Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोदींचे स्वप्न मतदार उघळून लावतील

0
0
‘अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात सन २००४ साली भाजपाने ‘इंडिया शायनिंग’चा नारा देत आम्हीच सत्तेवर येणार असे वातावरण केले होते. तसेच वातावरण निर्माण करून नरेंद्र मोदींना आताच पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र, येथील सुज्ञ मतदार त्यांचे स्वप्न उधळून लावतील,’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला रविवारी सायंकाळी कराड येथे उदयनराजेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

विद्यार्थीकेंद्रित उपक्रमाला हवे पाठबळ

0
0
तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या त्रुटीवर उपाय आखले. अ​धिविभागात पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. प्रत्येक घटकाला अपडेट राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या. तथापि, ‘नॅक’ची तयारी म्हणजे प्रशासनाचे काम अशी काहींची धारणा झाली आहे. काही प्राध्यापक विद्यार्थीहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणारे तर काहीजण भाषणबाजीत मग्न आहेत.

अतिरिक्त शिक्षक जिल्ह्यातच सामावण्याच्या हालचाली

0
0
‘प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातच सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समायोजनाची कार्यवाही केल्यास शिक्षकांची जिल्ह्यातच सोय होणार असून, गुणवत्तावाढीस गती मिळणार आहे,’ अशी माहिती राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अन्नछत्राचा २५ हजार भाविकांनी घेतला लाभ

0
0
शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे सुरू असलेल्या अन्नछत्राचा रविवारी पहिल्याच दिवशी २५ हजार भाविकांनी लाभ घेतला. मंडळातर्फे पंचगंगा नदी घाट येथे जोतिबा यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्र सलग तीन दिवस सुरू राहणार आहे. यात्रेकरू शामराव खंडागळे, संगीता खंडागळे, अमित पाटील यांच्या हस्ते अन्नछत्राचे उद्घाटन झाले. एक लाख यात्रेकरूंसाठी अन्नछत्राची सोय केली आहे.

टाकाळा खणीत लँडफील साइट

0
0
कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहणारे इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टाकाळा खणीत लँडफील साइट विकसित करण्यास सुरुवात झाली आहे. तेथील पाणी काढण्याबरोबरच रिटेनिंग वॉल, जमिनीचे सपाटीकरण करण्याबरोबरच टाकलेल्या मेटरियलमध्ये साठलेला गॅस बाहेर काढण्यासाठी पाइप टाकण्याचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज भरगच्च कार्यक्रम

0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त सोमवारी (​ता.१४) शहर आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. मध्यवर्ती जयंती समितीच्यावतीने दसरा चौक येथून मिरवणूक काढली जाणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत दलित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीवर आधारित चित्ररथ स्पर्धा हे आकर्षण असणार आहे. व्याख्यान, परिसंवाद आणि मिरवणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होणार आहे.

जरगनगरात अडीच लाखांची घरफोडी

0
0
जरगनगर येथील भूमिनंदन कॉलनीत रविवारी पहाटे घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये सहा तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, रोख २८ हजार रुपये असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

‘निवडणुकीनंतर मोदींची हवा संपेल’

0
0
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काळातील गुजरात सर्वांना हवा आहे. मात्र जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या मोदिंच्या काळातील गुजरात कुणालाच नको आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर पाटील यांनी केले. निवडणुकीनंतर मोदिंची हवा निघून जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

‘दौलत’च्या कामगारांची उद्या बैठक

0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मंगळवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता कामगारांची बैठक बोलावल्याची माहिती अर्जुन कुंभार यांनी दिली. दौलत बचाव संघर्ष समितीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत `नोटा` चा पर्याय वापरुन शेतकऱ्यांची एकजूट दाखवून देण्यासाठी आवाहन केले होते.

समताधिष्ठित समाजरचना आंबेडकरी चळवळीचा गाभा

0
0
‘समताधिष्ठित समाजरचना आणि व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे. सामाजिक परिवर्तनाची चळवळ भविष्यकाळातही जोमानेच लढावे लागेल,’ असे प्रतिपादन सुदर्शन इंगळे (सातारा) यांनी केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. समितीचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मिरवणूक, अभिषेक, धार्मिक कार्यक्रम...

0
0
शहरात रविवारी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात जैन समाजाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. भारतीय जैन संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या महावीर रथ मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते. लक्ष्मीसेन जैन मठ, दिगंबर जैन मंदिर येथे सकाळपासूनच भगवान महावीर यांच्या दर्शनासाठी रीघ लागली होती.

हक्कासाठी ‘निमा’ संघटना बळकट करा

0
0
‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा (निमा) स्थापना दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या हक्कासाठी ‘निमा’ हेच योग्य व्यासपीठ असून ही संघटना बळकट करावी,’ असे आवाहन निमा संघटनेचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील बी. पाटील यांनी केले. ‘

शरद पवारांचे धोरण भांडवलदारधार्जिणे

0
0
‘कृषीमंत्री शरद पवार यांनी भांडवलदार व मध्यस्थाना केंद्रस्थानी ठेवूनच कृषी धोरण राबविले. शेतकऱ्याला या धोरणांचा कधीही फायदा झाला नाही.शेतमालाला रास्त भाव मिळावा अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांना जनता निवडणुकीतच योग्य उत्तर देईल,’ असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. गडहिंग्लज येथे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

जातीयवादी कळपात गेलेल्या शेट्टींचा पराभव करा

0
0
जातीयवाद्यांच्या कळपात सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचा संकल्प केलेल्या भाजपचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजू शेट्टींचा पराजय करण्यासाठी दलित-मुस्लिम समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने पेटून उठण्याचे आवाहन मागासवर्गीय सूत गिरणीचे उपाध्यक्ष प्रा. अनिल कांबळे यांनी केले.

निवडणुकीवरील बहिष्काराचे वृत्त निराधार

0
0
आसगाव (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्त निराधार असून लोकसभा मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे ग्रामस्थांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सहकारविरोधी प्रवृत्ती रोखण्यासाठीच काँग्रेसबरोबर

0
0
जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या आणि सहकार मोडीत काढणाऱ्या प्रवृत्तीला रोखण्यासाठीच जनसुराज्य शक्ती पक्षाने लोकसभा निवडणुकीपुरताच काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून सहा महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुका जनसुराज्य पक्ष काँग्रेस विरोधात लढवणार असल्याचे सूतोवाच जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी रविवारी वारणानगर येथील महामेळाव्यात केले.

महिला, शेतकरी आणि सामान्य केंद्रस्थानी

0
0
जनतेशी संबंधित नसलेल्या प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव व्हावी आणि जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण करणे आणि नव्याने काही कायदे नीटपणे करण्यासाठी प्रयत्न होणे हाच ‘जनतेच्या जाहीरनाम्या’चा उद्देश आहे. केवळ एकमेकांवर टीका करणे एवढेच राजकीय पक्षांचे काम झाले आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांवर राजकीय पक्ष चर्चा करत नाहीत.

तुकड्यांचा निर्णय सरकारच्या हाती

0
0
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात येत्या शैक्षणिक वर्षात नवीन तीन कॉलेज, तीन विद्याशाखा, पंधरा विषय आणि ३४ तुकड्या सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत. विद्यापीठ स्तरावर प्रस्ताव पास झाले असून आता ते ३० ​एप्रिलपर्यंत राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविले जाणार आहेत.

कष्टकरी महिलांची रोजचीच लढाई

0
0
दिवसरात्र काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा पण डोक्यावर हक्काचं छत्र नाही...सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास घडतो...आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, पण सांगायचं कुणाला? आपलं आयुष्य कष्टात गेलं, किमान मुलांचं शिक्षण नीट पार पडावं यासाठी झगडा सुरू आहे... अशा अनेक समस्या घेऊन घरेलू कामगार, कचरा वेचक आणि बांधकाम मजूर महिला जगण्याची लढाई लढत आहेत. निवडणुकीतून आपल्याला काय मिळणार आहे, याचा अंदाज नसला तरीही लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस

0
0
जोतिबाच्या नावानं चांगभलं... यमाईच्या नावानं चांगभलं.....चा गजर आणि हलगीच्या निनादात सासनकाठ्या नाचवत लाखो भाविकांनी रविवारी जोतिबा डोंगरावर हजेरी लावली. मंदिर परिसर गुलालात न्हाऊन निघाला आहे. यात्रेचा आज (सोमवार) मुख्य दिवस आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली असून, पोलिस प्रशासन रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहन पार्किंग करण्यासाठी भाविकांना मदत करीत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images