Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विधानसभेबाबत घाई करू नका

$
0
0
पुनर्रचित मतदारसंघात स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या राजकीय वारसावरून वाद उघड झाला असताना त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी संग्राम कुपेकर यांनी सबुरीने घ्यावे असा सल्ला दिला आहे.

लमाणवाडा विकासाच्या प्रतीक्षेत

$
0
0
गडहिंग्लज हा परिसरातील सर्वात सधन तालुका गणला जातो. निसर्गरम्य परिसरातील हिरण्यकेशीला असलेले बारमाही पाणी यामुळे पूर्वभागातील काही क्षेत्र वगळता संपूर्ण तालुका बागायती आहे. ऊस, मिरची, सोयाबीन, गहू, तांदूळ यांचे हे आगर आहे.

रंकाळाप्रश्नी उपोषणाचा इशारा

$
0
0
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रंकाळा तलाव व टॉवर परिसराची झालेली दुरवस्था पंधरा दिवसात न संपवल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा क्रांती बॉईज रंकाळा बचाव समितीने दिला आहे. या परिसरातील नागरिकांना महापालिकेने त्रासच द्यायचे ठरवले आहे, असे दिसत असल्याने हा मार्ग अवलंबल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

वाहने पेट कशाने घेतात?

$
0
0
रस्त्यावर धावणारी किंवा एका बाजूला उभी असलेल्या कारमधून धूर यायला सुरू होतो आणि पाहता पाहता कारच पेट घेते. कारमधील पॅसेंजरच्या जीवावर बेतू ठरणारा हा प्रसंग असतो. प्रमाण कमी जरी असले तरी किरकोळ दुर्लक्षामुळे मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळू शकते.

त्यावेळी का कारवाई केली नाही?

$
0
0
आघाडी धर्म न पाळण्यांवर कारवाई करण्याचा प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील आवळे, पी. एन. पाटील, सतेज पाटील गटातील कार्यकर्त्यांमध्ये उमटले. महाडिक काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या गटाने यापूर्वी या तीनही गटांच्या विरोधात काम केले.

राधानगरीत महाडिकांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा

$
0
0
लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी अद्याप दोन्ही काँग्रेसने संयुक्त किंवा स्वतंत्रपणे उघड प्रचाराला सुरवात केली नसली तरी महाडिक यांच्यावतीने राधानगरी तालुक्यात युवाशक्तीसह समांतर प्रचार यंत्रणा कार्यरत झाली आहे.

शुगर लॉबीविरुद्ध ‘स्वाभिमानी’ची लढाई

$
0
0
‘शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचे राज्यकर्ते एकवटले आहेत. पण सहकारातील भ्रष्टाचार, घोटाळेबाजी यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले आहे.

शिवसेनेला ‘उसने’च प्यारे

$
0
0
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावरही काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पश्चिम महाराष्ट्रावरील पकड ढिली होऊ नये याची काळजी घेतली आहे. शिवसेना व भाजपने काँग्रेसमधील असंतुष्ठांना तिकीटे देऊन पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहेत.

प्रचार सभांचे बदलले टायमिंग

$
0
0
इंटरनेट, मोबाइल तसेच दळणवळणाची नवनवीन साधने हाती आल्यानंतर प्रचार यंत्रणांमध्ये जसा बदल झाला आहे, तसाच बदल प्रचार सभांच्या नियोजनातही होत आहे. पूर्वी नेत्याची जी वेळ उपलब्ध असेल त्यावेळेस सभा असे समीकरण असायाचे. पण आता जनता, कार्यकर्त्यांच्या वेळेवर नेत्यांना प्रचाराला जावे लागत असल्याचे चित्र आहे.

सामान्यांच्या अपेक्षांची उपेक्षाच

$
0
0
जिल्ह्यातील दोन्ही खासदार साखर उद्योगाशी संबंधित. एक कारखानदार तर दुसरे ऊसकरी शेतकऱ्यांचे नेते. ऊसदर, आयात साखरेवरील कर, इथेनॉल या प्रश्नांवरुन या साखर कारखानदारीबाबतच्या प्रश्नांवरुन पाच वर्षात राज्यातील मोठ्या संघर्षाचा केंद्रबिंदू कोल्हापूर जिल्हा ठरला.

लोकसभा लढाईतून संपतबापू बाहेर?

$
0
0
मनसे आणि जनसुराज्यने अचानक ‘हात’ वर केल्याने शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मर्यादित ताकदीवर लढण्यास पक्षातील प्रमुखांनीच लढायला नको, असा तगादा पवार यांना लावला आहे.

मतदार बैलासारखे!: अण्णा हजारे

$
0
0
विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांवर आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता मतदारांना शेतकऱ्याच्या बैलाची उपमा दिली आहे. मतदार जागृती अभियानाचा एक भाग म्हणून प्रसिद्ध दिलेल्या एका पत्रकात हजारे यांनी बैलपोळ्याची गोष्ट सांगून मतदारांना जागरूकतेने मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

रंकाळ्याला झळाळी

$
0
0
धुळीने माखलेला पदपथ, टॉवर व फुलझाडांना पाण्याच्या फवाऱ्यांनी दिलेले स्वच्छ रुप, बऱ्याच वर्षानंतर फुलझाडांना मिळालेला आकार आणि सभोवतालच्या कचऱ्याचा एकाचवेळी झालेल्या उठावामुळे मंगळवारी रंकाळा झळाळून उठला.

वाघांपाठोपाठ बिबट्याचे कातडे हस्तगत

$
0
0
सांगली पोलिसांनी वनसगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथे छापा घालून बिबट्याचे कातडे जप्त केले. तेथील प्रल्हाद सुभाष शिंदे (वय १९) याला सांगलीत पट्टेरी वाघांच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्यांनी बिबट्याचे कातडे विक्रीसाठी दिले होते.

हव्या त्या पक्षाला मतदान करा

$
0
0
‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांपैकी कोणत्याही पक्षाला धनगर समाजाच्या आरक्षणाशी देणे घेणे नाही. त्यामुळे धनगर समाजाने या लोकसभा निवडणुकीत आपल्या मनाप्रमाणे हव्या त्या पक्षाला मतदान करावे,’ असे आवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे नेते माजी मंत्री अण्णा डांगे यांनी मंगळवारी सांगलीत केले.

हुल्लडबाज तरुणांना इचलकरंजीत अटक

$
0
0
धुलिवंदन सण साजरा करीत असताना हुंल्लडबाज तरूणांनी दोन एस. टी. बसेसच्या काचा फोडल्या. यामध्ये सुमारे चार हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी तिघा तरूणांना ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री होण्यासाठी समर्थक लागतात

$
0
0
जयंतराव, तुम्ही मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहात हे अजित पवारांना माहीत झाले तर तुमचे काय होईल, याचा विचार करा. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगता मग पंधरा वर्षांत एक समर्थक का तयार केला नाही, असा सवाल महायुतीचे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांनी केला.

कसबा बावड्यात जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने मटका, जुगार, गावठी दारू अशा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कसबा बावड्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी रोख १७ हजार ४०० रुपये, दोन मोटारसायकली, पाच मोबाइल हॅन्डसेट, टीव्ही असा ९२ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करून सातजणांना अटक केली.

धूल‌िवंदनाच्या प्रसादातून विषबाधा

$
0
0
येथील गणेशनगर गोसावी गल्ली परिसरातील २५ जणांना धुलिवंदनाचा प्रसाद खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यामध्ये १३ मुले-मुली, ५महिला आणि ७ पुरुषांचा समावेश आहे.

कोतवाल भरती शंकास्पद

$
0
0
चंदगड तालुक्यातील सात सज्जांसाठी नुकतीच झालेली कोतवाल भरती प्रक्रिया नुकतच झाली. मात्र, माहिती अधिकारात भरती प्रक्रियेदवारे निवड झालेल्या उमेदवारांच्या उत्तर पत्रिका मागविल्यानंतर त्यामध्ये काही शंकास्पद बाबी निदर्शनास आल्याची माहिती परशराम यल्लाप्पा पाटील (पोरेवाडी), सहदेव नाना पाटील (हंबिरे) व सचिन दत्तू गवस (कोळिंद्रे) या उमेदवारांनी दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images