Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केएमटी पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड

$
0
0
शाळा, कॉलेज सुरू झाल्याने केएमटी बसच्या पाससाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. शहरातील महाराणा प्रताप चौक, शाहू खासबाग मैदान व गंगावेश तिन्ही केद्रांवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत पास देण्याचे काम सुरू आहे.

‘सीए’ परीक्षेत कोल्हापूरची मोहर

$
0
0
जिल्ह्यातील पंधराहून अधिक उमेदवारांचे अंतिम परीक्षेत यशम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरस्पर्धा परीक्षा, बँकिंग या परीक्षांपाठोपाठ देशपातळीवर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकौंटंट (सी.ए.) च्या अंतिम परीक्षेत जिल्ह्यातील तरुण- तरूणींनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, गांधीनगर अशा विविध भागांतील पंधराहून अधिक उमेदवारांनी सी.ए. परीक्षेत यश मिळवले आहे.

कागदापासून गणेशमूर्ती

$
0
0
गणेशोत्सवाचे वेध सुरू झाले की मूर्ती शाडूची की प्लास्टर ऑफ पॅरिसची?, रंग नैसर्गिक की रासायनिक? या चर्चेलाही सुरूवात होते. सण-समारंभ हे पर्यावरणाशी जोडलेले आहेत असे म्हणत असताना सध्या उत्सवांमधूनच पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचे फॅड आले आहे. मूर्तीकार म्हणतात की शाडू मिळत नाही, मिळालाच शाडू तर मूर्ती बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो.

लयीची वळणे

$
0
0
घाटांचे रस्ते जोखमीचे असतात. सावध नजर आणि एकाग्र चित्त याशिवाय घाटातला प्रवास संभवत नाही. प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर घाटाचं दडपण असतं, पण या दडपणासह घाट आली की, आपण उत्सुक आणि रोमांचित होतोच. घाटाची वळणदार लयबद्धता आणि प्रत्येक वळणावर उसळून येणारी उत्कंठा यामुळे प्रवासात सजीवता येते.

३८५ बार, दारू दुकाने सुरूच राहणार

$
0
0
राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत आखून दिलेली अंतराची मर्यादा जिल्ह्यातील केवळ दोनच बारनी ओलांडल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरात अशा तीन मार्गांवरील परमीट रुम, बिअर शॉपी, देशी-विदेशी दारू तसेच होलसेल दुकाने अशी ३८७ लायसन्सधारकांची तपासणी करण्यात आली.

माझ्या बदनामीचे षड्‍‍यंत्र

$
0
0
‘तटाकडील तालीम मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी चार वर्षे काम करत आहे. गणेशोत्सवाच्या खर्चाचा तपशील धर्मादाय न्यास कार्यालयाकडे सादर करुन पारदर्शक कारभाराचा पायंडा पाडला आहे.

धरणक्षेत्रांत अतिवृष्टी

$
0
0
कुंभी, कासारा, कडवी, राधानगरी, तुळशी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरणक्षेत्रांत गुरूवारी अतिवृष्टी झाली आहे. कडवी व कुंभी धरणे ८० टक्के भरली असून राधानगरी व वारणा ही धरणे ८० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला.

अकबर मोहल्ल्यात दोन गटांत हाणामारी

$
0
0
अकबर मोहल्ला येथे गुरुवारी रात्री साने गुरुजी वसाहत व स्थानिक तरुणांच्या गटात हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला. हाणामारी सुरु असताना स्थानिक तरुणांचा मोठा जमाव जमल्याने साने गुरुजी वसाहतीमधील तरुण पळून गेले.

पोषण आहारात खबरदारी घ्या

$
0
0
शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या बिहारमध्ये घडलेल्या घडनेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातही सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जैवविविधता रक्षणासाठी समिती

$
0
0
पर्यावरणसंपन्न कोल्हापुरात होणारा जैवविधतेचा ऱ्हास थांबवण्यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शहर व जिल्ह्यातील जैवविविधतेची नोंद ठेवण्यासह वनस्पती औषधांची पेंटट घेण्यात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

स्थानक हलवा, स्मारक करा

$
0
0
दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, शहरात येण्यासाठी असणारे मर्यादित मुख्य रस्ते, त्यावरील रुंदीकरणाचे भेडसावणारे प्रश्न आणि या सर्वांमधून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने रेल्वे स्थानक मार्केट यार्ड परिसरात स्थलांतर‌ित करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह ठरणारा आहे.

आता मलाच पिस्तुल हातात घ्यावे लागेल!: उदयनराजे

$
0
0
साताऱ्यात गोळीबारासारखे प्रकार वाढले असून, बेकायदा पिस्तुलांचा सुळसुळाट झाला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, जिल्हा आणि पोलिस प्रशासन निष्क्रिय झाले आहे. पुरावा नसल्याचे कारण पोलीस पुढे करीत आहेत. त्यामुळे आता मला हातात पिस्तुल घ्यावे लागेल, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला.

११५ विद्यार्थी आजारी

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील माळकवठे गावातील पंचाक्षरी शाळेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना रक्तवाढीसाठी देण्यात आलेल्या गोळ्या घेतल्यानंतर ११५ विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ, उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने जिल्ह्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलाची महापूजा संपन्न

$
0
0
पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेला अनुसरुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक महापूजा केली.

सुविधा कमी, अडचणी जादा

$
0
0
लांबी व उंचीने कमी असलेले प्लॅटफॉर्म, कमी जागेमुळे जादा प्लॅटफॉर्म तयार करण्यातील अडचण, उपलब्ध प्लॅटफॉर्मवरही प्रवाशांना जाण्यासाठी होणारा त्रास पाहता सध्याच्या रेल्वे स्टेशनवर सुविधा कमी व अडचणी जादा असाच प्रकार आहे. रेल्वेने मॉडेल स्टेशन म्हणून कोल्हापूरचा समावेश केला असला तरी प्लॅटफॉर्मवर कोणता डबा कोठे येणार याचे इंडिकेटर्स सोडल्यास मॉडेल म्हणाव्यात अशा सुविधा दिसतच नाहीत.

रेल्वे स्टेशनच्या स्थलांतरास इतिहासप्रेमींचा विरोध

$
0
0
रेल्वे स्टेशन सध्याच्या जागेवरून हलवून ते मार्केट यार्ड येथील गुड्स यार्डमध्ये स्थलांतरित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. मात्र, त्याला इतिहासप्रेमी कार्यकर्ते अमित आडसुळे, संजय चव्हाण, व्ही. के. खोडके, अशोक बाबूराव रानगे, शंकर बुने, आदींनी विरोध केला असून, याबाबत महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

मदरशांत अभियांत्रिकी शिक्षण देणार

$
0
0
'केंद्र सरकारच्या माध्यमातून मदरशांच्या आधुनिकीकरणाची योजना राबवली जात असून त्याअंतर्गत पार्टटाइम आयटीआयचे कोर्स सुरु करण्यात आले आहेत. आगामी काळात अभियांत्रिकी शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे,' अशी माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी पत्रकार​ परिषदेत दिली. 'उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा गुणात्मक दर्जा तपासण्यासाठी कार्यशाळाही घेण्यात येणार आहे' असे हकीम म्हणाले.

जातपंचायत पुढाऱ्यांवर कारवाईची मागणी

$
0
0
आंतरजातीय विवाह केला म्हणून आपल्या कुटुंबीयास समाजाच्या सर्व कार्यक्रमातून बाजूला काढण्याबरोबरच कुटुंब वाळीत टाकणाऱ्या कलेढोण (ता. खटाव) येथील लिंगायत समाजाच्या जातपंचायत पुढाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील युवक कार्यकर्ते सचिन चन्नबसवेश्वर शेटे यांनी वडूज पोलिसांकडे केली आहे.

कॉलेज तरुणांकडून ४५ लाखांचा ऐवज जप्त

$
0
0
बेळगाव पोलिसांनी दोन कॉलेज तरुणांना अटक करून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किमतीचा चोरीचा ऐवज हस्तगत केला आहे. केवळ चैनीसाठी चोऱ्या केल्याची कबुली या दोन तरुणांनी दिली असून, ते दोघे चांगल्या कुटुंबातील आहेत.

'वांग-मराठवाडी'ग्रस्तांना समस्यांचा विळखा

$
0
0
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील वांग-मराठवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठयात झपाट्याने वाढ होत असून, सांडव्यातून पाणी वाहत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, पुनर्वसन न झालेल्या गावांतील धरणग्रस्तांच्या समस्यात आणखी भर पडली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images