Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हाध्यक्षपदी चिकोडे, घाटगे?

$
0
0

फोटो : राहुल चिकोडे, समरजित घाटगे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असून १३ ते १४ जानेवारीपर्यंत नवे पदाधिकारी निवडले जाण्याची शक्यता आहे. महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी समरजित घाटगे यांची नावे निश्चित झाली आहेत.

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने राज्यात पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची निवडणूक प्रक्रिया समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. ३१ डिसेंबरपूर्वी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली होती. पण राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपद निवड आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे हा कार्यक्रम एक महिना पुढे ढकलण्यात आला.

जिल्ह्यातील बूथ प्रमुखांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील सात आणि ग्रामीण भागातील १४ मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया आज सोमवारपासून सुरू झाली. महानगर अध्यक्षपदी प्रभारी राहुल चिकोडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, अॅड संपतराव पवार, गणेश देसाई यांनी तर ग्रामीण अध्यक्षपदी सध्या हिंदूराव शेळके असून अनेक पदाधिकाऱ्यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. ही सर्व नावे राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीपुढे पाठवण्यात आली. विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवड प्रक्रियेचे अध्यक्ष माजी आमदार हळवणकर आणि राज्यातील २२ उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यभरातील महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे यांना कायम ठेवून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नाव निश्चित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्हाला पोकळ धमक्या देऊ नका : देवेंद्र फडणवीस

$
0
0

पंढरपूर : राज्यात सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर फडणवीस सरकार काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याच्या घोषणा सत्ताधारी नेत्यांकडून होत असताना आम्हाला पोकळ धमक्या देऊ नका हवी ती चौकशी करा असे उत्तर आज देवेंद्र फडणवीस यांनी अकलुज येथे दिले .

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी ,यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू अशा केलेल्या वक्तव्याना आज फडणवीस यांनी चोख उत्तर दिले . 'आम्ही कसल्या ही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा पारदर्शी कारभार माहीत आहे .कोणाला काही ही चौकशी करायची असतील ती करावी' असे फडणवीस यानी सांगितले .
वाचा: तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री मीच; फडणवीसांची बॅटिंग
आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही .कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत मात्र हे सरकार सुडबुद्धीने काम करीत असल्याचा टोला लगावला .
ते अकलूज मध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजीत निंबाळकर , हर्षवर्धन पाटील, विजयसिह मोहित पाटील ,रंजितसिह मोहिते पाटील उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी अजित पवारांवर कारवाई करा, राष्ट्रवादीला घरचा आहेर

$
0
0

पंढरपूर

सोलापुरात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील सहा सदस्यांवर भाजपला मतदान केल्याने निलंबनाची कारवाई केली. पण या निलंबनानंतर मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाला आहे. 'आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांचं निलंबन करा', असं म्हणत जयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

अजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय: फडणवीस

'राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?' असे सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

बारामतीकरांच्या जंगी स्वागताने भारावलो: अजित पवार

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयसिंह मोहिते पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजपला मतदान केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील आणि मंगल वाघमोडे अशी कारवाई करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यावर धमाल हॅपी स्ट्रीट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या साक्षीने रविवारची सकाळ कोल्हापूरकरांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल अनुभवायला मिळाली. चित्रकारांच्या ब्रशमधून कॅनव्हासवर झरझर उतरणारा रंकाळ्याचा परिसर, क्षमतेचे प्रदर्शन करणारी रस्सीखेच, दोरीउड्या अशा पारंपरिक खेळात रंगलेली कुटुंबे, डेअर अँड ट्रूथ, बॅटमिंटन, सेल्फी पॉइंट, हिप हॉप डान्स अशी विविधता अनुभवता आली. पारंपरिक खेळांचा सहकुटुंब आनंद कोल्हापूरकरांनी लुटला. बालपणातील हरवलेले खेळांपासून ते कलागुणांचा आविष्कार यातून आनंदाला उधाण आले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या दुसऱ्या हॅपी स्ट्रीटची धमाल रंकाळा पदपथावर होती. स्ट्रीटवर आणि पदपथ उद्यानावर झालेल्या कार्यक्रमात तरुणाई जल्लोषात सहभागी झाली. जुन्या आणि नव्या गोष्टींचा संगम असलेल्या हॅपी स्ट्रीटच्या व्यासपीठावर हजारो कोल्हापूरकरांनी हजेरी लावली. झोंबणाऱ्या वाऱ्याच्या साथीने लक्षवेधी झालेल्या नृत्याने अनेकांची मने जिंकली. आल्हाददायी वातावरणामध्ये स्टेजवर हौशी कलाकारांचे दिलखेचक नृत्य, पारंपारिक खेळ, अनेकांनी हॅपी संडेचा मनमुराद आनंद लुटला. कलाकारांच्या कलाविष्कारालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. सुमारे साडेतीन तास हा कार्यक्रम रंगला. चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती, कॅलिग्राफीतून उमटलेली वळणदार अक्षरे पाहताना कलाकारांना उत्स्फूर्त दाद मिळाली. नागरिकांनी 'प्लास्टिक हटाव'ची शपथ घेत स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूरची ग्वाही दिली. फुटबॉलमधील ड्रिब्लिंगसह विविध क्रीडा प्रकारांत उत्साहाने तरुणाई सहभागी झाली.

तत्पूर्वी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच शहरवासिय सहकुटुंब कार्यक्रमस्थळी दाखल झाले. उबदार स्वेटर अंगावर चढवून कोल्हापुरातील कानाकोपऱ्यातील कुटुंबीयांची पावले रंकाळा रोडवर वळली. पदपथावर नृत्य, गाणी, खेळ, साहसी प्रात्यक्षिके, जुने खेळ, विविधांगी कलागुण दर्शनासाठी रसिकांचा मेळा जमला.

कुटुंबातील लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकाच्या आवडी आणि छंदांना प्रोत्साहन देणारे हॅपी स्ट्रीट ठरले. आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांत जगण्याचा आनंदी मार्ग दाखविणारा हॅपी फॅमिलीच्या जल्लोषाचा संडे ठरला. थंडीपासून बचाव करण्यासाठी मफलर, स्वेटर, कानटोपी आदी घालून तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक आले होते. कॅलिग्राफीतून वळणदार अक्षरांचा नमुना सादर करताना टॅटू पेटिंगचा नजराणा आणि सेल्फी बूथमध्ये डोरेमॉन, मिकी माऊस हे बच्चे कंपनीचे आकर्षण ठरले. सोसायटी ऑफ अॅनस्थेशियालॉजिस्ट कोल्हापूरने 'सीपीआर'ची माहिती दिली. व्हाइट आर्मीच्या जवानांच्या साथीने अनेकांनी आपत्ती निवारणाचे धडे गिरवले. ज्येष्ठ चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून एकाहून एक सरस कलाकृती सादर करत उपस्थितांना थक्क केले. रस्त्यावर अशी फुल्ल टू धमाल चालू असताना रंकाळा पदपथावरील बागेतील स्टेजवर अनेकांना आपला कलाविष्कार सादरीकरणाची संधी मिळाली. दरम्यान, झेस्ट फॅमिलीच्या माध्यमातून अनेकांची फिटनेस ग्रोथ टेस्ट घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्यावतीने अभिवादन

$
0
0

फोटो आहे.

कोल्हापूर

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, शेखर कुसाळे, अशोक जाधव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत नागावकर, राजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, किशोर घाडगे, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, धनाजी आमते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बंडा साळोखे, प्रभावती इनामदार तसेच शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व राजमाता तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंतीदिनी जिजाऊंचा जयजयकार

$
0
0

फोटो आजच्या तारखेला फोल्डरला आहे.

................

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिजाऊ वंदन, व्याख्यान, पोवाडे आणि पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांद्वारे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. बिंदू चौक येथे आयोजित कार्यक्रमात महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी 'समाजातील स्त्री शक्तीचा आदर आणि त्यांना पाठबळ देवून समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना नावारुपाला आणावे. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून पुढची पिढी आदर्श घडू शकेल,'असे आवाहन केले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रविवारी दिवसभर राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयजयकार झाला.

संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा व जिजाऊ जन्मोत्सव कमिटीतर्फे जयंती उत्साहात साजरी झाली. जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महापौर सूरमंजिरी लाटकर व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील यांनी प्रास्ताविकात जिजाऊ यांच्या कार्याची महती सांगितली. याप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कुरुकली येथील श्रीमती भागिरथी पाटील व निर्भया प्रथकातील पोलिस उपनिरीक्षक विभावरी रेळेकर यांना 'राजमाता जिजाऊ'पुरस्कार देऊन सन्मानित केले. रेळेकर यांच्यावतीने त्यांच्या प्रतिनिधींनी सत्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, पुस्तक असे सत्काराचे स्वरुप आहे.

यावेळी रिक्षाचालक साताप्पा कांबळे यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाबा महाडिक, स्वाभिमानी शेतकरी संघटेचे वैभव कांबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवाजी खोत, शहराध्यक्ष चेतन पाटील, कादर मलबारी, अनिल म्हमाणे, मोहन गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अतुल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.

...

राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू

'राजमाता जिजाऊ यांनी राज्याला दोन छत्रपती दिले. त्यांच्या राज्यात महिलांना विशेष सन्मान होता. त्याच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरू आहेत,'असे प्रतिपादन मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले यांनी केले. मराठा महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला आघाडीच्या जिल्हा सचिव दीपा डोणे व तेजस्विनी नलवडे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी संयोगिता देसाई, मेघा मुळीक, संजीवनी चौगुले, भारती पाटील, नेहा मुळीक, सोनाली जाधव उपस्थित होते.

...

जिजाऊ फाऊंडेशनतर्फे 'वॉकथॉन'

जिजाऊ फाऊंडेशनतर्फे आयोजित 'वॉकथॉन २०२०'चा प्राारंभ रविवारी सकाळी रंकाळा चौपाटी येथे झाला. महापौर सूरमंजिरी लाटकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, साक्षी पन्हाळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

.....

दोन जोड आहेत...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओंचा रस्ता सुरक्षा सप्ताह आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी (ता. १३) खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित राहणार आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. रस्ता सुरक्षा रथ म्हणून दालमिया ग्रुपची आधुनिक बस, ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाहतूक नियमांच्या माहिती पत्रकाचे वाटप, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, आरोग्य तपासणी, प्रथमोपचार आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १७) धैर्यप्रसाद हॉल येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तरुणांनी सत्याच्या बाजूनी उभे राहावे'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'तरुणांनी चळवळीत सहभागी होणे ही काळाची गरज बनली आहे. आपण सत्तेच्या बाजूनी नव्हे तर सत्याच्या बाजूंनी उभे राहिले पाहिजे. वर्तमानाला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहण्याची क्षमता हवी,' असे मत हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'राज्यशास्त्रातील समकालीन समस्या'या चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने, महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३७ वे संयुक्त अधिवेशन घेण्यात आले. वि. स. खांडेकर भाषा भवन येथे चर्चासत्र झाले. नायकवडी म्हणाले, 'आज राज्यासमोर व राष्ट्रासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या घटना नागरिकांशी निगडीत आहेत. त्या प्रश्नांचा नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा वर्तमान राजकारणांशी जवळचा संबंध आहे. यामुळे वर्तमानाला सत्याच्या बाजूने तपासून पाहिले पाहिजे.' परिषदेच्या समोरापाला ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा बी. बी. पाटील, डॉ. भालबा विभूते, प्राचार्य प्रमोद पवार, डॉ. विलास आवारी, प्राचार्य मनोहर पाटील, प्राचार्य पी. डी. देवरे, डॉ. भारती पाटील आदी व्यासपीठावर होत्या. प्राचार्य डॉ. सिकंदर जमादार यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. ३८ व्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र भणगे महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३८ वे अधिवेशन जवाहरलाल नेहरू कॉलेज औरंगाबाद येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या संमेलनाध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवेंद्र फडणवीसांनी केला शतचंडी यज्ञ

$
0
0

पंढरपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वेळापूर येथील पुरातन अर्धनारीनटेश्वर मंदिरात शतचंडी महायज्ञ केला. अकलूज दौऱ्यावर आलेले फडणवीस वाकडी वाट करून या पांडवकालीन मंदिरात दाखल झाले. या यज्ञाची जय्यत तयारी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर व सूर्यकांत भिसे यांनी केली होती. यज्ञासाठी पंढरपूर येथून अकरा पुरोहीत आले होते. सकाळी साडेनऊ वाजता वेदमूर्ती संजय ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाला प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात येऊन यज्ञात सहभाग घेऊन संकल्प सोडला. या नंतर दुर्गामातेची विधिवत पूजा करून यज्ञाचे षोड्शोपचार पूर्ण केले. हा यज्ञ विश्वकल्याणासाठी केल्याचे सांगण्यात आले असले तरी, या यज्ञामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा संकेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वार्थ हाच आघाडीचा किमान समान कार्यक्रम

$
0
0

अकलूजच्या शेतकरी मेळाव्यात फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचा स्वार्थ हाच एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांसाठी, गोर-गरिबांसाठी किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे नाही. केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच ते एकत्र आले आहेत,' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकलूजमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, 'आम्हाला शेतीतील काय कळते, असे म्हणणाऱ्यांच्या काळात अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत, बंद पडले आहेत. आम्ही पाच वर्षे एफआरपी वेळेत देण्याचे काम केले. यांनी दिलेली कर्जमाफी फसवी असून, कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जलयुक्त शिवारची कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ऐवजी एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा, असा पवित्रा घेतला आहे.' या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोकळ धमक्या देऊ नको, हवी ती चौकशी करा

$
0
0

पोकळ धमक्या देऊ नको, हवी ती चौकशी करा

पंढरपूर

'राज्यातील सत्ताधारी आमच्या सरकार काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याच्या घोषणा करीत आहेत. आम्हाला पोकळ धमक्या देऊ नका, हवी ती चौकशी करा,' असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी अकलूज येथे बोलताना दिले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार राजू शेट्टी, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यांना रविवारी फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिले. अकलूजमध्ये शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, 'आम्ही कसल्या ही धमक्यांना घाबरत नाही, जनतेला आमचा पारदर्शी कारभार माहीत आहे. कोणाला काही चौकशी करायची असेल तर ती जरूर करावी. आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही. कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत. मात्र, हे सरकार सूडबुद्धीने काम करीत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वार्थ हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

$
0
0

स्वार्थ हाच किमान समान कार्यक्रम

अकलूजच्या शेतकरी मेळाव्यात फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचा स्वार्थ हाच एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांसाठी, गोर-गरिबांसाठी किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे नाही. केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच ते एकत्र आले आहेत,' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकलूजमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, 'आम्हाला शेतीतील काय कळतं? असे म्हणणाऱ्यांच्या काळात अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत, बंद पडले आहेत. आम्ही पाच वर्षे एफआरपी वेळेत देण्याचे काम केले. यांनी दिलेली कर्जमाफी फसवी असून, कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जलयुक्त शिवारची कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, यांनी पाणी आडवा पाणी जिरवा ऐवजी एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा, असा पवित्रा घेतला आहे.'

या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारी शक्तीचा सन्मान समाजाला प्रेरणादायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या महिलांचा केलेला सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल,' असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व उद्योजक नितीन वाडीकर यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंडळातर्फे 'नारीशक्ती तुझे सलाम' या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. समाजातील विविध क्षेत्रात सक्रिय दहा महिलांचा सत्कार करण्यात आला होता. मानचिन्ह व साडी देऊन सन्मान झाला. हुतात्मा गार्डन येथे रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला.

महापौर सूरमंजिरी लाटकर, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचन परुळेकर, डॉ. उज्ज्वला पत्की, डॉ. आशा शितोळे, उद्योजिका मनीषा वाडीकर, उद्योजिका मुग्धा देशपांडे अकोळकर, जलतरणपटू आभा देशपांडे, चार्टर्ड अकाउंटंट ऋतुजा चौगुले, सामाजिक कार्यकर्त्या कस्तुरी रोकडे यांचा विशेष सन्मान झाला. परुळेकर यांचा सत्कार हा त्यांच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.

दरम्यान 'हा सत्कार सोहळा समाजातील विविध घटकांसाठी आणखी कार्य करण्यासाठी स्फूर्ती देणारा आहे' अशा भावना सत्कारमूर्तीनी व्यक्त केल्या. मंडळाचे अध्यक्ष वाडीकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती सांगितली. तत्पूर्वी शिवशंभू मर्दानी खेळ विकास मंचने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक दाखवली. शाहू गर्जना ढोल पथकातील कलाकारांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. सोनाली पाटील व सहकलाकारांनी गणेश वंदना सादर केली. वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. परीक्षक म्हणून पूर्वा नागेशकर, सविता कुलकर्णी, कोमल बोंगले, पूजा माने यांनी काम पाहिले होते. मंडळातर्फे शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या.मंडळाचे उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाच्या कार्यवाह श्रीमती शालन शेटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला उद्योजक अरविंद कुलकर्णी, माणिक पाटील चुयेकर, संजीव कुलकर्णी, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.

चित्र प्रदर्शन ठरले कुतुहलाचे

मंडळातर्फे शाळकरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी मुलांची चित्रे कार्यक्रमस्थळी मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शिवकाळातील विविध प्रसंग चित्रीत केले होते. उपस्थितांनी मुलांच्या चित्रकलेचे कौतुक केले.

फोटो ओळी...

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळतर्फे आयोजित समारंभात मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील सक्रिय महिलांचा सत्कार झाला. महापौर सूरमंजिरी लाटकर, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, डॉ.उज्ज्वला पत्की, डॉ. आशा शितोळे, उद्योजिका मनिषा वाडीकर, मुग्धा देशपांडे आदींचा सन्मान झाला.

अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा रस्त्यावर प्रवास धोक्याचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळ्याला जाणाऱ्या खचलेल्या रस्त्यावर सध्या दुरुस्तीचे काम चालू असून या रस्त्यावर अतिशय धोकादायक परिस्थितीत वाहतूक सुरू आहे. शैक्षणिक सहलीचा हंगाम असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या बस किल्ल्यावर येत आहेत. पण या चिंचोळ्या मार्गावर समोरासमोर गाड्या येतात, त्यावेळी त्यांना वाट मिळत नाही. अशा स्थितीत थोडी जरी चूक झाली तरी गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज पन्हाळावासीय व्यक्त करीत आहेत.

रविवार असल्यामुळे आज पन्हाळ्यावर पर्यटकांची आणि सहलीच्या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. बुधवार पेठ ते पन्हाळा यांदरम्यानच्या खचलेल्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. हा रस्ता रहदारीसाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच दुपारी चारच्या सुमारास समोरासमोर येणाऱ्या दोन गाड्या अडकल्याने वाहतुकीचा तासभर खोळंबा झाला. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सध्या पन्हाळ्यावर शैक्षणिक सहलीचा हंगाम जोरात असून दररोज ५० हून अधिक बस येत आहेत. यातल्या बहुतांश गाड्या बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी अशा जिल्ह्यांतून येत आहेत. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी अर्ध्या भागात खडीकरणाचे काम चालू आहे. शिवाय एका बाजूला पावसाचे पाणी जाण्यासाठी गटार खोदण्यात आली आहे त्यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे.

पन्हाळ्यावर जाणारी एसटी महामंडळाची बस आणि खाली जाणारी खाजगी बस नाक्यापासून तीनशे मीटरवर येतात. त्यावेळी गाड्या पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूला बस कार आणि दुचाकींची मोठी रांग लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर रस्ता मोकळा झाला.

हा रस्ता तटालगत जात असल्याने खालच्या बाजूला खोल दरी आहे. यामध्ये थोडीजरी चूक झाली तरी गंभीर अपघात होऊ शकतो. रस्त्याचे काम सुरू असताना या मार्गावर बुधवार पेठ ते पन्हाळा अशी एकेरी वाहतूक करून ती वाहतूक थांबवून पुन्हा विरुद्ध बाजूची वाहतूक सुरू करण्याची गरज आहे. मात्र पन्हाळा पोलिसांनी याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या मार्गावर अपघात झाल्यानंतर पोलिस यंत्रणा जागी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिकाऊ रस्त्यासाठी ‘आरबीआय ग्रेड ८१’चा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी या रस्त्याची दुरुस्ती दक्षिण आफ्रिकेतील तंत्रज्ञानानुसार करण्यात येणार आहे. रोल बिल्डिंग इन्फास्ट्रक्चर (आरबीआय ग्रेड ८१) या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या तंत्राने रस्त्याचा टिकाऊपणा वाढणार असून त्यासाठी ठेकेदाराने नवी दिल्लीतून दोन अभियंत्यांना प्राचारण केले आहे. सोमवारी (ता. १३) कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने चार वर्षांपूर्वी केलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरुन नीट वाहन चालवता येत नाही. पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले आहे. याविरोधात जिल्हा वाहनधारक महासंघाने आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळीत मेणबत्या प्रज्वलीत करुन प्रशासनाचा निषेध केला होता. चार वर्षापूर्वी केलेल्या खराब कामाबाबत ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला असतानाच अमृत योजनेतील पिण्याच्या पाइपलाइनमुळेही कामात दिरंगाई झाली. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी २५ लाखांच्या निधीतून नवीन तंत्रज्ञानाद्वारे रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कामासाठी साऊथ आफ्रिका येथे विकसीत केलेल्या 'आरबीआय ग्रेड ८१' तंत्राचा वापर केला जाणार आहे. रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी रस्त्यावर मुरुम व माती टाकून बेस तयार केला जाणार आहे. रोलिंग केल्यानंतर सलग तीन दिवस पाण्याचा फवारा मारला जाईल. मजबूत बेस तयार केल्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेला रस्ता आठ वर्षे मजबूत टिकेल असा दावा प्रशासनाचा आहे. त्यासाठी संगीता कन्स्ट्रक्शनला ठेका देण्यात आला आहे.

नियोजनशून्य कारभाराने

रस्ता दुरुस्तीस उशीर

चप्पल लाइन ते गंगावेशपर्यंतच्या रस्त्यांची अशरक्षा चाळण झाली आहे. रस्त्यावरुन चालणेही मुश्कील बनले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनेही झाली. अमृत योजनेतील पाणीपुरवठ्याची वाहिनी टाकण्यासाठी काम थांबले होते. काम संपल्यानंतर ठेकेदारांना रस्ते कामास सुरुवात करण्याची सूचना केली. त्यानुसार रविवारी सपाटीकरण करण्यात आली. सोमवारी नवीन तंत्रज्ञानानुसार कामाला सुरुवात होणार होती. पण लाइनवरील कनेक्शन जोडून न दिल्याने रविवारी काम थांबवावे लागले. कामाला सुरुवात होणार असल्याने ठेकेदाराने दिल्लीवरुन दोन इंजिनीअर आणले आहेत. तसेच मशिनरीही व कामगार आले होते. पण कनेक्शन जोडलेले नसल्याने त्यांना काम थांबवावे लागले. सोमवारी कामाला मुहूर्त लागण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या भूमीगत लाइन अवघ्या सहा इंचावर असल्याने काम करताना अडथळा निर्माण होत आहे.

फोटो आहे. (छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी पर्यंतच्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे प्रॉपर्टी शोला उंदड प्रतिसाद

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरवासियांना पुणे येथे घर, फ्लॅट खरेदीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केलेल्या पुणे प्रॉपर्टी शोला दोन दिवस उंदड प्रतिसाद मिळाला. आर्थिक मंदीतील गुंतवणूक फायेदशीर ठरण्यासाठी रविवारी प्रॉपर्टी शो मधील बांधकाम प्रकल्प पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. फ्लॅट, रो-बंगलो, बंगलो यासह कमर्शिअल ऑफिसेससाठी सहकुटुंब भेट दिली. तसेच प्रत्यक्ष प्रकल्प पाहण्याचे नियोजनही अनेकांनी केले.

'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' च्यावतीने धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात प्रॉपर्टी शोचे आयोजन केले होते. गुंतवणूकदारांसोबत स्थानिक बांधकाम व्यावसायिक व स्थापत्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीही भेट देवून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. रविवारी प्रॉपर्टी शोचा समारोप झाला.

'पुणे प्रॉपर्टी शो'चे गेल्या चार वर्षांपासून कोल्हापुरात आयोजन केले जात आहे. प्रत्येकवर्षी शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे त्यामध्ये सहभागी होणाऱ्या बांधकाम व्यावसायिक आणि कंपन्यांची संख्या वाढत आहे. दहा व्यावसायिकांच्या १०० प्रकल्पांचे डिस्प्ले लावण्यात आले होते. मुंबई, बेंगळुरुनंतर पुणे शहराचा वेगाने विकास होत आहे. विविध आयटी कंपन्या, कमर्शियल कार्यालये यामुळे रोजगाराबरोबरच गुंतवणुकीची संधी विपुल प्रमाणात निर्माण होत आहेत. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेल्यांना व शहरवासियांना सेंकड होमची पर्वणीच यानिमित्ताने उपलब्ध झाली.

१३ लाखांपासून तब्बल अडीच कोटीपर्यंतचे फ्लॅट, रो-बंगले, बंगलो, कमर्शियल ऑफिसेससाठी शोमधून माहिती मिळाली. रविवारी सुटी असल्याने कोल्हापूरकरांनी सहकुटुंब प्रकल्पांची माहिती घेतली. सुटीमुळे सकाळपासून गुंतवणुकीसाठी इच्छूक असलेल्या गुंतवणूकदारांची गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. पुण्यासारख्या शहरात घर आणि कमर्शियल जागांचे सर्व पर्याय एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने गुंतवणूकदार खूष झाले. विविध प्रकल्पांचे लॅपटॉपवर सादरीकरण केल्यानंतर अनेकांनी पुण्याला भेट देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुढील शनिवार, रविवारी प्रकल्पांना कुटुंबासह भेट देण्याचे नियोजन केले आहे.

प्रॉपर्टी शोच्या माध्यमातून लक्झरी ऑटो पॅव्हेलियनचे आयोजन केले होते. नामांकित कंपन्यांच्या अलिशान कार लक्षवेधी ठरल्या. मर्सिडीज बेंझ, ऑडी, जग्वार या ब्रँडच्या अत्याधुनिक, विविध रंगातील गाड्या प्रदर्शनस्थळी पाहण्याची संधी अनेकांनी घेतली. फ्लॅट, बंगलोसोबत अनेकांनी कार बुकिंगचा आनंद घेतला.

...

कोट

'प्रॉपर्टी शोमध्ये पाच प्रोजक्टची माहिती दिली होती. पुण्यासारख्या शहरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेकजणांनी माहिती घेतली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून बहुतांश कोल्हापूरवासियांनी प्रकल्पांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. प्रॉपर्टी शोच्या माध्यमातून शहरवासियांची गुंतवणुकीतील रुची दिसून आली.

प्रशांत गाडवे, वरिष्ठ व्यवस्थापक, रोहन बिल्डर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल- पैशांसाठी खून

$
0
0

सोलापूर :

मित्राबरोबर बाहेर गेलेल्या शाळकरी मुलाच मोबाइल आणि पैशांसाठी खून झाल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. नान्नज या गावी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी त्याच्या मित्राला तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अमीर अल्ताफ मुजावर (वय १४ रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) असे खून झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. बराच वेळ अमीर घरी न आल्याने आई वडिलांना संशय आल्याने दोघांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अरबाज याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. अरबाज याने अमीरला दीड हजार रुपये उसने दिले होते, ते तो परत करीत नव्हता. मार्डी रोडवरील प्रशांत बचुटे यांच्या शेताजवळ दारू पाजून गळा आवळला व डोक्यात दगड घालून खून केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी वडील अल्ताफ नबीसाब मुजावर (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत समुद्री प्रदूषण नियंत्रण हब

$
0
0

- तटरक्षक दलाच्या तिन्ही केंद्रांना सामग्रीचा पुरवठा

- डेन्मार्कहून आलेल्या सामग्रीची महत्त्वाची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

भारतीय समुद्र सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवण्याची जबाबदारी तटरक्षक दलाकडे आहे. यासाठी दलाकडे अत्याधुनिक सामग्री असून त्याचा हब मुंबईत आहे. मुंबईतूनच ही सामग्री तटरक्षक दलाच्या तीन प्रदूषण नियंत्रण केंद्रांना पाठवली जाते.

तटरक्षक दल हे किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आले आहे. याखेरीज समुद्रात अडकलेल्यांचा बचाव करणे व आपत्कालिन स्थितीत नौदलाला टेहळणी आणि गस्तीसाठी सहकार्य करण्याचे काम तटरक्षक दलाकडून केले जाते. पण त्याखेरीज समुद्राचे प्रदूषणापासून संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारीही तटरक्षक दलाकडेच आहे. संपूर्ण अरबी समुद्र व भारतीय उपखंडाला लागून असलेल्या समुद्रात कुठल्याही प्रकारचे प्रदूषण असल्यास त्यासाठी भारतीय तटरक्षक दल हे त्याचे 'नोडल एजन्सी' आहे. यासाठीच दलाकडे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित अत्याधुनिक सामग्री आहे.

तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील ṇप्रदूषणाचा सामना करण्यासाठी पश्चिम क्षेत्रांतर्गत मुंबईत, उत्तर-पश्चिम क्षेत्रांतर्गत पोरबंदर तर दक्षिण क्षेत्रांतर्गत चेन्नई येथे विशेष प्रदूषण नियंत्रण केंद्र आहे. मुंबईतील हे केंद्र माझगावच्या समुद्रकिनारी आहे. हे केंद्र अरबी समुद्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत तर आहेच. पण त्याखेरीज देशातील अन्य दोन केंद्रांना प्रदूषण नियंत्रण सामग्री पुरविण्याचे कामही याच केंद्राकडून केले जाते.

तटरक्षक दलाकडे समुद्रातील तेल गळतीसह विविध प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी जवळपास ५१ प्रकारच्या सामग्री आहेत. ही सामग्री महागडी असून ती जगभरातील निवडक देशांतच तयार केली जाते. तटरक्षक दलाने अलीकडे ही सामग्री डेन्मार्क येथून आणली आहे. मुंबईच्या केंद्रावर या सामग्रीची रितसर तपासणी करण्यात आली. त्यानंतर ती देशातील अन्य दोन केंद्रांकडे रवाना करण्यात आली. बाहेरून आयात होणाऱ्या सामग्रीच्या तपासणीची सोयदेखील फक्त मुंबईतील माझगावच्या केंद्रावरच आहे, हे विशेष. त्यामुळेच हे केंद्र देशभरातील समुद्री प्रदूषण नियंत्रणाचा हब झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएएला विरोध हे कटकारस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९नुसार कोणत्याही जाती, धर्माच्या नागरिकांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. देशातील सध्याच्या प्रत्येक नागरिकाचे नागरिकत्व अबाधित राहणार आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांकडून या कायद्याची भीती दाखवून कटकारस्थान केले जात आहे. सर्व जातीधर्मीयांनी या कटकारस्थानाला बळी पडू नये,' असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष भाजपचे खासदार अमरजीत साबळे यांनी केले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात भाजपच्यावतीने रविवारी कोल्हापुरात घरोघरी जावून जनजागृती उपक्रमास सुरुवात झाली. खासदार साबळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी बिंदू चौक, शिवाजी चौक, अकबर मोहल्ला परिसरात याबाबतची पत्रके वाटून नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत साबळे बोलत होते.

'लोकसभा आणि राज्यसभेत सीएए विधेयक पूर्ण बहुमताने मंजूर झाले आहे,' असे सांगून खासदार साबळे म्हणाले,"स्वातंत्र्यानंतर अखंड भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्य हिंदू, बौद्ध, जैन, पारसी लोकांवर झालेल्या धार्मिकतून अन्याय झाल्याने त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण गेल्या ६० वर्षात काँग्रेसने अशा नागरिकांना कधीही नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केला नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या निवडणूक घोषणापत्रात नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लोकशाहीमार्गानुसार हे विधेयक मंजूर केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने भारतातील कोणत्याही जाती धर्मातील नागरिकांचे नागरिकत्व कमी होणार नसून त्यांचे नागरिकत्व अबाधित राहणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने रविवारी राबवण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कॉलेज आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने दिवसभरात १२ टन कचरा व प्लास्टिक संकलीत करण्यात आले. उद्यानांची स्वच्छता करण्यावर भर देण्यात याला. रविवारी (ता. १९) नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून परिसराची स्वच्छता करण्यात आली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर स्वच्छतेला सुरुवात झाली. रंकाळा तलाव शाहू स्मृतीबाग, आयसोलेशन हॉस्पिटल ते शेंडा पार्क, रिलायन्स मॉलमागील संपूर्ण, नर्सरीबाग, डायना पार्क येथील ओपन स्पेस, शिर्के उद्यान, रेल्वे गुड्स, कोटितीर्थ तलाव, हुतात्मा पार्क, डिपार्टमेंट ऑफ टेक्नालॉजी शिवाजी विद्यापीठ रोड, उड्डाणपूल ते कावळा नाका व कावळा नाका ते तावडे हॉटेल, कळंबा फिल्टर कळंबा मेनरोडची स्वच्छता करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज, वृक्ष प्रेमी संघटना, परिट समाज, मेनन कंपनीचे कर्मचारी यांच्यासह नगरसेविका सुरेखा शहा, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, शाखा अभियंता आर. के. पाटील, शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, क्रीडा निरिक्षक सचिन पांडव, शशिकांत भालकर, व्हाइट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रेम सातपुते आदींनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images