Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हा हज कमिटीचे संपर्क कार्यालय सुरू

$
0
0
मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भाविक जातात. भाविकांना यात्रा काळात प्रवासाबाबत तसेच करावयाच्या विविध विधींबाबत माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्हा हज कमिटीच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.

कर्ण ग्रुपच्या रौप्यमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

$
0
0
लोणार गल्लीतील कर्ण ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार राजेश क्ष‌ीरसागर यांच्या हस्ते झाले.

डीएसएलआर फिल्ममेकिंग आणि थिएटर लाइटवर कार्यशाळा

$
0
0
सिनेमानिर्मितीमध्ये क्रांतिकारक ठरलेल्या डीएसलआर कॅमेरा आणि थिएटरच्या प्रकाशयोजनेवर महाराष्ट्र टाइम्स आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्यावतीने कार्यशाळा होणार आहे. १ ते १० फेब्रुवारीदरम्यान ही कार्यशाळा होत आहे.

महसूलच्या योजनांना चित्ररथाचे चाक

$
0
0
मुंबईकरांनी महसूल विभागाच्या चित्ररथाला दिलेली दाद लक्षात घेता हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवून ‘सुवर्णजयंती राजस्व अभियाना’च्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा महसूल विभागाचा विचार आहे.

कलाविष्काराची उधळण

$
0
0
कोल्हापुरातील चित्रशिल्प कलाकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे या हेतूने कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर कला महोत्सवाची पर्वणी रसिकांसाठी खुली होत आहे.

केआयटीचे हॉवर क्राफ्ट

$
0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील विद्यार्थ्यांनी छोट्या आकारातील हॉवर क्राफ्ट यंत्र बनवले आहे. हॉवर क्राफ्ट हे यंत्र ट्रान्सव्हेइकल म्हणून लष्करात वापरले जाते. कोणत्याही भूभागावर चालू शकणारे हे यंत्र असते. लष्करात मोठ्या आकाराची हॉवर क्राफ्ट वापरली जातात.

पाणंद रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करवीर येथील पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवास पाटील यांनी केली आहे. वडकशिवाले ते इस्पुर्ली पाणंद रस्ता, वडकशिवाले नदी पाणवठा पाणंद रस्ता यामध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याबाबतचा अहवाल सहाय्यक अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

सौंदत्तीसाठी सवलतीत एसटीची सेवा

$
0
0
रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी कागल आगाराने ‘गाव ते सौंदत्ती’ ही कर्नाटक बसपेक्षा स्वस्त सेवा उपलब्ध केली आहे. यापूर्वी कागल ते गावापर्यंतचा अधिक भार प्रवाशांकडून घेतला जात होता, तो रद्द केल्यामुळे सौंदत्तीला जाणाऱ्या भाविकांना प्रवास खर्चात बचत झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक प्रदीप कदम यांनी दिली. यावेळी बसस्थानक प्रमुख रमेश चव्हाण उपस्थित होते.

आजरा कॉलेजमध्ये उद्यापासून हिंदी परिषद

$
0
0
आजरा कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि दक्षिण भारत हिंदी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदी साहित्य में सांप्रदायिक परिदृश्य’ या विषयावर १ व २ फेब्रुवारी दरम्यान ही परिषद संपन्न होत आहे. देशभरातील १०० हून अधिक शिक्षक, प्राध्यापक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

अंगणवाडी सेविकांचे धरणे

$
0
0
अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ जानेवारी पासून राज्यभर सुरु असलेले आंदोलन आज पंचविसाव्या दिवशीही सुरु आहे. तालुकास्तरावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातून आपला लढा चालू ठेवला आहे.

डी. एड्, बी. एड् धारकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
महाराष्ट्र-कर्नाटकातील डी. एड्. आणि बी.एड्. उमेदवारांना नोकरी देण्याचे अमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. कॉम्प‌िटेटिव एक्झामिनेशन ट्रेनिंग बोर्ड (सी.ई.टी.बी.)नवी मुंबई या संस्थेने ऑनलाइन अर्ज व पैसे भरून घेतले.

पन्हाळा येथे आजपासून ’प्रेरणोत्सव’

$
0
0
पन्हाळा पायथ्याच्या नेबापूर येथील वीर शिवा काशीद स्मारक परिसरात आजपासून प्रेरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थ‌ितीत वीर शिवा काशिद स्मारकाचे शनिवारी (ता. १) लोकार्पन होणार आहे.

आघाडीचे फडकेही फडकू नये

$
0
0
‘महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे फडकेही फडकू देऊ नका,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. महायुती स्थापन झाल्यानंतर सर्व घटक पक्षांचे नेते असलेला हा पहिलाच मेळावा होता. प्रचंड गर्दीत झालेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांचा आसूड उगारून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

थोडं थांबा..आमचेच सरकार येणार!

$
0
0
‘कर्नाटकात उद्योग स्थलांतरित करण्याची भूमिका सहा महिने बाजूला ठेवा. कारण केंद्रात भाजप आघाडीचे सरकार येणार असून, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू,’ असे आश्वासन भाजपचे संसदेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले.

कोल्हापूर लोकसभेबाबत पवार घोषणा करणार का?

$
0
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्याला विशेष महत्व आले आहे.

बारा सिलिंडरची घोषणा, अंमलबजावणी कधी?

$
0
0
अनुदानित नऊ सिलिंडरवरून बारा सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला. हा निर्णय जाहीर केला असला तरी याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालय व गॅस कंपन्यांकडे लेखी आदेश आलेले नसल्याने अंमलबजावणी कधी होणार याबाबत संभ्रम आहे.

जिल्ह्यातील ‘आशा’ प्रशासनाच्या दारी

$
0
0
‘आशा’ना आरोग्य सेविकेचा दर्जा आणि महिना सात हजार रूपये वेतन मिळालेच पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

आयुष्यातील संधीचे सोने करणे आपल्याच हाती

$
0
0
आयआयटी पवई येथे ‘इंडस्ट्रीयल इंजिनीअरींग’चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला युवक भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करायचं स्वप्नं पाहतो. स्वप्नं साकारण्यासाठी मुंबई येथील मोठ्या कंपनीतील खासगी नोकरी सोडतो.

गांधी विचारानेच देशाचा विकास

$
0
0
‘महात्मा गांधी नावाच्या विचारवादळाने ६६ वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्याचे परिमाण दिले, त्या गांधीजींची विचारवाटच देशाच्या विकासाचा मार्ग बनेल,’ दिल्ली येथील इंडिया गेट परिसरातून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे हे शब्द व्हिडिओ कॉन्फरन्सवरील पडद्याच्या माध्यमातून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात घुमले आणि महात्मा गांधी यांच्या बलिदानाला कोल्हापूरकरांनी सलाम केला

एक लाख शिक्षकांचा मेळावा

$
0
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद, शिक्षक मेळावा व शताब्दी महोत्सव शुभांरभ रविवारी (ता. २) कोल्हापुरात जरगनगर रस्त्यावरील निर्माण चौक येथे होणार असून राज्यभरातील एक लाख शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images