Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शॉपिंग कॉम्प्लेक्सला प्राधान्य

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून ग्रामीण भागाचा विकास साधताना जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्वमार्ग विकसित करू. जि.प. मालकीच्या जागा विकसित करून ग्रामीण भागात रोजगाराला चालना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वउत्पन्नातील वाढीसाठी प्रयत्नशील आहे. भाऊसिंगजी रोडवरील जि.प.च्या मालकीच्या इमारतीत पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीला प्राधान्यक्रम राहील. इमारत उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. महत्वाचे म्हणजे, कॉम्प्लेक्स उभारणीबाबत येथील दुकानदारांसोबत कोर्टात समझोता झाला आहे,' अशी माहिती अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 'ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे तीन मंत्री जिल्ह्याला मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिळवू. ग्रामीण भागातील रस्ते, शेतकऱ्यांना सुविधा, आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सोयी, शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करून गुणवत्ता उंचावणे या कामांना चालना देऊ,'असेही त्यांनी सांगितले

ते म्हणाले, 'पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे व गावपातळीवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणीचे महत्त्व सरकार दरबारी मांडून निधी मिळवू. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळायला हव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ज्या गावांत नियुक्ती आहे, त्या ठिकाणी ते कायमस्वरुपी राहिले पाहिजेत. जे वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी मुक्काम करणार नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावरुन कारवाई केली जाईल'

याप्रसंगी पांडूरंग पाटील, बयाजी शेळके, अरुण चव्हाण, अशोक वरेकर उपस्थित होते.

'डीबीटी'पद्धत रद्दसाठी प्रयत्न

उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, 'सरकारच्या विविध योजनेतंर्गत सध्या थेट खात्यावर अनुदान डीबीटी जमा केले जाते. मात्र अनेक लाभार्थ्यांची पहिल्यांदा वस्तू खरेदी करण्याची ऐपत नाही. वस्तू खरेदी करून पावती जमा केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही. यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून लांब राहत आहेत. यामुळे डीबीटी पद्धत बंद करुन पूर्वीप्रमाणे थेट वस्तू देण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी मंत्रीमहोदयांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करु.'

शिक्षक बदली प्रक्रिया मे महिन्यातच

शिक्षक बदलीची प्रक्रिया वर्षभर गाजत असते. या प्रश्नावर बोलताना पक्षप्रतोद उमेश आपटे म्हणाले, 'शिक्षक बदलीची संपूर्ण प्रक्रिया ही मे महिन्यात पूर्ण झाली पाहिजे यासाठी धोरण ठरवू. बदली प्रक्रियेत घोळ झाला म्हणून वर्षभर जिल्हा परिषदेत कुणालाही हेलपाटे मारायला लागू नयेत. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शिक्षक अध्यापनाचे काम पूर्ण क्षमतेने करू शकतील. नव्या धोरणाची निश्चित अंमलबजावणी केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाणून घेऊया दुर्मिळ अन् औषधी वनस्पती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागाने विकसित केलेल्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतीच्या बॉटॅनिकल गार्डन येथे महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने सोमवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता 'वॉक थ्रू लिड बॉटॅनिकल गार्डन' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 'मटा' चे वाचक, बॉटनीचे विद्यार्थी, युवक आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

वनस्पती विभागाने ४२ एकरमध्ये दुर्मिळ वनस्पती रुजवून विकसित केल्या आहेत. त्यामध्ये सेक्शन प्लँट, फॉमिली मेंबर, हर्बेरियम या विभागात ४० हजार वनस्पतींच्या पेशींचे संवर्धन केले आहे. तसेच काही वनस्पतींसाठी वेगवेगळे प्लॅाटस् तयार केले आहेत. नेचे वर्गीय वनस्पतीतील ७८१ तर बुरशी विभागात ५८० जातीच्या वनस्पती आहेत. सपुष्प वनस्पती गटात ८५० प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत. आर्किड फुलांची नर्सरी तयार करण्यात आली असून ९० प्रकारांच्या फुलाची रोपे पहायला मिळणार आहेत. तसेच फुलांच्या १८० जातींची झाडे आहेत.

भारतातील सर्व जातींचे पाम एकाच ठिकाणी पहायला मिळणार आहेत. अंदमान निकोबारसह 'सेंच्युरी पाम' या जातीसह ५५ प्रकारची पामची झाडे विकसित करण्यात आली आहेत. त्सुनामीमुळे खारफुटी वनस्पतीला महत्व असून २७ प्रकारच्या वनस्पती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच गवताचे २० प्रकार पहायला मिळतील. व्हिक्टोरिया लिली हे झाडही पहायला मिळणार आहे.

वनस्पती विभागाने १२ एकर आणि भाषा भवन येथे २० एकरवर उद्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये वायर हाउस, पॉली हाउस, ग्लास हाउस, वॉटर टँकरची उभारणी केली आहे. त्यासाठी दोन विहिरींतून पाणी पुरवठा केला जातो.

'मटा' तर्फे आयोजित नेचर वॉकमध्ये दुर्मिळ वनस्पती, त्यांची माहिती, त्या कशा विकसित केल्या जातात तसेच त्यांचे महत्व आणि बाजारपेठेतील स्थान यांची माहिती मिळणार आहे. विभाग प्रमुख वर्षा जाधव (राठोड) यांच्या नेतृत्वाखाली प्रोफेसर एस.आर. यादव, निरंजना चव्हाण, प्रो. एस.एस. कांबळे, डी.के.गायकवाड, एन.बी. गायकवाड, प्रो. एस.जी घोणे, डॉ. आर.व्ही.गुरव, डॉ. एम.एम. लेखक, डॉ. कल्याणी पवार, डॉ. एम.एस. निंबाळकर यांच्यावतीने नेचर वॉकमध्ये माहिती दिली जाणार आहे. नेचर वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सतीश घाटगे (८५५२९६९१९१), अदित्य सरनाईक (९७६७८९०६२६) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिषेक जोशी यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र राज्याच्या ६० व्या कला प्रदर्शनातील निवडक कलाकारांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कोल्हापूरचे युवा चित्रकार अभिषेक जोशी यांना हा सन्मान मिळाला. रोख ५० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात राज्यातून पाचशेहून अधिक कलाकृतींमधून २३४ कलाकृतींची निवड करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील १५ चित्रकारांची पुरस्कारासाठी निवड झाली असून जोशी यांना यामध्ये स्थान मिळाले आहे. मुद्राचित्र या विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला. जोशी हे देवरूख येथील आर्ट अँड डिझाइन येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापुरातील कलामंदिर येथून त्यांनी कलेचे शिक्षण घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पांडुरंगाची कृपेने वाचलो’

$
0
0

'पांडुरंगाची कृपेने वाचलो'

पंढरपूर :

'पुत्रता एकादशी दिवस मी पंढरपुरात होतो. मठातून एका कार्यक्रमासाठी पहाटे निघणार होतो. पण, रात्रीच निघालो आणि पांडुरंगाच्या कृपेने वाचलो, अन्यथा बाजीराव जगताप याने मला ही मारले असते,' असा धक्कादायक खुलासा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी 'मटा'शी बोलताना केला.

बंडातात्या म्हणाले, 'पुत्रदा एकादशी निमित्त सोमवारी मी पंढरपूरमध्येच होतो. दुसऱ्या दिवशी मला कार्यक्रमाला जायचे असल्याने सुरुवातीला पहाटे निघायचे नियोजन होते. पण, मी रात्रीच निघालो. रात्रीच निघून गेल्याने आज मी तुमच्या समोर उभा आहे. केवळ पांडुरंगाच्या कृपेच मी वाचलो आहे. माझी झोप खूप शांत असते, हे आरोपी बाजीरावाला चांगले माहित होते. त्या दिवशी मुक्काम केला असता तर झोपेतच त्याने मलाही मारले असते.'

पंढरपुरातील कराडकर मठाचे मठाधिपती पिसाळ यांच्या निर्घृण हत्येनंतर पहिल्यांदाच बंडातात्या यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. ही घटना वारकरी संप्रदायातील काळा दिवस असला तरी आता पुन्हा अशी घटना कधीही संप्रदायात घडणार नाही, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. या वेळी पिसाळ यांच्या आठवणीने बंडातात्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. एका हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी बाजीराव याला कराडमधून हद्दपार केले होते. त्यावेळी ट्रस्टने त्याला कराडसोबत आळंदी व पंढरपूर मधूनही हद्दपार करण्याची मागणी न्यायालयात करायला पाहिजे होती. तसे केले असते तर पिसाळ यांचा जीव वाचला असता, असेही बंडातात्या म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय लोकअदालत

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले, दाखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांना आपल्या प्रि लिटीगेशनच्या केसेस या लोकअदालतीमध्ये ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य कागदपत्रासह ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ यांची गुगली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमदार पी.एन. पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा करण्याची घोषणा केली असताना मंत्री मुश्रीफ यांनी पी.एन, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आपण एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगून गुगली टाकली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुश्रीफ आणि पी.एन. केंद्रस्थानी राहण्याचे संकेत मिळत आहेत.

गोकुळच्या निवडणुकीत पी.एन आणि आमदार महादेराव महाडिक यांनी सत्ताधारी संचालक मंडळाला पाठिंबा मिळावा यासाठी मुश्रीफ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीला जादा दोन जागा सोडण्याची ऑफर दिली आहे. पण मुश्रीफ यांनी सत्ताधारी गटातील पी.एन, सतेज पाटील यांची आघाडी केली जाईल, अशी गुगली टाकली आहे. त्यामुळे पी.एन. आणि मुश्रीफांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

गोकुळची निवडणूक पी.एन, महाडिक विरोधात सतेज पाटील या दोन गटात होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून ठराव गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सत्ताधारी गटाला मुश्रीफांचा पाठिंबा मिळावा यासाठी पी.एन. पाटील यांनी मुश्रीफांची भेट घेण्याचे जाहीर केले आहे. नुकतेच दोन दिवसापूर्वी मुंबईत एक दिवसीय विशेष अधिवेशन झाले. यावेळी आमदार पाटील यांनी मुश्रीफांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या बैठकीत गोकुळसह, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवर चर्चा झाली. जिल्हा बँक, गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. जिल्हा परिषदेत काँग्रेसला आणखी एक पद मिळावे, अशी मागणी पी.एन.पाटील यांनी केल्याची चर्चा आहे. काँग्रेसने बांधकाम समिती सभापतीची मागणी केली असून या पदासाठी आमदार पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

....

चौकट

मोठ्या घडामोडी होणार

जिल्हा परिषद विशेष समिती सभापती निवड प्रक्रिया १६ जानेवारीला होणार असून त्यानंतर मुश्रीफ आणि पी.एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पी.एन. पाटील यांच्या संपर्क साधला असता त्यांनी मुश्रीफ यांची मुंबईत भेट झाल्याचे सांगितले. गोकुळची निवडणक प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असून या निवडणुकीत मोठ्या घडामोडी होणार आहे. त्यामुळे पुढील काळात मुश्रीफांसोबत अनेकवेळा बैठक घ्याव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँक आणि गोकुळच्या निवडणूका एकत्र असल्याने दोन्ही संस्थावर महाविकास आघाडीची सत्ता असावी यावर चर्चेंच्या फेऱ्या झडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरनर्तनाने बहरला मंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऐश्वर्या कडेकर,नीता कुलकर्णी मुतालिक यांचे शास्त्रीय गायन व मंजिरी हसबनीस यांचे कथक नृत्य यांच्या संगमावर रंगलेल्या 'स्वरनर्तन' या कार्यक्रमाने संगीत महोत्सवाचा मंच बहरला. आज महोत्सवाचा समारोप असून स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

दि एज्युकेशन सोसायटीतर्फे मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे राम गणेश गडकरी सभागृहात सुरू असलेल्या संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही रसिकांना सांस्कृतिक पर्वणी मिळाली.यावेळी शुक्रवारी दिवसभर १५ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांसाठी राज्यस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा रंगल्या.

ऐश्वर्या कडेकर यांनी शास्त्रीय गायनामध्ये मधुकल्याण हा सायंकालीन राग सादर केला. ए ओ नंदलाल हा त्रितालातील बडा ख्याल सादर केला. मोसे रार करत गिरीधारी हा ख्याल सादर करत त्यांनी रसिकांची मनं जिंकली. छा रही काली घटा हा गझलनुमा दादरा पेश केला. अजपा जाप जपो भाई साधो या कबीर यांच्या भजनाने त्यांनी आपल्या मैफलीची सांगता केली.

नीता कुलकर्णी मुतालिक यांनी राग नंदमधील ख्यालगायनाने मैफलीच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात केली. त्यानंतर द्रुत एकतालातील 'आजा रे बालमवा' व तराना सादर केला. 'बनके चलो दोनो भाई' या उपशास्त्रीय रचनेवर त्यांनी स्वर आळवले. 'म्हारे घर आओजी' या मीरा यांच्या भजनाने त्यांनी मैफलीचा समारोप केला.

आशय कुलकर्णी यांनी तबला तर सौरभ शिपूरकर यांनी संवादिनी साथ दिली. सचिन जगताप यांनी बासरी, केदार गुळवणी यांनी व्हायोलीन व गीता मनवाडकर यांनी स्वरसाथ दिली. माहेश्वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

मंजिरी हसबनीस यांनी कथक नृत्यामध्ये दुर्गास्तुती, त्रिताल अभिसारीका, स्वाधीनपतिका या मुद्रा सादर केल्या. मैफलीच्या अखेरच्या सत्रात तबला व कथक यांची जुगलबंदी रंगली.

आज महोत्सवात

सकाळी ९ ते सायंकाळी ५: राज्यस्तरीय नाट्य व भावगीत गायन स्पर्धा

सायंकाळी ६.०० : मर्मबंधातली ठेव हा प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी महापौरांशी चर्चा

$
0
0

कोल्हापूर

उपशहर अभियंता रमेश मस्कर यांना नगरसेवक अशोक जाधव यांनी केलेल्या शिवीगाळीनंतर अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार होती. पण मारहाणीच्या घटनेनंतर ही नियोजित बैठक सोमवारी (ता.१३) दुपारी १२ वाजता स्थायी समिती सभागृहात होणार आहे. 'कामबंद आंदोलनामुळे राजर्षी शाहू समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीवर कोणताही परिणाम होणार नाही.' अशी माहिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ८

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले, दाखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांना आपल्या प्रि लिटीगेशनच्या केसेस या लोकअदालतीमध्ये ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य कागदपत्रासह ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजरीला मागणी वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाजारपेठेला भोगी, मकर संक्रातीची चाहूल लागली असून किराणामालाच्या दुकानात बाजरी, राळ्याचा तांदूळ, तीळ, तिळगूळ, तिळ्याच्या वड्यांना मागणी वाढली आहे. खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ झाली आहे.

मंगळवारी (ता. १४) भोगी तर बुधवारी (ता. १५) मकर संक्रातीचा सण आहे. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर किराणामालाच्या बाजारात बाजरी, राळ्याच्या तांदळाला मोठी मागणी आहे. बाजरीचा दर प्रतिकिलो ३० ते ३२ रुपये असून बाजरीचे पीठ प्रतिकिलो ४० रुपयांनी विकले जात आहे. हे पीठ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. भोगी दिवशी राळ्याचा भात खाल्ला जातो. राळ्याच्या तांदळाचा दर प्रतिकिलो १०० रुपये असून ग्राहकांकडून किमाना २५० ग्रॅम तांदूळ खरेदी केला जातो. संक्रातीसाठीच्या पदार्थांत तिळाचा वापर केला जातो. सध्या तिळाचा दर प्रतिकिलो १८० ते २०० रुपये आहे. त्याचबरोबर तीळगूळ, तिळाच्या वड्या, लाडूंना मागणी आहे.

तिळगुळाचा दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये असून निळाची वडी आणि लाडूचा दर प्रतिकिलो २०० ते २४० रुपये आहे. गुळालाही मागणी वाढली असून प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये दर आहे. सरकी आणि शेंगतेलाच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ झाली आहे. सरकीचा दर प्रतिकिलो १०६ तर शेंगतेलाच दर १३६ रुपये झाला आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३८

शेंगदाणा : १२०

मैदा : ३२

आटा : ३४

रवा : ३४

गूळ : ४५ ते ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९६

मूगडाळ :, ९२ ते ९६

उडीद डाळ : १३०

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६८

मसूर : ७० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६ ते १००

काळा वाटाणा : ६८ ते ७२

मूग ९२

मटकी : १२०

छोले : ९५ ते १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४४ ते ५४

गहू : २८ ते ३६

हायब्रीड ज्वारी : ४० ते ४२

बाजरी : ३० ते ३१

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३६

सरकी तेल : १०६

खोबरेल : २४०

सूर्यफूल : १०५ ते १०८

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८० ते २००

जिरे : २८०

खसखस : ९०० ते १४००

खोबरे : १८०

वेलदोडे : ५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओंचा रस्ता सुरक्षा सप्ताह सोमवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक परिवहन कार्यालयात(आरटीओ) राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी (ता. १३) खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. रस्ता सुरक्षा रथ म्हणून दालमिया ग्रुपची आधुनिक बस, ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांबाबत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाहतूक नियमांच्या माहिती पत्रकाचे वाटप, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, आरोग्य तपासणी, प्रथमोपचार आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १७) धैर्यप्रसाद हॉल येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदार गटाला पदांची लॉटरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या समीकरणात महाविकास आघाडीने सर्वच समित्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सदस्यसंख्या ४३ पर्यंत वाढवली. सदस्यांना सहलीवर पाठविले. दुसरीकडे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेली भाजप आघाडी अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाही. सभापतिपदाच्या निवडणुकीबाबत पक्षात सामसूम आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळचे २४ सदस्य समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत टिकवताना दमछाक होणार आहे. अन्य काही सदस्यही गैरहजर राहतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजप आघाडीची पिछेहाट होताना दिसत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभूत शिवसेनेच्या माजी आमदारांच्या गटाला समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत पदांची लॉटरी लागणार आहे. महाविकास आघाडींतर्गत चारपैकी तीन पदे शिवसेनेला मिळतील. शिवसेनेचे दहा सदस्य असल्यामुळे त्यांच्यामध्येच पदासाठी रस्सीखेच आहे. महाविकास आघाडीने सदस्यांना सहलीवर पाठविल्यामुळे कोणाला संधी द्यायची याचा फैसला १५ जानेवारी रोजी होईल.

सोळा जानेवारी रोजी समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक होईल. महाविकास आघाडीकडे ४३ सदस्य आहे. याउलट भाजप आघाडीकडे २३ सदस्य आहेत. या आघाडीचा एका सदस्य कमी झाला आहे. भाजपसोबत राहिलेले चंदगड विकास आघाडीचे सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी आता महाविकास आघाडीला पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे सर्व सदस्य महाविकास आघाडीत आहेत. शिवसेनेच्या वाट्याला तीन पदे आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार संजय घाटगे गट अडीच वर्षे भाजपसोबत होता. नरके गटाचे सदस्य सर्जेराव पाटील यांना उपाध्यक्षपद तर घाटगे गटाचे सदस्य अंबरिश घाटगे यांना शिक्षण समिती सभापतिपद मिळाले होते. आता शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील गटाला पदाची संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. नरके गटाचे तीन सदस्य आहेत. त्यांनी समाजकल्याण समितीवर दावा सुरू केला आहे. उल्हास पाटील गटाच्या सदस्या स्वाती सासने व नरके गटाच्या सदस्या मनीषा कुरणे, कोमल मिसाळ यांच्यामध्ये स्पर्धा आहे.

तिढा 'बांधकाम' आणि 'शिक्षण'चा

बांधकाम आणि शिक्षण सभापतिपदावरुन महाविकास आघाडीत तिढा आहे. बांधकामसाठी शिवसेनेचे सदस्य हंबीरराव पाटील, आकांक्षा पाटील व प्रविण यादव यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. शिक्षण समितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. संघटनेच्या सदस्या पद्माराणी पाटील यांना संधी मिळू शकते. शिवसेनेतील मिणचेकर गटाने 'बांधकाम'पदी संधी मिळाली नाही तर शिक्षण सभापतिपद हवे अशी भूमिका घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याच्या कारणावरुन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची पुण्यात बैठक झाली. बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीला तेरा संचालक हजर होते. संचालिका वर्षा उसगावकर अनुपस्थित होत्या. दरम्यान, सदा पाटील यांचेही सभासदत्व रद्द केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सभेत व्यासपीठावर येऊन गोंधळ घातलेल्या सभासदांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. सभेचे व्हिडीओ चित्रीकरण पाहून ज्यांनी गोंधळ घातला त्यांना नोटीस बजावली जाईल. समाधानकारक खुलासा नसेल तर संबंधितावर कारवाई करू असे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

महामंडळाची १५ डिसेंबर रोजी सभा झाली होती. तत्पूर्वी २०१४ मध्ये अष्टेकर यांच्या विरोधात अभिनेत्री सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांपूर्वी कोर्टाने अष्टेकर यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. खोटा गुन्हा दाखल करुन बदनामी केली म्हणून अष्टेकर यांनी सर्वसाधारण सभेत विषय उपस्थित केला. याप्रश्नी सांगावकर, अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यावरून सभेत गोंधळ झाला होता.

मिलिंद अष्टेकर यांचा विषय न्यायप्रविष्ठ होता. त्यांनी या विषयावरुन सर्वसाधारण सभेला वेठीस धरायला नको होते. त्यांनी सभेत जो गोंधळ घातला, त्यामुळे राज्यातून आलेल्या सभासदांचे महत्वाचे प्रश्न बाजूला राहिले. अष्टेकरांनी वैयक्तिक कारणासाठी गोंधळ घातल्यामुळे सभासदांत नाराजी निर्माण झाली. याबाबच ८०० सभासदांचे पत्र महामंडळाकडे आले आहे. भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत, शिस्त लागावी यासाठी त्यांचे सभासदत्व रद्दचा निर्णय घेतला.

- मेघराज भोसले, अध्यक्ष चित्रपट महामंडळ

माझ्यावरील कारवाईमागे राजकारणाचा वास येत आहे. जो आरोप झाला, त्याप्रश्नी ट्रायल कोर्ट आणि सत्र न्यायालय या दोन्ही कोर्टांनी मला निर्दोष सोडले. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करावे व मला न्याय मिळावा म्हणून महामंडळाच्या अध्यक्षांकडे व सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला. त्यामध्ये माझी काय चूक झाली?

- मिलिंद अष्टेकर, माजी उपाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही करणार पर्यावरण संवर्धन

$
0
0

फोटो अर्जुन टाकळकर

...........

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल

कोल्हापूर

पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी इतरांमध्येही जागृती करू, असा संकल्प संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास स्कूलमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हात पुढे करत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'पृथ्वीरक्षण'उपक्रमात विद्यार्थीही पुढे सरसावले. या उपक्रमावेळी शाळेचे मैदान विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. संभाजीनगर, गजानन महाराजनगर, रामानंदनगर, जरगनगर, मंगळवार पेठ, जवाहरनगर, गड मुडशिंगी, उचगाव आणि वडणगे येथील मुले येथे शिकायला आहेत. प्राचार्या श्रीमती शिवानी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्रीराम जाधव आणि इतर शिक्षकांनी नियोजन केले. शिक्षक अभय बकरे यांनी शपथ दिली. विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात, हात पुढे करत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

.. .. ..

शालेय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयक धडे दिले जातात. 'पृथ्वीरक्षण' उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याच्या जाणीवा आणखी प्रगल्भ होतील. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येकाने 'निसर्ग वाचवू या'साठी कटिबद्ध झाले पाहिजे.

श्रीराम जाधव, पर्यवेक्षक

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुणांनी सत्याच्या बाजूनी उभे राहावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तरुणांनी चळवळीत सहभागी होणे ही काळाची गरज बनली आहे. आपण सत्तेच्या बाजूनी नव्हे तर सत्याच्या बाजूंनी उभे राहिले पाहिजे. वर्तमानाला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहण्याची क्षमता हवी,' असे मत हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'राज्यशास्त्रातील समकालीन समस्या'या चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने, महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३७ वे संयुक्त अधिवेशन घेण्यात आले. वि. स. खांडेकर भाषा भवन येथे चर्चासत्र झाले.

नायकवडी म्हणाले, 'आज राज्यासमोर व राष्ट्रासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या घटना नागरिकांशी निगडीत आहेत. त्या प्रश्नांचा नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा वर्तमान राजकारणांशी जवळचा संबंध आहे. यामुळे वर्तमानाला सत्याच्या बाजूने तपासून पाहिले पाहिजे.'

परिषदेच्या समोरापाला ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा बी. बी. पाटील, डॉ. भालबा विभूते, प्राचार्य प्रमोद पवार, डॉ. विलास आवारी, प्राचार्य मनोहर पाटील, प्राचार्य पी. डी. देवरे, डॉ. भारती पाटील आदी व्यासपीठावर होत्या. प्राचार्य डॉ. सिकंदर जमादार यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले.

३८ व्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र भणगे

महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३८ वे अधिवेशन जवाहरलाल नेहरू कॉलेज औरंगाबाद येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या संमेलनाध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चेंबर ऑफ कॉमर्स’च्यानिवडणुकीत ५० अर्ज वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, आज शनिवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी २३ जागांसाठी ५३ अर्ज दाखल झाले. छाननी प्रक्रियेत तीन अर्ज बाद झाले असून एकूण ५० अर्ज वैध ठरले. २२ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून १६ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीसाठी ५४ जणांनी अर्ज नेले होते. शनिवारी, अंतिम दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ५३ अर्ज दाखल झाले. साधारण सभासद, व्यापारी संस्था गटातील १० जागांसाठी २८ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी सुरेश हंसराव ओसवाल यांचे दोन्ही अर्ज बाद ठरले. याच गटातील बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांचे दोनपैकी एक अर्ज बाद ठरला. या गटात २५ अर्ज वैध ठरले आहेत. संलग्न सभासद गटातून पाच जागांसाठी आठ अर्ज, औद्योगिक संस्थातून पाच जागांसाठी ११, कार्पोरट सभासद गटातून दोन जागांसाठी तीन तर सह आणि मानद सभासद गटातून एक जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या याद्या तातडीने द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक विकास सेवा संस्थांनी तयार केलेल्या कर्जमाफीच्या याद्या तातडीने द्याव्यात असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. सेवा संस्थांनी याद्यांची माहिती दिल्याशिवाय सरकारला नियमित खातेदारांना लाभ देण्यासंदर्भातील निर्णय घेता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजयोजनेमध्ये नियमित खातेदारांना थकीत खातेदारांना प्रमाणेच लाभ मिळावा. तसेच योजनेमध्ये मध्यम मुदत व खावटी या कर्जाचा समावेश करावा आणि नियमित शेतकऱ्यांनाही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी, अशी मागणी सेवा संस्थांच्या सचिवांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्या शासन स्तरावर मांडण्यात येतील व त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.'

जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे म्हणाले, 'ज्या शेतकरी सभासदांची माहिती प्रथम सादर केली जाईल, त्यांना प्रथम लाभ मिळणार आहे. त्यामुळे सचिव आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या याद्यांची माहिती तातडीने तपासणीसाठी द्यावी.'

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. डी. माने, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील, गट सचिव संघटनेचे पदाधिकारी संभाजी चाबूक, दत्ता पाटील, संभाजी पाटील, बाजीराव पाटील, तालुका सहाय्यक सचिव, बँकेचे विभागीय अधिकारी आणि शाखा निरीक्षक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड सोमवारी (ता. १३) आणि मंगळवारी (ता. १४) हॉटेल अयोध्या येथे होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी अॅड भरत पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी सुरेश हाळवणकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तरुणांनी सत्याच्या बाजूनी उभे राहावे'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'तरुणांनी चळवळीत सहभागी होणे ही काळाची गरज बनली आहे. आपण सत्तेच्या बाजूनी नव्हे तर सत्याच्या बाजूंनी उभे राहिले पाहिजे. वर्तमानाला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहण्याची क्षमता हवी,' असे मत हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'राज्यशास्त्रातील समकालीन समस्या'या चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने, महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३७ वे संयुक्त अधिवेशन घेण्यात आले. वि. स. खांडेकर भाषा भवन येथे चर्चासत्र झाले. नायकवडी म्हणाले, 'आज राज्यासमोर व राष्ट्रासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या घटना नागरिकांशी निगडीत आहेत. त्या प्रश्नांचा नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा वर्तमान राजकारणांशी जवळचा संबंध आहे. यामुळे वर्तमानाला सत्याच्या बाजूने तपासून पाहिले पाहिजे.' परिषदेच्या समोरापाला ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा बी. बी. पाटील, डॉ. भालबा विभूते, प्राचार्य प्रमोद पवार, डॉ. विलास आवारी, प्राचार्य मनोहर पाटील, प्राचार्य पी. डी. देवरे, डॉ. भारती पाटील आदी व्यासपीठावर होत्या. प्राचार्य डॉ. सिकंदर जमादार यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. ३८ व्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र भणगे महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३८ वे अधिवेशन जवाहरलाल नेहरू कॉलेज औरंगाबाद येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या संमेलनाध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र भणगे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

प्रस्तावीत गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी आठ दिवसात नव्याने सर्वेक्षण करून त्याचा विस्तृत आराखडा राज्य शासनाकडे पाठवा अशी सूचना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केली. या योजनेच्या ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करून त्याला नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत २० गावांमध्ये टंचाईग्रस्त गावे म्हणून १० कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. काम निकृष्ट दर्जाचे असून, वर्षभराची मुदत संपूनदेखील ते रखडले आहे अशा तक्रारी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सबंधित ठेकेदाराबद्दल मांडल्या. यावर मंत्री सतेज पाटील यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत, या कामाच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याला नोटीस बजावण्याचे आदेशही दिले.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील, गांधीनगर, वळीवडे, उचगाव, पाचगाव, कणेरीसह एकूण २० गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आखण्यात आली. सुमारे २२४ कोटींचा हा आराखडा असून २०१४ मध्ये या योजनेसाठी सर्व्हे करण्यात आला. मात्र, प्रस्तावित गावांची लोकसंख्या पाहता या योजनेत काही बदल सुचविण्यात येत आहेत. या अनुषंगाने राज्यमंत्री सतेज पाटील आणि दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, योजनेत समाविष्ट गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली.

यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी साठवणुकीच्या टाकीची क्षमता वाढविण्याची मागणी केली. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा प्रस्तावीत योजनेत समाविष्ट गावांसाठी पुढील २० ते २५ वर्षांत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आराखडा तयार करावा अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता व्ही. एम. घेवडे आणि एन. बी. लोकरे यांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, उपअभियंता ए. डी. चौगले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार, बाजार समितीचे सभापती दशरथ माने आदीसह ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images