Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंडलिकांचे डिपॉझिट जप्त करणार

$
0
0
सत्तेसाठी जातीयवादाचा झेंडा हातात घेणाऱ्या संजय मंडलिकांचे डिपॉझिट जप्त करू, असा निर्धार कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मुरगूड हद्दीतील जांभूळखोरा परिसरात मुश्रीफ यांच्या विकासनिधीतून साकव पुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील होते.

‘अन्नसुरक्षे’चा फेरसर्व्हे करा

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेचा सर्व्हे पूर्णपणे चुकीचा झाला आहे. अनेक गावातील पात्र लाभार्थ्यांना यातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे सर्व्हे नव्याने करावा. तसेच तालुक्यातील ऐशी टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती लतादेवी पाटील होत्या.

वाढीव दराला विरोध

$
0
0
शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कामे थांबवू नका. मात्र बेकायदेशीर कामांना तसेच वाढीव दराला आमचा लेखी विरोध नोंदवावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरी यांनी केले.

आता अनुभवा रात्रीचे जंगल

$
0
0
दिवसभर जंगलभ्रमंती करून थकलेल्या निसर्गवेड्याना आता अंधाऱ्या रात्रीच्या साक्षीने, सौरउर्जेच्या मंद प्रकाशात, घनदाट जंगलातील प्राण्यांच्या विविध आवाजाच्या संगतीत दाजीपूर अभयारण्याच्या गर्द वनराईत रात्र घालविता येणार आहे. यासाठी ‘कम्पा’अंतर्गत वन्यजीव विभागाने येथील ठक्क्याच्या वाड्यावर तीन कापडी तंबू उभारले असून त्यात निवास, भोजनासह अन्य सुविधाही पुरविल्याने अनेक जंगलवेड्या पर्यटकांची पाऊले दाजीपुरकडे वळत आहेत.

सरकारी जाहिरातींचा फंडा

$
0
0
निवडणुका आल्या की राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या जाहीराती आणि होर्डिंग्ज लागतात. यावर्षी मात्र सर्व राजकीय पक्षांना राज्य सरकारनेच मागे टाकले आहे. राज्य सरकारने कर्तव्य म्हणून केलेल्या कामांच्या जाहिराती लावण्याचा सपाटा लावला आहे.

हिरण्यकेशी नदीत मासे, खेकडे मृत

$
0
0
आजरा येथील रामतीर्थनजिकच्या हिरण्यकेशी नदीपात्रातील खेकडी मृतावस्थेत सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासेही मृतावस्थेत सापडले होते. हिरण्यकेशी नदीपात्रात बारा महिने पाणी वाहते असते.

वॉर्म ग्रीटिंग्ज

$
0
0
‘...पुढील पाच वर्षांत वळीवडे येथील कॅम्प एका कम्युनिटीमध्ये विकसित झाला. बरॅक्स, दगडी भिंती, फुलांच्या आणि केळीच्या बागा, मुख्य रस्त्यांपासून क्वॉर्टर्सना विभाजित करणाऱ्या भिंती असे येथील चित्र होते.

बारावी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु

$
0
0
ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी सोमवारपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाची सुरुवात केली. बहिष्कारामुळे रखडलेल्या मॉडरेटरच्या बैठका होऊन प्राचार्यांनी पर्यवेक्षकांच्याकडे उत्तरपत्रिका ताब्यात दिल्या. बारावीच्या मराठी, इंग्रजी, गणित विषयांच्या मॉडरेटरच्या बैठका विभागीय मंडळात झाल्या.

इचलकरंजी, जयसिंगपूरमध्ये जोरदार पाऊस

$
0
0
विजांचा कडकडाट आणि गारांसह इचलकरंजी शहर, परिसर व शिरोळ, हातकणंगले, जयसिंगपूर परिसरात जोरदार पाऊस पडला. सुमारे तासभर पावसाने चांगलेच झोपडून काढले. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

पाण्यासाठी टँकरभोवती झुंबड

$
0
0
जुन्या शिंगणापूर योजनेवरील बऱ्याच वर्षांपासून असलेल्या दोन मोठ्या गळतीच्या दुरूस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. दिवसभरात ११ टँकरद्वारे ५४ ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला.

मंडलिकांना पाठिशी घालण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, पाटील यांनी याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यांनी राजीनामा आयुक्तांकडे न पाठविता आपल्याकडेच ठेवला आहे.

भन्नाट बाइक रॅलीचा अनुभवा ‘मुक्ता’छंद

$
0
0
कोल्हापूर आणि दुचाकी यांचं अभेद्य आणि अतूट नातं आहे. इथं प्रत्यक्ष आयुष्यातल्या जोडीदारापेक्षा आपल्या बाइकबरोबर जास्त वेळ काढावा लागतो. कोल्हापुरातल्या बहुतांश वर्किंग, बिझनेस विमेन्सही याला अपवाद नाहीत. अशा या आपल्या बाइकच्या जोडीनं आपला दिवस साजरा करण्याची एक भन्नाट कल्पना आपल्यासमोर येते आहे... येस... महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर ऑल विमेन बाइक रॅली!

द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले

$
0
0
वादळी वाऱ्यासंह गारांच्या मुसळधार पावसाने सोमवारी सांगली आणि परिसराला केवळ झोडपले. गारपिठीमुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. निर्यातक्षम द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना वाढीव ‌बिलांचा ‘शॉक’

$
0
0
तालुक्याच्या पूर्व भागात कोवाडसह कुदनूर, कालकुंद्री, दुंडगे, यासह अन्य परिसरातील २० हून अधिक गावातील शेती मोटरपंप धारकांना चालू बिलातून हजारो रुपयांच्या अतिरिक्त आकार आकारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिंक भुर्दंड सोसावा लागत असून हा अतिरिक्त आकार रद्द करावी, अशी मागणी पंपधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

नगरसेवकांची पायावर कुऱ्हाड

$
0
0
आतापर्यंत केएमटी दरवाढीच्या तसेच सवलतींच्या प्रस्तावावर नगरसेवकांचा राहणारा अंकुश नुकत्याच झालेल्या सभेत नगरसेवकांनी काढून घेतला. महासभेचे अधिकार परिवहन व्यवस्थापकांकडे देण्याचा ठराव संमत केल्याने येथून पुढे जे आयुक्त ठरवतील तो प्रस्ताव थेट सरकारदरबारी मंजुरीसाठी जाणार आहे.

वादावादी, कुरघोडीने चित्रपट महामंडळाचा ‘सिनेमा’

$
0
0
पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंतांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील गेल्या वर्षभरातील वाद, गैरव्यवहार आणि एकमेकांवरील कुरघोडीचे राजकारण यामुळे महामंडळाच्या कारभाराची गाडी ट्रॅक सोडून जात असल्याचा संदेश महामंडळाच्या सदस्यांमध्ये जात आहे.

महायुतीच्या लाटेत ‘बारामती’ ही टिकणार नाही

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या स्वागतानिमित्त महायुतीच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन सोमवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

लढाई लोकसभेची, नजर विधानसभेवर

$
0
0
लोकसभेसाठी मंडलिक-महाडिक लढतीत महत्वाची भूमिका बजावत आता काही नेते विधानसभेचे गणित सोपे करण्याच्या तयारीला लागले आहेत. आता ते लोकसभेसाठी इतरांसाठी लढत असले तरी त्यांची नजर विधानसभेवरच आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस

$
0
0
कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर शहरासह शिरोळ व हातकणंगले तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. जयसिंगपूर, नृसिंहवाडी भागात गारांचा वर्षाव झाला. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या.

पोलिस व्हॅनमधून उडी टाकली

$
0
0
वाहगाव (ता. कराड) येथे एका महिलेसह तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या मृत्यूचे गूढ सोमवारी उलगडले. पोलिस कारवाई दरम्यान धावत्या व्हॅनमधून चिमुकल्या मुलांसह उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images