Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विधानसभेसाठी मतदार नोंदणी सुरू

$
0
0
‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विशेष मोहिमेच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे. ज्यांना नोंदणी करायची आहे, त्यांनी २१, २२, २८ आणि २९ जूनला सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत आपापल्या मतदान केंद्रांवर नोंदणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी शनिवारी केले.

संजय मंडलिक सह संपर्कप्रमुख

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविलेल्या प्रा. संजय मंडलिक यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांची शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.

पोलिस भरती सुरू

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस भरतीसाठी दुसऱ्या दिवशी ११३५ जणांनी सहभाग घेतला. सकाळी सहा वाजता सुरू झालेली प्रक्रिया सायंकाळी सहा वाजता संपली. पात्र उमेदवारांना रविवारी (ता.८) सकाळी राजाराम साखर कारखाना कॉर्नर ते शिये फाटा अशी पाच किलोमीटर धावण्याची परीक्षा द्यावी लागणार आहे.

मनपा कारवाईच्या तयारीत!

$
0
0
महानगरपालिकेच्या हद्दीतील तावडे हॉटेल परिसरातील ज्या इमारतींचे बांधकाम कारवाईवेळी पाडले आहे, त्यापैकी त्यांनी त्याची डागडूजी केली आहे. अशा पुन्हा बांधकाम करणाऱ्या हॉटेल मालकांसह मिळकतधारकांवर वकिलांच्या सल्ल्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

गुरुजींची बाके रिकामी

$
0
0
डीटीएड् झालेल्या उमेदवारांच्या नोकरीसाठी गेल्या दोन वर्षांत सीईटीही झालेली नाही. कोर्स करूनसुद्धा नोकरी मिळत नाही तर त्यासाठी प्रवेशच कशाला घ्यायचा या मानसिकतेमुळे डीटीएड्ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची रोडावली आहे.

विजांची दहशत

$
0
0
शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने शहर आणि परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. कानठळ्या बसविणाऱ्या विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे नागर‌िकांमध्ये अक्षरशः भीतीचे वातारवण होते. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली.

गोकुळच्या दूध दरात वाढ?

$
0
0
गोकुळच्या दूध दरात वाढ करायाची किंवा नाही याबाबत संचालकांची शनिवारी होणारी बैठक आता बुधवारी ( दि. ११ ) होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. म्हशीच्या दुधात २ रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव असून अमूलने वाढविलेल्या दूध दराच्या पार्श्वभूमीवर दरवाढीबाबत चर्चा सुरू आहे.

टोल वसुलीला संरक्षण नाही

$
0
0
मुंबई हायकोर्टाने आदेश देऊनही रस्ते विकास प्रकल्पातील टोलच्या वसुलीसाठी अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही. हा हायकोर्टाचा अवमान आहे. याबाबत कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा आयआरबी कंपनीने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना एका पत्राद्वारे दिला आहे.

महामोर्चाला पाठिंब्याचा जोर

$
0
0
कोल्हापुरात लागू करण्यात आलेला टोल कायमचा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सोम​वारी (ता. ९) टोलविरोधी कृती समितीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चाला अनेक संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार होत्या. त्यांनीही सोमवारी सुटी असल्याचे जाहीर केले आहे.

टोलविरोधी महामोर्चा

$
0
0
सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी (ता.९) आयोजित केलेल्या मोर्चाचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून शहरातील टोलविरोधी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान अनेक मोर्चे आणि आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर सोमवारचा मोर्चा सर्वाधिक मोठा काढण्याचा निर्धार करण्यात आला असून तशी तयारी करण्यात आली आहे.

‘जिप’च्या आरोग्य विभागाची पावसाळ्यासाठी जय्यत तयारी

$
0
0
पावसाळा आला की साथीच्या रोग थैमान घालतात. या काळात कॉलरा, गॅस्ट्रो, न्यूमोनिया, कावीळ, आदी आजार डोके वर काढून नागरिकांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. यावर उपापयोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सक्षमपणे पूर्वतयारी केली आहे. प्रत्येक गावाच्या नियोजनानुसार जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

हुंडेकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे प्रयत्न

$
0
0
रेल्वे वॅगनमधील मालाची भरणी उतरणी बंद केल्यामुळे राज्यभरात निर्माण होणारा पेच सोडवण्यासाठी आता केंद्र सरकारच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. माजी मंत्री शरद पवार यांच्याबरोबर नूतन मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्याशी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य चर्चा करणार आहेत.

राष्ट्रपुरुषाच्या बदनामीनंतर उद्रेक

$
0
0
फेसबुवर राष्ट्रपुरुषाची कथित बदनामी केल्याच्या घटनेचे रविवारी तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करत निषेध रॅली काढली. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद झाले. काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी एसटी, केएमटी बसेस, हॉटेल, दुकानांवर दगडफेक केली. सीबीएसजवळ फळांच्या गाड्याही उलथवून टाकल्या.

सरकारविरोधात काढला राग

$
0
0
फेसबुकवरील राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे प्रकार रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा तीव्र संताप व्यक्त करत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी निषेध सभेमध्ये विविध पक्ष व संघटनांनी केली. तसेच हे सरकारच जातीयवादी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दर्जा सुधारा, अन्यथा वेतनवाढ रोखू

$
0
0
वर्षभर शाळेत नियमित यायचे, मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचे नाहीत, शिकवण्याला शैक्षणिक उपक्रमांची जोड द्यायची नाही अशा शिक्षक, मुख्याध्यापकांवर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने लक्ष ठेवले आहे. यापूर्वीच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी दाखवूनही सुधारणा न केलेल्या शिक्षकांची प्रसंगी वेतनवाढ रोखली जाईल.

महायुतीमुळे मोर्चाला बळ

$
0
0
टोलविरोधी कृती समितीने सोमवारी (ता. ९ जून) आयोजित केलेल्या महामोर्चात महायुती सहभागी होणार असल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. टोलविरोधातील आंदोलन फसू नये यासाठी महायुतीने हा निर्णय घेतला असून यापुढे सरकारवर दबाव आणण्यासाठी महायुतीतर्फे स्वतंत्र आंदोलन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

३०० रुपयांत स्टॅम्पवर झळका!

$
0
0
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीचा फोटो पोस्टाच्या टपाल तिकिटावर छापला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि त्याच्या कार्याचा पोस्ट विभागाकडून गौरवच होत असे. मात्र, आता स्वतःचाच फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट विभागाने केवळ ३०० रुपयांत १२ फोटो छापून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

टोलविरोधात आज पुन्हा एल्गार

$
0
0
गेली चार वर्षे टोल वसुली विरोधात सातत्याने आंदोलन छेडणाऱ्या सर्वपक्षीय कृती समितीने पुन्हा एल्गार पुकारला आहे. आज (सोमवारी) लाखोंच्या संख्यने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी गेले महिनाभर विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

महाबळेश्वरच्या जंगलात बिबटे

$
0
0
जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा वनविभाग व वनविभाग सातारा परिक्षेत्र महाबळेश्वर यांनी २७ मे ते २ जून या कालावधीसाठी महाबळेश्वर परिसरातील जंगलात वेब कॉमेरे बसविले होते. या कॉमेऱ्यात टिपलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर जंगलात ठिकठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवा!

$
0
0
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दि. २७ व २८ जून रोजी लोणंद मुक्कामी येत आहे. त्यासाठी पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images