Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘रेड झोन’मध्ये नो परमिशन

$
0
0
‘रेड झोन’मध्ये अकरा मजली इमारतींना परवानगी मिळणार नाही’ असे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. रेड झोन क्षेत्रामध्ये भराव टाकून इमारत बांधणाऱ्या बिल्डरांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल याचाही पुनरूच्चारही आयुक्तांनी यावेळी केला.

कावळा नाका रेस्ट हाउसवर व्यापारी संकुल?

$
0
0
हार्ट ऑफ सिटी असलेल्या कावळा नाका परिसरातील रेस्ट हाउसच्या एक एकर जागेवर व्यावसायिक संकुल साकारण्याचा एमएसआरडीसीचा मनसुबा आहे.

शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी भरारी पथके

$
0
0
शालेय पोषण आहार चांगला मिळावा यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांचे भरारी पथक तयार करण्यात येत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पथकही तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर. वाय. अघम यांनी दिली.

पुराच्या उंबरठ्यावर रोगराईचा धोका

$
0
0
पंचगंगा नदीला पूर आल्यास पहिला फटका बसणाऱ्या सुतारवाडा, शंकराचार्य मठ, सिध्दार्थनगर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

महापालिका, IRB वर गुन्हा दाखल करा

$
0
0
टेंबलाईवाडीतील जागेवर बांधकाम करताना आयआरबी कंपनीने बेकायदेशीरपणे नैसर्गिक नाला वळवला आहे. नाला वळवल्याने त्याचा प्रवाह नागरी वस्तीतून वाहत असून लोकांच्या जीवाशी खेळ सुरु झाला आहे.

आजरा वनौषधी पार्कला उद्घाटनाची प्रतीक्षा

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच साकारण्यात आलेल्या आज-यातील वनौषधी पार्कच्या उद्घाटनाला मुहूर्तच मिळत नसल्याची चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या पार्कचे उद्घाटन करण्याबाबत तालुका कृषी विभागाने हालचाल केली होती.

शाहूवाडी तालुक्यात ३ ठिकाणची वाहतूक बंद

$
0
0
शाहूवाडी तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार होती. तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, विशाळगड, उदगिरी, शित्तुर वारुण, येळवण जुगाई या भागाला वा-यासह पावसाने झोडपले.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

$
0
0
भुदरगड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. अधिकाऱ्यांकडून टक्केवारीसाठी उशीर केला जात आहे.

२०१५ ला होणार ‘थेट’ पाणीपुरवठा

$
0
0
‘टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना अडीच वर्षांत पूर्ण होईल,’ असा विश्वास आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला.

कोरडवाहूसाठी अभियान

$
0
0
राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू असून कितीही प्रयत्न केले तरी ३० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आणता येणार नाही. त्यामुळे आता सरकारने कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेतला आहे.

राधानगरी तालुक्यात मुसळधार

$
0
0
राधानगरी धरणक्षेत्रात सोमवारीही अतिवृष्टी झाली असून धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ होत असल्याने येथील दरवाजे आता कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता वाढलेली आहे.

कोंडिग्रेतील खत कारखाना बंद करा

$
0
0
शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथे सुरु असलेल्या मांस व कत्तलखान्यातील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी कोंडीग्रे, चिपरी, निमशिरगाव येथील नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

राधानगरीचे दरवाजे खुले होण्याची शक्यता

$
0
0
पावसाचा जोर ओसरला असला, तरी पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. तासाला एक इंच पाणी वाढत असल्याने सोमवारी रात्री उशिरा राजाराम बंधाऱ्यावर इशारा पातळीपर्यंत पाणी आले होते.

नाले बंदिस्तीचा परिणाम

$
0
0
पुराच्या पाण्याची फूग वाढत जाईल, तसा अरुंद केलेल्या नाल्यांचा धोका वाढत चालला आहे. अद्याप पंचगंगेने इशारा पातळीही ओलांडली नसताना नाले बंदिस्तीमुळे बाजूच्या परिसरात पाणी पसरू लागले आहे.

बनियन-थ्री फोर्थ घालून पोस्टमन कामावर

$
0
0
केंद्र सरकारकडून दिलेल्या गणवेश, बूट व छत्री पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोस्टमन कर्मचाऱ्यांना पुरविलेल्या नाहीत. तांत्रिक कारणे सांगून या वस्तू परत पाठविण्यात आल्या असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यातील अडीचशे पोस्टमन कर्मचाऱ्यांनी टीशर्ट व थ्री फोर्थ घालून कामकाज केले.

राजाराम तलावाजवळ ‘ग्रास झोन’

$
0
0
ओसाड असलेल्या राजाराम तलाव परिसरात गेल्या दहा वर्षात १७ हजार वृक्षारोपणातून जंगल बाळसे धरत आहे. पण परिसरातील पाळीव जनावरे तिथे चरण्यास येत असल्याने या जंगलाची वाढ खुंटली जात आहे.

दरवळतोय अत्तराचा सुगंध!

$
0
0
दिवसभर कडक रोजा करताना मन प्रसन्न राहण्यासाठी मुस्लिम बांधव अत्तराचा वापर करतात. त्यामुळे रमजान महिन्यात अत्तराच्या बाजारपेठेत पारंपरिक अत्तरांबरोबर नव्या अरेबिक अत्तरांनाही मागणी वाढू लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी

$
0
0
दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापूर जिल्ह्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी दाखविली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

वाळू नसल्याने शासकीय कामे बंद

$
0
0
वाळू उपलब्ध होत नसल्याने खासगी कंत्राटदारांप्रमाणेच शासकीय कामावरील ठेकेदारही अडचणीत आले आहेत. शासकीय, तसेच पाटबंधारे योजनांची कामेही बंद पडली आहेत.

पक्षाच्या बदनामीचा कट हाणून पाडा

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी राष्ट्रवादी भवन येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images