Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विखारी प्रचाराला सडेतोड उत्तर

$
0
0
‘राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला हाच माझा पहिला विजय आहे. ऊसदराबाबत मुख्यमंत्र्यांच्या दारात दहा दिवस शेतकरी बसले होते तेव्हा साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे कोठे होते, असा सवाल आता खेडोपाड्यातील शेतकरी विचारणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात विखारी प्रचार झाल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

टोल, उसाचा दणका कुणाला?

$
0
0
गेल्या पाच वर्षांपासून टोल, ऊसदर, पाणीपुरवठा, पंचगंगा नदी प्रदूषणसारख्या मोठ्या आंदोलनांमुळे कोल्हापूर सतत चर्चेत राहिले आहे. विरोधक या आंदोलनांचे खापर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीवर फोडत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांचा परिणाम जाणवणार आहे.

जिल्ह्यात लक्ष्य युवा मतदारच

$
0
0
नवीन व युवा मतदार या निवडणुकीचे भवितव्य ठरवणार असा होरा व्यक्त केला जात असला, तरी १८ ते २० वयोगटातील ८० हजार ८१ मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. १८ ते २९ वयोगटात ५ लाख ६६ हजार १८ मतदार आहेत.

छळाला कंटाळून जावांची आत्महत्या

$
0
0
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या एका गावात सासरच्या जाचाला कंटाळून दोन सख्ख्या जावांनी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. शिल्पा काटे व मोनिका काटे अशी या महिलांची नावे आहेत.

नगरसेवक अद्याप... कूल कूल

$
0
0
काँग्रेस आघाडीची सत्ता असलेल्या व कोल्हापूर उत्तरमध्ये प्रचाराची प्रमुख धुरा असलेल्या महापालिकेतील आघाडीच्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या गोटात प्रचाराबाबत शांतता आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीच्या मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान महापालिकेतील नगरसेवकांवर असताना अद्याप दोन्ही पक्षांकडून शहरात प्रचाराचा जोर दिसत नाही.

‘रिपब्लिकन’ मतांबाबत औत्सुक्य

$
0
0
मागासवर्गीय समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसमधून फूटून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतरही विविध दलित संघटनांनी दोन्ही काँग्रेसनाच पाठिंबा दिला. मात्र निवडणुकीमध्ये मदत घेतल्यानंतर सत्तेत सहभागी करुन घेताना या संघटनातील बेकीचा फायदा घेत नेहमीच त्यांना सत्तेपासून दूर ठेवले गेले.

रंकाळा स्वच्छतेसाठी जबाबदाऱ्या निश्चित

$
0
0
‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महापालिकेने प्रत्येक विभागाची​ जबाबदारी निश्चित केली. या विभागांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, असा आदेश महापौर सुनीता राऊत यांनी दिले आहेत. मंगळवारी एक हजार कर्मचारी एकत्र काम करत रंकाळ्यावर स्वच्छता मोहिम राबवणार आहेत.

दरोडेखोरांच्या टोळीस अटक

$
0
0
पुणे जिल्ह्यातील जेजुरी, वडगाव निंबाळकर पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत दरोडे घालणाऱ्या व बारामती, पुरंदर तालुक्यांतील वाहनचालकांना लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांच्या टोळीला कराड तालुक्यातील शामगाव घाटात बारामती व उंब्रज पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई करून ताब्यात घेतले.

आई-बापाने तीला तलावात फेकले

$
0
0
कॅन्टीनच्या व्यवसायात आलेल्या अपयशामुळे घरखर्च चालवणे मुश्किलीचे बनले. पाच महिन्यांच्या स्वत:च्या मुलीला सांभाळणे अशक्य असल्याचे वाटल्याने तिचा जीव घेतला, अशी धक्कादायक कबुली ओंकार राजेंद्र साठे (वय २४) व सुवर्णा साठे (वय २२, दोघेही सध्या रा. भगतसिंह गल्ली, कोडोली, पन्हाळा) यांनी शनिवारी पोलिसांना दिली. न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी या संशयित दाम्पत्याला दिली.

डंपर रसवंत‌ीगृहात घुसला

$
0
0
निमशिरगांव (ता.शिरोळ) येथे चालकाचा ताबा सुटल्याने डंपर रसवंती गृहात शिरला. या अपघातात एक जण ठार झाला तर चौघेजण जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर भयभीत झालेल्या डंपरचालकाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

थकबाकी भरा, अन्यथा पाणी बंद

$
0
0
महापालिकेकडे साडेसात कोटी थकबाकी असल्याने त्याच्या वसुलीसाठी जलसंपदा विभागाने पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. पुढील दोन दिवसात थकबाकी न भरल्यास शहरवासियांचा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.

२.५ लाखांच्या भरपाईचा आदेश

$
0
0
दिशाभुलीने शैक्षणिक नुकसान करून विद्यार्थीनीला मनःस्ताप दिल्याप्रकरणी सांगलीच्या ग्राहक न्यायालयाने तिला अडीच लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश आशिर्वाद नर्सिंग इन्स्टिट्यूटला दिले आहेत. इन्स्टिट्यूटने जाणीवपूर्वक तिचे वय बसत नसाताना तिला शुल्क भरून घेऊन प्रवेश दिला.

मंत्र‌िमंडळात माझे वजन; मुख्यमंत्री होऊ शकतो

$
0
0
‘राजू शेट्टी खासदार झाल्यावर पंतप्रधान होणार नाहीत , मात्र जयंत पाटील विधानसभेत गेल्यावर मुख्यमंत्री होऊ शकतात,’ असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले.

भाजप व सेनेकडून उसने उमेदवारच

$
0
0
इचलकरंजी लोकसभा मतदार हा काँग्रेसचा बालेकिल्ला. आणीबाणीनंतर संपूर्ण देश व राज्यात काँग्रेसची वाताहात झालेली असताना इचलकरंजी लोकसभा मतदार संघात काँग्रेसने जागा राखली होती. बाळासाहेब माने यांनी भारतीय लोकदलाचे काकासाहेब देसाई यांचा ३३ हजार ३६४ पराभव केला होता.

भाजीपाला स्थ‌िरावला तरी कांदा वाढला

$
0
0
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या गारपीठ पावसाचा कोणताही परिणाम कोल्हापूर भाजीपाला मार्केटवर झालेला नाही. बाजार समितीमध्ये कर्नाटक व आंध्रप्रदेशासह जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक कायम असल्याने दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

राष्ट्रवादीच्या धनशक्तीला धडा शिकवा

$
0
0
शिवसेना हा पक्ष कधीही सेटलमेंट करणारा पक्ष नाही. महायुती कधीही धनंजय महाडिक यांच्याशी सेटलमेंट करणार नाही. पराभवाची धास्ती असल्यानेच महाडिक बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत. एका हिंदी चित्रपटातील ‘मैं कहाँ हूँ’ अशी अवस्था धनंजय महाडिक यांची झाली आहे.

फये प्रकल्पातील बंधाऱ्याना गळती

$
0
0
फये (ता. भुदरगड) येथील प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागल्याने परिसरातील पिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पिकांवर संक्रांत आली आहे. अजून उन्हाळ्याला सुरवात झालेली नाही तरीही पुरेसा पाणी पुरवठा होईना झाला आहे.

आम्हाला पुरोगामित्वाचे डोस पाजू नका

$
0
0
‘शाहू, फुले व आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन आम्ही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ही ओळख देशभर आहे. महायुती ही पुरोगामी विचारांनीच कार्यरत आहे. त्यामुळे आम्हाला कोणी पुरोगामीत्वाचे डोस पाजू नयेत,’ असा पलटवार महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केला.

केशरी कार्डधारकांना गहू, तांदूळ न मिळाल्यास आंदोलन

$
0
0
केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायद्यातून गरीब कुटुंबांना एक ते तीन रुपये दराने रेशन दुकानातून गहू, तांदूळ व भरड धान्य माणसी पाच किलोप्रमाणे देण्याचे ठरले होते. मात्र घोषित केलेल्या यादीमध्ये केशरी कार्डधारकांचे नाव आलेले नाही.

महाडिकांच्या विजयासाठी प्रयत्न करा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार बजरंग देसाई यांनी केले. ते गारगोटी येथे काँग्रेस कमिटीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images