Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाण्याची निम्मी थकबाकी पोकळच

$
0
0
जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी आकारणीबाबत सरकारने निर्णय न घेतल्याने महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीचे प्रकरण साडेसात कोटींवर पोहचले आहे. ‘जलसंपदा’ ने महापालिकेसाठीच्या राखीव पाणीसाठ्यावर आकारणी केली आहे.

कोरे, गायकवाड गटात अद्याप सामसूमच

$
0
0
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा फीवर हळूहळू चढू लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उमेदवारीने निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. शाहूवाडी तालुक्यात मात्र आतापर्यंत उमेदवारांचा संपर्क नाही की आरोप -प्रत्यारोपासाठी सभा नाहीत.

धनंजय महाडिक यांना आचारसंहिताभंगाची नोटीस

$
0
0
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विनापरवाना संपर्क कार्यालय उघडून मोठा मंडप घातल्याप्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी आचारसंहिताभंगाची नोटीस बजावली आहे.

दुसऱ्या सत्राचे ‘सँडविच’!

$
0
0
शिवाजी विद्यापीठातर्फे दुसऱ्या सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असली तरी, अनेक विषयांचा अभ्यासक्रम अपूर्णच राहिला असल्याची स्थिती आहे. पहिल्या सत्रातील परीक्षांचा लांबलेला कालावधी, जानेवारीच्या मध्यापर्यंत झालेल्या परीक्षा त्याच्या परिणामी निकालाला लागलेला विलंब आणि फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी अशा कारणांनी प्राध्यापकांना अभ्यासक्रम पूर्ण करायला अत्यंत कमी वेळ मिळाला.

रेल्वे बुकिंग हाउसफुल्ल

$
0
0
येत्या एप्रिल आणि मे मधील विविध मार्गांवरील प्रवासांचे ८० टक्के बुकिंग रेल्वेकडे फुल्ल झाले आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेनेही तिकीट नोंदणीसाठी पाच काउंटर खुले केले आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी प्रवाशांनी पर्यटनाला जम्मू काश्मीर, सिमला, तिरुपती, शेगांव या धार्मिक स्थळांसाठी पसंती दिली आहे.

उन्हाचा तडाखा वाढला

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून होळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी या तडाख्याने कहरच केला. दिवसभर भाजून काढणाऱ्या उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे जाणवत होते. केवळ दिवसभरच नव्हे, रात्रीही हवेतील उष्मा वाढला आहे.

उमेदवारांचा रोज गोपनीय रिपोर्ट

$
0
0
लोकसभा उमेदवाराच्या संपूर्ण हालचालीवर पोलिस स्टेशननिहाय नजर ठेवली जात आहे. यासाठी पोलिस स्टेशननिहाय खास तीन पथके कार्यरत असून त्यांनी दिलेला रोजचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे बंधन आहे.

होळीच्या लाख शेणी स्मशानभूमीला

$
0
0
पारंपरिक होळीला फाटा देत कोल्हापूरकरांनी शेणी दान उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. होळीसाठी जमा केलेल्या सुमारे एक लाख शेणी पंचगंगा स्मशानभूमीसाठी देण्यात आल्या. गणेशमूर्ती दान संकल्पनेबरोबरच कोल्हापूरकरांनी होळी सणाला प्रबोधनाची जोड दिली आहे.

उदयनराजेंसमोर चोरगेंचे आव्हान

$
0
0
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, महायुतीकडून संभाजी संकपाळ आणि आपकडून राजेंद्र चोरगे निवडणूक रिंगणात आहेत.

असह्य करणाऱ्या ‘वेदना’

$
0
0
प्रस्तुत शिल्प नाल मारण्यासाठी बांधलेल्या हतबल बैलाचे आहे. नाल मारताना जे मोठे मोळे वापरले जातात, त्यातील एक भला मोठा खिळा तयार करून त्या खिळ्यालाच त्या बैलाचे चारही पाय बांधले आहेत.

खिळवून ठेवणारे ‘शंभर मी’

$
0
0
मी म्हणजे कोण...जो इतरांना समोर दिसतो तो की स्वत:ला उमगतो तो? मी या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू उलगडून दाखवणारी पण, तरीही कथा नसलेली शब्दकृती. लेखक श्याम मनोहर यांनी या ​अभिनव कल्पनेला शब्दात बांधलं आणि साकारली ‘शंभर मी’ ही साहित्यकृती. यावरच बेतलेल्या ‘शंभर मी’ या ९० मिनिटांच्या दीर्घांकाने उपस्थितांना खिळवून ठेवण्यात बाजी मारली.

शिल्पकाराचा परिचय

$
0
0
वास्तववादी शैलीतून अभिजात काव्यमय अनुभूती देणाऱ्या शिल्पाकृती साकारणारे किशोर भरत पुरेकर महाराष्ट्राच्या शिल्प कलाक्षेत्रातील अनेक मान-सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.

उलगडला हिरवा शैशवतारा...

$
0
0
कधी घराच्या खिडकीतून खेळणारी लहान मुलं पाहिली की तिथंच वेड्यासारखं पाहत राहायला होतं. ‘बालपणीचा काळ सुखाचा’सारख्या विषयावरचा निबंध शाळेत असताना प्रत्येकानं लिहिला असावा पण त्यात इतकं काय विशेष वाटायचं नाही जितकं आता एखादं गोड लहान मूल नुसतं पाहिलं तरी आठवणींचे ठसे ओले व्हायला लागतात आणि भावपटलावर भावनांचे खेळ रंगायला लागतात.....!

भाजप कार्यालय पाडले

$
0
0
ऐननिवडणुकीच्या धामधुमीच्या काळात सांगली भाजपचे जिल्हा कार्यालय काँग्रेसच्या नगरसेवकाने जमीनदोस्त केल्याने सोमवारी खळबळ उडाली. भाजपचे आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेकांनी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो रस्त्यावर आणून जोरदार निदर्शने केली.

राज्यशास्त्र अधिवेशनाचे आयोजन

$
0
0
शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे २०वे अधिवेशन शुक्रवार-शनिवारी इस्लामपुरात होत आहे. श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद कोल्हापूर आणि विद्यापीठाचे नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पट्टेरी वाघाचे कातडे जप्त

$
0
0
सांगली पोलिसांनी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीकडून आणखी एक कातडे सोमवारी जप्त केले. या टोळीचा सांगलीतला म्होरक्या मेहबुब नबीसाब आतार (वय १९) याच्या घरातून पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाचे कातडे हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

वाडी रत्नागिरीची निवडणूक होणार दुरंगी

$
0
0
वाडीरत्नागिरी (जोतिबा)येथील ग्रुपग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक येत्या २३ तारखेला होत आहे. विद्यमान सरपंच शिवाजीराव सांगळे आणि माजी सभापती विष्णुपंत दादर्णे या दोन गटात चुरशीची लढत होणार आहे.

म्हाळुंगेत कालवा फुटला

$
0
0
म्हाळुंगे (ता. करवीर) येथील कालव्याचा भराव काढल्याने तुंबलेले पाणी शेतात घुसल्याने १५० एकर शेतीचे नुकसान झाले. तसेच २५ विहिरी गाळाने भरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

बळीचा बकरा की वाघ ते निवडणुकीनंतर कळेल

$
0
0
राजकीय स्वार्थासाठीच माझ्यासारख्या मानसपुत्राला गाडून एका रात्रीत पुत्राचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न खासदार मंडलिक यांनी केला असून कॉंग्रेस व राष्ट्रवादीने मला बळीचा बकरा केल्याची ओरड ते करीत आहेत. मात्र मी बळीचा बकरा आहे की राष्ट्रवादीचा वाघ आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईलच.

पाणलोटचा निधी परत जाणार

$
0
0
वसुंधरा पाणलोट कार्यक्रमांतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेकडे कृषी व पाणलोट समित्यांनी दुर्लक्ष केले आहे. कृषी विभाग व स्थानिक समितीच्या दुर्लक्षामुळे या महिन्यात कामाचा कालावधी संपणार होता.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images