Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

५ कोटींचे बिल कर्नाटक ‘पाटबंधारे’ला पाठविले

$
0
0
कोयना - चांदोली धरणातून दररोज ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पाणी कर्नाटकात वाहून जात आहे. टंचाईकाळात कोयना, चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या अडीच टीएमसी पाण्याचे पाच कोटी रुपयांचे बिल पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे विभागाला पाठविले आहे.

लाच घेतल्याने महिला तलाठी अटकेत

$
0
0
शेतजमिनीच्या खरेदी पत्राची नोंद करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेताना सांगली जिल्ह्यातील अंत्री बुद्रुक (ता.शिराळा) येथील महिला तलाठ्यासह क्लार्क व शिपायाला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

पटेकरी यांचा जातीचा दाखला रद्द

$
0
0
येथील राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक जहाँगिर गणी पटेकरी यांचा बाजीगर जातीचा दाखला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द ठरविल्याचा निर्णय दिला. परिणामी पटेकरी यांचे सदस्यत्वसुध्दा रद्द झाल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

बेंच असून अडचण...

$
0
0
जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या शाळांमध्ये देण्यात आलेले बेंच ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. तालुक्याला १०० ते २०० बेंच मिळत असल्याने दहा शाळांची मागणीही पूर्ण होऊ शकत नाही.

पुराचा धोका वाढला

$
0
0
मंगळवारीसुध्दा क्षणभरही पावसाने उसंत न घेतल्याने तसेच धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी व कुंभी धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

कोयनेतून विसर्ग वाढला

$
0
0
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने धरणाचे सहाही वक्र दरवाजे मंगळवारी सकाळी दहा वाजता सात फुटांवर व दुपारी चार वाजता दहा फुटांवर उचलण्यात आले आहेत.

विद्यापीठातील कागदपत्रांचे डिजिटायझेशन

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील महत्त्वाच्या सर्व कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत साधारणतः वीस लाख कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याचे नियोजन असून आता पर्यंत ११ लाख पानांचे काम पूर्ण झाले आहे.

घरेलू कामगारांचा भरपावसात मोर्चा

$
0
0
घरेलू कामगार महिलांना पेन्शन, फंड, ग्रॅच्युईटी, साप्ताहिक सुटी, आजारपणाची रजा अशा सुविधा लागू व्हाव्यात या मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या घरेलू कामगार महिलांच्यावतीने मंगळवारी स‌हायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोबाइल गुरूजींना पुन्हा तंबी!

$
0
0
शाळेच्या आवारामध्ये आणि वर्गामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांनाही मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालण्याच्या जुन्या अध्यादेशाची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

उद्योगांच्या तक्रारी सोडवू

$
0
0
कोल्हापूरमधील उद्योग क्षेत्र हा महावितरणला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा ग्राहकवर्ग आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.

प्लॅटफॉर्मचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

$
0
0
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते हे रेल्वेबाबतही कायम आहे. मुंबई आणि पुणे येथे प्लॅटफॉर्मची उंची नसल्याने अपघात घडले. त्यावेळी रेल्वे स्थानकात उतरताना पाय प्लॅटफॉर्मवर पडेल, असे मॉडेल प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या सूचना केल्या.

चित्रपट महामंडळाला घरचा आहेर

$
0
0
गेल्या काही महिन्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मूळ कामापेक्षा दुसऱ्याच कारणांनी गाजत आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष उघडपणे सुरू आहे.

संभाव्य पूरग्रस्तांना नोटिसा

$
0
0
धोक्याच्या इशारा पातळीकडे निघालेल्या पंचगंगा नदीचे पाणी, राधानगरी धरणाचे उघडलेले पाच दरवाजे या पार्श्वभूमीवर पुराचे पाणी येत असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरासाठी इशारा नोटिसा पाठवण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले.

पंचगंगा धोक्याच्या दिशेने

$
0
0
पावसाने मंगळवारी पुन्हा जोर धरला. ‌गगनबावडा, राधानगरी, आजऱ्यासह जिल्ह्यातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पाणीपातळी चाळीस फुटापर्यंत जाऊन पोहचली.

महापालिकेची सर्व फॉगिंग मशिन बंद

$
0
0
पुराच्या पाण्यामुळे शहराला डेंगी आणि साथीच्या रोगांचा विळखा पडू लागला असताना महापालिकेची नऊ फॉगिंग मशिन बंद आहेत.

झोपडपट्या झाल्या बाकाल

$
0
0
रस्ते विकास प्रकल्प व नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते चकचकीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

शहरवासीयांत चर्चा मच्छिंद्री आणि रेडेडोहाची

$
0
0
जयंती आणि दुधाळी नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कुंभार गल्ली, सीता कॉलनी, बापट कॅम्प आदी वसाहती भीतीच्या छायेत आहेत दिसून येत होते.

माकडवाला वसाहतीत चिखल, डुकरांचे साम्राज्य

$
0
0
कावळा नाका येथील माकडवाला वसाहत म्हणजे पावसाळ्यात चिखल आणि डुकरांचे साम्राज्य असं चित्र आहे. या परिसरात चिखलांचेच रस्ते असल्यासारखी स्थिती आहे.

घरं झाली गळकी

$
0
0
गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने एस्तर पॅटर्न हायस्कूलमागे कनाननगर झोपडपट्टीत प्रत्येक घर गळकी झाली आहेत.

शाळेत मोबाइल नकोच

$
0
0
शिक्षकांनी शाळेच्या आवारात आणि वर्गात मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‌हा आदेश जुना असला तरी त्याची नव्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>