

ज्ञानेश कुलकर्णीला अमेरिकेची शिष्यवृत्ती

0
0
ज्ञानेश प्रशांत कुलकर्णी याला अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठाने पदवी शिक्षण घेण्यासाठी ८० हजार डॉलरची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.

दागिने चोरणाऱ्या संशयितास अटक

0
0
दोन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार चोरल्याच्या संशयावरुन कुणाल बाजीराव पाटील (वय २७, रा. कदमवाडी) याला शाहूपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवस कोठडी सुनावली.

थकबाकी भरा, मगच नेतेगिरी करा

0
0
‘जे. बी. पाटील यांनी पहिल्यांदा पतसंस्थेची साडेतीन लाख रुपयांची थकबाकी भरावी, मगच नेतेगिरी करावी. जे संस्थापक शिक्षक, शिपायांच्या हक्कांच्या पगाराला कात्री लावतात, ते कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था काय चालविणार?, असा टोला कोजिमाशिचे नेते दादासाहेब लाड यांनी लगावला.

वॉटरप्रूफ डांबर अडगळीत

0
0
पावसाळा आला की रस्त्यातील खड्ड्यांची चर्चा सुरु होते. मात्र उपायांची अंमलबजावणी होत नाही. यंदाही रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्याने जीवघेणे अपघात होत आहेत.

संशयितांना ४ दिवस पोलिस कोठडी

0
0
कॉलगर्ल्स पुरविण्याचे रॅकेट चालविल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांना न्यायाधीश एम. एम. बंबरे यांनी चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.

पूर ओसरू लागला

0
0
पावसाचा उघडझाप सुरु झाल्याने पंचगंगेची पूरपातळी ओसरू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत पाणीपातळी चाळीस फुटापर्यंत होती.

प्रसाद सुर्वेंवर फौजदारी करणार

0
0
नियमबाह्य पैशाची उधळपट्टी, मनमानी कारभार, परस्पर मोडलेल्या ठेवी, मुंबई कार्यालयात ठेवलेली नियमबाह्य सात लाख ७७ हजार ८३६ रक्कम या कारणास्तव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह संचालकांवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा चित्रपट महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीने रविवारी दिला.

कचरामुक्तीसाठी महापालिका सरसावली

0
0
कचऱ्यापासून खतनिर्मितीच्या प्रकल्पात हात पोळलेले महापालिका प्रशासन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी गॅसीफिकेशन पद्धतीचा अवलंब करणार आहे.

शिर्डीत तीन भिका-यांची हत्या

0
0
देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत आज सकाळी तीन भिका-यांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. १५ दिवसांपूर्वी साईनगर स्टेशनवर दोन भिका-यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी तीन भिका-यांचा खून झाल्यानं शिर्डीवासीय 'सीरियल किलर'च्या भीतीनं हादरलेत.

सत्तारूढ संचालक संभ्रमावस्थेत

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत एकत्र मोट बांधून विजय संपादन केलेल्या जागृती पॅनेलमध्ये अडीच वर्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

सत्ता शरणता आणि कर्तव्यपराङ्मुखता

0
0
सर्व विद्यापीठांना सध्या शिर्षकामध्ये उल्लेख केलेल्या दोषांनी आतून पोखरलेले आहे. लटक्या सुधारणा आणि आदेश यांच्या मलमपट्टीने उपाय होईल असे दिसत नाही.

पुन्हा लढा ‘स्वाइन फ्लू’शी

0
0
पावसाळा आला की स्वाइन फ्लूची धास्ती सुरु होते. या संसर्गजन्य रोगामुळे त्याची लागण वाऱ्याच्या वेगाने होते, असा अनुभव २००९ मध्ये आरोग्य यंत्रणेला आलेला आहे.

‘स्वाइन फ्लू’च्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज

0
0
पुण्या-मुंबईत काही थैमान घातलेल्या ‘स्वाइन फ्लू’ने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला असून, ‘स्वाइन फ्लू’ने फलटण येथे एकाचा बळी गेला, तर एकाची तब्येत गंभीर असल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार करण्यात येत आहे.

सांगली आयुक्तांविरोधात याचिका दाखल करणार

0
0
‘नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय देगावकर यांच्या विरोधात लवकरच मुंबई हायकोर्टात जनहितयाचिका दाखल केली जाणार आहे,’ अशी माहिती नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी दिली.

ऐतिहासिक धावडशीचा रस्ता खड्ड्यात

0
0
सातारा शहरापासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या धावडशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाकाय खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

२५ कोटी भूकंप निधी समितीला प्राप्त

0
0
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या खात्यात महाजनको विद्युत कंपनीकडून २५ कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याचे पत्र १९ जुलै २०१३ रोजी मिळाले आहे.

योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच

0
0
शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.

ठेकेदारांचा ‘काम बंद’चा इशारा

0
0
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून सर्वजण टक्केवारीसाठी ठेकेदार आणि मजूर संस्थांची अडवणूक करत असल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images