Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीला धडा शिकवा

$
0
0
लोकसभेला ‌मत मागणाऱ्या हसन मुश्रीफ यांना जिल्हा बँकेत भ्रष्टाचार करून मि‌ळलेले २ कोटी ८७ लाख रुपये व्याजासकट भरायला सागा. निवडणुकीत पैसे वाटून मस्तवालपणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्याची हीच वेळी आहे, त्यामुळे संधी सोडू नका असे आवाहन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

आघाडी धर्म पाळा

$
0
0
‘गावातील भांडणतंट्यांची मला जाणीव आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या अन्यायाबाबत माझ्याही मनात खदखद आहे. पण देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता आणायची असल्याने हे सर्व मतभेद बाजूला ठेवून माझ्यावरील निष्ठा व प्रेमापोटी आघाडी धर्म पाळावा.

रिपाइं बदलणार एकमेव उमेदवार?

$
0
0
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात महायुतीने रिंगणात उतरवलेले संभाजी संपकाळ यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे. संपकाळ हे राजेंचेच कार्यकर्ते असल्याच्या तक्रारी आल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मी PM होईन; पण भविष्यात!: शिंदे

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असून राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘भविष्यात मलाही कधीतरी पंतप्रधान होण्याची संधी मिळेल,’ असे सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

हॉकीतील टॅलेंटला पुन्हा झळाळी

$
0
0
सरावासाठी मैदान नाही, साहित्य खरेदीसाठी आर्थिक चणचण, मुलींचा खेळातील सहभाग नगण्य अशा अनेक अडचणीवर मात करत कोल्हापूरच्या मुली विविध खेळात आपला ठसा उमटवत आहेत. हॉकी त्यापैकीच एक क्षेत्र. सध्या हॉकीमध्ये सर्वांत जास्त राष्ट्रीय खेळाडू खेळ करत असल्याचे चित्र आहे.

पाळणाघरांअभावी मुलांची परवड

$
0
0
महिलांसाठी वाढलेल्या रोजगाराच्या संधी आणि कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून कोल्हापुरातील अनेक महिला नोकरीनिमित्त उंबऱ्याबाहेर पडत आहेत.

दुर्मिळ ग्रंथाचे डिजिटायझेशन सुरू

$
0
0
मराठी साहित्य विश्वात उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. पण काही ग्रंथ हाताळता येत नाहीत. काही ग्रंथांची पाने जीर्ण झाली आहेत. काही साहित्याचे पुनर्मुद्रण अशक्य आहे. तर काही साहित्यकृतींवरील लेखक आणि प्रकाशकांचे स्वामित्व संपले आहे.

'आणखी दहशतवादी मिळू शकतील'

$
0
0
लोकसभा निवडणुकीत अतिरेकी कारवायांसाठी आलेल्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कट्टर दहशतवादी असलेल्या झिया उर रहमान उर्फ वकास याच्यासह चौघांना अटक करण्यात यश आल्यानंतर आणखी एखादा प्रमुख दहशतवादी मिळण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केली.

आत एक आणि बाहेर एक करू नका

$
0
0
लोकसभा निवडणुकीत राज्यात आघाडीच्या जादा जागा मिळवायच्या आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने आत एक आणि बाहेर एक करू नये, असे कोणी केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मलतवाडीत गव्याला पकडले

$
0
0
मलतवाडी (ता. चंदगड) येथे अचानकपणे गावात गवा शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. गव्याने गावामध्ये धुडघूस घातल्याने जमावाने गव्याला पकडून एका झाडाला झाडाला बांधून घातले. वनविभागाच्या घटनेची माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गव्याची सुटका करुन गावाबाहेर सोडल्यानंतर त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.

महाडिकांनी घेतली घाटगेंची भेट

$
0
0
आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी कागल हाऊस येथे जाऊन शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कामगारमंत्री हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सुरेश कुऱ्हाडे होते.

‘मिरची शेठ’ घटले

$
0
0
झणझणीत आणि रुचकरच चटणी करण्यासाठी मिरचीपूड उद्योगाने कोल्हापुरात चांगलेच बस्तान बसवले होते. कोल्हापुरातील चटणीला असणारी मागणीमुळे मिरचीपूड व्यवसायात ३० ते ३५ व्यापारी कार्यरत होते.

भाजप शिवसेनेला संपवेल: आर.आर.

$
0
0
‘महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्वच संपवायचे या विचारांनी भाजप कामाला लागले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी शिवबंधनच काय, पण लोखंडी साखळ्या जरी बांधल्या तरी शिवसैनिक जागेवर थांबायला तयार नाहीत,’ अशी जोरदार टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

पाडवा मार्केट फुल्ल

$
0
0
होळी झाली की गुढीसाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा तयार करायला वेग येतो. शहरात दगडू बाळा भोसले, बाबूराव उरूणकर, शंकर माळी, मोहन सावर्डेकर यांच्या कारखान्यात साखरेची माळ तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

शिवसेना, ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचे वाईट वाटते

$
0
0
आयुष्यभर शिवसेनेला जातीयवादी पक्ष असे हिनवत बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जाळणाऱ्या आणि शेतकरी संघटनेचे बिल्ले काढून बोलायला या, अशी स्वाभिमानीच्या नेत्यांनाच तंबी देणाऱ्या कार्यकर्त्यांवर माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुत्राचा प्रचार करण्याची वेळ यावी, याचे खूप वाईट वाटत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी आजरा येथे केले.

डाव्या लोकशाही आघाडीची कोंडी फुटेना

$
0
0
डाव्या लोकशाही आघाडीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघात तयार झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार माजी आमदार संपतबापू पवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सहकार्य करावे यासाठी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या घरी घेण्यात आलेली बैठक भाकपचे नेते अॅड गोविंद पानसरे यांच्या अनुपस्थितीमुळे स्थगित करण्यात आली.

मंडलिकांची संपत्ती १ कोटी १६ लाख

$
0
0
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय सदाशिवराव मंडलिक हे कोट्यधीश उमेदवार आहेत. त्यांची स्थावर व जंगम तसेच ठेवी, विमा आणि गुंतवणुक केलेली संपत्ती १ कोटी १६ लाख ७२ हजार ७०८ इतकी असल्याचे शपथपत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात

$
0
0
उसास प्रतिटनास ५०० रुपयांपर्यंत तोटा सोसण्यापेक्षा शेतकऱ्यानी यावर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांना ऊस पाठवून पसंती दिली आहे. त्याचा परिणाम प्रतिवर्षी महाराष्ट्रातील ऊस मिळवण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांना यंदा महाराष्ट्रातील ऊस मिळणे दुरापास्त झाले आहे.

‘एड्सविरोधी प्रबोधन’चा निधी परत

$
0
0
शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणारा निधी, ठराविक कालावधीतच कार्यक्रम सादर करण्याची अट, कॉलेजकडून मिळणारा अल्प प्रतिसाद अशा विविध कारणांमुळे एड्सविरोधी जनजागृतीसाठी खर्ची होणारा निधी सलग दुसऱ्या वर्षी विद्यापीठाला परत करावा लागला.

दारूसाठी पैसे न दिल्याने खून

$
0
0
दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणांवरून राहुल मल्लाप्पा आप्पाजी (वय २६, रा. नवीन वसाहत यादवनगर) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पण्ण झाले. पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील सुरेश सातपुते (वय २९, रा. यादवनगर), किरण लक्ष्मण कुऱ्हाडे (वय ३५, रा. दौलतनगर), फिरोज यासीन मुल्ला, (वय २६, रा. यादवनगर) या तिघांना अटक केली. स्वप्नील व फिरोज हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images