Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ठेकेदारांच्या वादात ‘पे अँड पार्क’

$
0
0
शहरातील पार्किंगच्या १४ ठेक्यांसाठी टेंडर भरलेले ठेकेदार महापालिकेकडे न फिरकल्याने फेरटेंडर काढावे लागले आहे. नवे ठेकेदार मिळू नयेत यासाठी जुने काही ठेकेदार जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची चर्चा आहे.

टोल लादणाऱ्यांना हद्दपार करा

$
0
0
‘टोल व एलबीटीच्या बैठकांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नाही, ते पृथ्वीराज चव्हाण स्वतः उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी कोल्हापुरात दाखल होतात, म्हणजे ही जनतेच्या डोळ्यात धूळफेकच आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारनेच कोल्हापूरवर एलबीटी व टोल लादला असल्याने आता त्यांना निवडणुकीच्या ‌निमित्ताने हद्दपार करा,’ असे आवाहन शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी येथे केले.

क्षेत्र कोणतेही असो, शिक्षणाला पर्याय नाही

$
0
0
मी हे लिहित असताना मला माझ्या डोळ्यांसमोर माझी परीक्षा दिसत आहे. खरंतर पुढच्या आठवड्यापासूनच माझी सेमिस्टर परीक्षा सुरू होत आहे. सध्या मी कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे व इंग्रजी साहित्य हा माझा मुख्य विषय आहे.

रुईपासून बायोडिझेल

$
0
0
बायोडिझेल ही संकल्पना फारशी नवीन नाही. पण ज्वारी, मका, ऊस अशा खाद्यपिकांपासून बायोडिझेल बनवले जात असल्याने त्यासंदर्भात भिन्न मते व्यक्त होत असतात.

हा उकाडा सोसवे (ना)!

$
0
0
उन्हातून काही मिनिटे चालत उभे राहिले तरी अंग भाजून निघत असल्याचे जाणवते. बाईकवरुन फिरताना तर उन्हाच्या झळा आणखीनच तीव्र होतात. अशा वातावरणात कॉलेजसाठी असो, कामानिमित्त असो ज्यांना घर, ऑफिसबाहेर पडणे आवश्यकच असते.

‘महायुतीला ३४ ते ३५ जागा मिळतील’

$
0
0
‘निवडणुका जाहीर होण्यापूर्वी उदयनराजे भोसले हे आपल्या संपर्कात असून, त्यांनी रिपाइंमधून निवडणूक लढवावी, त्यासाठी साताऱ्याची जागा सेनेकडून रिपाइंला घेऊ, असे जाहीररित्या सांगून चूक केली, अशी प्रांजळ कबुली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषेदत दिली.

लोकशाहीच्या मंदिरात कोणाला पाठविणार?

$
0
0
लोकशाहीच्या मंदिरात कोणाला पाठविणार? असा प्रश्न करणारी एक पुस्तिका येथील नागरी हितरक्षा संघातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पुस्तिकेचे संपादक व संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी दिली.

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे २३ कोटींची मालमत्ता

$
0
0
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे २३ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.

मनसेचे ‘इंजिन’ अजून स्टेशनातच

$
0
0
सातारा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘इंजिना’ने अद्याप स्टेशन सोडलेले नाही. प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रचाराचे नारळही फुटले आहेत. मनसेच्या उमेदवाराला राज ठाकरेंकडून अद्याप हिरवा कंदील न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांत कमालीची अस्वस्थता आहे.

मार्डीत बोकड कापून कार्यकर्त्यांची पोटपूजा

$
0
0
मार्डी (ता. माण) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यात ३८ बोकड कापून कार्यकर्त्यांची पोटपूजा करण्यात आली. मटणाचा ढीग व दारुच्या महापुराने दुष्काळग्रस्तांची चेष्टा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

विरोधी उमेदवार नाही; तटस्थ राहणार

$
0
0
संजयकाका पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका सांगलीतील भाजपचे आमदार संभाजी पवार यांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण प्रचारात सहभागी होणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

तगडे बंडखोर रिंगणात

$
0
0
‘कोणाच्या सोयीसाठी किंवा विरोधात नाही, तर आपली उमेदेवारी लालफितीच्या कारभाराविरोधात आहे. परमेश्वराच्या पुढे कोणीच नसल्याने कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपली उमेदवारी कायम राहणार आहे,’ असे जाहीर करीत काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हल्लेखोर पतीचा मृतदेह सापडला

$
0
0
पाचवडे (ता. भुदरगड) येथील राजेंद्र बाबूराव पोवार (वय २०) या तरुणाचा मृतदेह लोटेवाडी येथे बुधवारी सडलेल्या अवस्थेत सापडला. राजेंद्रने पत्नी प्रियांकावर कोयत्याने वार केल्यानंतर तो चार दिवसांपासून गायब होता. घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे.

शॉर्ट सर्किटने राजगोळीत गंजींना आग

$
0
0
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे एकाच ठिकाणी असलेल्या गवताच्या आठ गंजींना शॉर्ट सर्किटने आग लागली. यात साडेचार लाखांचे नुकसान झाले. आगीत एक बैलगाडी जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. तलाठी सोमशेट्टी यांनी पंचानामा केला.

इचलकरंजीतील सर्व सभा शहराबाहेर

$
0
0
लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपल्यानंतर प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे. २९ मार्चला माघारीची मुदत संपल्यानंतर लढाईचे चित्र स्पष्ट होणार आहे. तरीही लढत प्रामुख्याने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे विरुद्ध खासदार राजू शेट्टी यांच्यातच होणार असे चित्र आहे.

अंगडिया सेवा महिनाभर बंद

$
0
0
देशभरातील कोणत्याही ठिकाणी त्वरित पैसे आणि मौल्यवान वस्तू पोहोचविण्यासाठी विश्वासार्ह मानली जाणारी अंगडिया सर्व्हिस निवडणूक संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. देशभरातील अंगडिया नेटवर्कने हा निर्णय घेतला आहे.

गरिबांच्या प्रवेशांचे हायजॅक थांबणार

$
0
0
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत प्राथमिक शाळेत बालकांच्या मोफत २५ टक्के आरक्षणाचे प्रवेश काटेकोरपणे होणार आहेत. एक लाखाच्या उत्पन्नाचे बोगस दाखले देणाऱ्यांची फेरतपासणी केली जाणार आहे.

स्पीड @ ८०

$
0
0
रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नव्याने उत्पादित होणारे ट्रक, आराम बस, टँकर आणि डंपर अशा वाहनांनाही स्पीड गर्व्हनर बसवावा लागणार आहे. स्पीड गर्व्हनरशिवाय कोणत्याही वाहनांचे पासिंग केले जाणार नाही. केंद्रीय मोटार वाहन नियमातील बदलानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

पाच उमेदवार कोट्यधीश

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी अखेरच्या दिवशीपर्यंत २९ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले. हातकणंगले मतदारसंघातून २१ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख उमेदवारांनी डमी अर्ज भरले आहेत.

शेतकऱ्यांच्या चुलीत मंडलिकांनी पाणी ओतले

$
0
0
शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांना निवडणुकीत वेळीच जागा दाखविली जाईल, असा टोला कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगाविला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images