Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

व्यापाऱ्यांचा पाठिंबा कोणाला?

0
0
लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या ‘फाम’ या संघटनेने घेतला असला तरी शहरात अजूनही कोणासोबत जायचे याबाबत निर्णय झालेला नाही. व्यापाऱ्यांचा एलबीटी संदर्भातील प्रश्न गंभीर आहे.

भेट झाली पण मनोमिलनाचे काय?

0
0
राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, रा​जकीय सोयीसाठी कधी ना कधी हातात हात घ्यावा लागतोच. पण राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर पोहचल्याने काय होऊ शकते याचा अनुभव जिल्ह्याने महाडिक व गृह राज्यमंत्री सते​ज पाटील वादाने अनुभवला.

थेट पाइपलाइनसाठी पर्यायी आराखडा

0
0
थेट पाइपलाइन योजनेचे काम गतीने होण्यासाठी महापालिका प्रशासनाने दूधगंगा धरणाच्या डाव्या कालव्याच्या बाजूने पाइपलाइन टाकण्याचा पर्यायी आराखडा तयार केला आहे. नव्या मार्गाने केवळ पाच गावांच्या हद्दीतूनच पाइपलाइन जाणार असल्याने वेळखाऊ भूसंपादनापासून सुटका होणार आहे.

इच्छेविरुद्ध रंग लावल्याने खून

0
0
गोकुळ शिरगाव येथे रंग लावण्यावरून दोन कामगारांत झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. नीलेश रघुनाथ उपाळे (वय ३६, रा. वडणगे, ता. करवीर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

लोकसंस्कृतीचे भवितव्य

0
0
लोकसंस्कृतीच्या उपासकांनी धर्म, समाज, विज्ञान व नव्या पिढीला योग्य दिशा देणारे काम केले आहे. समाजाने आधुनिक वैज्ञानिक भरारी मारली आहे हे कौतुकास्पद आहे, परंतु आपला गावगाडा, आपली लोकसंस्कृती ठोकरली आहे.

मतिमंदांसाठी आधार राष्ट्रीय न्यास कायदा

0
0
मतिमंदांच्या हक्काचे पालन व पुनर्वसन याविषयी समाजात संभ्रम आहे. अपंग व्यक्ती कायदा १९९५ मध्ये संमत झाला. परंतु या कायद्यात अनेक त्रुटी असल्याने व मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्तीचा फारसा विचार न झाल्याने अशा व्यक्तीसाठी स्वतंत्र कायदा करावा अशी कल्पना मूळ धरू लागली.

पर्यायांच्या शोधात

0
0
भारतीय राजकारण कमालीचे गुंतागुंतीचे व व्यामिश्र झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राजकीय पक्ष अस्तित्वात होते. मात्र, गेल्या तीसेक वर्षांत भारतीय राजकारणात शेकडो पक्ष उदयास आले.

सेवेसाठी सत्ताबाजी

0
0
देशात अनेक पक्ष असले तरी प्रमुख पक्ष दोनच आहेत. एक सत्ताधारी आणि दुसरा सत्ताकांक्षी. त्यामुळे ही दोन महत्त्वाकांक्षेची टोके एकत्र भिडल्यावर सत्ताप्रदर्शन हा त्यानंतरचा अंक सुरू होत असतो. म्हणून सेवेसाठी आसुसलेल्या सत्ताबाज मंडळींना आपणच समजून घ्यायला हवे.

मनसेच्या इंजिनचे डबे विस्कळीतच

0
0
लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र कोल्हापुरात मनसे आपला पाठींबा कोणत्या पक्षाला देणार याबाबतचा संभ्रम कायम आहे. कोल्हापुरातील मनसेची अवस्था रेल्वे इंजिनला असलेले डबेच विस्कळीत झाल्यासारखी झाली आहे. मनसेच्या कोल्हापुरातील कार्यकत्यांमध्ये चार ते पाच गट आहेत.

कोल्हापूरने बदलली राज्याची रणनीती

0
0
राज्याच्या राजकारणात कोल्हापूरचा कायमच प्रभाव राहिला आहे. याठिकाणी झालेले बदल किंवा नवीन घटना पुन्हा राज्यभरात लागू होतात. मग तो एखादा निर्णय असो, एखादी योजना असो किंवा राजकीय घडामोड. त्यामुळे कोल्हापूरवर राजकीय नेत्यांचे कायम लक्ष असते.

प्रचाराची हालगी नेत्यांच्या पातळीवरच

0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्क्य देणाऱ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचे डोळे लागले आहेत. प्रचाराच्या हालगी अजून नेत्यांच्या पातळीवरच घुमत असल्याने गाव व तालुकापातळीपर्यंत अजून शांतता आहे.

मदत नावाची क्रूर चेष्टा

0
0
गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने चार हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यासाठी ४५ हून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. शेतकऱ्यांच्या जखमेवर शासनाने मात्र त्यावर कोरडी पट्टी बांधलीय. अत्यंत तोकडी मदत देऊन क्रूर चेष्टा केली.

लोकशिक्षक संत एकनाथ

0
0
समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून संत एकनाथांनी मांडलेला भक्तिविचार परिणामकारक ठरला. भक्तीचा आचारधर्म स्विकारतांना बेगडीपणाचा त्यांनी धिक्कार केला. बुवाबाजी आणि कर्मकांडांची दुकानदारी करून सामान्य माणासाला वेठीस धरणाऱ्या टोळभैरू दलालांवर त्यांनी ‌टीका केली.

‘अण्णांनी सहकारात आदर्श घालून दिला’

0
0
‘सहकारात विश्वस्थ म्हणून काम करणारी चांगली माणस पुढे यायला पाहिजेत. नागनाथ अण्णांनी सहकारात एक आदर्श घालून दिला आहे. त्या आदर्शानुसार युवकांनी मार्गाक्रमण करावे,’ असे आवाहन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

करमणूक कर निरीक्षक बेपत्ता

0
0
कराड प्रांताधिकारी कार्यालयातील करमणूक कर निरीक्षक शरद दादासाहेब सानप (वय ३३, रा. गुरुदेव दत्तनगर, विद्यानगर, सातारा) मंगळवारपासून बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी कार्यालयाने केबल नेटवर्किंग जोडण्या कमी दाखवून महसूल बुडविणाऱ्या केबल चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती.

कलायोगींचे स्वप्न सत्यात उतरले

0
0
आपल्या कामाचे कायमस्वरूपी संग्रहालय व्हावे, अशी इच्छा मनात ठेवून चित्रकारितेच्या क्षेत्रातील एक दीपस्तंभ असलेल्या कलायोगी जी. कांबळे यांनी सन २००२ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांची ही इच्छा सत्यात उतरण्यासाठी सरकारी यंत्रणेची दिरंगाई अडथळा ठरत होती.

इचलकरंजीतील तीस जणांवर हद्दपारीची कारवाई

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० जणांवर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

धूम स्टाईलने दागिने लंपास

0
0
धूम स्टाईलने आलेल्या मोटार सायकलस्वाराने वृध्देच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसडा मारून लांबविले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय ते मंगलधाम रस्त्यावर घडली.

जाती-धर्मांत तेढ वाढविणे भाजपचा उद्योग

0
0
‘नरेंद्र मोदी फसवा माणूस आहे. वर्षभरापूर्वी मोदींना कोणी ओळखत नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे भांडण विकासासाठी असते. जाती-धर्मात तेढ निर्माण करणे हा भाजपचा उद्योग आहे. देशाचा गेल्या आठ वर्षांत बदललेला चेहरा-मोहरा हे काँग्रेसचेच काम आहे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे लोकसभा उमेदवार प्रतीक पाटील केले.

विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांना मातृशोक

0
0
अनुसया दत्तात्रय वळसे-पाटील यांचे ​शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुणे जिल्ह्यातील मंचरनजीकच्या निरगुडसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images