Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सर्वोदय’चा वाद आता हायकोर्टात?

$
0
0
सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्काचा वाद आता हायकोर्टात जाणार असून, राजारामबापू सहकारी साखर कारखाना हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहे. तर, कॅव्हेट दाखल करण्यासाठी आमदार संभाजी पवार यांच्या हालचाली सुरू आहेत.

कोयनेचे वक्र दरवाजे उघडले

$
0
0
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात पावसाच्या पाण्याची मोठी आवक होत असल्याने धरण व्यवस्थापनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कंत्राटी कामगारांचा ‘महावितरण’वर मोर्चा

$
0
0
महावितरणच्या मुरगूड व गारगोटी विभागातील कंत्राटी कामगाराचे गेल्या ७ महिन्यातील थकीत वेतन त्वरीत द्यावे,नोकरीत कायम करावे आणि या कामगारांचा विमा ५ लाखापर्यंत करावा, या मागण्यासाठी मुरगूडच्या विभागीय वीज वितरण कार्यालयावर शिवसेनेसह कंत्राटी कामगारांनी आज मोर्चा काढला.

योग्य वेतनवाढीमुळेच संप मागे

$
0
0
‘कामगारांना दीड हजार रुपये वेतनवाढ द्यावी लागली. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत भविष्यनिर्वाह निधी, महागाई भत्ता व ओव्हर टाईम देण्याचे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

छळाप्रकरणी पती, सासूला अटक

$
0
0
खालसा कोळीद्रे (ता. चंदगड) येथील सौ. संपदा लक्ष्मण मोटर (वय २३) या विवाहीतेने पती, सासरा, सासू हे सर्वजण हुंड्यासाठी छळ करत असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे.

जोतिबा येथील ११६ हेक्टर जमिनीचा सर्व्हे पूर्ण

$
0
0
जोतिबा परिसराचा विकास आराखडा राबवण्याच्या दृष्टीने ११६ हेक्टर जमिनीचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. यातील समतल नकाशाच्या आधारावर विविध आर्किटेक्टकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे.

दरवाढीच्या पावसात शेतकरी कोरडाच

$
0
0
भाज्यांच्या भडकलेल्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्यातही घाम फोडला असला तरी भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात मात्र त्या दराचा काही हिस्साच पडला आहे.

अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत येणार २६ लाख

$
0
0
नवीन अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्या अपेक्षित धरण्यात आली आहे. जवळपास १२ लाख लोकांना योजनेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाचे होणार ‘ग्रीन ऑडिट’

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस सृष्टीसौंदर्यानं बहरलेला आहे, पण आवारात झाडे किती आहेत, वनस्पती कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, यासंबंधीची नेमकी माहिती नाही.

तटाकडील तालमीची खोटी कागदपत्रे

$
0
0
शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाचा खजानिस असल्यासंबंधीची खोटी कागदपत्रे तयार करून बँकेतील ठेव हस्तांतर केल्याच्या आरोपावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश बाळासाहेब जाधव यांच्यासह चौघांवर जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा नोंद झाला.

‘निर्भय योजने’वरून खडाजंगी

$
0
0
‘निर्भय योजने’च्या अंमलबजावणीवरून भाजपचे नगरसेवक सुभाष रामुगडे व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यात आज झालेल्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी उडाली.

‘लागेबांधे’च वरचढ

$
0
0
वाळू उपसा आणि दगडखाण व्यवसायालाही पर्यावरण समितीचा ‘ना हरकत दाखला’ आवश्यक केला. तो राज्यातील अनेक वाळूमाफियांना अडचणीचा वाटू लागला. बहुसंख्य ठेकेदार हे राजकीय नेत्यांचे बगलबच्चे असल्याने त्यांचा हस्तक्षेपच नव्हे तर दबाव वाढत होता.

सीपीआरमध्ये ३४ अॅम्ब्युलन्स

$
0
0
शहरासह जिल्ह्याच्या डोंगरी भागात आता आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी ३४ हायटेक अॅम्ब्युलन्स सीपीआर हॉस्पिटलच्या दिमतीला असणार आहेत. यापैकी आठ अॅम्ब्युलन्समध्ये ‘अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट’ सुविधा असणार आहेत.

मार्केट यार्डात स्टेशन

$
0
0
सध्याच्या रेल्वे स्टेशन ऐवजी मार्केट यार्ड येथील रेल्वे गुड्स मार्केट यार्डच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगसेवक राजेश लाटकर यांनी केली.

‘छावा’तर्फे मराठा आरक्षणासाठी महारॅली

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जनजागृती म्हणून छावा संघटनेच्यावतीने महारॅली काढण्यात आली. तिचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी केले. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली जिल्ह्यांतून काढण्यात आलेल्या या रॅलीत संघटनेचे अडीचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बाळ पोतदार यांची याचिका हायकोर्टाकडून नामंजूर

$
0
0
अमोल पोतदार प्रकरणाचा तपास विशेष पथक किंवा सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश धर्माधिकारी व शुक्रे यांच्या खंडपीठाने नामंजूर केली. तपास कसा करायचा याचे मार्गदर्शन न्यायालय करू शकत नसल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिनी रिक्षाचालकांना ई-मीटर वाटप

$
0
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जुलै रोजी कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रसतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‌‌७०० रिक्षाचालकांना ‌मोफत ई मीटरचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील, आयरेकर यांची शाहीर परिषदेवर निवड

$
0
0
कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेच्या सरचिटणीसपदी अजित आयरेकर यांची तर शहराध्यक्षपदी राजू पाटील यांची निवड करण्यात आली. शाहीर परिषदेच्या पेठवडगाव येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

रस्त्यावरच्या पार्किंगला अधि‘भार’

$
0
0
चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी रस्त्याचा वापर करणाऱ्यांसाठी पार्किंग फी आकारण्यात येणार आहे. घरफाळ्याबरोबर त्याची आकारणी केली जाणार आहे. महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला असून रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्यांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

मुख्यमं‌त्र्यांनी विरोधकांशी चर्चा करावी

$
0
0
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक विनाविलंब मंजूर करावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images