Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगली पावसासाठी सज्ज

$
0
0
पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीची उपाययोजना म्हणून नदीकाठच्या ७२ गावांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपत्कालीन योजना तयार केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे व जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी दिली.

महाबळेश्वर: देशातला सर्वात उंच निवडूंग

$
0
0
भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेला महाबळेश्वर येथील सरकारी दुग्ध शाळेत आसणारा निवडुंग सध्या फुलांनी बहरला आहे. त्याची फुले ब्रम्हकमळासारखी दिसत असून, ती अत्यंत सुवासिक व पांढरी शुभ्र दिसतात.

साईभक्तांच्या कारला अपघात

$
0
0
गोव्याहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांच्या स्विफ्ट कारने ट्रकला जोराची धडक दिल्याने कारमधील दोघेजण ठार तर तीघेजण जखमी झाले आहेत. संदेश मुळगावकर (वय-३७) आणि चालक रोहन हाटवळ (वय-३४ दोघेही रहाणार गोवा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर केनपॉल फर्नांडीस,गोपाळ बोचडी आणि अशोक बांदेकर गंभीर जखमी आहेत.

शिवप्रताप संघटना स्थापन करणार!

$
0
0
‘आम्ही लवकरच शिवप्रताप संघटना स्थापन करणार आहोत. शिवप्रताप सोडून अन्य कोणत्याही माथाडी संघटनेशी आमचे संबंध असणार नाही, असे प्रतिपादन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

शहीद पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार

$
0
0
खंडेराजुरी (ता. मिरज) येथील जवान महादेव बाजीराव पाटील (वय २४) सोमवारी कर्तव्य बजावताना जम्मू येथे गोळी लागून शहीद झाले. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे. शहिद पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सोशल मीडियाचा गैरवापर पडणार महागात

$
0
0
‘फेसबुक’ व ‘व्हॉट्स अॅप’ या सोशल मीडियाचा वापर करून आक्षेपार्ह फोटो अथवा माहिती अपलोड केल्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या आहेत. या प्रकारांचा समाज जीवनावर वाईट परिणाम होऊन सामाजिक शांतता बिघडते. याची दखल घेत सातारचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या विरोधात दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यावर भारनियमनाचे संकट

$
0
0
कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे. धरणात सध्या केवळ १६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातील १० टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे.

संघर्षशील, झुंझार नेता हरपला

$
0
0
‘संपूर्ण आयुष्यभर संघर्ष करीत राहिलेला तसेच सामान्य कुटुंबातून आलेला एक झुंझार नेता हरपला. राजकारणात कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे,’ अशा भावना स्वाभिमानीचे राज्यसचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी व्यक्त केल्या.

डॉक्टरांचा संप, पेशंट सलाइनवर

$
0
0
विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा परिणाम बुधवारी तिसऱ्या दिवशी प्रकर्षाने जाणवू लागला आहे.

पाण्यासाठी आंदोलन

$
0
0
सहा दिवसांपासून पाणी न आल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजपाचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह बुधवारी अचानक पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. पाणी सोडत नाही तोपर्यंत पदाधिकाऱ्यांना आत न सोडण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

'गोकूळ'चे दर स्थिर

$
0
0
गोकुळच्या दूध दरात वाढ करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पुढील दोन तीन दिवसात राज्यात दूध दरवाढीबाबत धोरण ठरविले जाणार आहे. त्याचा आढावा घेऊन दूध दर वाढ करायची किंवा नाही याबाबत चर्चा केली जाईल आणि संचालकांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

शतकोटी योजनेची दमछाक

$
0
0
पर्यावरण संतुलनासह प्रत्येक जिल्हा हरित करण्यासाठी सरकारने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरु केली आहे. यासाठी प्रत्येकवर्षी जिल्ह्यांना ठराविक उद्दिष्ट दिले जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेला ३५ लाख ७० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. पण या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे रोपेच नसल्याने उद्दिष्ट कसे साध्य करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सायलेंट ऑब्झर्व्हर बंद

$
0
0
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी करणारा सायलेंट ऑब्झर्व्हर हा कल्पक उपक्रम निधीअभावी बंद पडला आहे. ‘सेव्ह द बेबी गर्ल,’ या नावाने देशभर ओळख निर्माण केलेला हा कोल्हापुरी पॅटर्न पुन्हा सुरू करण्यासाठी कुठल्याच पातळीवर प्रयत्न होत नसल्याने आता हा उपक्रम इतिहासजमा होईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मलाच पाठिंबा आहे!

$
0
0
विद्यमान आमदारांवरील नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील वातावरण यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील पुरोगामी मतदार माझ्यासोबतच राहतील, असा विश्वास डावे लोकशाही पक्ष व संघटनांच्यावतीने प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केला. माझ्या उमेदवारीला माकप, शेकाप, रिपाइं (खोब्रागडे), रिपाइं ​(सेक्युलर), सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी व समाजवादी जनपरिषदेने पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डावी चळवळ क्षीण

$
0
0
‘क्रांतिकारी विचार रुजवण्यात सामाजिक संस्था आणि संघटनांचा फार मोठा वाटा आहे. मात्र, सध्या संघटनांचे इमले वाढत असून, क्रांतिकारी विचारांची उंची खुजी होत चालली आहे. वैचारिक औदासिन्यामुळे डावी चळवळ क्षीण होत आहे,’ प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

रेल्वे हमालांचा संपाचा इशारा

$
0
0
मार्केट यार्ड येथील रेल्वे गुड्स यार्डमध्ये माथाडी कामगारांसाठीच्या सुविधांची कामे रखडल्याबाबत संघटनेने ११ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात कामगारांचे हाल होऊ नये यासाठी हा इशारा देण्यात आला आहे.

वीज ग्राहकांना भुर्दंड बसणार

$
0
0
सरकार आतापर्यंत महावितरण केंद्राकडून विजेसाठी सव्वा तीन रुपये देत होते. मात्र, महावितरणची अडचणीतील स्थिती पाहून केंद्राने साडेचार रुपये दराने वीजपुरवठा केला आहे. याचा ग्राहकांनाही फटका बसणार असून वीजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवराज्याभिषेकासाठी कार्यकर्ते रवाना

$
0
0
रायगडावर ५ आणि ६ जूनला होत असलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी बुधवारी रात्री मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक रवाना झाले आहेत. भवानी मंडपातून विविध वाहनांतून शिवप्रेमी रायगडाकडे रवाना झाले. मुख्य सोहळा ६ जूनला होणार आहे.

...तर पालिकेचे काम बंद!

$
0
0
व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारने एलबीटी (स्थानिक संस्था कर) काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर कोल्हापूरसह राज्यातील २७ महापालिकांच्या कर्मचाऱ्यांनी ८ जूनपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

शिवाजी स्टेडियमकडे दुर्लक्ष

$
0
0
शिवाजी स्टेडियमने एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवला आहे. स्टेडियमवर अनेक प्रथमश्रेणींचे सामने झाले आहेत. यामुळे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी ऐतिहासिक क्रीडा नगरीतील क्रीडाप्रेमीना मिळाली होती. पण कालांतराने या स्टेडियमची पूर्ण वातावाहत झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images