Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाळांची स्थिती सुधारणार!

$
0
0
महापालिका शाळांची दुरवस्था सुरू आहे. सुविधेअभावी विद्यार्थी नाहीत. त्यामुळे सुविधा देता येत नाहीत अशा चक्रव्यूहामध्ये प्राथमिक शिक्षण मंडळ सापडले आहे. सामान्यांना आधार देऊ शकतील अशा ६६ प्राथमिक शाळांचे हे चक्रव्यूह भेदण्याची आवश्यकता आहे. नूतन शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते यांनी प्रयत्न चालवले आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाचा फज्जा

$
0
0
कोल्हापूर शहरातील बहूतांश सर्वच ठिकाणच्या चॅनल्सची सफाई झाल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असले तरी सलग पाऊस सुरू राहिल्यास शहरवासियांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याची स्थिती आहे.

प्रेरणादायी हुतात्मा स्मारके

$
0
0
सागरमाळचे हुतात्मा स्मारक, गोपाळकृष्ण गोखले कॉलेजजवळील हुतात्मा पार्क आणि मिरजकर तिकटी येथील स्मृत‌िस्तंभाच्या ठिकाणी स्वच्छता, टापटीप आहे. महापालिकेने या स्मारकाची कायमस्वरुपी निगा बाळगण्याची गरज आहे

पोलिस भरती

$
0
0
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर शुक्रवार (ता.६) पासून पोलिस भरतीतील शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे. दररोज १५०० विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

‘स्वाभिमानी’ला हव्या ३० जागा

$
0
0
आगामी विधानसभे वारे आतापासूनच वाहू लागल्यामुळे तीस जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना दावा करणार आहे. कोल्हापूर, सांगली व सोलापूर या तीन जिल्ह्यातच ताकद असल्याने या भागातील शिवसेना-भाजपच्या हक्काच्या जागांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

सांगलीत पोलिस भरती

$
0
0
सांगली जिल्हा पोलिस दलाकडील ३२७ जागांसाठी उद्यापासून (शुक्रवार) पोलिस भरतीला सुरुवात होत आहे. एकूण ७ हजार २८९ उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यामध्ये अकराशे महिला उमेदवारांचा समावेश आहे.

‘सुंदर’ला वारणेतून हलविले

$
0
0
जोतिबा देवस्थानच्या ‘सुंदर’ हत्तीला कर्नाटकातील बाणेरगट्टा या राष्ट्रीय प्राण‌ि संग्रहालयात हलविण्याची मोहीम गुरूवारी सकाळी यशस्वी झाली. सुंदरला १५ जूनपूर्वी बाणेरगट्टा प्राण‌ि संग्रहालयात न पाठवल्यास कारवाई करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे सुंदरला हलविण्याचे वनविभागापुढे आव्हान होते.

मुंडेंचे 'किल्लेदार' अस्वस्थ

$
0
0
सहकार सम्राटांच्या बालेकिल्ल्यात जातीयवादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये बहुजन समाजाच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला तो केवळ गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातून एकेक करत अनेक ‘किल्लेदारांना’च मुंडे यांनी फोडले. मात्र मुंडेंच्या अचानक निधनाने हे सारे ‘किल्लेदार’ अस्वस्थ झाले आहेत.

आशा कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन

$
0
0
‘आशा’ कर्मचाऱ्यांना कामाच्या मोबदल्या​व्यतिरिक्त दरमहा निश्चित मानधन सुरु करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मांडून तो मंजूर करुन घेऊ असे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले.

पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

$
0
0
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगरच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे निवडणूक​ बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.

पोलिस भरती 'डाऊन'

$
0
0
सर्व्हर डाउन झाल्यामुळे पोलिस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना रिसीटच मिळत नसल्याने खळबळ उडाली आहे. रिसीट मिळविण्यासाठी नेट कॅफेच्याबाहेर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.

भरदुपारी गंठण लंपास

$
0
0
रुईकर कॉलनीत मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी रचना राजेंद्र कसबेकर (वय ४२, रा. हरी मंदिर, दुधाळी) या महिलेचे दीड लाख रुपये किंमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण लंपास केले. गुरूवारी दुपारी सव्वाएक वाजता ही घटना घडली. दरम्यान हा चोरटा घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पुन्हा बांधकाम आणि दुरुस्ती

$
0
0
मुंबई हायकोर्टाने अतिक्रमित बांधकामे ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्यानंतरही तावडे हॉटेल परिसरातील मिळकतीवर काही व्यापाऱ्यांनी पुन्हा बांधकामे आणि दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. महापालिका प्रशासनाने या बांधकामांचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.

शंभर किलो ई-कचरा जमा

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे ई-कचरा निर्मूलन अभियानास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १०० किलो ई-कचरा जमा झाला.

कामगार चाळींची दुर्दशा

$
0
0
इमारतीला ठिकठिकाणी गेलेले तडे, काही घरात कोसळत असलेला स्लॅब, फुटलेल्या पाण्याच्या पाईप, तुंबलेले ड्रेनेज ​आणि संपूर्ण परिसरात घाणीचे व डासांचे साम्राज्य हे चित्र संभाजीनगर रेसकोर्स येथील कामगार चाळीत पाहावयास मिळत आहे.

खेळांना बंदी नको!

$
0
0
कोणत्याही खेळाला मैदानावर बंदी घालणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. मैदानावर पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी मास्टर प्लॅन तयार करण्याची गरज आहे. स्टेडियमची दुरवस्था झाल्यानंतर उपाय सुचवण्यापेक्षा ही दुरवस्था का झाली याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपत्कालीन तयारी पूर्ण

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात अतिवृष्टी होत असते. त्यामुळे या गावांबरोबरच काही वेळा शहरातील पूरस्िथती गंभीर होत असते. महापुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची तयारी पूर्ण झाली आहे.

विद्यापीठाचे मिशन पर्फेक्ट

$
0
0
शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया ते करिअरपर्यंतचे कौन्सेलिंग करणार आहे. व्यक्तिमत्त्व विकास, स्कॉलरशिपचे अर्ज, फीडबॅक, शिस्त, वर्षभराचा अटेंडन्स, कोचिंगपासून करिअरपर्यंतचे कौन्सेलिंग करणार आहे.

रेल्वे गुड‍्स यार्डात काम बंद

$
0
0
मालवाहतुकीच्या वॅगनमधील माल नऊ तासात उतरुन न घेतल्यास गुडस कॉन्ट्रॅक्टरना (हुंडेकरी) सहा पट जादा दर आकारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हुंडेकरी ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टरनी मालाची भरणी उतरणी (लोडिंग अनलोडिंग) बंद केली आहे.

साता-यात पोलिस भरती

$
0
0
सातारा पोलिस परेड ग्राउंडवर पोलिस भरतीसाठी शारीरिक चाचणीसाठी साताऱ्यासह जवळच्या जिल्ह्यातून सुमारे दोन हजार युवक उपस्थित राहिले आहेत. शुक्रवार सकाळी सहा वाजल्यापासून युवकांच्या विविध तपासण्या तसेच शारिरीक उंची, वजन आदी मोजमापे पोलिस विभागातर्फे घेण्यात येत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images