Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नांदणीत विद्यार्थ्यांनी घेतली पृथ्वीरक्षणाची शपथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथे नंदादीप शिक्षण संकुलाच्या ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूल व नंदादीप बालविकास मंदिरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पृथ्वी रक्षणाची शपथ घेतली. 'सुंदर आणि स्वच्छ पर्यावरण हा माझा हक्क आहे, स्वच्छ व सुंदर वसुंधरा हे माझे व्रत आहे', अशी शपथ घेण्यात आली.

'महाराष्ट्र टाइम्स'ने पर्यावरण समतोल साधण्यासाठी सुरू केलेल्या पृथ्वीरक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेतली. मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थितांना शपथ दिली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्यरत राहू असा संकल्प करून या उपक्रमात नंदादीप शिक्षण संकुलातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी होण्याचे निश्चित केले. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थनेसोबत ही शपथ घेण्यात आली. परिसर स्वच्छता, वृक्षारोपण तसेच त्याचे संवर्धन करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर टाळण्याची तसेच प्रदूषण रोखण्याची शपथ घेतली.

नंदादीप संकुलाने आजअखेर पर्यावरण संरक्षण व संतुलनासाठी लाखो वृक्ष बिया संकलन, बीजरोपण, वृक्ष लागवड, संवर्धन, पाणी संरक्षण, संवर्धन यासह विविध उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सचा उपक्रम स्तुत्य व समाजाला प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. एस. बी. जैनापूरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिरुपती विमान रद्द; इंडिगोच्या कर्मचा-यास धक्काबुक्की

$
0
0

कोल्हापूर: तिरुपतीला जाणारं विमान रद्द केल्यानं संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीकेल्याचा प्रकार कोल्हापूर विमान तळावर घडला आहे. थंडी वाढल्यानं दृश्‍यमानता कमी झाल्यानं विमानसेवेवर परिणाम झाला. त्यामुळं कोल्हापूरहून तिरुपला जाणारं विमान अचानक रद्द करण्यात आलं.

विमान रद्द झाल्याचं कळताच प्रवासी संतापले. संतप्त प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचा-यास जाब विचारत धक्काबुक्की केली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणच्या अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त करीत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिलं.


वाचा: कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला मिळणार चालना

ऐनवेळी विमान रद्द करण्याचे प्रकार वाढल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

वाचा: खूशखबर! मुंबई महापालिकेत ८७४ जागांसाठी भरती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभद्र युती राज्याला एका दिशेला नेणार नाहीः खडसे

$
0
0

पंढरपूरः वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्वे बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र युती झाली असून, ही ३ पायांची युती महाराष्ट्राला एका दिशेला नेईल, असे वाटत नाही, असा घणाघात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला. सांगोला तालुक्यातील एका कार्यक्रमाला जाताना खडसे विठ्ठल दर्शनासाठी थांबले असताना ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी वर्षानुवर्षे जपलेली तत्वे सत्तेसाठी सोडून दिली असून, पहिल्या ५० दिवसांत ५० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांवर आरोप, विसंगत विधाने, सत्तेसाठी एकत्र आलेली ही अभद्र युती किती दिवस चालेल सांगता येत नाही, असा टोलाही खडसे यांनी लगावला. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी तर काँग्रेस-राष्ट्रवादी हे पुरोगामी पक्ष आहेत. मात्र, आता जनतेसमोर जाताना हे कोणती विचारधारा घेऊन जाणार, असा सवालही खडसे यांनी केला.

महापुरातील पुलांची चेन्नई आयआयटीद्वारे तपासणी

तान्हाजी चित्रपटावरून उठलेल्या वादावर बोलताना, शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणासोबतही होऊ शकत नसली, तरी त्यांच्या विचारधारेचे अवलोकन करण्यात गैर काय, असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चेहरे लावलेल्या व्हिडिओचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागताला नोटांची उधळण

२०१४ मध्ये शिवसेना काँग्रेससोबत सरकार स्थापन करायच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने उठलेल्या वादळावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, त्यांच्या आरोपात तथ्य असू शकते. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. त्यामुळे सेनेने कोणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय होता. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी आजच्याघडीला हे तीन पक्ष एकत्र आले. त्याच पद्धतीने २०१४ साली प्रयत्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या माहितीत नक्कीच तथ्य असू शकेल, असेही खडसे यांनी सांगितले.

मेगा भरतीने भाजपाचे सरकार घालवलेः खडसे

या विधानसभा निवडणुकीत भाजपमधील ज्या नेत्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात काम केले. त्याचे पुरावे पक्षश्रेष्ठींना देण्यात आले असून, त्या नेत्यांवर लवकरच कारवाई होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. आपण पक्षश्रेष्ठींना याबाबत सर्व पुरावे दिले असून, आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे. हा पक्षांर्गत मुद्दा असल्याने लवकरच ही कारवाई झालेली दिसेल, असे खडसे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत केलेला सत्तास्थापनेचा प्रयत्न योग्य नव्हता, याचा पुनरुच्चार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत येण्याच्या प्रश्नावर बोलताना, अजून असे काहीच झाले नसून, आता भाजप एकटा समर्थपणे काम करू लागल्याचे खडसे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांचे ज्येष्ठत्व ठरले, मंडलिक यांना अध्यक्षपद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील दोन खासदार आणि राज्यसभेवर नियुक्त एक खासदार यांच्यामधील ज्येष्ठत्त्व निश्चित न झाल्याने जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची रखडलेली अध्यक्षपदाची निवड अखेर मंगळवारी झाली. राज्यपातळीवर ग्रामविकास विभागाच्या प्रशासनाने ज्येष्ठत्व निश्चित करून अखेर समितीवर खासदार संजय मंडलिक यांची निवड केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली आढावा बैठक २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे.

दर तीन महिन्यांनी होणाऱ्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, स्वच्छ भारत मिशन, दिनदयाळ उपाध्यय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पायाभूत सुविधा, महानगरपालिका, नगरपालिकांकडील केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला जातो. मात्र, राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीस विलंब झाला होता. आढावा बैठकही रखडली होती.

अध्यक्षासंबंधी उत्सुकता

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक आणि 'हातकणंगले'तून धैर्यशील माने पहिल्यादांच खासदार झाले. दोन्ही खासदार निवडून येण्याआधीपासून राज्यसभेचे खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती कार्यरत आहेत. अध्यक्षपदासाठी खासदारपदातील ज्येष्ठ हा निकष महत्वाचा मानला जातो. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीतून निवडून आलेल्यांना प्राधान्य अशा निकषांतून खासदार मंडलिक यांना अध्यक्षपद द्यावे या निष्कर्षापर्यंत प्रशासन आले आणि समितीच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पेठेतील महिलांनी दिले सामाजिक वाण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मकर संक्रातीला सोन्या-चांदीचे दागिने, स्टीलची भांडी यांसह आकर्षक वस्तू भेट महिलांकडून वाण दिले जाते. पण शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतील महिलांनी वाण देण्याच्या वस्तूंवरील अनावश्यक खर्च टाळून जमा केलेली रक्कम प्रयाग चिखली येथील पूरग्रस्त महिलेचा देऊन मदतीचा हात दिला. हे 'सामाजिक वाण' आगळे ठरले.

शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत महिला भजनी मंडळ असून प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील साक्षी लोहार या मंडळाच्या सभासद आहेत. त्या भजनी मंडळात संवादिनी वादन करतात. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याला महापुराने वेढले होते. प्रयाग चिखली तर महापुराच्या विळख्यात सापडले होते. घरदार सोडून सर्व नागरिक कोल्हापुरात आश्रयाला आले होते. महापुरात लोहार यांचे घर वाहून गेले. सरकारी मदतीसह दानशूर व्यक्तींनी लोहार यांना मदत केली. महापुरात वाहून गेलेल्या घराचे नव्याने बांधकाम लोहार कुटुंबियांनी सुरू केले असून त्यांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यांची अडचण लक्षात घेऊन मरगाई गल्लीतील माहिलांना लोहार यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. गल्लीतील निर्मला जाधव, वासंती साळोखे, रोहिणी कारंडे, पवार मॅडम, अनिता मोरे, सविता माने, राधिका पोवार, उज्ज्वला सूर्यवंशी, अनिता देसाई, कांचन माने, स्वाती साळोखे, स्नेहा माने, उमा मोरे यांनी संक्रातीला वाण देण्याच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी ती रक्कम लोहार यांना देण्याचा निर्णय घेतला.

मकर संक्रातीदिवशी साक्षी लोहार यांना 'तिळगूळ देऊन गोड बोला' अशा शुभेच्छा देऊन भजनी मंडळाच्या सदस्यांनी जमवलेली रक्कम दिली. भजनी मंडळातील सहकाऱ्यांनी दिलेली मदत पाहून लोहार गहिवरुन गेल्या. महिलांनी दिलेल्या मदतीतून घरबांधणी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला मंडळाच्यावतीने लोहार यांना कपडे, अंथरुण या वस्तूंचीही मदत केली आहे.

दरवर्षी आम्ही भेटवस्तूंचे वाटप करतो. पण यंदा आमच्या भजनी मंडळातील भगिनीला मदत व्हावी असे वाटले. त्यासाठी वाण देण्याच्या रक्कमेतून मदतीचा निर्णय घेतला. आमच्या उपक्रमाला गल्लीतील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

- रोहिणी कारंडे, मरगाई गल्ली, शिवाजी पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिसिंह नाना पाटील नगरात मेळावा

$
0
0

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील महिलांसाठी शोभा विभूते यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी महापौर शोभा बोंद्रे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उदघाटन झाले. यावेळी लक्ष्मी तिप्पे, अरुणा नलवडे यांचा उत्कृष्ट माता म्हणून सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला संघटनांचे काम जाणून घेण्याची संधी या मेळाव्यातील सहभागी महिलांना मिळाली. अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. माधुरी विभूते यांनी स्वागत केले. गजानन विभूते यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबिन दिव्यांगांना, व्यवसाय दुसऱ्याचा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महानगरपालिकेने दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शहराच्या विविध भागात वितरीत करण्यात आलेल्या बहुतांश केबिन्समध्ये दिव्यांग व्यक्तींऐवजी इतरांकडूनच व्यवसाय केला जात आहे. स्वत: व्यवसाय करण्याचे हमीपत्र दिलेले असतानाही शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणच्या केबिन्स दिव्यांग व्यक्तींनीच मासिक भाडेतत्वावर दिल्या आहेत. अशा केबिन्समध्ये वेगवेगळे व्यवसाय केले जात असून कब्जा न घेतलेल्या अनेक केबिन्सचा गैरवापरही सुरू आहे.

महानगरपालिकेने दिव्यांग व्यक्तींच्या रोजगाराला मदत करण्यासाठी त्यांना व्यवसायासाठी केबिन देण्याचा ठराव केला होता. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींची यादी तयार करुन किती केबिन वितरीत करायच्या हे निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रत्येकी २९ हजार रुपये खर्च करुन १७३ केबिन बनविण्यात आल्या. या केबिन दिव्यांग व्यक्तींना दिल्या जात असताना तेथे स्वत: व्यवसाय केला जाईल, असे हमीपत्र महापालिकेने घेतले होते. तयार झालेल्या १७३ केबिन्स शहराच्या वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आल्या होत्या.

मात्र काही ठिकाणी व्यवसाय होणार नाही, असे सांगत दिव्यांग व्यक्तींनी त्याचा ताबा घेतला नव्हता. त्याबाबत प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर केबिन्सच्या जागा बदलण्यात आल्या. २०१७ मध्ये १४२ दिव्यांग व्यक्तींनी याचा ताबा घेतला. हमीपत्र दिले असल्याने केबिन्सचा ताबा घेतल्यानंतर दिव्यांगांनी तिथे व्यवसाय करण्याची आवश्यकता होती. मात्र सध्या ठिकठिकाणी केबिन्सची स्थिती पाहता तेथे दिव्यांग व्यक्तींकडून व्यवसाय सुरू नसल्याचे दिसले. त्याऐवजी इतर व्यक्ती कार्यरत आहेत.

दिव्यांगांना केबिन देताना त्यांची ओळख वेगळी दिसावी यासाठी महापालिकेने एक रंगसंगती निश्चित केली. अनेक ठिकाणी अशा केबिन्सची रांगच लागली आहे. सायबर चौक परिसर, रामानंदनगर अशा ठिकाणांचा समावेश यात आहे. यातील अनेक केबिन्स बंद आहेत. तर काही ठिकाणी व्यवसाय सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणे केबिन्समधील व्यवसाय पाहिल्यानंतर तेथे दिव्यांग दिसत नाहीत. दिव्यांगांच्या नावावर केबिन्स आहेत, पण व्यवसाय करणारे इतर नागरिकच असल्याचे उघड दिसते. काही व्यक्तींनी भाडेतत्वावर या केबिन्स चालवायला घेतल्या आहेत.

काही ठिकाणी केबिन्स अजूनही बंद अवस्थेत आहेत. सायबर चौक तसेच व्यवसायाच्या ठिकाणी केबिन्समध्ये दिव्यांगांकडून व्यवसाय करण्याऐवजी दुसराच व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर मटण, चिकन दुकानेही सुरू करण्यात आली आहेत. अनेकांनी कब्जा घेतला, पण त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाहीत. काही केबिन्सची शटर खराब झाली आहेत तर काहींची गायबच झाली आहेत. ज्या केबिन्स बंद आहेत, त्यामध्ये अनैतिक प्रकार होत असल्याचे दिसत आहे.

दिव्यांगांच्या अनेक केबिन्स बंद अवस्थेत असल्याने त्यामध्ये अनेक गैरप्रकार सुरू आहेत. अनेकांनी तर केबिन्स भाड्याने दिल्या असून तेथे इतरांकडून व्यवसाय सुरू आहे. या प्रकारामुळे योजनेचा मूळ हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

- जयश्री चव्हाण, नगरसेविका

अनेक बंद केबिन्सचा गैरवापर होत आहे अशी माहिती आहे. काहींनी मिळआलेल्या केबिन्सला ठरवून दिलेली रंगसंगती बदलली आहे. अनेकांनी केबिन्स घेऊन व्यवसाय सुरू केलेले नाहीत. अनेकांना व्यवसाय करायची इच्छा असताना केबिन्स मिळालेल्या नाहीत, असे दोन प्रकार दिसून येत आहेत. याबाबत माहिती घेऊ.

- प्रमोद बराले, इस्टेट ऑफिसर

१७३

दिव्यांगांना दिलेल्या केबिन्स

१४२

कब्जा घेतलेल्या केबिन्स

कोणत्या ठिकाणी केबिन्स

रामानंदनगर, सायबर चौक, पाच बंगला परिसर, राजोपाध्येनगर, कसबा बावडा, आरटीओ कार्यालय परिसर, हुतात्मा पार्क परिसर,शेंडा पार्क, टेंबलाईवाडी, टेंबलाईनाका परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागाळा पार्क रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

खानविलकर पेट्रोल पंपाजवळ क्रॉस ड्रेन व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी सहा महिने बंद राहिलेला भाऊसिंगजी रोड ते कसबा बावडा रस्ता महिन्यापूर्वी सुरू झाला. मात्र महिन्यानंतरही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने वाहनधारकांचा प्रवास खाचखळग्यांतून सुरू आहे. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रस्त्याची पाहणी करून काम सुरू करण्याबाबत आढावा घेतला. आठवड्यात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भाऊसिंगजी रोड ते कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपानजिक येथे क्रॉस ड्रेन, ड्रेनेज लाइनसाठी सहा महिने वाहतूक बंद ठेवली होती. पाणीपुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वी नियोजन न करता काम सुरू केले. त्यानंतरच्या महापुरात कामात मोठा अडथळा आला. त्यातून काम पूर्ण होण्यास विलंब झाला. त्याचा त्रास वाहनधारक, परिसरातील नागरिकांना झाला. विविध संघटनांनी दिवाळीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता सरनोबत, उपशहर अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन कामाचा निपटारा करण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी सूचना केल्या. अखेर नोव्हेंबमध्ये काम पूर्ण झाले.

मात्र खोदाईमुळे ठिकठिकाणी मुरुमाचे ढीग आणि मोठे दगड तसेच पडून राहिल्याने रस्ता बंदच राहिला. शेवटी यातूनच वाहनधारकांनी वाट काढली. रस्त्यावरील अडथळे दूर करून सपाटीकरणानंतर डिसेंबरमध्ये अंशत: वाहतुकीला सुरुवात झाली. मात्र अद्याप डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावर ठिकठिकणी मोठे दगड आणि मुरुम असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिसरात काळी माती असल्याने दोनवेळा मुरुम टाकून सपाटीकरणाचे नियोजन होते. त्यानुसार मुरुम टाकण्यात आला. पण त्यानंतरही डांबरीकरण झालेली नाही. त्यामुळे धूळ अधिकच उडत आहे. वातावरणातील बदल आणि रस्त्यावरील धुळीमुळे परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुलीकणामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.

दरम्यान, डांबरीकरणासाठी १९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. निधीची तरतूद करुन कामाला सुरुवात करण्यासाठी सकाळी शहर अभियंता सरनोबत यांनी पाहणी केली. सपाटीकरणानंतर आठवड्यात डांबरीकरणाला सुरुवात होऊ शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनाची धास्ती

दोन वर्षांपूर्वी शहर पाणीपुरवठा विभागाने काम केल्यानंतर त्वरीत डांबरीकरण करण्यात आले. मात्र येथील काळ्या मातीमुळे रस्ता खचला. त्यामुळे आंदोलने झाली. नंतर पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे यावेळी त्वरीत डांबरीकरण करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. रस्त्यावर दोनदा मुरुम टाकून वाहतूक व रोलिंग करुन रस्ता मुजबूत झाल्यानंतरच डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता लगेच खराब झाल्यानंतर नागरिकांचा येणारा रोष टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१ लाख ३० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (एसएससी बोर्ड) घेण्यात येणारी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. लेखी परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातून १ लाख ३० हजार २७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा केंद्रांची पाहणी, समुपदेशकांची नियुक्ती, भरारी पथकांची स्थापना, उत्तरपत्रिकांची छपाई या पातळीवर एसएससी बोर्डातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीसाठी शाळांमध्ये प्रयोगशाळेतील साहित्याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. विज्ञान, कला व वाणिज्य या तीन शाखांमधून यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७३ हजार १३९ तर विद्यार्थिनींची संख्या ५६ हजार ९६८ इतकी आहे. यंदा वाणिज्य शाखेतून परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा तीन हजारांची अधिक आहे. तर सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा देणार आहेत. किमान कौशल्य विभागातून यंदा दीडहजारांहून अधिक मुली परीक्षा देणार असल्याने तांत्रिक विषयावर आधारीत असलेल्या अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा असल्याचे यातून दिसून येत आहे.

शाखा मुले मुली एकूण

विज्ञान ३०,९१६ २३,३१२ ५४२२८

कला २४,८२४ १६,०२८ ४०८५२

वाणिज्य १२९३८ १५९२७ २८,८६५

किमान कौशल्य ४,४६१ १७२१ ६१८२

एकूण ७३,१३९ ५६,९६८ १,३०,१२७

१६७

परीक्षा केंद्रे

३२

संवेदनशील केंद्रे

४४

पर्यवेक्षक कार्यालये

१०

भरारी पथके

महिला भरारी पथके

समुपदेशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणगाव परिषद शताब्दीनिमित्त व्याख्यानमाला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय प्रजासत्ताक याविषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ व २७ जानेवारी रोजी दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार आहे. समितीचे अध्यक्ष प्रा. विनय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अध्यक्ष प्रा. कांबळे म्हणाले, 'माणगाव परिषदेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने या परिषदेचे महत्त्व व डॉ.आंबेडकर यांचे विचार समाजाला कळावेत यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे.

२६ रोजी भारतीय संविधान व लोकशाही या विषयावर सांगली येथील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. विजय पाटील हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. २७ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील या 'संविधानाचे श्रेष्ठत्व... आजच्या काळाची निकड' या विषयाची मांडणी करणार आहेत.'

पत्रकार परिषदेस प्रा. अशोक चोकाककर, प्रा. ए. बी. कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडकनाथप्रकरणी शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यभर चर्चेत असलेल्या इस्लामपूरच्या रयत अ‍ॅग्रोच्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून १८ जानेवारी रोजी विष प्यायलेल्या प्रमोद सर्जेराव जमदाडे (२५, रा. मसूद माले, ता. पन्हाळा) या तरुण शेतकऱ्याचा सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्देवी मृत्यू झाला. कडकनाथ फसवणूक प्रकरणात जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद जमदाडे याने मसूद माले येथे किराणा बझार सुरु केला होता. त्यानंतर कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाची माहिती घेतली. त्याने वर्षभरापूर्वी 'कडकनाथ' कोंबडी पालन व्यवसायासाठी अडीच लाख रुपये भरले होते. त्यासाठी गावात शेड उभारुन अन्य सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. मात्र याप्रकरणी आर्थिक घोटाळा झाल्याने त्याचे नुकसान झाले होते. व्यवसायासाठी त्याने कर्ज काढले होते, मात्र फसवणूक झाल्याने त्याला नैराश्य आले. त्यातूनच १८ जानेवारी रोजी त्याने विष प्राशन केले. त्याला नातेवाईकांनी सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र त्याचा उपचार सुरु असताना मंगळवारी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जमदाडे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सीपीआर पोलिस चौकी आणि कोडोली पोलिस ठाण्यात विष प्राशनाने मृत्यू अशी नोंद झाली आहे. दरम्यान, कडकनाथ घोटाळ्यातील जमदाडे हा पहिला बळी ठरला. या घटनेमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे. या घोटाळ्याच्या विरोधात कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा तपास सुरु असला तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.

...

सागर खोतवर गुन्हा दाखल करा

'कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याप्रकरणी शेतकरी प्रमोद जमदाडे यांच्या आत्महत्येस माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा जबाबदार आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा', अशी मागणी कडकनाथ संघर्ष समितीचे विजय आमते यांनी केली. या संदर्भातील निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...

माजी मंत्री खोत यांनी भूमिका स्पष्ट करावी

'माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरच्या रयत अ‍ॅग्रोच्या कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाशी आपला काय संबध आहे, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जमदाडे कुटुंबियांना न्याय द्यावा', अशी मागणी मृत प्रमोदच्या आई-वडिलांनी केली आहे.

....

नेटके संघटन

जमदाडे यांनी पन्हाळा तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना एकत्र करुन चांगले संघटन केले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते.

...

घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून

'कडकनाथ' कोंबडी पालन व्यवसायप्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची सुमारे तीन कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयित सुधीर मोहिते, संदीप मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व इतर संचालकांवर गुन्हा दाखल आहे. संशयित मोहिते याने कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरात कार्यालय सुरू केले होते. तेथून जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर संपर्क साधून कोंबडीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

...

कोट

'कडकनाथ प्रकरणातील घोटाळ्यामुळेच शेतकऱ्याचा मुलगा प्रमोद जमदाडे याला आत्महत्या करावी लागली. या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरत आहेत. संशयित सागर खोत याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या पाहिजेत.

राजू शेट्टी, माजी खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराव दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ निवडणुकीसाठी मंगळवारी ३४४१ ठराव दाखल झाले आहेत. आज, बुधवारी (ता.२२) ठराव दाखल करण्याचा अंतिम दिवस असून २१८ ठराव येणे बाकी आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी ३६५९ मतदार असून दूध संस्थांनी मतदानासाठी ठराव दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांनी गठ्ठ्यांनी ठराव दाखल करत शक्तीप्रदर्शन केले. सोमवारी १९६४ तर मंगळवारी १२९१ ठराव दाखल झाले. सत्ताधारी आणि विरोधी गटांनी दोन हजारपेक्षा जास्त ठराव दाखल केल्याचा दावा आहे. पण संस्थांनी एकच ठराव झेरॉक्स काढून नेत्यांना दिल्याने ठरावांची संख्या वाढली आहे. ठराव दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर ठरावांची छाननी होणार आहे. दुबार ठराव दाखल करणाऱ्या संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असून सुनावणीनंतर अंतिम निर्णय सहाय्यक दुग्ध उपनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख घेणार आहेत.

.....

दाखल झालेल्या ठरावांची संख्या

तालुका सोमवारी मंगळवार एकूण

आजरा १८८ ४० २२८

करवीर ४०३ २०५ ६०८

कागल २३५ १५२ ३८७

गगनबावडा २९ ४८ ७७

गडहिंग्लज १९४ ७१ २६५

चंदगड २६७ ५४ ३२१

पन्हाळा २०२ १३० ३३२

भुदरगड १८ २५० २६८

राधानगरी २३५ २११ ४४६

शाहूवाडी १९० ९४ २८४

शिरोळ १०४ २७ १३१

हातकणंगले ८५ ०९ ९४

एकूण २१५० १२९१ ३४४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक सरकारकडून दडपशाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा म्हणजे पाकिस्तानची सीमा नाही. कर्नाटक पोलिसांनी हातात दुडंका घेऊन साहित्यिकांना अडविण्याचा केलेला हिटलरशाही शोभनीय आहे. सीमाभागातील मराठी बांधव मुस्कटदाबीचा अनुभव घेत आहेत अशी प्रतिक्रीया उमटत आहेत. या दडपशाहीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे विविध राजकीय पक्ष, संघटनांनी सांगितले.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनावेळी बेळगावात मराठी भाषिकांवर लाठीमार, साहित्य संमेलनात सहभागाला महाराष्ट्राच्या साहित्यिकांना बंदी, महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या सायकल रॅलीवर लाठीमार अशा घटना घडल्या आहेत. यांतून कर्नाटक सरकार सीमाभागातील नागरिकांवर दडपशाही करीत आहे असे साहित्यिकांनी सांगितले. सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर १७ जानेवारी रोजी बेळगाव येथे गेले होते. कर्नाटक पोलिसांनी मंत्री पाटील यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास अटकाव करत ताब्यात घेतले. त्यांना धक्काबुक्की झाल्याचे समजताच जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी रास्ता रोकोसह कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस रोखण्याचा प्रयत्न झाला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद पुन्हा तापला आहे. बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे तेथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेली काही वर्षे बेळगावची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा १०५ नागरिकांच्या हौतात्म्याने यशस्वी झाला. मात्र, निपाणी, कारवार बेळगाव हा सीमा वाद अजूनही तसाच आहे. हा प्रदेश केंद्रशासित करून बेळगावच्या २० लाख लोकांचा प्रश्न सोडवा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने यापूर्वी केली होती. मात्र यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचे एकमत झाले नाही. सीमाभागात आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. ३१ सप्टेंबर २०१८ रोजी सायकल रॅलीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला होता.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन बेळगाव पोलिस प्रशासनाने इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. बेळगावसह इतर मराठी भाषिक भूभाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे 'काळा दिन' पाळण्यात आला.

सीमाभागातील वीस लाख मराठी लोकांच्या भावना कर्नाटक सरकार समजावून घेत नाही. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, मात्र त्यावर कर्नाटक सरकारने आघात केला आहे. राज्याच्या सीमेवर दूधगंगा नदी पात्राजवळ आम्ही या सरकारचा श्राद्ध घालून निषेध केला आहे. भविष्यात आणखी आक्रमक भूमिका घेतली जाईल.

- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख (ग्रामीण)

सीभावासियांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. केंद्र सरकारने कर्नाटक सरकारवर संविधानचे मारेकरी म्हणून गुन्हा दाखल करावा. सीमाभागातील काही गावे आजही दहशतीखाली आहेत.

- आर. के. पोवार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कर्नाटक सरकारचे डोके फिरले आहे. कर्नाटक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. सातत्याने महाराष्ट्रावर दडपशाही केली जात आहे. हे खपवून घेणार नाही. तली जाणार नाही.

- वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, मराठा महासंघ

सीमाभाग महाराष्ट्रात सामील होत नाही, तोपर्यंत लढ्याची ज्योत विझणार नाही. कर्नाटकी मुस्कटदाबीविरोधात एकोप्याने लढा दिला जाणार आहे. साहित्य संमेलनात मराठी भाषिक कोणालाही गोळ्या घालण्याची मागणी करत नाही. तरीही दंडुकेशाहीच्या जोरावर सीमाभागातील मराठी माणसांचा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- दीपक दळवी, अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यड्रावकर शिवबंधनात, शेट्टी,उल्हास पाटील चक्रव्यूहात

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर

निवडून येताच शिवसेनेला तातडीने दिलेल्या पाठिंब्याचे बक्षीस म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकरांना राज्यमंत्रीपदाचे बक्षिस दिले, त्यानंतर त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. पण या दोन घडामोडींनी तालुक्यातील राष्ट्रवादीला तर दणका बसलाच, शिवाय माजी आमदार उल्हास पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना नवे आव्हान ठरणाऱ्या या घडामोडीत काँग्रेस मात्र अडगळीत पडणार आहे. सत्तेची पोळी खाण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या अनेकांची मोठी अडचण झाली आहे.

शिरोळ तालुक्यात अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष बळकट होता. त्यानंतर तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला बालेकिल्ला तयार केला. पाच वर्षांपूर्वी उल्हास पाटील आमदार झाल्याने शिवसेनेचेही अस्तित्व तयार झाले. जिल्ह्यातील या एकमेव तालुक्यात सर्व पक्षाची ताकद चांगली होती. विधानसभेला सर्वच पक्षांकडे ताकदीचे उमेदवार होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील, शिवसेनेकडे उल्हास पाटील, स्वाभिमानीकडे सावकर मादनाईक, भाजपचे अनिल यादव, माधवराव घाटगे आणि काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचा समावेश होता. पण महायुती आणि आघाडी झाल्याने अनेकांची अडचण झाली. मादनाईक व पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने इतरांनी बंडखोरी केली. यातून यड्रावकरांना संधी मिळाली व ते आमदार झाले.

राज्यात महाविकास आघाडी होत असतानाच यड्रावकरांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. अर्थात हे करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घेतला. सेनेने त्यांना राज्यमंत्री केले. हे करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले. यामुळे ते आता अधिकृत शिवसैनिक झाले. या घडामोडीने मात्र राष्ट्रवादीसह अनेक नेत्यांची देखील अडचण झाली आहे. शिरोळ तालुक्यात यड्रावकरांची ताकद आहे. याच जोरावर ते आमदार झाले. आता सेनेचे मंत्री झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांचा दावा असेल. शिवाय मंत्री असल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील सेनेवर त्यांचा वरचष्मा राहील. सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती असल्याने तालुक्यात त्यांचा गट अधिक प्रबळ होईल यात शंका नाही. यामुळे एकीकडे शिवसेना प्रबळ होताना उल्हास पाटील मात्र बाजूला फेकले जाण्याची शक्यता आहे.

यड्रावकर हीच तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद होती. माजी खासदार निवेदिता माने, खासदार धैर्यशील माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, अशोकराव माने, धनाजीराव देसाई, रामचंद्र डांगे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. यामुळे यड्रावकर म्हणजेच राष्ट्रवादी असे समीकरण तयार झाले. पण तेच आता सेनेत गेल्याने या पक्षाची मोठी अडचण झाली आहे. तालुक्यात आता पक्षाला ना नेता आहे ना कार्यकर्ते. यामुळे या पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. कारण पक्षाच्या तंबूचा मूळ खांब आता राहिला नाही. राज्यमंत्री करण्यात पवारांचा निश्चितच वाटा आहे. पण आता ते शिवबंधनात अडकल्याने राष्ट्रवादीचे काम करणार नाहीत. यामुळे पक्ष वाढणार नाही हे निश्चित असले तरी किमान टिकण्यासाठी आता काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत.

महाआघाडीत सहभागी झालेले स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत हालचाली सुरू होत्या. पण ती केवळ चर्चाच राहिली. उलट त्यांचे विरोधक असलेल्या नेत्याला मंत्रिपद देऊन ताकद दिली. यामुळे शेट्टी सत्तेत असले तरी त्यांना राज्यमंत्र्यांना सोबत घेऊन विकासाची कामे करावी लागणार आहेत. स्वाभिमानी संघटना राज्यमंत्र्यांचा पारंपारिक विरोधक असल्याने ते संघटनेची ताकद वाढू नये यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. यातून दोघात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. या सर्व लढाईत काँग्रेसची मोठी अडचण होणार आहे. गणपतराव पाटील आक्रमक नसल्याने आहे तो गट टिकवून ठेवण्याचाच त्यांचा प्रयत्न राहील. तो पक्ष वाढण्यासाठी फारसे प्रयत्न होण्याची शक्यता कमी आहे.

...

चौकट

भाजप आणि नेत्यांची अडचण

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शिरोळ तालुक्यातील अनेकांनी या पक्षाची वाट धरली. अशोकराव माने, देसाई, निंबाळकर, अनिल यादव, माधवराव घाटगे अशा अनेकांनी हातात 'कमळ' घेतले. पण आता पक्षाची सत्ता तर गेलीच, शिवाय ज्यांना सोडून ते गेले तेच आता सत्तेवर आले आहेत. तीन विरोधक सत्तेवर असल्याने भाजपची आणि या नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. यादव वगळता इतरांना काहीच मिळाले नाही, आता तातडीने मिळण्याची आशा देखील नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर.डी. पाटील करणार भाजपला रामराम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता असताना आणि नंतरही जिल्ह्यातील पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नसल्याचा आरोप करत पक्षातील अनेकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी या असंतोषाला तोंड फोडले असून लवकरच मेळावा घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

भाजपमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना राज्यात सत्ता असताना पदांची अपेक्षा होती. पण पदे मिळाली नाहीत. त्यांना प्रत्येकवेळी डावलले गेले. त्यामुळे ते नाराज होते. यामध्ये माजी नगररसेवक आर. डी. पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. महानगर अध्यक्षपदासाठी ते इच्छूक होते. पण त्यांना संधी न दिल्याने त्यांनी असंतोषाला तोंड फोडले आहे. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असून निर्णय घेण्यासाठी लवकरच त्यांनी गटाची बैठक बोलावली आहे.

आर.डी. हे पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले पहिले नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे सभापती होतानाच ते पाच वेळा नगरसेवक झाले. त्यांना महानगरअध्यक्ष, महामंडळ अथवा विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. निवडणुकीच्या तोंडावर कृष्णा खोरे महामंडळावर त्यांची नियुक्ती झाली, पण अधिकृत मान्यताच मिळाली नाही. एका ठराविक गटालाच पक्षाच्या नेत्याकडून प्रत्येक ठिकाणी संधी दिली जात असल्याचा आरोप सध्या पक्षात सुरू आहे. महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील याचीच पुनरावृत्ती झाल्याने पक्षातील नाराजी वाढली आहे. यातून अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. याची सुरूवात पाटील यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोरे, आबिटकर, नरके, के.पीं. कडून स्वतंत्र ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्ताधारी आणि विरोधकांकडून अंदाजे दोन हजारपेक्षा जास्त ठराव गोळा केले असा दावा असताना आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील, चंद्रदीप नरके यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल केले. विधानसभा मतदार आणि तालुक्यातील राजकारण लक्षात घेऊन भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी रमणमळा ड्रीमवर्ल्ड येथे विरोधी महाविकास आघाडीने मेळावा घेतला. मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या गटाने स्वतंत्र्यरित्या १५९ ठराव दाखल केले. शिवसेनेची विभागणी सत्ताधारी आणि विरोधी गटात झाली आहे. सोमवारी माजी आमदार सत्यजीत पाटील आणि गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांनी आमदार पी.एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्याकडे ठराव दिले. मंगळवारी विरोधी आघाडीच्या मेळाव्यात परिवर्तनाचा नारा देणाऱ्या प्रा. संजय मंडलिक यांनीही त्यांच्या गटाचे स्वतंत्र १०० ठराव दाखल केले. तसेच दुपारी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी १५० ठराव दाखल केले. नरके यांचे चुलते अरुण नरके यांनी सत्ताधारी आघाडीकडे ठराव दिले आहेत.

आमदार विनय कोरे यांच्या गटाने पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील १४२ ठराव दाखल केले. कोरे गटाचे करणसिंह गायकवाड विरोधी गटाच्या मेळाव्याला उपस्थित होते. राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून प्रकाश आबिटकर यांनी २५२ यांनी ठराव दाखल केले. या तालुक्यातील सचिन घोरपडे यांनी आपल्याकडील ७५ ठराव महाविकास आघाडीकडे दिले.

...

कोट

'गोकुळच्या निवडणुकीत आम्ही यापूर्वी कधीच तयारी केली नव्हती. पण यंदा आम्ही २५२ ठराव जमा केले आहेत. विधानसभा आणि तालुक्याचे राजकारण लक्षात घेऊन आमची भूमिका ठरवणार आहोत.

प्रकाश आबिटकर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएन यांच्याशी चर्चा करुन गोकुळ, केडीसीबाबत निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार पी.एन. पाटील यांच्याशी अद्याप चर्चा झाली नसली तरी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले आहे,' असे पत्रक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पी.एन. पाटील यांनी गोकुळबाबत केलेले वक्तव्य अर्धसत्य आहे. दूध संघ मल्टिस्टेट करण्याप्रश्नी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उमटले. २०१४ नंतर आघाडीची सत्ता गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये आपसातील कुरघोडीमुळे दोन्ही काँग्रेसचे नुकसान झाले. ते टाळणे अतिशय गरजेचे आहे, यावर आमचे एकमत होऊन गोकुळ, जिल्हा बँक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे प्रत्यंतर दिले. गोकुळ मल्टिस्टेटचा विषय रद्द करावा, अशी विनंती पी.एन. यांना केली होती. त्यानंतर मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याचे पी. एन. यांनी जाहीर केले. याशिवाय गोकुळच्या कारभाराबाबत माझी चर्चा झाली नव्हती. गाड्यांच्या बाबतीत मी कधीच संचालकांना सूचना केल्या नव्हत्या. तो प्रस्तावही माझा नव्हता.

गोकुळच्या एकंदरीत सर्वच कारभाराबाबत माझे वेगळे मत आहे. त्याबाबत पी.एन यांच्याबरोबर चर्चा होईल. त्यावेळी कारभाराबाबत माझे मत मांडेन. मागील निवडणुकीमध्ये पैरा फेडण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाने सत्तारुढ गटाला सहकार्य केले, परंतु त्याची जाणीव आणि किंमत नेत्यांना (आमदार पी एन पाटील नव्हेत) राहिली नाही. अनेकवेळा त्यांनी अपमानित करण्याचे काम केले गेले. गोकुळ दूध संघ सभासद व दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे. त्यांना त्यांच्या कष्टाचा, हक्काचा व घामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराव दाखल करण्याची आज अंतिम मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर मंगळवारी विरोधकांनी दोन हजारपेक्षा जास्त ठराव गोळा करुन आपली ताकद दाखवली. आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, के.पी. पाटील यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल करत 'बार्गेनिंग पॉवर' दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. आजअखेर ३४४१ ठराव दाखल केले असून बुधवारी ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी ठराव गोळा करण्यासाठी कंबर कसली होती. सोमवारी (ता.२०) सत्ताधारी पॅनेलमधील माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव मुलगा शशिकांत यांनी बंड करत सवतासुभा मांडला. त्यामुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ उडाली आहे. सत्तारुढ आघाडीने २२०० हून अधिक ठराव दाखल करण्याचा दावा केला आहे.

सत्तारुढ गटाला तोडीस तोड आव्हान देत विरोधी आघाडीने मंगळवारी रमणमळा येथील ड्रीमवर्ल्ड येथे मेळावा घेऊन २४०० ठराव गोळा केल्याचा दावा केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर गोकुळमध्ये परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे, अशी घोषणा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केली. खासदार मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांनी सहाय्यक दुग्ध उपनिबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. ठराव दाखल करण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनानंतरही सत्तारुढ आघाडीने मंगळवारी १५० ठराव दाखल केले आहे. दोन्ही गटांनी २२०० पेक्षा जास्त ठराव दाखल करण्याचा दावा केला असला तरी एकाच संस्थेने नेते आणि संचालकांकडे ठराव दिले असल्याने प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी गणित चुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू चौक पार्किंगप्रश्नी आयुक्तांकडून झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी प्रशासनाकडून चालवलेल्या जात असलेल्या बिंदू चौक पार्किंगप्रश्नी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. पार्किंगस्थळाची स्वत: पाहणी करत मंगळवारी नव्याने नियुक्त झालेल्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली. तसेच पार्किंग ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर गतिमान झाल्या आहेत. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक दिवाकर कारंडे यांनीही पार्किंगस्थळाला भेट दिली होती.

केएमटी प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा वारंवार चव्हाट्यावर येत आहे. गेल्या आठवड्यात चालक-वाहकांनी केलेल्या ऑन ड्युटी पार्टीची चर्चा शमते न शमते तोच बिंदू चौकमधील पार्किंग शुल्कवर मारण्यात येत असलेल्या डल्ल्याचे प्रकरण समोर आले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये गुरुवारी (ता. १६) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचारी आणि एका पक्षाचे कार्यकर्ते सामुदायिकपणे डल्ला मारत असलेल्या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या दरम्यान राजर्षी शाहू महाराज समाधीस्मारक लोकोत्सव सुरू असताना त्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना केल्या.

तत्पूर्वी केएमटीचा कार्यभार स्वीकारलेल्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक दिवाकर कारंडे यांनी पार्किंगस्थळाची पाहणी केली. त्यांनी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांच्यासह पार्किंगस्थळी भेट दिली. दरम्यान, सोमवारी अतिरिक्त परिवहन आयुक्त म्हणून मोटार वाहन निरीक्षक जाधव यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी दिवसभर केएमटी अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी बिंदू चौक पार्किंगस्थळाची पाहणी केली. त्यांनी पार्किंग शुल्क आकारणीसाठी असलेल्या मशिनची तपासणी करत ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. मंगळवारी सकाळी त्यांनी आयुक्तांची महापालिकेच्या ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी बिंदू चौक पार्किंगबाबत आढावा घेतला.

त्याचबरोबर पार्किंगचा ठेका देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. यापूर्वी विविध कारणाने तीनवेळा निविदा प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दाखल झालेल्या निविदेच्या तांत्रिक बाजू तपासण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेकेदाराच्या सर्व बाजू तपासल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

...

चौकट

'पार्टी' प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

१२ जानेवारी रोजी ड्युटीवरील ४० वाहकांनी दुर्गमानवड येथे जंगी पार्टी केली होती. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पार्टीमध्ये सहभागी असलेल्या चालक-वाहकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासाही येत आहे. पण तत्पूर्वी कर्मचाऱ्यांवरील हे बालंट दूर करण्यासाठी कर्मचारी संघातील एक पदाधिकारी सरसावला आहे. प्रकरण नोटिशीपुरते मर्यादित ठेवून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ- सतेज पाटील गट एकत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीच्या विरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ बांधण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी झालेल्या मेळाव्याला काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ गट सतेज पाटील गटासोबत राहणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मेळाव्याला मुश्रीफ आणि सतेज पाटील मुंबईत असल्याने हजर राहू शकले नाही. पण दोन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. मुश्रीफ गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, भैय्या माने, नाविद मुश्रीफ तर सतेज पाटील गटाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images