Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अमित चव्हाणच्या कोठडीत चार दिवस वाढ

$
0
0
भुदरगड तालुक्यातील तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या अमित आनंदराव चव्हाण या कराड तालुक्यातील तरुणाला शुक्रवारी गारगोटी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली.

पासपोर्ट कार्यालय पूर्ववत कोल्हापुरात सुरू करावे

$
0
0
कोल्हापुरात तातडीने पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. महाडिक यांनी दिल्लीत त्यांना भेटून या मागणीचे निवेदन दिले. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन स्वराज यांनी दिले.

अभेद भक्ती आणि समदृष्टी

$
0
0
संतश्रेष्ठ ज्ञानदेव हे स्वतः आत्मानुभवी होते. त्यामुळे त्यांनी योग्याच्या समाधीचा, मुक्तीतील आत्मानंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव घेतला. आणि त्यातूनच त्यांनी मानवी जीवनात भक्तीला परमोच्च स्थान दिले.

प्रमाण भाषा रुजविणे काळाजी गरज

$
0
0
‘मराठी भाषेची अधिकाधिक मोडतोड केली जात असून, भाषेची रुजवण्याची प्रक्रियाही खंडित झाली आहे. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रमाण मराठी भाषेचा वापर काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी केले.

पर्यटनाची माहिती ऑफलाइन

$
0
0
पर्यटनस्थळांची​ व तेथील निवास व्यवस्थेच्या सुविधेची ऑन लाइनद्वारे माहिती देणारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) जिल्ह्यातील ‘की ऑक्स’ची सेवा महिनाभरातच गुंडाळली आहे.

‘फिनोलेक्स’ तर्फे वारकऱ्यांसाठी मोफत प्रथमोपचार

$
0
0
फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेडतर्फे वारकऱ्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष योगेश कृपलानी यांच्या हस्ते फिनोलेक्स बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रथमोपचार सुविधा सुध्दा देण्यात येत आहेत.

‘पोलिसांनी काठेकोरपणे कर्तव्य बजावावे’

$
0
0
‘समाजातील दलित, शोषितांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणे म्हणजेच समाज परिवर्तन होय. सर्वसामान्यांच्या मनातील भिती घालवण्यासाठी पोलिसांनी आपले कर्तव्य काठेकोरपणे बजावावे,’ असे आवाहन आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी केले. लांडे बिहारमध्ये कार्यरत आहेत.

खंडपीठ स्थापनेसाठी न्यायामूर्तींना निवेदन देणार

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना पाठविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

छावा मराठा युवा संघटनेची विजयी रॅली

$
0
0
मराठा आरक्षणाचा​ निर्णयाच्या आनंदप्रित्यर्थ छावा मराठा युवा संघटनेच्या विजयी रॅलीस शुक्रवारी प्रारंभ झाला. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा परत कोल्हापूर या रॅलीत २५ वाहने सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटनांचे आभार मानण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हद्दवाढीतून गांधीनगरला वगळा

$
0
0
महापा‌लिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतून गांधीनगरला वगळावे, अशी मागणी करत गांधीनगर व्यापाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मोर्चा काढला. हद्दवाढीत गांधीनगरचा समावेश झाल्यास करवाढीमुळे इथली व्यापारपेठ उदध्वस्त होईल, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

पोषण आहाराचे काम पूर्ववत बचत गटांना द्या

$
0
0
शालेय पोषण आहाराचे बचत गटांकडे दिलेले ठेके रद्द करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर व ​जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

केआयटीच्या १८ विद्यार्थ्यांची दहा कंपन्यांमध्ये निवड

$
0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (केआयटी) बायोटेक इंजिनीअरिंग विभागातील १८ विद्यार्थ्यांची दहा कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वा‌र्षिक सरासरी दोन लाख रुपयांचे पॅकेज मिळालेले आहे.

‘विवेकानंद’च्या नेट-सेट केंद्रातील ११ विद्यार्थी ‘सेट’ उत्तीर्ण

$
0
0
विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट व नेट मार्गदर्शन केंद्रातील ११ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यापैकी नीता पाटील व संग्रामसिंह पवार या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइलवर अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
औरंगाबाद येथील तरुणीला मोबाइलवर अश्लील प्रेम संदेश पाठविल्याबद्दल मिरजेतील दोघांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद येथील महाविद्यालयीन तरुणीस मोबाइलवर अश्लील प्रेम संदेश पाठविण्यात येत होते.

कराडमध्ये सोशल मीडियावरील महाचर्चा

$
0
0
क्रीडा प्रबोधिनी व अल्पसंख्याक विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘थिंक बिफोर क्लिक’ या सोशल मीडियातील फेसबुक, वॉटस्-अॅप, ट्विटर या विषयांवरील महाचर्चेत कराडच्या शाळा, कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्याची मागणी

$
0
0
कॉलेजमध्ये मंजूर विद्यार्थी क्षमतेपेक्षा एकही जादा प्रवेश देऊ नये, या शिवाजी विद्यापीठाच्या नियमाचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. हव्या असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसल्याने सुमारे पाच हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

बंडखोरी भाजपच्या पथ्यावर

$
0
0
विरोधकांच्या बंडखोरीबरोबरच त्यांच्यातील समन्वयाचा अभाव हे मुद्दे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी पथ्यावर पडले. बंडखोरी रोखता आली नसली तरी प्रथम क्रमांकाचे मत कुणालाही द्या, पण दुसऱ्या क्रमांकाचे मत देण्यासाठीचे धोरण विरोधकांना राबवता आले नाही.

शाळांनी प्रवेश नाकारल्यास कळवा

$
0
0
जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रवेश राखीव ठेवण्यात आलेला आहे. या आरक्षित कोट्यामधून कोणत्याही शाळेने प्रवेश नाकारल्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

मोटारीच्या धडकेत वायरमन ठार

$
0
0
पाठीमागून आलेल्या मोटारीने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने हुसेन महमंद देसाई (वय ४८, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) हे ठार झाले. देसाई हे वीज मंडळात वायरमन होते. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता शिरोली नाक्यावर अपघात झाला.

पालकमंत्र्यांविरोधात शंखध्वनी

$
0
0
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे आणि टोलप्रश्नी जनतेची फसवणूक केली असा आरोप करत शाहूप्रेमी संघटनेने शंखध्वनी करत आंदोलन केले. त्यांच्या पोस्टरला शाईही फासण्यात आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images