Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिष्यवृत्तीची परीक्षा आज

$
0
0
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (ता. २३) चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. चौथीच्या परीक्षेसाठी २३३ केंद्रावर ३२ हजार ६६२ विद्यार्थी बसणार आहेत. त्यासाठी २३३ केंद्र संचालक, १ उपकेंद्र संचालक, १४२१ पर्यवेक्षक आणि ४४७ परिचर यांच्या नेमणुका केल्या आहेत.

दरीत पडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

$
0
0
महाबळेश्वर येथील मुन्वर हाउसिंग सोसायटीजवळ असलेल्या चायना वॉटरफॉल परिसरात फिरावयास गेलेले दोन विद्यार्थी खोल दरीत पडून मरण पावले. नाजिम बडानी (वय १७) व रत्नदीप जाधव (१६, रा. महाबळेश्वर) अशी त्यांची नावे आहेत.

न्यायदानातील आदर्श फ्रेमवर्क

$
0
0
‘कोल्हापुरातील नावाजलेल्या ​वकिलांमध्ये कापसे यांचा उल्लेख केला जातो. परिश्रम, जिद्द आणि अभ्यास याच्या जोरावर कापसे यांनी कायद्याची फ्रेमवर्क तयार केली. कापसे यांचे वकीलीतील कार्य आणि लवकर न्याय मिळवून देण्याची ख्याती प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांनी काढले.

अविवाहित राहून शाळेचा प्रपंच

$
0
0
विकास आणि प्रगतीसाठी शिक्षणाचा आधार हवा, अशी भाषणबाजी अनेकजण करतात, पण खरंच शिक्षणाचा गंध नसलेल्या कुटुंबातील मुलांना एकत्र करणे, त्यांच्यासाठी बालवाडी सुरू करणे आणि हा ध्यास गेली २६ वर्षे अविरत सुरू आहे.

चार हुल्लडबाजांना अटक

$
0
0
भारताने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भाऊसिंगजी रोडवरील गल्लीत हुल्लडबाजी करणाऱ्या तीन तरूण व एका अल्पवयीन मुलाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

सत्संगात एकीकरणाची बीजे

$
0
0
‘व्यस्त दिनचर्येतून गुरुमंत्राचे पठण करावे. अध्यात्म आणि भक्तीतून सर्वांनी संघटित व्हावे. त्यासाठी सत्संगाची गरज असून, सत्संगातच एकीकरणाची बीजे आहेत,’ असे मत हळदीपूर मठाधिपती परमपूज्य श्री. श्री. वामनाश्रम महास्वामी यांनी व्यक्त केले.

युतीचे नामोनिशाण मिटवूया!

$
0
0
झालं गेलं विसरुन जाऊया. आपासातील मतभेद मिटवून हातात हात घालून कामाला लागूया. जिल्ह्यातील कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक व कल्लाप्पाण्णा आवाडे या दोघांना विक्रमी मतांनी निवडून आणून शिवसेना-भाजपचे नामोनिशाण मिटवून टाकूया, असा निर्धार शनिवारी कॉग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

हितेश भगतचा कोल्हापूरात मृत्यू

$
0
0
मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला त्याचा मुलगा हितेश भगत याचा कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

गावठी कुत्र्यांना मिळतेय घर

$
0
0
हौसेखातर जातीवंत कुत्री पाळणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात काही कमी नाही. अगदी लाखभर रुपये मोजून इंपोर्टेड ब्लडलाइनच्या प्युअर ब्रीडचे श्वान पाळणारे आणि त्यांच्यांसाठी म‌हिन्याला काही हजार रुपये खर्च करणारे श्वानप्रेमी कोल्हापुरात अनेक आहेत.

इमोशनल डे

$
0
0
सबमिशन्स, प्रॅक्टिकल्स, कॉलेजच्या विविध अॅक्टिव्हिटीज आणि व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशीप डे, टाय डे असे विविध डे साजरे होत असतानाचा मार्चचा महिना संपत येतो आणि शेवटच्या वर्षीच्या बॅचचा ग्रॅज्युएशन डे, फेअरवेल पार्टी आणि सेंडऑफची तयारी कॅम्पसमध्ये सुरू होते.

आठवडा चारच दिवसांचा

$
0
0
कोल्हापूर शहरात कामासाठी किंवा खरेदीसाठी कधी बाहेर पडावे असा प्रश्नच निर्माण होतो. शनिवारी बाजार सराफ व्यापार आणि महाद्वारचा बाजार बंद, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालये बंद.

‘दौलत’साठी निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0
गेले दोन हंगाम हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकार व नेत्यांनी ‘दौलत’ सुरु करतो अशी अनेकदा आश्वासने दिली. मात्र ती पाळली नाहीत. त्यामुळे दौलतबाबत शेतकरी व कामगारांच्या एकजूट दाखवून देण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

युवक महाडिकांकडे तर ज्येष्ठ मंडलिकांकडे

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता प्रचारात रंग भरू लागला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक या दोन्ही उमेदवारांबाबत संमिश्र वातावरण आहे.

शिवसेनेची मदत पालकमंत्री विसरले का?

$
0
0
पालकमंत्र्यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेच्या बळावर सुरू झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाटील यांना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री केले. सेनेच्या ताकतीवर मजल मारणाऱ्या पालकमंत्र्यांनी सेनेला संपविण्याची भाषा करू नये.

सुरेश भगतच्या मुलाचा CPR मध्ये मृत्यू

$
0
0
मटकाकिंग सुरेश भगतचा मुलगा हितेंद्र (३४, मूळ रा. वरळी) याचा ‌रविवारी सकाळी सीपीआर हॉ‌स्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हितेंद्र हा वडील सुरेश भगत यांच्या हत्येप्रकरणी कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

बॅग चोरणारे तिघे भाऊ ताब्यात

$
0
0
मार्केट यार्ड येथे एका कारमधून दीड लाख रुपये रक्कम असणारी बॅग चोरणाऱ्या तीन सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. किरण सुरेश भोसले (२० रा. उचगांव, करवीर) याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन भावांचा या चोरीत समावेश आहे.

कोल्हापूरला काय हवंय?

$
0
0
कोल्हापूरची विमानसेवा लवकर सुरू होण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. एअरपोर्ट अर्थारिटाकडे विमानतळ हस्तांतरीत करण्यात आले आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

‘मोदीच देशाला पुढे नेतील’

$
0
0
‘काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट केली आहे. दलालीच्या माध्यमातून कार्यकर्ते मोठे झाले आणि शेतकरी देशोधडीला लागले. शेतकऱ्यांच्या विकासाचे आणि नवीन पिढीच्या भवितव्याचे कोणतेच नियोजन आघाडी सरकारकडे नाही.

अडचणीवेळीच कसे आठवतो?

$
0
0
पाच वर्षांपासून पाटील आणि महाडिक गटात पेटलेल्या टोकाच्या संघर्षामुळे सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘तुमच्यासाठी काय पण’ असे सांगत महाडिक काका पुतण्याच्या जोडीवर रविवारी घणाघाती टीका केली. विधानसभेत काँग्रेस विरोधात बंडखोरी केली.

शिकारी जातात कुठे ?

$
0
0
वाघ व बिबट्यांसह दुर्मिळ वन्यप्राण्यांचे अवयव वनखाते व पोलिसांकडून सातत्याने हस्तगत केले जातात. अवयव विक्री करणारे आरोपी म्हणून सापडतात मात्र या प्राण्यांची हत्या करणारे शिकारी मात्र कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. त्यामुळे शिकारी कोण? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images