Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

छाननीत ‘कोल्हापूर’ मधील पाच अर्ज अवैध

$
0
0
जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी केलेल्या छाननी प्रक्रियेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. यामध्ये अरुंधती महाडिक, भूषण पाटील या उमेदवारांचा समावेश आहे.

सांगलीत अकरा उमेदवारांचे अर्ज अवैध

$
0
0
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांच्या छाननीत गुरुवारी सात उमेदवारांचे अकरा अर्ज अवैध ठरविण्यात आले. काँग्रेसचे प्रतीक पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, ‘आप’च्या समीना खान, जनता दलाचे के. डी. शिंदे, काँग्रेसचे बंडखोर हाफीज धत्तुरे यांच्यासह २७ उमेदवारांचे ३८ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष महायुतीच्या प्रचारात

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष असलेले वीरेंद्र मंडलिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. सेनेच्या कार्यकर्त्यांसह ते प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात असूनही काँग्रेसने अजूनपर्यंत त्यांच्याबाबत काहीच पावले उचललेली नाहीत.

महिन्याभरात मिळणार कनेक्शन

$
0
0
महावितरणने नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्याची पारंपरिक पद्धत बंद केली आहे. नवीन कनेक्शनसाठी कृषी, औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांनाही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे वीज कनेक्शन मिळवून देतो म्हणून हजारो रुपये उकळणारी मध्यस्थांची साखळी बंद होणार आहे.

कृषीमंत्री पवार, मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना जबरदस्तीने बोलवून त्यांना एलबीटी कराबाबत निर्णय घेण्याचे अमिष दाखवून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

‘पाटबंधारे’ नेच महापालिकेला परतावा करावा

$
0
0
सरकारच्या निर्णयानुसार घरगुती वापरासाठी ९९.६० टक्के व औद्योगिक वापरासाठी ०.४० टक्के या टक्केवारीप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी केल्यास पाटबंधारे विभागाची थकबाकी नसल्याचे स्पष्ट होते.

हजार विद्यार्थी क्षमतेचे होस्टेल

$
0
0
पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने एक हजार प्रवेश क्षमतेचे नवे बॉइज होस्टेल उभारणीसाठी अंदाजपत्रकी तरतूद केली आहे. शिवाय केमिस्ट्री आणि कम्प्युटर सायन्स विभागाच्या नव्या इमारतीसाठीही भरीव तरतूद केली आहे.

आचारसंहितेत धोत्रेंची सायकल

$
0
0
सायकलवरुन प्रचार करण्याची परवानगी मिळवण्यासाठी एका राज्यस्तरीय पक्षाला पदाधिकाऱ्यांची फौज घेऊन सरकारी विभागांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

पाइपलाइन गळतीचा शोध अपूर्णच

$
0
0
एसटीपी प्रकल्पातील किमान पहिला टप्पा सुरु करण्याची महापालिकेने हायकोर्टासमोर दिलेली ग्वाही पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून धावाधाव सुरु आहे. प्रकल्पातील तांत्रिक काम या मुदतीपर्यंत पूर्ण झाले तरी दुसरीकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या २ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनची गळती शोधता आलेली नाही.

‘मुश्रीफांमुळेच शेतकरी कर्जबाजारी’

$
0
0
कामगारमंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या बगलबच्च्यांनी केडीसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जबाजारी करुन राजकीय पोळी भाजून घेतली आहे. या जिवावरच मंत्री मुश्रीफ यांचे सत्तेचे राजकारण सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकाव्दारे केला आहे.

कोल्हापुरात मनसे राहणार तटस्थ

$
0
0
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोल्हापूरातून कोणालाही पाठींबा न देण्याचा निर्णय झाल्याने एकंदरीतच मनसे या निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार आहे. मनसे नेमका कोणाला पाठींबा देणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात होते.

पोलिसांना टेन्शनच टेन्शन

$
0
0
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जोतिबा यात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महालक्ष्मी रथोत्सवाबरोबरच बड्या नेत्यांच्या प्रचार सभा एकत्रित आल्याने पोलिस प्रशासनांवर ताण पडणार आहे.

वीज चोरीला बसणार आळा

$
0
0
वीज चोरीला आळा घालण्यासाठीचे तंत्र संजीवन इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले आहे. त्यामुळे नेमकी कोणत्या खांबावरून वीज चोरी होत आहे ते शोधून काढणे शक्य होणार आहे.

लगीनघाई

$
0
0
मुलांमध्ये लग्नाच्या ड्रेससाठी फारसे ऑप्शन नसले तरी थ्रीपीस, शेरवानीला मॉडर्न टच देवून मुले लग्नाची खरेदी करत आहेत. यामध्येही मोतीकलर, मरून, रेड, गोल्डन, ब्ल्यू हे कलर इन आहेत. तर गेल्या काही वर्षांत कुर्ता सलवार आणि कुर्ता धोती हा पर्यायही मुलांना सूट होत आहे.

शाश्वत असं काय मिळवलं?

$
0
0
नवनवी कार्सची मॉडेल्स, मोबाइलची अॅडव्हान्स मॉडेल्स, निरनिराळे वास्तू प्रकल्प, नव्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या ऑफर्स, नवीन प्रकारचे फर्निचर, अनेक प्रकारच्या खरेदीचा मोह अनावर व्हावा, अशा जाहिरातींनी गेला पंधरा दिवस वर्तमानपत्राची पानं भरू लागली आणि गुढीपाडवा जवळ आल्याचे जाणवू लागले.

‘सागरेश्वर’ मध्ये सायकलिंग ट्रेक

$
0
0
हरण, सांबर असे वन्यप्राणी सहजासहजी दृष्टीस पडत असल्याने दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या सागरेश्वर अभयारण्यात पर्यटकांसाठी सायकलिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

लगीनघाई

$
0
0
‘लग्न पहावं करून,’ असं म्हणतात. पण लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी ‘लग्नाची खरेदी पहावी करून,’ अशी म्हण रूढ होतेय. ज्यांच्या घरी कार्य आहे त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे...

गारपीटग्रस्तांना मदत देणार

$
0
0
फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील २८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती कोसळी आहे. या शेतकऱ्यांना मदत म्हणून एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतला आहे.

यंदा मार्च एंडिंग सुनासुना

$
0
0
मार्च एंडिंगसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने उत्पन्नाचे टार्गेट असलेले महापालिकेतील विभाग उपलब्ध कर्मचाऱ्यानिशी वसुलीची मोहिम जोरात राबवत आहेत. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर गर्दी पहावयास मिळत आहे.

ठरावाच्या उपसूचनेचे राजकारण

$
0
0
महापालिकेच्या सभेतील ठरावाला दिली जाणारी उपसूचना ठराव सुधारण्यासाठी नव्हे हवे ते पदरात पाडून घेण्याबरोबरच दर वाढवण्याचेही हत्यार बनली आहे. एखादा ठराव सुधारण्याची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर सभेमध्ये उपसूचना देण्याची आवश्यकता आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images