Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘आरटीओ’त एलइडी स्क्रीनवर नंबर डिस्प्ले

$
0
0
वाहनधारकांना गाडीचे क्रमांक, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि सुरू असलेल्या सीरिजची माहिती आरटीओ कार्यालयातील एलइडी स्क्रिनवर दिसणार आहे. टू व्हिलर, फोर व्हिलर, ट्रान्स्पोर्ट, नॉन ट्रान्स्पोर्टमधील ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे क्रमांक एलइडी स्क्रीनवर पाहावयास मिळणार आहेत.

राज्यात रस नाही; केंद्रातच काम करीन

$
0
0
बारामतीचा नावलौकिक देशपातळीवर असल्यामुळेच छोट्या घटनांचीही माध्यमांकडून दखल घेतली जाते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात रस नसून, केंद्रात काम करण्यालाच आपले प्राधान्य आहे, अशी​ भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली.

सेट टॉप बॉक्सबद्दल वाढतेय जागृती

$
0
0
केबलधारकांची वस्तुनिष्ठ आकडेवारी स्पष्ट व्हावी आणि महसुलात वाढ करण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये सेट टॉप बॉक्स बसवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांत सेट टॉप बॉक्स बंधनकारक करण्यात येणार आहेत.

दहावी परीक्षेचा बागुलबुवा

$
0
0
सोमवारपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. बऱ्याच कुटुंबांमध्ये या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे आई-बाबाच जास्त टेन्शनखाली असलेले दिसून येतात. विद्यार्थी मात्र त्या मानाने बिनधास्त असतात. काही काही विद्यार्थी नियोजनबद्ध प्रयत्न करून दहावीच्या परीक्षेला अगदी शंभर टक्के मार्कसुद्धा मिळवतात, पण असे अपवाद वगळले तर टी. व्ही. बघणे, मित्र-मैत्रिणींबरोबर मजा करणे, व्यवस्थित झोपा काढणे अशी सगळी आपली निवांतपणे चाललेली दिनचर्या तशीच चालू ठेवूनही चांगले यश मिळवणारे बरेच विद्यार्थी दिसून येतात.

‘एमटीडीसी’चा महोत्सव अधांतरी

$
0
0
थंडी कमी होऊन उन्हाचा चटका वाढू लागला तरी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला कोल्हापूर महोत्सवासाठी तीन महिन्यांपासून अजून तारखा निश्चित करता आलेल्या नाहीत.

सायटेक् प्रोजेक्टसचे सादरीकरण

$
0
0
शेतीक्षेत्राचे कमी होणारे प्रमाण, औद्योगिकरणामुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर मात करणारे ग्रीन प्रोजेक्टस, विज्ञानामुळे मानवी जीवनात झालेला आमूलाग्र बदल दर्शविणारी पोस्टर्स, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधावर होणारा परिणाम अशा विविध घटकांवर आधारित विद्यार्थ्यांच्या संशोधन आविष्काराचे दर्शन शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात घडले.

सायंकाळ सुखद

$
0
0
आयुष्यभर कलेसाठी जिवाचं रान केलेल्या कलावंतांच्या आयुष्याची संध्याकाळ मात्र मानधन न मिळण्याच्या निराशेने काळीकुट्ट झाली होती. गेल्या सात वर्षांपासून मानधनासाठी केलेल्या अर्जांची फाइल समाजकल्याण विभागात धूळ खात पडली होती.

संजय मंडलिक शिवसेनेत

$
0
0
काँग्रेसचे खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) शिवसेनेत प्रवेश केला. ते कोल्हापूरमधून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोषण आहारातून मुख्याध्यापक मुक्त

$
0
0
राज्य सरकारने शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापकांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेला यश मिळाले आहे.

सेनेत प्रवेश नाही, बाहेरून पाठिंबा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरवर केलेल्या अन्यायामुळेच प्रा. संजय मंडलिक यांनी बंडाचे निशाण फडकवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.आपण मात्र त्या पक्षात प्रवेश करणार नाही, आपला त्यांना बाहेरून पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी प्रा. संजय मंडलिक यांच्या शिवसेना प्रवेशावर व्यक्त केली.

मंडलिकांमुळे राजकारणाला कलाटणी

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेतील पक्षीय राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. मंडलिक यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडे दिला आहे.

जयंतराव पळ का काढताय?

$
0
0
‘जयंतराव तुमच्या कारनाम्याची अनेक पाने माझ्या दप्तरी शिल्लक आहेत, ती उघडली तर तुम्हाला जनतेला तोंड दाखवता येणार नाही. हातकणंगले मतदार संघात तुमचे काय होणार आहे, याचा अंदाज घेऊनच तुम्ही मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे गेल्याचे सांगत कल्लापाआण्णा आवाडे यांच्या विजयाची खात्री देत आहात.

तेरा वर्षांत ६४ आर्थिक गुन्हे

$
0
0
घोटाळे, पतसंस्था व बँकांची फसवणूक, जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक असे १३ वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ६४ आर्थिक गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित आरोपींनी ८० कोटी ९ लाख ८९ हजार ७७९ रुपयांची फसवणूक केली असून, अनेक आरोपी फरार आहेत.

संभाजी पवारांचा बंडाचा झेंडा

$
0
0
सांगली लोकसभा मतदारसंघातून आमदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले आमदार संभाजी पवार यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. ‘मारामारी, दरोडा आणि भ्रष्टाचारासारखे गुन्हे करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मंडलिक-महाडिक थेट लढत

$
0
0
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी अखेर शनिवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने कोल्हापूरची लढत आता संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यात निश्चित झाली आहे.

सिलिंडर होणार स्वस्त

$
0
0
महापालिकेच्या शनिवारी मांडण्यात आलेल्या सन २०१४-१५च्या अर्थसंकल्पात घरगुती गॅस सिलिंडरवरील स्थानिक स्वराज्य संस्था करात (एलबीटी) दोन टक्के सवलत देण्या प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानित सिलिंडर नऊ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर २६ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

ग्रीन टेक्नॉलॉजी

$
0
0
‘सध्या ग्रीन शब्दाची चलती आहे,’ माझा मीडिया सल्लागार सांगत होता, ‘तुम्ही तयार केलेल्या आयटी प्रोडक्टच्या वापराने ग्रीन इफेक्ट काय होतो हे तुमच्या ग्राहकांना समजावून सांगा. तुम्हाला इन्वेस्टर पटापट मिळतील.’ ह्या मंडळींच्या मांडणीला, प्रोजेक्शनसना बऱ्यापैकी डिस्काउंट द्यावा लागतो हे खरे असले तरी त्यात मार्केटिंगचे नवे ट्रेंड्स मात्र नक्कीच असतात.

दूधभेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस

$
0
0
दूधभेसळ करून ग्राहकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या दूध व्यावसायिकांच्या मोठ्या टोळीचा उपाधीक्षक प्रशांत कदम यांनी रविवारी पर्दाफाश केला. सुमारे साडेसह लाख रुपयांचे भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. युरिया, सरकी तेल आणि सोर्बिटोल घेऊन जाणाऱ्या गाडीची प्रशांत कदम यांनी अडवून चौकशी केली असता, दूधभेसळ उजेडात आली.

शेट्टींचा जनतेवरील विश्वास ढळला

$
0
0
‘खासदार शेट्टींचा जनतेवरील विश्वास ढळला आहे. त्यांना यावेळी जमेल असे वाटत नाही, म्हणूनच ते जातीयवादी पक्षांच्या पंक्तीला गेले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराची जनता त्यांना साथ देणार नाही,’ असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी कामेरी येथील कार्यक्रमात व्यक्त केला.

‘अन्नसुरक्षा’ राबविताना प्रशासनाची दमछाक

$
0
0
गरिबांना स्वस्तात धान्य देणारी अन्नसुरक्षा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यातच धान्य उपलब्ध होत नसल्याने अडचणीत आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ‘एपीएल’चे धान्य अन्नसुरक्षेच्या लाभार्थ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images