Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागलमध्ये फिफ्टी फिफ्टी

$
0
0
तालुक्यातील हक्काचा माणूस, खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या कामाची पुण्याई म्हणून शिवसेना भाजपचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना आणि पक्षाचा आघाडी धर्म पाळण्यासाठी, शेकडो लोकांच्यावर मोफत शस्त्रक्रिया, गावची विकासकामे हसन मुश्रीफ यांनी केली असल्याने त्याची परतफेड करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मतदान करणार असल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया कागल तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केल्या.

ऊन फोडतेय उमेदवारांना ‘घाम’

$
0
0
आग ओकणारा सूर्य, शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, सतत पाणी पिण्याने मारली जाणारी भूक, रणरणत्या उन्हात व फॅनमधून येणाऱ्या गरम वाऱ्यात कराव्या लागणाऱ्या प्रचाराचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे.

प्रबंधांवरील श्रद्धास्थानांना सुटी

$
0
0
पीएचडी आणि एम फिल प्रबंधांमध्ये यापुढे श्रद्धास्थाने, आवडत्या व्यक्तींचे फोटो लावणे तसेच प्रबंधांना अर्पणपत्रिका जोडण्यास मनाई करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. प्रबंध हे संशोधनपर लेखन असते.

आणखी वर्षभर धूळच खा

$
0
0
लोकसभेची आचारसंहिता संपताच सरकारचा पावसाळ्याचा नियम आडवा येत आहे. त्या नियमातून वाट काढत काम सुरू करायचे ठरवल्यास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आड येणार आहे.

वाचक चळवळीची उपेक्षा

$
0
0
जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या दर्जा वाढ आणि नवीन मान्यतेसाठी अजून एक वर्षभर थांबावे लागणार आहे. राज्यभर झालेल्या ग्रंथालय पडताळणी आणि आचारसंहितेचा फटका ग्रंथालय चालकांना बसणार आहे.

तलाव फुलले

$
0
0
उन्हाची काहिली वाढत असल्यामुळे बाहेरची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उरकण्याची घाई सुरू असते. त्यात दुपारी बाहेर जावेच लागले तर डोक्यावर टोपी किंवा छत्री घेऊनच बाहेर पडावे लागते.

‘द प्रॉमिस’ला पाच नामांकने

$
0
0
‘लेक वाचवा’ असा संदेश देण्यासाठी कलेच्या व्यासपीठावर अनेक पध्दतीने व्यक्त होणाऱ्या कलाकृतींच्याच पंक्तीतली ‘द प्रॉमिस’ ही शॉर्टफिल्म दिल्ली येथे होणाऱ्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी नॉमिनेट झाली आहे.

‘करुणालया’साठी मदतीची गरज

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्ससह जगणाऱ्या मुलांसाठीचे एकमेव वसतिगृह असलेल्या शिये येथील करुणालय या वसतिगृहाच्या वाढीव इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याला कोल्हापूर हायकर्स संस्थेच्यावतीने १३७ पोती‌ सिमेंट देण्यात आले.

मनोरुग्णावरील उपचार होणार सोपे

$
0
0
विविध आजारांनी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी सावली केअर सेंटर गेल्या दहा वर्षांपासून कार्य करत आहे. समाजातील मनोरुग्णांचा प्रश्नही गंभीर आहे. या लोकांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा समाजात आणण्यासाठी कोहम मेंटल हेल्थ केअर व रिहॅबीलिटेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

गारपीटग्रस्तांना एक दिवसाचा पगार देणार

$
0
0
फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील २८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती कोसळी आहे. या शेतकऱ्यांना मदत म्हणून एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतला आहे.

‘सह्याद्री’चे चित्रांतून समाजप्रबोधन

$
0
0
नैसर्गिक आपत्ती, पश्चिम महाराष्ट्रातील घटत चालेली जैवविविधता, शहरातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न असो अगर पाण्यासाठी टाहो फोडणारी सामान्य जनता यासह विविध सामाजिक ज्वलंत प्रश्नावर मार्गदर्शन आणि त्यावर आधारित चित्रकला असा समाजप्रबोधनाचा अनोखा उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आला.

ऐतिहासिक गूळ बाजारपेठेला घरघर ?

$
0
0
राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ वसवली. कोल्हापुरी गुळाच्या चवीने आणि गोडीने देशातील विविध बाजारपेठा काबीज केल्या. परंतु नुकताच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि महागाईला आळा घालण्यासाठी प्रक्रिया केलेल्या शेतीमालावरील नियमन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सौदे सुरू, प्रश्न अधांतरीच

$
0
0
राज्य सरकारच्या पणन, सहकार व वस्त्रोद्योग खात्याने प्रक्रिया केलेल्या शेतीमालावरील नियमन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरला दोन सुवर्ण

$
0
0
अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग संघटनेतर्फे जमशेदपूर येथे पॉवर लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत बिभिषण पाटील व्यायामशाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली.

मंदिर चोरीतील चौघे गजाआड

$
0
0
भुदरगड तालुक्यात गेल्या महिन्यात दोन ठिकाणी घडलेल्या मंदिरांतील चोरी, घरफोड्या, मोटारसायकलचे टायर चोरणाऱ्यांचा भुदरगड पोलिसांनी छडा लावला. दोन दिवसांपूर्वी संशयित म्हणून अटक केलेल्या चौघांनी चोरीची कबुली दिली.

बलात्कारप्रकरणी फौजदार अटकेत

$
0
0
महाविद्यालयीन तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फौजदारला सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ए. के. नदाफ असे त्या फौजदाराचे नाव असून, तो शहरातील खडेबाजार पोलिस स्टेशनमध्ये सेवा बजावत आहे.

माढ्यात काँग्रेस ‘हात’चे राखून

$
0
0
माढा मतदारसंघात येणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या भागात काँग्रेसचे नेते जाहीरपणे राष्ट्रवादीविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बंडखोरी न करण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादीचे काम करण्याविषयी मात्र काँग्रेसमधील गट ‘हात’चे राखून असल्याचे जाणवत आहे.

उंदीर आणि रावण

$
0
0
सांगली मतदारसंघात भाजपच्या प्रचारात काँग्रेसवर टीका करण्याऐवजी उमेदवार संजयकाका पाटील आणि आमदार संभाजी पवार यांच्यातच परस्पर चिखलफेक सुरू आहे. त्यात संजयकाका पाटील यांनी संभाजी पवारांची संभावना ‘वाघ झालेला उंदीर’ अशी केली, तर पवार गटाच्या नगरसेवकाने संजयकाकांचा उद्धार ‘साधूच्या वेशात आलेला रावण’ असा केला.

उदयनराजेंची मालमत्ता ६० कोटी

$
0
0
राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची मालमत्ता ५९ कोटी ७४ लाख रुपयांची असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे ८२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असून, ३ लाख १२ हजार ९४१ रुपयांचे कर्जही आहे.

निवडणूक कार्यालये धामधुमीपासून दूरच

$
0
0
निवडणूक कार्यालय म्हणजे कार्यकर्त्यांची धावपळ, प्रचार साहित्याची जमवाजमव आणि सभांचे नियोजन याचीच चर्चा. मात्र, पक्षांच्या निवडणूक कार्यालयात सध्या यापैकी काहीच होताना दिसत नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images