Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगलीत १५ अनधिकृत शाळा

$
0
0
सांगली जिल्ह्यात १५ अनधिकृत शाळा असून, त्या सुरू झाल्यास त्वरित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या शाळांतून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे यांनी केले आहे.

चांदीच्या मूर्तीची चोरी

$
0
0
निपाणी-अक्कोळ रोडवरील हालसिद्धनाथ मंदिरातील सव्वा किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याचबरोबर या परिसरात गुरुवारी रात्री दोन घरेही चोरट्यांनी फोडल्यामुळे निपाणी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

जखमी बिबट्याचा मृत्यू

$
0
0
गारवडे (ता. पाटण) येथील शिवारामध्ये जखमी स्थितीत वावरणाऱ्या बिबट्याला गुरुवारी वनविभागाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. मात्र, पिंजऱ्यातून धूम ठोकून बिबट्या पसार झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने मारूल हवेलीच्या शिवारातून त्याच बिबट्याला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात आले. पण, उपचारांसाठी पाटणला नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सांगली मनपात महिलाराज

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील प्रभाग समित्यांच्या सभापतीच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या. सहा प्रभाग समित्यांपैकी पाच प्रभाग समित्यांच्या सभापतीपदी महिलांची वर्णी लागली. प्रभाग समिती दोन वगळता अन्य सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

पाणी वाचवा, गाव वाचवा

$
0
0
ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल यावर उपापयोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्या वतीने पाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ नावाचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरकारच्या वतीने जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

पुरस्कारासाठी कागदोपत्री कारभार

$
0
0
जिल्ह्यात भुदरगड तालुक्याने निर्मलग्राम अभियानात आघाडी घेतली आहे. तालुक्यातील केवळ तीनच गावे वगळता संपूर्ण तालुका निर्मल झाला आहे. या वर्षात हा तालुका १०० टक्के निर्मल करण्याचा संकल्पही सोडण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तालुक्यातील चक्क ७१६१ कुटुंबांच्याकडे शौचालयेच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव निर्मल भारत अभियानाच्याच सर्व्हेतच समोर आले आहे.

उपचारास उशीर झाल्याने मृत्यू

$
0
0
चार मुलींनंतर जन्मलेल्या मुलाचा अपघात झाल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर धडपड केली. जत, सांगली, मिरजेतील हॉस्पिटलच्या प्रशासनाने कारणे सांगत उपचारास असमर्थता दर्शविल्याने ते कोल्हापुरात आले. मात्र उपचारापूर्वीच सीपीआरमध्ये आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा ठरला.

'माने'च्या २१८ विद्यार्थ्यांची प्लसमेंट

$
0
0
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्समधील २१८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली. यामध्ये टाटा मोटर्स (१७), कुपर कार्पोरेशन (७), एचसीएल पुणे (६), छेडा इलेक्ट्रीकल्स पुणे (१३), युनिटेल वर्क्स वायरलेस सोल्युशन्स (०५), व्हरटेक्स प्रा. लिमिटेड (३८), मॉडेल्स इंडिया (२६), एपिटोम सोल्याशन्स (१४), मेगास्पेस (९), युरेका फोब्ज इरोव्हिल्स (२१), आप. टी. टेक्नोसॉफ्ट (६), भारत इलेक्ट्रीकल्स (५), युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर, पुणे (३), ओम असोसिएटस (४), टी ई कनेक्टीव्हिटी शिरवळ (२), महाबळ मेटॅलिक्स (१) अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.

राज्याभिषेक

$
0
0
कोल्हापूरकर टोल देणार नाहीत, रायगडच्या डागडुजीसाठी १ हजार कोटींचा निधी द्या, मराठ्यांना आरक्षण देता, की घरी जाता? अशा मागण्या करत शुक्रवारी सायंकाळी शिवराज्यभिषेक दिनाची मिरवूणक शहरातून काढण्यात आली.

पोलिस भरतीसाठी चुरस

$
0
0
भर उन्हात शंभर मीटर धावण्यासाठीची चुरस, खांद्याला जोर देत टाकला जाणारा लोखंडी गोळा, लांब उडीसाठी शर्थीचे प्रयत्न आणि पूलअप्स हे चित्र होते पोलिस भरतीचे. शारीरिक चाचणी परीक्षेत शंभरपैकी जादा गुण मिळवण्यासाठी राज्यातून आलेल्या उमेदवारांची शुक्रवारपासून (ता. ६) सुरू झालेली ही चढाओढ १८ जूनपर्यंत पाहायला मिळणार आहे.

'लोकविकास'चा पेपर फुटला

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्राच्या सिटी स्कॅन एक्सरे ईसीजी असिस्टंट टे‌िक्नशियन या विषयाचा पेपर फुटल्याने तो रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. झालेल्या प्रकरणाची चौकशी करुन येत्या काही दिवसांत पुन्हा लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. चार केंद्रावर झालेले पेपर परत मागविण्यात आले आहेत.

हद्दवाढीला विरोध

$
0
0
ग्रामपंचायत व नागरिकांना विश्वासात न घेता महापालिका आणि राज्य सरकार हद्दवाढीचा निर्णय घेत आहे. हद्दवाढीविषयी १७ गावाममध्ये असंतोष असून जनआंदोलन उभारण्यासह कायदेशीर लढाई करू असा इशारा हद्दवाढ ​विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकार परिषदेत दिला.

महावितरणची मान्सूनपूर्व सज्जता

$
0
0
महावितरणच्या वतीने गेले महिनाभर मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यासाठी पावसाळ्याआधीच महावितरणने काम सुरू केले आहे.

एसटीपी रखडणार, प्रदूषण होणार

$
0
0
हायकोर्टाने दिलेल्या मुदतीत महापालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू करणे अशक्य बनले आहे. पहिला टप्पा सुरू झाला असला तरी अद्याप दुसऱ्या टप्प्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

फाउंड्री उद्योग

$
0
0
भारत सरकार, जागतिक बँक (डब्ल्यूबी) आणि ग्लोबल एन्व्हायरर्न्मेंट फॅसिलिटीच्यावतीने (जीइएफ) भारतातील पाच औद्योगिक समूहांमध्ये पाचशे सूक्ष्म, लघु आणि मध्यम कारखाने ऊर्जा कार्यक्षम (एनर्जी इफिसिएन्ट) करण्यात येणार असून यामध्ये कोल्हापुरातील शंभर फाउंड्रीचा समावेश आहे.

शौचालयांचा बोजवारा

$
0
0
पावसाळा आला की अंगावर काटा येतो. ड्रेनेज लाइन चोकअप होते. घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण होते. गटारी तुंबतात. डासांमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही कथा एका झोपडपट्टीतील नसून पोलिस वसाहतींची आहे.

कोल्हापूर-बोरीवली बससेवा

$
0
0
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट आणि मोहन ट्रॅव्हल्स या संस्थेच्या २x१ ए. सी. एअर सस्पेन्शन कोल्हापूर ते बोरीवली (व्हाया ठाणे) या प्रवासी सेवेला दोन जूनपासून सुरुवात झाली.

कोल्हापूरकर लक्षाधीश!

$
0
0
गेल्यावर्षी एक लाखाचा आकडा ओलांडलेल्या कोल्हापूर जिल्ह्याने यंदाही दरडोई उत्पन्नात अल्पशी वाढ करत घोडदौड कायम ठेवली आहे. मुंबई, पुणे, रायगड, नागपूर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांपाठोपाठ कोल्हापूरचा क्रमांक असला तरी नागपूरने मात्र दरडोई उत्पन्नात घसघशीत वाढ करत तो पुन्हा पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मराठा आरक्षण,महिन्याची डेडलाईन

$
0
0
‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता महिनाभरात मराठा समाजाला आरक्षण द्यावे; अन्यथा मी काय करू शकतो ते दाखवून देईन. मराठा आरक्षणानंतर अन्य समाजातील प्रश्न सोडवण्यासाठीही माझा पुढाकार असेल,’ असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर दिला.

कळंबा तलावाचे प्रदूषण

$
0
0
कळंबा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये तलावावर पोहायला येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, जेमतेम एक ते दोन महिन्यांत ही बंदी मोडून पुन्हा पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुटीच्या कालावधीत मुले विद्यार्थ्यांचीही त्यात भर पडत आहे. त्यातून तलावाच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images