Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिका शाळांची होणार तपासणी

0
0
लक्ष्मीपुरीतील रंगराव साळुंखे विद्यामंदिरातील बेकायदेशीर अतिक्रमण आणि शाळेला लावण्यात आलेल्या आगीनंतर जागे झालेल्या प्राथमिक शिक्षण मंडळाने महापालिकेच्या सर्व शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण विभाग आणि इस्टेट विभागातर्फे येत्या चार दिवसांत शाळांची तपासणी होणार आहे.

नियोजनाअभावी भारनियमनाचा झटका

0
0
राज्यात निर्माण झालेल्या विजेच्या तुटवड्यामुळे नियोजनाशिवाय भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाचा अंदाज येऊनही महावितरणने वेळापत्रक तयार केले नसल्यामुळे कधीही वीज गूल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

दंगा नव्हे; समाजकंटकांकडून लूट

0
0
फेसबुकवरील आक्षेपार्ह फोटोंमुळे कोल्हापूरात घडलेला प्रकार हा हिंदु-मुस्लिम यांच्यातील दंगा नसून संमाजकंटकांकडून करण्यात आलेली लूट होती असा सूर मान्यवरांनी सोमवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल

0
0
इयत्ता बारावीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात कोल्हापूर विभागीय मंडळाअंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी सर्वाधिक आहेत. टक्केवारीमध्ये कोल्हापूर जिल्हा यंदाही अव्वल ठरला आहे.

व्यापाऱ्यांना एलबीटीच्या नोटिसा

0
0
शहराची हद्द स्पष्ट झाल्यानंतर तावडे हॉटेल परिसर, गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिकेने हातोडा चालवल्यानंतर आता एलबीटीच्या नोटिसा पाठवून या अतिक्रमणधारकांच्यामागे वेगळा ससेमिरा लावला आहे.

माजी सैनिकांनो, उद्योजक बना

0
0
‘माजी सैनिकांनी आपल्याला केवळ गार्डच व्हायचे आहे, ही मानसिकता सोडून उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे. त्यासाठी पुण्यात भोसरी येथे माजी सैनिकांसाठीच्या औद्योगिक वसाहतीचे काम सुरू करण्यात आले आहे.

शिवाजी स्टेडियमचा मेकओव्हर हवाच

0
0
स्पर्धात्मक क्रिकेटमुळे करिअर करण्यासाठी कोल्हापुरात अनेक खेळाडू कठोर परिश्रम घेत आहेत. क्रिकेटचे ग्लॅमर, आपीएलमध्ये देशातील लहान लहान शहरातील खेळाडूंना मिळणारी संधी, मुबलक पैसा आणि सुविधा यामुळे खेळाडू आकर्षित होत आहेत.

ग्रामीण आरोग्य ऑक्सिसजनवर

0
0
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) वतीने सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरूवात झाली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

सामाजिक सलोख्यासाठी शपथ

0
0
राष्ट्रपुरुषांच्या फेसबुकवर झालेल्या बदनामीमुळे सध्या अवघ्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असल्याने अनेक ठिकाणी निषेध सभा होत आहेत. अशा स्थितीत संभाजी ब्रिगेडने जातीय तेढ वाढवणाऱ्या विचारांना साथ देणार नाही अशी सामूहिक शपथ घेऊन शहरवासियांतील सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न चालविला आहे.

आपत्कालीनचा अॅक्शन प्लॅन

0
0
दक्षता पथकांची स्थापना, बेसमेंट व घरामध्ये पाणी साचल्यास उपसा करण्यासाठी पोर्टेबल पंप, लाइफ जॅकेटस, स्लॅबखाली नागरिक अडकले असल्यास तत्काळ सुटका करण्यासाठी स्लॅब कटर, आपत्कालीन स्थिती व पूरस्थितीत मदतकार्यात खंड पडू नये तसेच विनाव्यत्यय संवाद सुरू राहावा यासाठी वीस टॉकी आणि गेले काही महिने बंद असलेली बिनतारी संदेश यंत्रण कार्यान्वित करत महापालिका अग्निशमन दल व आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे.

करिअरच्या दिशा निश्चित

0
0
करिअरच्या निर्णयाला योग्य दिशा देणारे टाइम्स एज्युफेस्ट प्रदर्शन पाहण्यासाठी शेवटच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांची अलोट गर्दी झाली. अनेकांनी आपले करिअर निश्चित केले.

विभागात यंदाही मुलींचीच बाजी

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

हद्दवाढीसाठी पुढचे पाऊल

0
0
शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने सकारात्मक अभिप्राय नोंदविला आहे. वाढीव भागाला सुविधा पुरवण्याबरोबरच तेथील कररचनेबाबतचे निश्चित धोरण ठरवण्याची महत्वाची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये केली आहे.

कूर कालव्याला भगदाड

0
0
कूर उजवा कालव्याला मुदाळ (ता. भुदरगड) येथील ‘सुतारकी’ नावाच्या शेताजवळ भगदाड पडल्याने येथील १६ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून सात – आठ एकरातील ऊस व भात पिकाचे नुकसान झाले.

माळ्याची शिरोलीत गोळीबार

0
0
माळ्याची शिरोली (ता. करवीर) येथे हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी दहा वाजता घडला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत राहुल तुकाराम पाटील (वय ३३) याला मंगळवारी रात्री आठ वाजता अटक केली.

हिंदू-मुस्लिम ऐक्य

0
0
पुरोगामी कोल्हापूरकरांनी मंगळवारी राजर्षी शाहूंच्या समतेच्या विचारांचा वारसा रोमारोमात भिनला असल्याचे दाखवून दिले. ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी दगडफेकीत नुकसान झालेल्यांना भरपाई म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांकडून मदतीचा हात पुढे आला. शाहू स्मारक भवनातील बैठकीतील अर्ध्या तासात २ लाख ६३ हजार २०० रुपये मदत म्हणून जाहीर करण्यात आली.

सोने लुटणारा अटकेत

0
0
सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा चोरटा महिलांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याचा साथीदार पसार झाला. लाटवाडी (ता. शिरोळ) येथे ही घटना घडली. राजेशकुमार जवाहर सहा (रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पेट्रोल, एलपीजी रिक्षांना परवाना

0
0
कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपालिका हद्दीत यापुढे डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाना न देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच या परवान्यासाठी नवीन नोंदणी केलेली रिक्षाच परवान्यावर दाखल करावी लागणार आहे.

शिवरायांची दुसरी राजमुद्रा सापडली

0
0
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हटले की चटकन नजरेसमोर येते ती अष्टकोनी आकारातील ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्र्ववंदिता II शाहसूनो शिवस्यैषा मुद्राभद्रायराजतेII’ ही मुद्रा. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही एकमेव राजमुद्रा नसल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

महाबळेश्वरमध्ये ATM बंद, पर्यटकांचे हाल

0
0
महाबळेश्वर येथे पर्यटकांना एका वेगळयाच समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. एकाचवेळी शहरातील सर्व बँकांची एटीएम बंद पडली आहे. त्यामुळे बँकेत कॅश ठेऊन एटीएमच्या भरवशावर आलेले पर्यटक धर्मसंकटात सापडले आहेत. काहींनी आपली सहल आटोपती घेतली तर काहींनी खरेदीला चाप लावला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images