Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाणी पुरवठा हायटेक

$
0
0
आता महापालिकेच्या टाक्यांतील पाणीसाठा आणि शिंगणापूर उपसा केंद्रातून केला जाणाऱ्या पाणीपुरवठा याचे अपडेट महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून कळत आहेत.

पुस्तकांशिवाय शिकविणार कसे?

$
0
0
यावर्षी इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे वाळवा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पुस्तकाविना अभ्यासाक्रम सुरू करण्याच्या खटाटोपात आहेत. गुरुजींनाच पुस्तक नसेल तर ते मुलांना शिकवणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कलावंताचा सन्मान करायला हवा

$
0
0
‘महाकवी कालिदास साहित्य नावाच्या कलेचा जागतिक उद्गाता आहे. ग्रामीण जीवनाचे अस्सल ताणतणाव दाखवणारे साहित्य हवे. कलावंत संवेदनशील असतो, त्याचा समाजाने सन्मान केला पाहिजे. बेजबाबदार अभिव्यक्तीमुळे अभिरुची ढासळते,’ असे मत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी व्यक्त केले.

औषध निर्माण संघटनेचा उद्या बंद

$
0
0
केंद्राप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी, पदोन्नतीची संधी, पदसंख्या वाढ, कंत्राटी अधिकाऱ्यांना दरमहा २० हजार वेतन व अन्य न्याय्य मागण्यांबाबत सरकार अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ न्याय्य मागण्यांसाठी ३० जूनपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत संप व धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य औषध निर्माण अधिकारी असोसिएशनने दिला आहे.

मॉलमधील कमी दराला विरोध

$
0
0
मॉलमधील वस्तूंचे दर आणि डिस्ट्रिब्युटर, किरकोळ विक्रेत्यांकडील वस्तूंचे दर समान असावेत या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर्स प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन आणि १३ राज्यांतील डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन्स कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे धाव घेणार आहेत.

बंधा‍‍रे अन् पाणीही अडेना

$
0
0
पंचगंगा नदीवरील बंधारे अजून अडवलेले नसल्याने महापालिकेकडून केला जाणारा पाणी उपसा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात जर बंधारे अडवले गेले नाही तर पुरेशा उपशासाठी पाणीच मिळणार नाही. तसेच कळंबा तलावानेही तळ गाठला असल्याने आता जवळपास दीड फूट पाणीच उपलब्ध आहे.

विमानसेवेचे १५ ऑगस्टला टेकऑफ

$
0
0
कोल्हापूरची बंद पडलेली नागरी विमानसेवा १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात येईल, असे आश्वासन सुप्रीम एव्हिएशन कंपनीचे अध्यक्ष अमित अगरवाल यांनी येथील उद्योजक व व्यापाऱ्यांना दिले.

विरोधकांची बंडखोरी पथ्यावर

$
0
0
विरोधकांच्या बंडखोरीबरोबरच त्यांच्यातील समन्वयाचा अभाव हे मुद्दे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी पथ्यावर पडले. बंडखोरी रोखता आली नसली तरी प्रथम क्रमांकाचे मत कुणालाही द्या, पण दुसऱ्या क्रमांकाचे मत देण्यासाठीचे धोरण विरोधकांना राबवता आले नाही.

पाइपलाइनसाठी लवाद नेमा

$
0
0
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही त्रुटींविना व निर्दोष पूर्ण व्हावी. योजनेचे काम एकाच ठेकेदाराकडे सोपविण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या कामात अडचणी उदभवू शकतात. त्यामुळे महापालिका व ठेकेदारात मतभिन्नता निर्माण होऊ शकते.

LBTविरोधात उद्या भूमिका ठरणार

$
0
0
राज्य सरकारने एलबीटीचे नाव बदलून त्याची वसुली विक्रीकर विभागाकडे देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या प्रस्तावाला शुक्रवारी व्यापाऱ्यांनी स्पष्ट विरोध दर्शविला. यासंदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी कोल्हापूर व्यापारी आणि उद्योग महासंघाची सोमवारी बैठक होईल.

कर्नाटकच्या मंत्र्यांना धमकी

$
0
0
छोटा राजन टोळीशी संबंधित असल्याचे सांगत बनावट नावाने कर्नाटकचे गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या नांदणी (ता. शिरोळ) येथील श्रीहंस बापूसाहेब पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी शनिवारी अटक केली.

कांदा पुन्हा महागला

$
0
0
कांदा उत्पादन क्षेत्रात झालेली गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे. गारपिटीमुळे तयार पिकापैकी ३० टक्के कांदा जमिनीतच खराब झाला. उर्वरित २५ टक्के कांदा सडल्याने बाजारपेठेत कांद्याची टंचाई भासत आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलपूजेचे जातीयवादी मंत्र बदलण्याची मागणी

$
0
0
‘पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेला जातीयवादी रंग चढवणारे मंत्र बदलावेत, अन्यथा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सरकारी महापूजा करू देणार नाही,’ असा इशारा ‘विठ्ठल रुक्मिणी मुक्ती आंदोलना’चे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे.

कृष्णा-वारणा पडल्या कोरड्या

$
0
0
पावसाअभावी कृष्णा व वारणा या दोन्ही नद्या कोरड्या पडण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याअभावी पिके वाळून चालली आहेत.

साताऱ्यात अघोषित पाणी कपात

$
0
0
कास तलावातील घटती पाणीपातळी आणि मान्सूनची प्रतीक्षा अशा कसोटीच्या क्षणी सातारकरांपुढे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पालिका प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी गेल्या काही दिवसांपासून १५ मिनिटांची अघोषित पाणी कपात सुरू केली आहे.

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी बाल वारकऱ्यांचा पुढाकार

$
0
0
आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक वाट चालत असताना या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेचे पात्र आणि वाळवंटाची मात्र दुरवस्था झाली आहे. नदीच्या कोरड्या पात्रात अनेक ठिकाणी घाणीचे ढीग साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाचे सर्व उपाय तोकडे पडले आहेत.

‘न्यू टॅक्स’चा पर्याय फसवा

$
0
0
‘एलबीटी’ला पर्याय म्हणून राज्य सरकारकडून सुचविण्यात आलेला ‘न्यू टॅक्स’ चा पर्याय फसवा आहे. केवळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांऐवजी ‘व्हॅट’ कडील अधिकाऱ्यांच्या तावडीत व्यापाऱ्यांना सोपविले जाणार आहे.

आर्थिक दुरवस्थेबाबत जन जागरण अभियान

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आर्थिक दुरवस्थेच्या संदर्भात जन जागरण अभियान हाती घेण्याचा निर्णय नागरिक संघटनेने हाती घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे कार्यवाह व माजी नगरसेवक वि. द. बर्वे यांनी दिली.

शिये विद्यामंदिरचा कायापालट

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शिये (ता. करवीर) येथील विद्यामंदिर क्रमांक दोन ही शाळा दत्तक घेतली आहे.

साठा पुरेसा, तरी टंचाईची भीती

$
0
0
बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेला आणि तीन किलोमीटर परीघाचा जलविस्तार पसरलेल्या मुरगूडच्या सरपिराजी तलावात यावर्षी तलाव व्यवस्थापन कायार्लयाच्या नियोजनामुळे पुरेसा पाणीसाठा आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images