Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राजकीय प्रगल्भतेची कसोटी

$
0
0
१६ मे रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी विविध पक्षांचे बलाबल, जनमत कौल, सरकार स्थापनेबाबत संभाव्य हालचाली सुरू होतील व बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या पक्षाला २७२ हा जादूई आकडा गाठण्यासाठी बऱ्याच खटपटी, लटपटी कराव्या लागतील. तथापि, ही सार्वत्रिक निवडणूक आजवर झालेल्या निवडणुकांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार असून ती मतदारांच्या राजकीय प्रगल्भतेची कसोटी पाहणारी ठरेल.

वारसा बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये

$
0
0
‘शरद पवार यांनी आत्तापर्यंत कितीजणांची नावे घेतली. त्यांनी केवळ नावेच घेतली नाहीत तर वारसे देखील बदलले. अशा राजकीय वारसे बदलणाऱ्यांनी आम्हाला बाळासाहेबांचे नाव घ्यायला शिकविण्याची गरज नाही,’ असे प्रत्युत्तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

‘विधानसभेपेक्षा यावेळची लोकसभा महत्त्वाची’

$
0
0
‘विधानसभेला आपण माझे काम नाही केले तरी मी तक्रार करणार नाही. मात्र, यावेळी हलगर्जीपणा नको. दुसऱ्यांना सातत्याने शिव्या-शाप देत लोकांची दिशाभूल करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. कारखानदारांच्या छाताडावर नाचून दर मिळविला, ही यांची भाषा. आमची छाताडेही छोट्या-छोट्या शेतकरी, शेतमजुरांच्या पाठबळातूनच बनली आहेत हे लक्षात ठेवा,’ असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

संशोधनाचा आलेख उंचावतोय

$
0
0
उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीत संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कॉलेज असो वा विद्यापीठ संशोधनाच्या बळावरच त्या संस्थांचा लौकिक वाढत असतो. विद्यार्थ्यांना उच्चदर्जाचे शिक्षण, संशोधनाच्या संधी मिळाव्यात यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने गेल्या पाच वर्षांत संशोधनावर भर दिला आहे.

माजी मंत्री अजित घोरपडे संजयकाकांच्या प्रचारात सक्रिय

$
0
0
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. कवठेमहांकाळ-तासगाव तालुक्यात विविध ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी गव्हाण, डोंगरसोनी भागात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.

पवार पंतप्रधान झाल्यास देशाचे कल्याण

$
0
0
‘मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मात्र, व्यक्ती म्हणून नाही तर प्रवृत्ती म्हणून मोदी देशासाठी घातक आहेत. निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. पवार पंतप्रधान झाले, तर देशाचे कल्याण होईल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून द्या,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

रुसवे-फुगवे कायम

$
0
0
सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान पाच दिवसांवर आली आहे. प्रचारासाठी केवळ तीनच दिवस बाकी असल्याने आघाडी, आप, महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आजूनही काही ठिकाणी रुसवे फुगवे आहेत. महायुतीची या मतदार संघात परवड सुरू आहे. तर ‘आप’ने मात्र ग्रामीण भागांत प्रचाराचा जोर धरला आहे.

सोशल मीडिया आणि तरुणाई

$
0
0
“फोटो आपल्यासाठी आठवणीशी निगडित आहेत. तरुण पिढीसाठी फोटो महितीशी निगडित आहेत.” इंस्टाग्राम ह्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तरुण वर्गात खूपच जोम धरलेल्या सोशल मीडियाबद्दल आम्ही बोलत असताना माझ्या एका जाणकार मित्राने फोटोबद्दलची, या विषयाकडे बघायची माझी नजरच बदलून टाकली.

‘अवनि’, ‘शुभम’तर्फे हंगामी अंगणवाडी

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामासाठी असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी अन्न, वस्त्र निवारा संस्था आणि शुभम सिव्हिल प्रोजेक्टच्यावतीने हंगामी अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे.

मेडिको लिगल सेल स्थापन करणार

$
0
0
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने (केएमए) मेडिको-लिगल सेल स्थापण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यातून पेशंट आणि डॉक्टर यांच्यात काही वाद असतील तर ते मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

...वाट ही डोंगराची!

$
0
0
दख्खनचा राजा जोतिबा यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. वर्षानुवर्षे मानाची सासनकाठी घेऊन जोतिबा डोंगरावर हजारो भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पंचगंगा नदीघाटावर पहिला मुक्काम करुन पुढील प्रवासासाठी भाविक रवाना होत आहेत.

आंब्याचा दरवळ

$
0
0
कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याची रेलचेल सुरू झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सर्वत्र दरवळ पसरला आहे. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस ते अगदी केसर, लंगडा, बेगमपल्ली अशा विविध जातीचे आंबे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

आचारसं‌हितेचा अतिरेक होतोय: CM

$
0
0
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. परंतू अतिउत्साही लोकांकडून आचारसंहितेची अतिरेकी अंमलबजावणी सुरु आहे. मलाही याचा वैयक्तिक अनुभव आला आहे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी नाराजी व्यक्त केली.

विजय‘घाटा’चे आडवळण

$
0
0
प्रत्येक पक्षाने प्रतिष्ठेचा केलेला हा मावळ मतदारसंघ. रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर, पनवेल, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देत प्रचारात आघाडी घेतली खरी; पण विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी बंडाचा झेंडा फडकावला.

प्रतीक पाटील यांच्यासाठी मिरजेत रोड शो

$
0
0
सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरजेत पदयात्रा आणि छोट्या पडद्यावरील ‘होणार सून मी या घरची’, या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोचलेल्या ‘श्री-जान्हवी’ जोडीचा रोड-शो आयोजित करण्यात आला होता.

‘ना हातला, ना कमळला माझं मत मोदीला’

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचत असतानाच ‘मोदी’ जपाने सर्वसामान्य आणि अशिक्षित मतदार अगदीच प्रभावित झाला आहे. यावेळी ना हात, ना कमळ, ना घड्याळ माझे मत केवळ मोदीला, असे सामान्य, अशिक्षित मतदार म्हणत आहे.

निवडणूक आयोगाचे रन फॉर व्होट

$
0
0
मतदार जागृती अभियानांतर्गत रविवारी सांगली मिनी मेरॉथॉन स्पर्धेत धावली. या स्पर्धेसाठी लहान मुले-मुली, युवक युवती, मध्यमवयीन आणि वयाच्या साठीनंतरही स्पर्धेत धावण्याची क्षमता असणाऱ्यांच्या गर्दीने छत्रपती शिवाजी स्टेडियम रविवारी सकाळी फुलून गेले होते. जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी झेंडा उंचवताच विविध गट स्पर्धा जिकण्यासाठी लोंढ्याने स्टेडियमच्या बाहेर पडले.

‘माढ्यात वाडाविरूद्ध गावगाडा’

$
0
0
‘माढ्यात वाडाविरूद्ध गावगाडा अशी निवडणूक आहे. या लढतीत गावगाडा जिंकणार,’ असा ठाम विश्वास माढा मतदारसंघातील महायुतीच उमेदवार सदाभऊ खोत यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील कळंबी व औंध येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कळंबी व औंध येथील लोकांनी खोत यांच्या ‘एक व्होट एक नोट’ या आवाहनास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

सर्वांगीण प्रगतीसाठी काम करू

$
0
0
सोळाव्या लोकसभेत सातारा जिल्ह्यातील महिलांचा आवाज अधिक प्रखर करण्यासाठी आणि मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार करेन, अशी ग्वाही अपक्ष उमेदवार अॅड. वर्षा माडगूळकर यांनी कराड येथे दिली.

साताऱ्यात इतिहासाची पुनरावृत्ती करा

$
0
0
‘सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुक्यातील काही समस्या मांडल्या. कार्यकर्त्यांनी प्रचार करताना महत्त्वाच्या प्रश्नांची यादी करावी. निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images