Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ऑनड्यूटी जंगी पार्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटीकडील रोजंदारी चालक-वाहकांना वेतन ग्रेड मिळाल्याच्या आनंदाचे सेलिब्रेशन ४० कर्मचाऱ्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दुर्गमानवड येथे केले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या तब्बल २२ बसेस रविवारी दुपारनंतर मार्गस्थ होऊ शकल्या नाहीत. परिणामी एका दिवसांत ९० हजाराच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. वेळेवर बस मार्गस्थ होत नसल्याने रविवारी गर्दीच्या दिवशी प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले.

गेल्या अनेक वर्षांपासून केएमटी आर्थिक अरिष्टातून धावत आहे. तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, पण ते सर्व अयशस्वी झाले. या प्रयत्नांना खीळ घालण्यात केएमटीतील कर्मचारीही कारणीभूत ठरत आहेत. पूर्वपरवानगीशिवाय ड्युटीवर न येणे, ड्युटीवर आल्यानंतर मधूनच गायब होणे, अशा कारणांमुळे ऐनवेळी सकाळी मार्गस्थ झालेल्या पाच ते दहा बसेस दररोज दुपारी वर्कशॉपमध्ये पोहोचत आहेत. त्यामुळे तोटा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्याची प्रचिती रविवारी पुन्हा आली.

केएमटीकडे ए, बी व 'सी' अशा बॅचमध्ये रोजंदारी चालक-वाहकांची वर्गवारी केली जाते. त्यामधील 'सी' बॅचमधील काही रोजंदारी चालक-वाहकांचा 'ए' बॅचमध्ये समावेश करण्यात आला. या ग्रेडमुळे त्यांच्या वेतनात दिवसाला शंभर रुपयांची वाढ झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या भेटीचे सेलिब्रेशन करण्याचा बेत आखण्यात आला. त्यासाठी त्यांनी रविवारी थेट दुर्गमानवडची निवड करत तिथे जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे चार ते पाच सहाय्यक वाहतूक निरीक्षकांसमवेत ४० चालक-वाहक दुपारी दुर्गमानवडकेड रवाना झाले. त्यामुळे सकाळी मार्गस्थ झालेल्या १०२ बसेस पैकी २२ बसेस वर्कशॉपमध्ये चालक-वाहक नसल्याने दाखल झाल्या. सकाळी ११ बसेस कमी असताना पुन्हा सुटलेल्या २२ बसेस कमी झाल्याने केएमटीला ९० हजाराचा दैनंदिन उत्पन्नाचा फटका बसला. चालक- वाहक नसल्याने उत्पन्नावर परिणाम झालेला असतानाच प्रवाशांनाही मन:स्तापाला सामोरे जावे लागले. रविवारच्या सुटीमुळे अनेकजण कुटुंबासह खरेदीसाठी आले होते. पण दुपारनंतर बस वेळेवर मार्गस्थ होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी चौक, खासबाग येथील वाहतूक नियंत्रण कक्षासाठी विविध मार्गावरील बसेस कधी मार्गस्थ होणार, याची सातत्याने विचारणा केली जात होती. त्यामुळे त्यांना तासनतास बसथांब्यावर उभे राहावे लागत होते. तर अनेकांनी वाट पाहून अन्य वाहतूक व्यवस्थेचा अ‌वलंब केला. याबाबत अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक दिवाकर कारंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

........

चौकट

'गटारी' पार्टीचे प्रकरण दाबले

गेल्यावर्षी गटारी आमवस्येचे औचित्य साधून केएमटीकडील चालक-वाहकांनी अशीच जंगी ओली पार्टी केली होती. त्यामुळे दुपारनंतर अनेक बसेस मार्गस्थ होऊ शकल्या नाहीत. या ओल्या पार्टीची चौकशी करण्यासाठी सहभागी लोकांना नोटिसा देऊन समितीही नेमण्यात आली. मात्र नंतर या नोटिसा आणि समितीही बासनात गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा केएमटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. अधिकारीच अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याऐवजी त्यावर पांघरुण घालत असतील, तर केएमटी आर्थिक अरिष्टातून कशी बाहेर येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिऊरला पाच सदस्यांचे एकाचवेळी राजीनामे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळा तालुक्यातील जिऊर ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. काही दिवसांपूर्वी उपसरपंचांवर अविश्वास ठराव संमत करणाऱ्या पाच सदस्यांनी तो ठराव बेकायदा ठरवला गेल्यानंतर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिऊरमधील जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता अल्पमतात आली आहे. राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी या पाच सदस्यांनी केली आहे.

माजी सरपंच अशोक दाते यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यांनी राजीनामा पन्हाळ्याचे गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांना सादर केला. सत्ताधारी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत. गेल्या पाच वर्षात गावात एकही भरीव विकासकाम झाले नाही. त्याचा निषेध म्हणून पदाचे राजीनामे देत आहोत. असे या सदस्यांनी गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नारायण दाभोळकर, पूजा दाभोळकर, अशोक दाते, प्रकाश वरेकर, लक्ष्मी चांदणे अशी राजीनामा दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. सदस्या वंदना बोरे यांनी उपसरपंच धोंडीराम पाटील यांच्याविरोधात मंजूर केलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत सध्या प्रियांका महाडिक या सरपंच तर धोंडिराम पाटील उपसरपंच आहेत. काही महिन्यांपूर्वी उपसरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. हा ठराव बेकायदा असल्याचा निकाल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला होता.

राजीनाम्याबद्दल अशोक दाते म्हणाले, 'सदस्यांना विश्वासात न घेता कारभार सुरू आहे. याचा निषेध म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे. आता ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मिनिटांत आठ उद्घाटने

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवारी जालन्यामध्ये आठ कामांची उद्घाटने आणि भूमिपुजने उरकण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी कमीत कमी वेळेत हे कार्यक्रम पूर्ण केले आणि त्यानंतर त्या अंबडला रवाना झाल्या. मात्र, या कार्यक्रमासाठी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला.

शहराच्या रुग्णालयांतील सिटीस्कॅन विभाग, केमोथेरपी विभाग, सौर ऊर्जा प्रकल्प, जन्मतः व्यंग असलेल्या बालकांच्या उपचाराचा विभाग, कौशल्य विकास केंद्र, मनोरुग्ण रुग्णालय भूमिपूजन, परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत आणि औषधी भांडार यांचे उद्घाटन त्यांच्याकडून होणार होते. या वेळी त्यांच्याबरोबर आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल होते. या कार्यक्रमासाठी पाचशेहून अधिक आशा स्वयंसेविकाही उपस्थित होत्या. सायंकाळी पाच वाजता सुळे तेथे आल्या आणि पाच मिनिटांमध्येच त्यांनी हा कार्यक्रम उरकला.

दरम्यान, आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेश टोपे यांच्या विभागाचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. उद्घाटक म्हणून प्रोटोकॉलनुसार जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री असलेले राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा अधिकार असताना, हे संकेत बाजूला ठेवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटने करण्यात आली. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया लोणीकर यांनी दिली. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे हेही अनुपस्थित होते.

सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप तोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा सदस्यांचे निलंबन केल्या प्रकरणात जयसिंह मोहिते यांनी पक्षाचे धोरण गुंडाळून भाजपच्या सोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात सगळ्यात प्रथम कारवाई करावी, त्यानंतर आमच्यावर असे म्हटले आहे. या विषयावर सुळे म्हणाल्या, 'मी मोहिते यांची प्रतिक्रिया ऐकलेली नाही. हा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हाध्यक्ष निवड आज

0
0

कोल्हापूर

भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवड सोमवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल अयोध्या येथे होणार आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड मंगळवारी (ता. १४) होणार आहे. भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचे नाव निश्चित झाले आहे. निवडणूक प्रक्रियेच्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी अॅड. भरत पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मंडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्पादन शुल्क’मधील दारू चोरीच्या तपासात प्रगती नाही

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहरातील भगतसिंग उद्यानाच्या पिछाडीस दूरदर्शन कार्यालयाच्या जागेतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १.३ लाख रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या लंपास केल्याच्या घटनेला दोन दिवस उलटले तरी तपास शून्यच आहे.

भगतसिंग उद्यानाच्या पिछाडीस बंद असलेल्या दूरदर्शन कार्यालयाच्या जागेत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. विविध कारवायांत जप्त केलेल्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या कार्यालयात ठेवलेल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री कार्यालयाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने आतील देशी-विदेशी मद्याच्या १ लाख ३ हजार ६६१ रुपयांच्या ५०९ बाटल्या लंपास केल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच चोरी झाल्याने पोलिसही चक्रावून गेले होते.

दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. चार ते पाच संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र काहीच माहिती मिळू शकली नाही. चोरीच्या घटनेनंतर उत्पादन शुल्क कार्यालयात रविवारी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

खासगी सावकारावर गुन्हा

इचलकरंजी : व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही पुन्हा व्याजासाठी शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी रविवारी एकावर सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. जयवंत आप्पासाहेब ताटे (रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद हमिदा राजू शेख (रा. नांदणी) यांनी दिली. गावभाग पोलिसांनी सांगितले की, शिरोळ तालुक्यातील नांदणीतील हमिदा शेख भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी जयवंत ताटे यांच्याकडून आर्थिक गरज भागविण्यासाठी ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी ६३ हजार रुपये व्याजासह त्यांनी ताटेंकडे परतफेड केले. तरीही पुन्हा व्याजाची मागणी करीत शेख यांच्या घरी जावून ताटेने शिवागाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीसांनी ताटे याला अटक केली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणून घेऊया दुर्मिळ अन् औषधी वनस्पती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागाने विकसित केलेल्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतीच्या बॉटॅनिकल गार्डन येथे महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने सोमवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता 'वॉक थ्रू लिड बॉटॅनिकल गार्डन' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 'मटा' चे वाचक, बॉटनीचे विद्यार्थी, युवक आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

वनस्पती विभागाने ४२ एकरमध्ये दुर्मिळ वनस्पती रुजवून विकसित केल्या आहेत. त्यामध्ये सेक्शन प्लँट, फॉमिली मेंबर, हर्बेरियम या विभागात ४० हजार वनस्पतींच्या पेशींचे संवर्धन केले आहे. तसेच काही वनस्पतींसाठी वेगवेगळे प्लॅाटस् तयार केले आहेत. नेचे वर्गीय वनस्पतीतील ७८१ तर बुरशी विभागात ५८० जातीच्या वनस्पती आहेत. सपुष्प वनस्पती गटात ८५० प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत. आर्किड फुलांची नर्सरी तयार करण्यात आली असून ९० प्रकारांच्या फुलाची रोपे पहायला मिळणार आहेत. तसेच फुलांच्या १८० जातींची झाडे आहेत.

भारतातील सर्व जातींचे पाम एकाच ठिकाणी पहायला मिळणार आहेत. अंदमान निकोबारसह 'सेंच्युरी पाम' या जातीसह ५५ प्रकारची पामची झाडे विकसित करण्यात आली आहेत. त्सुनामीमुळे खारफुटी वनस्पतीला महत्व असून २७ प्रकारच्या वनस्पती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच गवताचे २० प्रकार पहायला मिळतील. व्हिक्टोरिया लिली हे झाडही पहायला मिळणार आहे.

वनस्पती विभागाने १२ एकर आणि भाषा भवन येथे २० एकरवर उद्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये वायर हाउस, पॉली हाउस, ग्लास हाउस, वॉटर टँकरची उभारणी केली आहे. त्यासाठी दोन विहिरींतून पाणी पुरवठा केला जातो.

'मटा' तर्फे आयोजित नेचर वॉकमध्ये दुर्मिळ वनस्पती, त्यांची माहिती, त्या कशा विकसित केल्या जातात तसेच त्यांचे महत्व आणि बाजारपेठेतील स्थान यांची माहिती मिळणार आहे. विभाग प्रमुख वर्षा जाधव (राठोड) यांच्या नेतृत्वाखाली प्रोफेसर एस.आर. यादव, निरंजना चव्हाण, प्रो. एस.एस. कांबळे, डी.के.गायकवाड, एन.बी. गायकवाड, प्रो. एस.जी घोणे, डॉ. आर.व्ही.गुरव, डॉ. एम.एम. लेखक, डॉ. कल्याणी पवार, डॉ. एम.एस. निंबाळकर यांच्यावतीने नेचर वॉकमध्ये माहिती दिली जाणार आहे. नेचर वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सतीश घाटगे (८५५२९६९१९१), अदित्य सरनाईक (९७६७८९०६२६) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११४ रुग्णालये, क्लिनिक नुतनीकरणाविना

0
0

पृथ्वी रक्षक लोगो वापरता येईल Maruti.Patil @timesgroup.com tweet: @MarutipatilMT कोल्हापूर शहरात कोणताही व्यवसाय किंवा रुग्णालय, क्लिनिक सुरू करताना महापालिकेच्या परवाना विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. परवाना घेतल्यानंतर ठराविक वर्षांनी त्याचे नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी नियमही ठरले आहेत. मात्र नियम धाब्यावर बसवून शहरातील तब्बल ११४ रुग्णालये, क्लिनिक व्यवस्थापनाने मुदत संपूनही परवान्यांचे नुतनीकरण न करताच व्यवसाय सुरू ठेवले आहेत. त्यामुळे या ठिकाणावरुन निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कोठे लावली जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. रुग्णालये, क्लिनिक, दातांचा दवाखाना, लॅबोरेटरी, ब्लड बँक यांची एकूण सात हजार इतकी संख्या आहे. त्यामध्ये शहरातील ४२२ रुग्णालये व क्लिनिकचा समावेश आहे. या सर्वच वैद्यकीय व्यवसायिकांना महापालिकेच्या परवाना विभागाकडून परवाना घेतल्यानंतर दर तीन वर्षांनी त्याचे नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी बेडनुसार शुल्क आकारणी केली जाते. तसेच जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी दरवर्षी नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने त्यांची तपासणी केली जाते. तपासणीमध्ये रुग्णालय, क्लिनिकमधील बदल, बेडची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या आदींची तपासणी केली जाते. महापालिका अधिनयमातील तरतुदीनुसार तीन वर्षानंतर नुतनीकरण आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे निर्देश दिले आहेत. पण हे दोन्ही नियम शहरातील रुग्णालये व क्लिनिकनी धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे दोन्हीद्वारे मिळणाऱ्या महसुलावर पाणी पडले असून जैववैद्यकीय कचऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरात दररोज ९०० किलो वैद्यकीय कचरा तयार होतो. त्यावर महापालिकेच्यावतीने प्रक्रिया केली जाते. पण त्यासाठी नुतनीकरण करणे अनिवार्य असते. हा नियमच रुग्णालय व क्लिनिकने धाब्यावर बसवल्याने जैववैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न अधिक जटील बनला आहे. परवान्यांच्या नुतनीकरणासाठी प्रशासनावर आवाहन करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्यावतीने दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवले जात आहे. विशेषत: नाला परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करताना नाल्यात अथवा काठावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यवस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही अद्याप स्वच्छतेदरम्यान वैद्यकीय कचरा आढळून येत आहे. .... कोट 'नुतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. तत्पूर्वी नागरी आरोग्य केंद्राकडून त्याची तपासणी केली जाते. मार्चपूर्वी नुतनीकरण न केल्यास त्यांना दंड आकारणी केली जाते. मुदतीत प्रक्रिया न राबवल्यास प्रति महिन्याप्रमाणे त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी ..... चौकट ४२२ रुग्णालये, क्लिनिक ३०८ नोंदणीकृत ११४ नुतनीकरण नसलेले ३०० रु. नोंदणी शुल्क (दहा बेडपर्यंत) ६०० रु. दहा बेड पेक्षा अधिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभगवान गोयलविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

0
0

सोलापूर: 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं?: मुनगंटीवार


लेखक जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर स्पष्ट झाले आणि राज्यभरात या पुस्तकाचा निषेध सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर नाराजी व्यक्त करत याचे स्पष्टीकरण मागितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडत या पुस्तकाचा निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप या तिन्ही पक्षांनी केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी जय भगवान गोयल यांच्याविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शिवरायांशी तुलना करणाऱ्यांना आवरा: शिवेंद्रराजे

आज राज्यातील विविध ठिकाणी या पुस्तकाचे तसेच लेखकाच्या छायाचित्रांचे प्रतिकात्मक दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांसह अनेकांनी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याची भावनाही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मोदींची तुलना: शिवाजी महाराज कुठे, हे कुठे!

पक्षाने सांगितल्यास पुस्तक मागे घेईन- गोयल

दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक मागे घेऊ, असे लेखक जयभगवान गोयन यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करत असत, त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे. या पुस्तकाद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतंग उडवताना सावधानता बाळगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मकर संक्रांतीचा सण आला की, पतंगाच्या सिझनला सुरुवात होते. बालकांसह ज्येष्ठ मंडळी पंतग उडविण्याची मौज लुटतात. मात्र पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. पतंग उडविताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या नजीकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. यामुळे वीजपुरवठा खंडीत करुन तातडीची मदत करणे सोयीचे होईल, असे महावितरणने म्हटले आहे. महावितरणच्या २४ तास कार्यरत असलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ किंवा १८००२३३३४३५ या टोल क्रमांकावर संपर्क साधावा. १८००१०२३४३५ हा क्रमांकही उपलब्ध आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन, अडीच महिन्यापूर्वी पतंग काढतानाच्या नादात जीव गमावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कर्नाटकातून इचलकरंजी येथे आजोळी आलेल्या एका मुलालाही जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी व मुलांनी पतंग उडविताना खबरदारी घ्यावी. शहरी व ग्रामीण भागामध्ये विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. विद्युत वाहिन्या व खांबावर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करु नये. विद्युत वाहिन्यांचे एकमेकांवर घर्षण होवून शॉर्टसर्किट होवून जीवित व वित्तहानीची शक्यता असते.

........

पतंगप्रेमींनी काय खबरदारी घ्यावी....

मोकळ्या मैदानात पतंग उडवावा.

विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेला पतंग व मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा.

घराच्या गच्चीवरुन, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे.

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा.

धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून उमेदवारांची चाचपणी

0
0

महापालिका लोगो

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीला अजून दहा महिन्यांचा कालावधी असला तरी राजकीय पक्षांकडून आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने शहरातील ८१ प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक प्रभागात चार सक्षम उमेदवारांच्या नावांची यादी बनवली जाणार आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि ओबीसी महिला अशा चार प्रवर्गांपैकी कोणत्याही प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले तरी पक्षाकडून उमेदवार तयार असला पाहिजे यासाठी आतापासूनच शोध घेतला जाणार आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जाती महिला प्रवर्गही त्याला अपवाद नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची कोअर कमिटी तयार केली आहे.निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाचा सक्षम कार्यकर्ता या दोन बाबींना तिकीट वाटपात प्राधान्यक्रम राहणार आहे.

कोअर कमिटीला सहकार्य करण्यासाठी आणखी एक समिती कार्यरत असणार आहे. यामध्ये माजी आमदार अमल महाडिक, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, आर. डी. पाटील, अजित ठाणेकर, विजय खाडे सक्रिय असतील. पक्ष संघटनेसाठी शहरात सात मंडल अंतर्गत कामकाज चालते. प्रत्येक मंडल अखत्यारित किती प्रभाग समाविष्ट आहेत, त्या ठिकाणी पक्षाचे प्रभावीपणे कार्य कोण करत आहे, नागरिकांशी संपर्क आणि नागरी प्रश्नासाठी आंदोलनातील सहभाग या साऱ्या बाबी तपासल्या जाणार आहेत.

कोअर कमिटी व अन्य कमिटी शहरातील सर्व प्रभागांवर लक्ष ठेवून असणार आहे. प्रभाग आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होईल हे अद्याप अनिश्चित आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात प्रवर्गनिहाय चार उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीस व ओबीसी महिला प्रवर्गातील उमेदवारासंदर्भात चाचपणी होईल. कालांतराने प्रत्येक प्रभागनिहाय यादी तयार करुन निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

....

कमी मतांनी हरलेल्या जागांवर लक्ष

भाजप व ताराराणी आघाडीच्या मिळून दहा जागा कमी मतांनी हुकल्या आहेत. या सर्व जागा यंदा जिंकण्यासाठी आतापासूनच नियोजन आहे. उमेदवारी देताना पक्षाचा सक्षम कार्यकर्ता, गेल्या पाच वर्षातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. गेल्या निवडणुकीतील चुका यंदा दुरुस्त करत रणनिती आखली जाणार आहे.

....

कोट

'आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपतर्फे शहरातील सर्व प्रभागात तयारी करण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत नऊ ते दहा ठिकाणी कमी मतांनी भाजपच्या उमेदवारांना यशाने हुलकावणी दिली. या सर्व ठिकाणी फोकस राहणार आहे. प्रत्येक प्रभागातील सक्षम कार्यकर्ता, निवडणूक जिंकण्याची क्षमता या साऱ्या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत.

महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान व्यवस्थापन समिती

...

ताराराणी आघाडी - भाजप संयुक्तपणे लढणार

महापालिकेच्या २०१५ मधील निवडणुकीत भाजपाला १३ जागा मिळाल्या होत्या. तर ताराराणी आघाडीने १९ जागा जिंकल्या होत्या. महापालिकेत भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्रित आहेत. आगामी निवडणुकीतही ताराराणी आघाडी आणि भाजप संयुक्तपणे निवडणूक लढविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांच्यात जागृती करण्याचे आवाहन

0
0

कोल्हापूर

'निवडणूक आयोगाकडून मजबूत लोकशाहीसाठी 'निवडणूक साक्षरता' हा विषय देण्यात आला असून २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांमध्ये जागृती करावी ', असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'विविध विभागांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवीन मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान केलेल्या नव मतदार ते ज्येष्ठ मतदार अशा निवडक मतदारांना बोलावून त्यांचा सन्मान करा. विशेषत: तृतीयपंथी, दिव्यांग अशा मतदारांनाही निमंत्रित करुन त्यांचाही सन्मान करण्याची सूचना केली.' यावेळी तहसीलदार अर्चना शेटे, शीतल मुळे-भांबरे, सुनीता नेर्लीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य शिबीरात ५२६ जणांची तपासणी

0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती व एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीच्यावतीने लक्षतीर्थ वसाहत येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ५२६ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचे उद्घाटन आयक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा खेडकर यांच्या हस्ते झाले. विविध सरकारी योजनांची माहिती देताना आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'महापालिकेच्या शाळा डिजीटल झाल्या पाहिजेत. मुलांनी घरात कचरा साठवून महिन्यातून एकदा शाळेत दिला पाहिजे. स्वच्छतेमुळे आपले व कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. त्यासाठी आजुबाजूचा परिसर प्रत्येकांना स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे.' यावेळी खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपायुक्त धनंजय आंधळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते. वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्या काळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीत विद्यार्थी बनले पृथ्वीरक्षक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटी येथील गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'पृथ्वीरक्षण' करण्याची शपथ घेतली. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने 'पृथ्वीरक्षण' उपक्रम राबविला जात आहे. त्यात दोन्ही शाळांतील ९७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलेल्या पृथ्वीरक्षण उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचाऱ्यांसह भुदरगड-आजराचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, भुदरगड तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे, केंद्रप्रमुख संजय कुकडे, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, हणबरवाडीचे सरपंच धनाजीराव खोत, खानापूरच्या सरपंच तृप्ती पुजारी, पडखंबेचे सरपंच दिगंबर गुरव, वेदगंगा बझारचे चेअरमन सर्जेराव मोरे, सुशांत सूर्यवंशी, शशिकांत कासार, एल. जी. हवालदार यांनी शपथ घेतली. गारगोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. बी. पांगिरेकर, नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक आर. वाय. देसाई, आर. पी. गव्हाणकर, पी. पी. भंडारी, हरीदास देसाई आदींनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. आर. वाय. देसाई यांनी उपक्रमाचे महत्व सांगितले.

मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पृथ्वीरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्याचे काम बंद आंदोलन मागे

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवक आशोक जाधव यांच्यासोबत कामावरुन झालेल्या वादावादीनंतर अभियंत्यांनी सामुदायिक रजेवर जात कामबंद आंदोलन सुरू केले होते. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. स्थायी समितीच्या सभागृहात तब्बल दीड तास बैठक झाली. 'पदोन्नतीचा प्रश्न निकालात काढण्याबरोबरच अतांत्रिक कामातून मुक्त करण्यासाठी सर्वोपतोपरी प्रयत्न करु. त्यासाठी पुढील आठवड्यात आढावा बैठक घेऊ,' अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात कामाचा निपटारा होत नसल्याने गुरुवारी (ता.९) सायंकाळी नगरसेवक जाधव यांनी उपशहर अभियंता मस्कर यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व अभियंत्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्याबाबतचे निवेदन त्याचदिवशी महापौर, आयुक्त व स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांना दिले होते. त्यानुसार त्यांच्यासोबत शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. पण एमआयएमच्या कार्यकर्त्याला जमावाकडून झालेल्या मारहाणीमुळे बैठक रद्द होऊन ती सोमवारी घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजता बैठकीला सुरुवात झाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रत्येक मागणीचे वाचन केले. 'अतांत्रिक कामे आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण निर्माण होत आहे. रिक्त पदे त्वरीत भरण्याबरोबरच अतिक्रमण विभागाला अधीक्षक दर्जाचा अधिकारी द्यावा. तसेच वाहतूक विभागाला दोन अभियंत्यांची गरज आहे. विद्युत व उद्यान विभाग ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या जोरावर सुरू असल्याचे सांगितले.

उपशहर अभियंता मस्कर म्हणाले, 'वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका, अतिक्रमण कारवाई, स्वच्छता मोहीम यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नाही. सहायक अभियंता नसल्याने कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तेथील काम ठप्प होते.'

स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख म्हणाले, 'आठवड्यातून तीन दिवस अतिक्रमण निर्मूलन कारवाई करा. स्वतंत्र विभाग सुरू केल्यास त्यांचे लागेबांधे निर्माण होऊन कारवाईला खीळ बसते.' ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, 'स्थायी' च्या बैठकीला अधिकारी वारंवार गैरहजर राहतात. कारवाईदरम्यान कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त घ्या.' नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना वारंवार मुख्य कार्यालयात बोलवण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्या, अशी सूचना केली.

महापौर अॅड. लाटकर म्हणाल्या, 'वाहतूक समस्या कमी होण्यासाठी अतिक्रमण विभाग सक्षम झालाच पाहिजे. अभियंत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ.' आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'सहायक आयुक्त दर्जाचा एकही अधिकारी नाही. सहा मुख्य अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पदोन्नतीचा प्रश्न निकालात काढला जाईल. त्यासाठी २७ जानेवारी रोजी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेवू.' त्यानंतर शहरअभियंता सरनोबत यांनी काम बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपमहापौर संजय मोहीते, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक इश्वर परमार, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, आर. के. जाधव, रावसाहेब चव्हाण, विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले आदी उपस्थित होते.

...

चौकट

गतिमान कामाची आवश्यकता

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले,' 'मागण्या पूर्ण करुन घेताना अभियंत्यांनीही गतिमान काम करण्याचे आश्वासन दिले पाहिजे. मनुष्यबळ कमी असल्याची जाणीव आहे. पण महापालिका आपली समजून जादा वेळ देण्याची तयारी ठेवली पाहिजे. सुटी दिवशी येऊन फायलींचा निपटारा करण्याची आवश्यकता आहे. इतर सरकारी कार्यालयातील अधिकारीही सुटी दिवशी येत आहेत.'

....

अभियंत्यांच्या मागण्या

अतांत्रिक कामातून मुक्त करा

रिक्त पदे भरा

अतिक्रमण विभागाला अधीक्षक द्या

इस्टेट विभागात अभियंत्यांची नियुक्त रद्द करा

वाहतूक शाखेकडे दोन अभियंते द्या

तांत्रिक अधिकाऱ्यांना जनगणना व निवडणूक कामातून मुक्त करा

....

आयुक्तांनी खडसावले

अतिरिक्त कामावरुन चर्चा सुरू असताना कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्त चांगलेच संतप्त झाले. 'विभाग प्रमुख म्हणून तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. चार ओळीचे पत्र देवून जबाबदारी झटकता येणार नाही. आवश्यकता असल्यास थेट कारवाई करा,' असे त्यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभर दबावगटाचे स्वाभिमानीचे ‘लक्ष्य’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर सभासद नोंदणीची मोहीम गतीने सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० हजार सभासद नोंदणी करून घेत ४० हजार शेतकरी कुटुंबांचा दबावगट तयार करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार देवेंद्र भुयार, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, रवीकांत तुपकर हे यासाठी राज्यभर दौरे करीत आहेत. सभासद नोंदणीबरोबर जिल्हानिहाय पदाधिकारी निवडीही सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात संघटना राज्यभर मोठ्या ताकदीने संघर्षासाठी सज्ज होईल असे संकेत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दशकांहून अधिक काळ दबादबा निर्माण केला. मात्र अलिकडच्या काही वर्षात भाजप सरकारच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे संघटनेतून बाहेर पडले. परिणामी, काही ठिकाणी संघटनेत पडझड झाली. लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत विदर्भात संघटनेच्या चिन्हावर देवेंद्र भुयार यांच्या रुपाने एकमेव आमदार निवडून आला. त्यामुळे विदर्भात संघटनेचा विस्तार व्यापक होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र 'स्वाभिमानी'च्या बालेकिल्ल्यात, शिरोळ मतदारसंघात संघटनेच्या उमेदवारास पराभव पत्करावा लागला.

राजकारणात घरच्या मैदानातच संघटनेला यश मिळाले नाही. त्यामुळे संघटनेच्या प्रमुख संघटनेच्या नेत्यांनी आत्मचिंतन करून पूर्वीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त केले. सर्वच जिल्ह्यांत नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू केली. ही निवड करताना गावपातळीवर सभासद नोंदणीही करून घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास पहिले प्राधान्य आणि राजकारण दुय्यम ही मध्यवर्ती संकल्पना ठेवूनही संघटनेची बांधणी करण्यावर भर दिला जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यकालही दोन वर्षाचा ठेवला आहे. त्यामुळे संघटनेची आचारसंहिता न पाळणाऱ्यास कार्यमुक्त करणेही सोपे केल्याचा दावा संघटनेने केला आहे.

खोत यांच्याशी जुळवून घेणे अशक्य

भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर 'स्वाभिमानी'तून बाहेर पडलेले सदाभाऊ खोत यांच्या घरवापसीची चर्चा सुरू आहे. भाजपचे सरकार गेल्यानंतर ही चर्चा अधिक झाली. मात्र, आता त्यांच्याशी जुळवून घेणे शक्य नाही, अशी भूमिका 'स्वाभिमानी'च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यांनी स्वत:ची संघटना चांगली चालवावी, ते पुन्हा आमच्यात नको, असा सूर 'स्वाभिमानी'त आहे.

आचारसंहिता अंतिम टप्यात

'संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ता विकाऊ निघाला, संघटना मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करू लागला तर शेतकरी, कष्टकऱ्यांच्या चळवळीला नख लागते,' असे 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यातूनच संघटनेसाठी आचारसंहिता असावी अशी मागणी पुढे आली. कार्यकर्ता, पदाधिकारी कसा असावा, त्याने कोणती पथ्ये पाळावीत यासंबंधी राज्यपातळीवर आचारसंहिता तयार केली जात आहे. त्याचा मसुदा तयार झाला आहे. त्यावर विचारवंत, तज्ज्ञांची मते घेतली जात आहे. पुढील एक महिन्यात संघटनेची आचारसंहिता प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे स्वाभिमानीच्यावतीने सांगण्यात आले.

शेती, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान ४० हजार शेतकऱ्यांचा दबावगट तयार करण्याचे संघटनेचे टार्गेट आहे. त्यासाठी राज्यभर नेत्यांचे दौरे झाले आहेत. दौऱ्यात संघटनेच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद असल्याचे दिसते. राजकारण दुय्यम आणि चळवळीला प्राधान्य हे सूत्र ठेवून संघटनेची राज्यभर पुर्नबांधणी केली जात आहे.

- जालिंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक पुरस्कारांना मिळेना मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करुन चार महिन्याचा कालावधी उलटला. पहिल्यांदा आचारसंहिता आणि मंत्री महोदयांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचा आग्रह यामुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडत आहे. शैक्षणिक वर्ष संपण्याआधी तरी शिक्षकांचा सन्मान होणार का? अशी विचारणा आता होऊ लागली आहे. शिक्षक संघटनांतर्फे प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही पदाधिकारी आणि अधिकारी स्तरावरुन कार्यक्रमासाठी चालढकल सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

प्राथमिक शिक्षण समितीतर्फे दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होते. महापालिका शाळांतील पाच, खासगी शाळांतील पाच, विशेष शिक्ष पुरस्कार दोन आणि आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी दोन अशा बारा जणांचा सन्मान केला जातो. शिक्षक दिनी पुरस्कार वितरणाला वेगळे महत्व आहे. गेल्यावर्षी शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली. पण वितरण झाले नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा हिरेमोड झाला. विधानसभा निवडणुकीआधी पुरस्कारांची घोषणा झाली. राज्यात सत्ता भाजप, शिवसेनेची तर महापालिकेत सत्ता दोन्ही काँग्रेसची. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कार वितरण लांबणीवर टाकण्यामागे राजकीय कारण दडल्याची चर्चा होती. नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडला.

शिक्षण सभापती श्रावण फडतारे हे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. तर उपसभापती सचिन पाटील हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम व्हावा म्हणून दोन्ही पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र राज्य पातळीवरील घडामोडीमुळे मंत्र्यांच्या तारखा निश्चित करताना वेळ चालला आहे. आता नवीन वर्ष उजाडले. पुरस्कार जाहीर करुन चार महिने झाले. शिक्षक संघटनांनी पुरस्कार वितरण व्हावे यासाठी शिक्षण समितीचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र काही झालेले नाही.

यासंदर्भात, शिक्षण समिती सभापती फडतारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी यासंदर्भात सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देऊ असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी नेते, साहित्यिकांना कर्नाटकबंदी करण्याची मागणी

0
0

बेळगाव : सीमाभागातील साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि साहित्यिक येऊन प्रक्षोभक भाषण करून सीमाप्रश्न उकरून काढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि साहित्यिकांवर कारवाई करावी. त्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा कन्नड कृती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मराठी साहित्य संमेलनामुळे सीमाभागात अशांतता निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील नेते आणि साहित्यिक बेळगावात येऊन कर्नाटक आणि कन्नड भाषेबद्दल प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. सीमाभागात चाललेल्या कर्नाटक आणि कन्नडविरोधी कारवाया थांबवण्यासाठी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोमाई यांनी बेळगावला तातडीने भेट देऊन चर्चा करून जिल्हा प्रशासनाला कारवाईसाठी पाठबळ द्यावे, अशी ही मागणी करण्यात आली आहे.

आयजीपी राघवेंद्र सुहास आणि डीसीपी सीमा लाटकर यांचीही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी, बी. तिप्पेस्वामी, शिवाप्पा शरमंत, सागर बोरंगल आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करप्रणाली सुटसुटीत करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जीएसटी अंमलबजावणीबाबत देशभरातील व्यापारी तसेच चार्टर्ड अकाउंटंट त्रास होत आहे. त्याबाबत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) ही करप्रणाली सुटसुटीत करण्याची सूचना सरकारकडे केली आहे. त्याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात निर्णय अपेक्षित आहे,' असे आयसीएआयचे अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी सांगितले. बँक व वित्तीय संस्थांची फसवणूक टाळण्यासाठी सीएंना युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबरचा (युडीआईएन) वापर करणे सक्तीचे केले आहे, असेही त्यांनी सांगितले. छाजेड यांनी सोमवारी आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेला भेट दिली. त्यावेळी कोल्हापूर परिसरातील सीएंशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

छाजेड म्हणाले, 'सीए हे व्यापारी व सरकार यांच्यातील दुवा आहेत. त्यामुळे हे काम करत असताना जाणवणाऱ्या अडचणी तसेच त्याबाबतच्या कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत हे प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पापूर्वी आम्ही सरकारकडे सांगत असतो. त्यातील काही सूचनांचा गांभीर्याने विचार केला जातो. यंदाही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे. थेट कर, कार्पोरेट कर यांच्यासह जीएसटीबाबतही काही मुद्दे मांडले आहेत. करप्रणाली सुटसुटीत करावी असेही सांगण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्याबाबत काही बदल होतील, अशी अपेक्षा आहे.'

छाजेड पुढे म्हणाले, 'काश्मीर, लडाख व उत्तर पूर्व भारतात आयसीएआयच्या शाखा सुरू केल्या जात आहेत. सीए करणाऱ्या तेथील विद्यार्थ्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्याठिकाणी फीमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. आमच्यातर्फे असलेला सीएचा अभ्यासक्रम उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. याशिवाय संस्थेच्यावतीने सामाजिक भान जपले जात असून स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बेसिडर होण्याबरोबरच गुंतवणूकदारांसाठी जाणीव जागृती कार्यक्रम, जीएसटीच्या नवीन प्रणालीचे प्रशिक्षण दिले आहे. विविध पातळीवर होत असलेली फसवणूक टाळण्यासाठी आयसीएआयकडून सीएंसाठी युनिक नंबर तयार केला जात आहे. कर्ज प्रकरण अथवा लेखापरीक्षणाच्या अहवालात हा नंबर देण्याची गरज आहे. या नंबरवरुन सीएंनी दिलेल्या सर्टिफिकेटची बँक वा वित्तीय संस्थांना ऑनलाइनवर खात्री करता येणार आहे.'

यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष उमेश शर्मा, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष अमित शिंदे, उपाध्यक्ष अनिल चिकोडी, तुषार अंतुरकर, चेतन ओसवाल, सुशांत गुंडाळे, आशिष सेवेकरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीविना पाणीपुरवठा सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी ते कळंबा साई मंदिर रिंगरोडच्या डांबरीकरणाचा शेवटचा लेअर टाकण्यापूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्यात येणार होती. मात्र कर्मचाऱ्यांचा संपूर्ण दिवस गळती शोधण्यात गेल्याने सायंकाळी दुरुस्तीविना पाणी सोडण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. पण दिवसभर पाणीपुरवठा बंद असल्याने २६ टँकरच्या फेऱ्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रिंगरोडच्या डांबरीकरण कामाला गेल्या महिन्यात सुरुवात झाली. बेस तयार करुन डांबरीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी गळती असल्याचे निदर्शनास येवू लागले. त्यामुळे डांबरीकरणाचा शेवटचा लेअर टाकण्याचे काम थांबवण्यात आले. फुलेवाडी चौकात जुन्या आपटेनगर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या ६०० व्यासाच्या पाइपलाइनची गळती काढण्याचे सोमवारी नियोजन केले होते. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यंत्रणेसह दाखल झाले. पण गळती शोधण्यात त्यांचा दिवस गेला. त्यामुळे गळती न काढताच सायंकाळी पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली.

नियोजित गळतीमळे 'ए' व 'बी' वॉर्ड संलग्न उपनगरे आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा होणार नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांना कळंबा फिल्टर हाउसमधून दहा व बावडा फिल्टर हाउस येथून १६ अशा २६ टँकरच्या फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. शाहूपुरी, शाहू मिल, राजारामपुरी, कसबा बावडा, पायमल वसाहत, आपटे नगर, बिंदू चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, राजाराम चौक व सुभाष नगर भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यात आले. संपूर्ण दिवस गळती शोधण्यात गेल्याने पुन्हा चार दिवसांनंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थव्यवस्था ‘लो ब्लड प्रेशर’वर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या दोन वर्षांत देशात मंदीचे वातावरण गंभीर बनले आहे. पोलाद, लोखंड, सिमेंट, बांधकाम, उद्योग व्यवसाय खाली बसलेत. व्याज दर कपातीसह सरकारी गुंतवणूक कमी झाली आहे. शरीरशास्त्राच्या भाषेत भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था लो ब्लडप्रेशर झाली आहे. त्यामुळे करोडो कुटुंबे बेरोजगारीत खितपत पडत आहेत. आणि रोजगार हिरावणे हे मरणाइतके भयंकर असते' असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले. आरती फाऊंडेशनतर्फे दसरा चौकतील शाहू स्मारक भवनात आरती पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना पाटील यांनी 'भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती' याविषयी विवेचन केले. प्रा. एम. एम. हवालदार अध्यक्षस्थानी होते.

प्रा. डॉ. पाटील यांनी देशातील अर्थव्यवस्था, आर्थिक विकासाचा घसरता दर, शेती उत्पन्न यासंदर्भात देशभरातील अर्थतज्ज्ञांचे दाखले देत वस्तुस्थिती निदर्शनास आणली. पाटील म्हणाले, 'केवळ उद्योग, शेती, व्यापार, कारखानदारी, बँकिग म्हणजे अर्थव्यवस्था नव्हे. अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी माणूस हवा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा व्यवस्थित पुरविणारी व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. जगातील सर्वात मोठी विषमता भारतात आहे. देशातील एक टक्के माणसाकडे ८३ टक्के मालमत्ता आहे. आणि ९९ टक्के लोकांकडे १७ टक्के मालमत्ता इतकी टोकाची विषमता आहे. मंदीमुळे सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आजच्या इतके गोंधळाचे वातावरण यापूर्वी कधी नव्हते.'

फाऊंडेशनचे अॅड. बी. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अंजली पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर एम. आर. पाटील होते.

देशासाठीचा निधी स्वत:साठी वापरला

डॉ. पाटील यांनी, 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या ७० वर्षात उत्तम कामगिरी करुन साडे नऊ लाख कोटी रुपयांचा राखीव निधी जमविला होता. या निधीचा विनियोग देशाच्या संकटकाळात करायचा असतो. मात्र सध्याच्या सरकारने स्वतच्या संकटकाळात तो वापरला' असे सांगितले. 'सरकारने आरबीआयकडून यापूर्वी एक लाख ४० हजार कोटी रुपये घेतले. आता पुन्हा चाळीस हजार कोटी रुपये मागितले आहेत. राखीव निधी देण्यास चार गव्हर्नरनी विरोध केला होता. देशातील विकासकामेही नागरिकांच्या बचतीच्या रकमेतून सुरू आहेत. सरकार मात्र बचत करताना दिसत नाही' अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images