Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोलविरोधात गुरूवारी मोर्चा

$
0
0
न्यायालयीन लढाईत टोलला स्थगिती दिली असली तरी रस्त्यावर सुरु असलेले आंदोलन टोल रद्द होईपर्यंत सुरुच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी (ता.६) जिल्हाधिकारी कार्यालय व विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सोमवारी टोलविरोधी कृती समितीच्या ​बैठकीत घेण्यात आला.

पीएन-महाडिक भेटीने संभ्रम दूर

$
0
0
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या आग्रहानंतरही कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते आघाडी धर्म पाळणार की नाही, याबाबतच्या साशंकतेला जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्या गुप्त भेटीने पूर्णविराम मिळाला.

रॅली युतीची पदाधिकारी काँग्रेसचे

$
0
0
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिकांच्या सोमवारी झालेल्या स्वागत रॅलीत काँग्रेसचे तीन जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य सहभागी झाले होते. माजी आमदार व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय घाटगे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र मंडलिक हे रॅलीत अग्रभागी दिसून आले.

‘सुंदर’चा माहुत अप्रशिक्षित

$
0
0
वारणा येथील सुंदर हत्तीसंदर्भात हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत सोमवारी पिपल फॉर इथिकल ट्रीटमेंट फॉर अॅनिमल या संस्थेच्या तज्ज्ञांनी सुंदरचा माहुत अप्रशिक्षित असून सुंदरला साखळदंडात जखडणे हे क्रूर असल्याचा दावा केला. यासंदर्भातील अंतिम सुनावणी ११ मार्चला होणार आहे.

हातकणंगलेतून आवाडेच

$
0
0
हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसला देण्याचा निर्णय राज्यपातळीवर झाला आहे. त्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी आठ मार्चला जाहीर होणार असल्याचे समजते. काँग्रेसने देश्पातळीवर अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेली नाही. त्यामुळे आवाडे यांच्या नावाची घोषणाही लांबणीवर पडली आहे. घोषणा होणार याची​ खात्री झाल्याने आवाडे गटाने प्रचाराला सुरुवातही केली आहे.

गारपिटीत दोघांचा मृत्यू

$
0
0
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊन एका वृद्धेसह एका बालिकेचा मृत्यू झाला आहे. दादा गरंडे (६५) आणि रेश्मा तातोबा खांडेकर (९ महिने) अशी त्यांची नावं आहेत. गारपिटीच्या या तडाख्यात ३९ मेंढ्याही दगावल्या असून फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

बोलाची कढी

$
0
0
बऱ्याच लोकांकडं खूप काही थोडक्यात किंवा नुसतंच खूप खूप सांगण्याची कला उपजतच असते. मितभाषी म्हणून त्यांचा माघारी अनुक्रमे गौरव किंवा टवाळी होत असते. घुम्या लोकांचा प्रश्नच नसतो.

धन्यवाद इंडिया, थॅंक्यू कोल्हापूर

$
0
0
१९४३ ते १९४८ या कालावधीत कोल्हापुरातील वळीवडे येथील पोलिश नागरिकांच्या कॅंपमध्ये असलेल्या आणि आता जगभरात विखुरलेल्या ८० पोलिश नागरिकांनी आज कोल्हापूरला भेट दिली. ‘धन्यवाद भारत आणि थॅंक्यू कोल्हापूर’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘कोल्हापूर’ नसेल तर ‘हातकणंगले’ही नको

$
0
0
कोल्हापूर लोकसभा राष्ट्रवादीला देताना स्थानिक नेत्यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आता हातकणंगले तरी कशाला देता अशी भूमिका घेत स्थानिक काँग्रेस नेत्यांनी हा मतदारसंघ घेण्यास छुपा विरोध सुरू केला आहे.

भुदरगडच्या काँग्रेस नेत्यांची गोची

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस जोरात कामाला लागली असली तरी काँग्रेसच्या गोटात अद्याप सामसूम आहे. हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापत असले तरी काँग्रेस आणि सदाशिवराव मंडलिक यांना मानणारे जुने काँग्रेसवासी मात्र संभ्रमावस्थेत आहेत.

शहरातून मताधिक्य कोणाला?

$
0
0
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सध्या शिवसेनेकडे आहे. या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व नेहमीच बदलत राहिले आहे. आमदार राजेश क्षीरसागर सध्या या मतदारसंघातून आमदार आहेत.

बड्या ऐपतवाल्यांना जागा दाखवा

$
0
0
‘पैसे द्यायचे, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून समाजाला वेठीस धरायचे असा काही राजकीय पक्षाचा अजेंडा आहे. त्यातून बड्यांना तिकीटे दिली जातात, त्यांना धडा शिकविण्यासाठी तिसरी आघाडीला साथ देऊन परिवर्तन घडवा,’ असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार यांनी केले.

पुरोगामी उमेदवाराला जनता दलाचा पाठिंबा

$
0
0
पुरोगामी विचारांचा वारसा चालविणाऱ्या उमेदवाराला जनता दल पूर्णपणे सहकार्य करणार आहे. पहिल्या टप्प्यात माजी आमदार संपतबापू पवार यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली जनता दलात सुरु झाल्या आहेत.

प्रा. मंडलिक यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षांतर केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे पत्र जिल्हा काँग्रेसने मंडलिकांना दिले आहे.

‘धनुष्यबाणा’ने ‘हात’ घायाळ

$
0
0
पक्षापेक्षा व्यक्तीलाच महत्व देत राजकारण करणाऱ्या कागलमध्ये अनेक वर्षानंतर काँग्रेस पक्षाला आता आपली ताकद शोधण्याची वेळ आली आहे. याउलट अस्तित्वासाठी​ वीस वर्षे धडपडणाऱ्या शिवसेनेला मात्र मंडलिक गटामुळे अचानक बळ मिळाले आहे.

‘पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर चौघींचा मृत्यू’

$
0
0
धावत्या पोलिस व्हॅनमधून तीन चिमकुल्यांसह उडी टाकून पळून जाताना झालेल्या दुर्घटनेत ठार झालेल्या चौघींचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कटनी (मध्यप्रदेश) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नुकसानीचा पंचनामा सुरू

$
0
0
सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा सुरू आहे. केवळ कवलापूर आणि बुधगाव परिसरात दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ए. आय. मालगार यांनी दिली.

उद्योगमंत्र्यांना पडला आश्वासनाचा विसर

$
0
0
उद्योजकांनी भविष्यातील उद्योगाच्या विस्ताराचा विचार करता काही ठिकाणी बांधकाम केले आहे. याबाबत एमआयडीसीकडून परवानगी घेण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बांधकाम केल्याने एमआयडीसीने उद्योजकांना २५ टक्के दंड आकारला आहे.

किमान आधारभूतचा ‘आधार’

$
0
0
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी प्रत्येक पिकाची किमान आधारभूत किमंत जाहीर केली होती. शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्राची स्थापना केली होती.

पाटील - महाड‌िक समेटासाठी प्रयत्न

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात समेट घडवण्यासाठी स्थानिक आणि वरीष्ठ पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images