Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीत लबाडांची टोळी

0
0
के. पी. पाटील सारख्या लबाड माणसाला बिद्री साखर कारखान्याचा अध्यक्ष करून मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. ते लबाड बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अशाच लबाड लोकांची टोळी शरद पवारांच्याबरोबर राष्ट्रवादीत आहे, अशी टीका खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केली.

कोल्हापूर लोकसभा काँग्रेसला मिळणार?

0
0
लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मिळाल्याने कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मिळवण्यासाठी राज्यपातळीवर जोरात प्रयत्न सुरू आहेत.

गूळ असोसिएशनला नोटीस बजावणार

0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्याच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने मंगळवारी समितीमधील सौदे बंद ठेवले होते. याबाबत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी प्रशासक डॉ. महेश कदम यांची भेट घेऊन सौदे बंद पाडलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान लटकले

0
0
गाव तेथे ग्रंथालय चळवळ, वाचाल तर वाचाल असा संदेश देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांचे पन्नास टक्के अनुदान लटकले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त १२ हजार ६०० ग्रंथालयांना या अनुदानाची प्रतीक्षा आहे. नवीन ग्रंथालयांच्या प्रस्तावाचा मुहूर्तही ग्रंथालय संचालनायलाने काढलेला नाही.

आरक्षणाबाबत दगाफटका केल्यास धडा शिकवू

0
0
मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या राज्यकर्त्यांसोबत राहू, दगाफटका केला तर त्यांनाही वेळीच धडा शिकविला जाईल. राष्ट्रीय अधिवेशनात शेवटचा निर्णायक लढा ठरेल.

सरकारी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

0
0
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १३ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. या संपाची नोटीस देण्यासाठी ‌कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

अहवाल तपासणीनंतर कोल्हापूरबाबत निर्णय

0
0
कोल्हापूर महापालिकेकडून राज्य सरकारला टोलबाबतचा प्रस्ताव मिळाला आहे. या प्रस्तावाची तपासणी करण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत. यानंतर या बाबत सरकारची भूमिका स्पष्ट करता येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत बुधवारी स्पष्ट केले.

गर्भलिंग चाचणी : डॉक्टरला कारावास

0
0
गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी बिद्री (ता. कागल) येथील डॉ. युवराज पांडुरंग पाटील व सोनोग्राफी मशीनचा पुरवठा करणाऱ्या एस.ए.जी.सय्यद (अहमदनगर) या दोघांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

...नाही तर खुर्च्या खाली करा

0
0
आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा..., एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता..., लाटणं ले कर हल्ला बोल... अशा घोषणा देत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर लाटणं मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

आबा, दादांनो..., आता सावधान!

0
0
फॅन्सी नंबर प्लेट आणि वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणाऱ्यांनो आता सावधान...! कारण शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने एक फेब्रुवारीपासून अशा वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेची वाहनधारकांना जाणीव व्हावी यासाठी जनजागृतीची पत्रके वाटली जात आहेत.

एसटी थेट भाविकांच्या गावात

0
0
सध्या यात्रा-जत्रांचा काळ सुरू झाल्याने खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी आणि आर्थिक उत्पन्नवाढीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाविकांना टार्गेट केले आहे. त्यामुळे एसटीने थेट भाविकांच्या गावात सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर विभाग पंढरपूर आणि सौंदत्ती यात्रेसाठी पहिलाच पॅटर्न जिल्ह्यात राबविणार आहे.

सांगलीवाडीचा टोल रद्द

0
0
सव्वा कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या वसुलीसाठी सोळा वर्षे टोलला मुदतवाढ देण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लवादाचा निर्णय अखेर त्या खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (२९ जानेवारी) रद्द ठरवला.

केजकर यांची बहारदार मैफल

0
0
लक्ष्मीनारायण संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील जयंत केजकर यांचे गायन झाले. रामगणेश गडकरी सभागृहात झालेल्या या मैफलीची सुरूवात ‘राग मारवा’मधील विलंबित झुमरा तालातील ‘मायी मोहे काहु की’ ही बंदिश त्यांनी सादर केली.

‘ग्रंथवाचन वाढवा, सामाजिक ऱ्हास रोखा’

0
0
‘इलेक्ट्रॉनिक्स मीडियांवरील विविध मलिकांतून माणासांच्या विचारांवर होणारा अनिष्ट परिणाम रोखायचा असेल आणि सांस्कृतिक, समाजिक व कौटुंबिक ऱ्हास थांबवायचा असेल तर ग्रंथवाचन वाढविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी आणि प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी केले.

पोवाड्यातून उलगडली मराठीची महती

0
0
मराठी भाषेतील शब्दरचनेची जादू शाहीर राजू राऊत यांनी पोवाड्यातून सादर केली. मराठी भाषेची पताका, मराठीचे महत्व, लोककलेची महती सांगणारे काव्य आणि पोवाड्यातूनच कांदबरीचा जन्म झाल्याचे अनेक स्वरचित कवने शाहीर राऊत यांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली.

पुरस्कार विजेत्यांचा आतषबाजीत सत्कार

0
0
राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केलेल्या कोल्हापूरच्या स्नेहांकिता वरुटे, एस. व्ही. सूर्यवंशी, संग्राम चौगुले यांचा शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात झाला.

मैत्रिणींच्या नात्यातील गुंता उलगडणार ‘मनस्वी’

0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (केआयटी) कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा विद्यार्थी कौस्तुभ देशपांडे याने बनवलेली ‘मनस्वी’ ही शॉर्टफिल्म २० फेब्रुवारीला रिलिज होणार आहे.

‘माण्साचेच गाणे गावे...’

0
0
नामदेव ढसाळ यांनी ‘गोलपीठा’ या कवितासंग्रहातील ‘माण्साने’ या कवितेत वरील भावना व्यक्त केल्या आहेत. माणूस हा बुद्धिमान आहे म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा जास्त स्वार्थी आहे.

‘अक्षरगप्पा’मध्ये बाबा आमटेंना अभिवादन

0
0
बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘अक्षरगप्पा’ उपक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमटे कुटुंबीयांच्या कार्यावरील दोन शॉर्टफिल्मस् दाखविण्यात आल्या. अक्षरदालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ७३ व्या भागात सुरुवातीला बाबा आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वातंत्र्यसैनिक संघटना, सर्वोदय मंडळाची बैठक उत्साहात

0
0
‘आम आदमी पक्ष आणि पक्षाचे नेते, दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका न करता त्यांना काम करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी द्यायला हवा,’ असा सूर कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, जिल्हा सर्वोदय मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, जिल्हा सर्वोदय मंडळाची बैठक नुकतीच झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images