Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सेलिब्रेशनलाच गटबाजीचे ग्रहण

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet@gurubalmaliMT

कोल्हापूर : भोपळा फोडण्यासाठी विधानसभेला काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले. त्यांच्या एकीने थेट चौकार मारला. त्याचे सेलिब्रेशन सुरू असतानाच अचानक मंत्रिपदामुळे पुन्हा पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले. मंत्रिपदासाठी डावलल्याने नाराज झालेल्या आमदार पी. एन. पाटील यांचा गट आक्रमक झाल्याने जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. दबावाच्या राजकारणाने पुन्हा पी. एन. आणि राज्यमंत्री सतेज पाटील गटात पक्षाची विभागणी अधिक ठळकपणे होणार याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.

जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष गेल्या पन्नास वर्षांत गटबाजीने सातत्याने पोखरला गेला. गटबाजीचा फटका नेहमीच पक्षाला बसला. पण, त्यातून नेत्यांनी फारसा धडा घेतला नाही. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत तर गटबाजीमुळे पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत चार जागा गटबाजीने गमवाव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पक्षाचे सर्व गट एकत्र आले. तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह सर्वांनी हात उंचावत एकीची शपथ घेतली. आवाडे, जयवंतराव आवळे, पी. एन., सतेज पाटील असे अनेक गट एकत्र आल्याने पक्ष मजबूत झाला असे म्हणतानाच काही महिन्यांत आवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे विधानसभेला काही ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ पक्षावर आली.

कठीण परिस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी विधानसभेला ताकदीने आणि एकदिलाने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदाही झाला. चार जागा पक्षाच्या खात्यावर जमा झाल्या. हे श्रेय सामुदायिक होते. त्यामुळे कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना पक्षासमोर आता पुन्हा गटबाजीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एका राज्यमंत्रीपदाने जिल्ह्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. सतेज पाटील आणि पी. एन. या दोघांनी महिनाभर पदासाठी फिल्डींग लावली होती. यामध्ये सतेज यांनी बाजी मारली. राजकारणात आपल्या मागून आलेल्या नेत्याला मंत्रीपद देताना चाळीस वर्षे एकनिष्ठ राहिलो त्याची कदर न झाल्याची खंत पी. एन. यांना आहे. त्यामुळे नाराज आणि संतप्त झालेल्या या गटाने पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.

कठीण परिस्थितीत चार जागा निवडून आणल्याचे श्रेय सतेज यांना आहे. वीस वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना पी. एन. पाटील यांना पक्ष जिवंत ठेवला. पण, दिल्लीतील संपर्कात सतेज यांनी बाजी मारल्यानेच त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मंत्रीपदाने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमधील अंतर वाढणार आहे. मुळात या दोघांत गेली काही वर्षे दुरावा आहेच, पण तो फार कधी उघडपणे व्यक्त होत नव्हता. या निमित्ताने तो बाहेर पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अधिक तीव्रपणे व्यक्त होताना दिसतो. पी. एन. गटाने पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत ते शक्य नाही. हा दबावतंत्राचा भाग असणे साहजिक आहे. त्यांच्या भावनेची किमान राज्यपातळीवर दखल घेतल्यास भविष्यात त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. त्यांची नाराजी पक्षनेते कशी दूर करणार हे चार दिवसांत स्पष्ट होईल. पण या निमित्ताने गटबाजीची पक्षाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

काँग्रेसमधील गटबाजी

रत्नाप्पाण्णा कुंभार - श्रेष्ठी आण्णा

कल्लाप्पाण्णा आवाडे - बाळासाहेब माने

उदयसिंगराव गायकवाड - श्रीपतराव बोंद्रे

सदाशिवराव मंडलिक - महादेवराव महाडिक

मंडलिक - पी.एन., महाडिक गट

महादेवराव महाडिक - सतेज पाटील

जयवंतराव आवळे - कल्लाप्पाण्णा आवाडे

पी. एन. पाटील - सतेज पाटील

पी. एन. पाटील - आवाडे गट

भरमू पाटील - नरसिंगराव पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपला धडकी भरवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे स्वागत जंगी करण्यासाठी तिन्ही पक्षांचे झेंडे, स्वागत कमानी, फलक लावण्यासह लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढली जाईल. भाजपच्या पोटात धडकी भरवू असा निर्धार प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. मंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने संयुक्त बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील- यड्रावकर हे तिघेही शुक्रवारी (ता. ३ जानेवारी) प्रथमच कोल्हापुरात येत आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन बैठकीत ठरले. सकाळी दहा वाजता ताराराणी चौकात प्रथम महापौर व आघाडीच्या आमदारांच्या उपस्थितीत तिन्ही मंत्र्यांना कोल्हापुरी फेटे बांधण्यात येणार आहेत. तेथून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, फुलांनी सजवलेल्या वाहनातून मंत्र्यांची मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दसरा चौकात जाहीर सभेनंतर मिरवणुकीची सांगता होईल. नंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन मंत्री अभिवादन करतील. तेथून अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन मंत्री सतेज पाटील काँग्रेस कमिटीत थांबतील. तर मंत्री हसन मुश्रीफ हे कागल तर मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळसाठी रवाना होणार आहेत.'

महापौर अॅड. लाटकर म्हणाल्या, 'न भूतो न भविष्यती असे स्वागत तिन्ही मंत्र्यांचे केले जाईल. त्यासाठी शहरात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम करायला हवे.'

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, 'तालुक्यातील स्वागताचे कार्यक्रम पुढे ढकलावे. येथील स्वागताच्या तयारीसाठी सर्वांनी जबाबदारी उचलावी.'

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागतासाठी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमणार असून जंगी मिरवणूक काढण्यात येईल. त्यासाठी नियोजन करावे असे सांगितले.

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याने त्याचा विचार करुन स्वागताचे नियोजन करावे. मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारल्या जातील.'

माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी जंगी स्वागताची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे, असे सांगितले. विजयसिंह मोरे यांनी कोल्हापुरातील स्वागत हे जिल्ह्याच्यावतीने असल्याने कागल व शिरोळ तालुक्यातील मिरवणुकांसाठी दुसरा दिवस निवडावा अशी सूचना केली. काँग्रेसचे नगरसेवक तौफीक मुल्लाणी यांनी भाजपला धडकी भरवणारे स्वागत करण्याचे नियोजन सर्वांनी करावे, असे सांगितले. प्रताप माने व आदिल फरास यांनी नियोजनासाठी प्रत्येक पक्षातील प्रमुखांच्या वेगवेगळ्या समिती नेमा. त्यांच्यावर जबाबदारी सोपवा असे सांगितले.

यावेळी गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, दुर्वास कदम, प्राचार्य महादेव नरके, रावसाहेब भिलवडे, सरला पाटील, अनिल घाडगे, शिवाजीराव जाधव, भरत रसाळे, विक्रम जरग यांनीही सूचना केल्या. बैठकीस स्थायी सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर सागर चव्हाण, शिवसेनेचे सुजीत चव्हाण, पी. जी. शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन संकल्प - प्रशांत गायकवाड

$
0
0

प्रदूषण रोखण्यास प्राधान्य

उद्योग, महापालिका, नगरपालिका व गावांच्या माध्यमातून समोतल साधून स्वच्छ पर्यावरण जिल्ह्याला देण्याचा नववर्षात प्रयत्न राहील. विशेषत: पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याचे शंभर टक्के नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न राहील. त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्यामार्फत १३९ गावातील सांडपाण्याचे नियोजन करून नदीचे प्रदूषण रोखणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक सशक्त करण्याची पाठपुरावा करण्याबरोबरच जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजनाला प्राधान्य देणार आहे. कचरा प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटके यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर येथील शिवानी ढेरे-कटके यांना शिवाजी विद्यापीठाने संगीत विषयातील पीएचडी जाहीर केले आहे. त्यांनी सादर केलेल्या 'उपशास्त्रीय संगीत विविध गीतप्रकारांचा निवडक दहा गायिकांच्या आधारे केलेला अभ्यास' या विषयावरील प्रबंधाला पीएचडी मिळाली. त्यांना डॉ. अंजली निगवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिवानी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण केएमसी कॉलेजमधून घेतले आहे. तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागातून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हात वर करुन मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी हात वर करुन मतदान होणार आहे. आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता निवडणुकीसाठी आयोजित विशेष सभा होत आहे. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, बुधवारी पीठासन अधिकारी नावडकर व पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दोन्ही गटांनी कमालीची प्रतिष्ठेची बनवली आहे. या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त मागिवला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. दुपारी दोन वाजता अध्यक्ष निवडणुकीसाठी आयोजित सभेला सुरुवात होईल. अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ राहील. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.

पीठासन अधिकाऱ्यांकडून निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे नाव वर्णानुक्रमे घोषित केले जाईल आणि हात वर करुन मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, गुरुवारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीठासन अधिकारी नावडकर, पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणुकीच्या दरम्यान जि.प.प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागविला आहे. राजर्षी शाहू सभागृहात सभा होत आहे. निवडणूक प्रक्रियेचे काम सुलभ व्हावे म्हणून सदस्यांची बैठक व्यवस्था सात विभागात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसा मोठा की पक्षनिष्ठा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणाचे आदर्श म्हणून पी. एन. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तरीही त्यांना मंत्रिमंडळात डावलले. पाटील हे आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले ही त्यांची चूक झाली का? नेमके कशाच्या आधारावर मंत्रिपदे देण्यात आली, पक्षनिष्ठेपेक्षा पैसा मोठा आहे का? हे आम्हाला कळू दे. तसे असेल तर सांगा, आम्ही घरेदारे विकून पैसे देतो,' असा सवाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडीत आयोजित केलेल्या मेळाव्यात केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ढवण, काँग्रेसचे करवीर तालुका सरचिटणीस प्रवीण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर टीकेची झोड उठवली.

गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, 'चार वेळा पराभूत होऊनही पी. एन. पाटील यांनी पक्षनिष्ठा कधी ढळू दिली नाही. मंत्रिपदात डावलल्याने त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे. राजकारणात उपद्रव लागतो. तोच पाटील यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना गृहीत धरले जाते. आता उपद्रवमूल्य वाढविण्याची गरज आहे.'

मेळाव्याचे अध्यक्ष, भोगावती कारखान्याचे व्हाइस चेअरमन उदयसिंह पाटील म्हणाले, 'राज्याच्या आणि केंद्राच्या नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी आमदार पाटील यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. नाहीतर कार्यकर्ते पेटून उठतील. जिल्ह्याचा सारीपाट बदलण्याची ताकद पाटील यांच्यात आहे.

प्राचार्य राजेखान शानेदिवाण म्हणाले, 'पाटील यांना मंत्रीपद का मिळाले नाही याचे उत्तर पक्षाने दिले पाहिजे. पाटील यांनी आत्मसन्मानाशी तडजोड करू नये.'

गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे म्हणाले, 'गेली ४० वर्षे पक्षाची प्रामाणिक सेवा करणाऱ्या नेत्याला न्याय दिला गेला नाही. दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली वाऱ्या करणाऱ्या पक्षाच्या दलालांनी जी कारस्थाने केली, त्याचा आम्ही निषेध करतो.'

पी. जी. शिंदे म्हणाले, 'कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र, रास्त आहेत. पाटील यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावू नका. जे सामर्थ्य आहे, त्यातून संघर्ष करा आणि योग्यवेळी ताकद दाखवा.'

जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे म्हणाल्या, 'पाटील यांच्यासारख्या पक्षनिष्ठ नेत्याबाबत जे पक्षाने केले, ते निंदनीय आहे. जनशक्तीविरुद्ध धनशक्तीचा विजय झाला आहे.'

करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहील की नाही अशी स्थिती होती. अशावेळी जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेत पाटील यांनी पक्षाला उभारी दिली. गांधी घराण्यावरील त्यांची निष्ठा ढळली नाही. तरीही पक्षाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे.'

राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, सभापती आश्विनी धोत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. सुनील खराडे, बुद्धीराज पाटील, भारत पाटील, संदीप पाटील, शामराव सूर्यवंशी, दादू कामिरे, सुधाकर साळुंखे, विजय भोसले आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वागत केले. मेळाव्यास गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, सुप्रिया साळुंखे, गोकुळचे संचालक बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटील, डॉ. के. एन. पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, संभाजी पाटील, शशिकांत आडनाईक, शामराव गोधडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उपाध्यक्षपद, आमदारकी सोडा

'पक्षाला जर ४० वर्षांची पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा दिसत नसेल तर पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा. त्यापुढे जावून पक्षालाही रामराम ठोकावा' असा आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी मेळाव्यात घेतली.

निर्णय विचारपूर्वक घ्या...

मेळाव्यात कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका मांडली. मात्र नामदेव कांबळे, राजेंद्र खानविलकर आदींनी 'भावनेच्या भरात, तडकाफडकी निर्णय घेऊ नये. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य निर्णय होऊदे. सनदशीर मार्गाने गटाची चळवळ चालू करूया', अशी संयमी भूमिका मांडली.

कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

'ज्या नेत्याने आपले आयुष्य काँग्रेससाठी वाहिले, त्या नेत्याला पक्षाने न्याय न दिल्याची बाब खेदजनक आहे. पाटील यांना मंत्रीपद डावलून त्यांच्यावर काँग्रेसने केलेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मेळावा घ्यावा लागत आहे' असे सांगत कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

जिल्हा परिषदेचे चार सदस्य उपस्थित

मेळाव्याला काँग्रेसचे राहुल पाटील, पांडुरंग भांदिगरे, शिल्पा पाटील, सुभाष सातपुते हे चार सदस्य उपस्थित होते. भांदिगरे यांनी पी. एन. पाटील हेच आमचे नेते आहेत. ते सांगतील तो निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत उमटण्याची चिन्हे आहेत.

फोटो :

आमदार पी. एन. पाटील यांच्यावर पक्षाकडून झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा ठराव हात उंचावून केला.

छाया : राज मकानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविकास आघाडीकडे मॅजिक फिगर

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाआघाडीची एकजूट झाली आहे. महाविकास आघाडीची मोट बांधल्यामुळे बहुमतासाठी आवश्यक ३४ इतकी मॅजिक फिगर पूर्ण झाल्याचा दावा नेत्यांनी केला. दुसरीकडे सत्ताधारी भाजप आघाडीकडून शेवटच्या घटकापर्यंत सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसमधील नाराज घटकांना आकर्षित करुन सत्ता समीकरणासाठी त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. दिवसभराच्या घडामोडीचे कोल्हापूर आणि बेळगाव हे केंद्र राहिले.

महाविकास आघाडीला मूर्त रुप देण्यासाठी बुधवारी दिवसभर घडामोडी वेगावल्या. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याला पी. एन. गटाचे जिल्हा परिषदेतील चार सदस्य उपस्थित राहिले आणि पी. एन. सांगतील त्या प्रमाणे पुढील राजकीय वाटचाल राहील अशी भूमिका सदस्य पांडूरंग भादिंगरे यांनी मांडली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसमधील संघर्ष उफाळला. पी. एन. गटाचे चार सदस्य निवडणुकीसाठी आयोजित सभेला गैरहजर राहिल्यास निकालावर परिणाम संभवत होता. या मेळाव्यानंतर आघाडी अंतर्गत राजकीय घडामोडी वेगावल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व मंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईवरुन सूत्रे हलवायला सुरुवात केली.

काँग्रेसकडून व्हीप लागू केल्यामुळे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील गटाचे चारही सदस्य काँग्रेस आघाडीसोबत राहतील असा विश्वास महाआघाडीतर्फे व्यक्त केला. पी. एन. गटाचे चार सदस्य गैरहजर राहिले तरी महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल असाही दावा केला. ऐनवेळी पी. एन. यांचा गट अलिप्त राहिला तर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हाराकिरी पत्करायला नको म्हणून मंत्री पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीसाठी हालचाली गतिमान केल्या. गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेत भाजपसोबत असलेले शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर यांना महाविकास आघाडीत आणले.

दुसरीकडे गोवा येथे सहलीवर पाठविलेले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांना बुधवारी सायंकाळी बेळगावमध्ये आणण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत दोन्ही मंत्र्यांनी मुंबईवरुन बेळगाव गाठले. खासदार मंडलिक यांची सदस्यांसोबत बैठक झाली. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असून महाविकास आघाडीची सत्ता येईल, या शब्दांत नेत्यांनी सदस्यांना आश्वासित केले.

.......

तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ४० पर्यंत

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वच घटक पक्षांसोबत हॉटेल नेटिव्ह येथे चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेच्या दहापैकी नऊ सदस्य हे दोन्ही काँग्रेससोबत आल्यामुळे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची बेरीज पूर्ण झाल्याचे मंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितल्याचे वृत्त आहे. शिवाय शाहू विकास आघाडीचे दोन सदस्य काँग्रेससोबत आहेत. या व्यतिरिक्त महाविकास आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन, ताराराणी विकास आघाडीतील राणी खमलेट्टी, चंदगड विकास आघाडीचे विद्या पाटील या सामील झाल्यामुळे महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही मंत्री, खासदार मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभूशेटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

......

भाजप नेत्यांची कराडमध्ये खलबते

भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी व चंदगड विकास आघाडीचे सदस्य हुबळी येथे सहलीवर गेले होते. बुधवारी सायंकाळी सगळे सदस्य कराडमध्ये पोहचले. भाजपचे १४ सदस्य आहेत. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा सदस्य कराडमध्ये दाखल झाले. शिवाय शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, ताराराणी आघाडीच्या सदस्या सुनीता रेडेकर, रेखा हत्तरकी, चंदगड विकास आघाडीचे सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण हे भाजप आघाडीसोबत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी सदस्यासोबत चर्चा केली. भाजप आघाडीकडे २६ सदस्य संख्या आहे.

....

पी. एन. गटाचा निर्णय

आज सकाळी होणार

आमदार पी. एन. पाटील गटाचे चार सदस्य आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे पाटील गट नाराज आहे. या गटाचे सदस्य राहुल पाटील, पांडूरंग भादिंगरे, सुभाष सातपुते, शिल्पा पाटील या चारही सदस्यांनी पी. एन. पाटील सांगतील त्याप्रमाणे पुढील धोरण राहील असे स्पष्ट केले आहे. या गटाकडून निवडणूक प्रक्रियेत सामील होण्याबाबतचा निर्णय गुरुवारी सकाळी होणार आहे.

......

कोट

'जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील गटाचे चार सदस्य महाविकास आघाडीत सामील होतील. त्यांनी वेगळा निर्णय घेतला तरी महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी ३४ इतके सदस्य आहेत.

संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

.........

अध्यक्ष, उपाध्यक्षपद काँग्रेसला,

सभापतिपद घटक पक्षांना

काँग्रेसकडे अध्यक्ष तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना, स्वाभिमानी, अपक्ष आणि शाहू विकास आघाडीला चार समिती सभापतिपद दिले जाणार आहे. घटक पक्षांनी समिती सभापतिपदाबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. दहा, दहा महिन्यांसाठी पदाची विभागणी होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायक्रो फायनान्सची वसूली थांबवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी त्वरित व्हावी व फायनान्स कंपन्यांकडील जीवघेणी वसुली तातडीने थांबवावी या मागणीसाठी गांधीनगर येथील निगडेवाडीत (ता. करवीर) पंचगंगा नदीघाटावर जलआंदोलन करण्यासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातून आलेल्या एक हजारहून महिला आंदोलक व पोलिसांमध्ये बुधवारी सकाळी झटापट झाली. आंदोलक महिला आणि दोन महिला पोलिस जखमी झाल्या. मोठे आंदोलन होऊनही करवीरचे प्रांताधिकारी, तहसिलदारांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. याबाबत आंदोलनस्थळी निषेध करण्यात आला. तीन दिवसांत निर्णय न झाल्यास प्रसंगी जलसमाधी घेऊ असा इशारा छत्रपती महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदूम यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा महिलांनी दिला. सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीपात्रात मंडप घालून वीस आंदोलक महिला उपोषणाला बसल्या.

बुधवारी सकाळी अकरा वाजता दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली एक हजारहून अधिक महिला तावडे हॉटेलनजिक जमा झाल्या. तेथून त्या निगडेवाडीतील पंचगंगा नदी घाटावर आल्या. मंगळवारी रात्री नदीपात्रआनजिक उपोषणासाठी मंडप उभारण्यात आला. या मंडपाकडे महिला जाऊ लागताच पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक महिला व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. 'आम्हाला आंदोलन करण्यापासून हटवू नका, न्यायमार्गाने आम्हाला आंदोलन करू द्या,' अशी संतप्त भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली. त्यानंतर पोलिस अधिकारी व दिव्या मगदूम यांच्यात चर्चा झाली. प्रातिनिधिक स्वरुपात वीस महिला मंडपामध्ये उपोषण करतील असा निर्णय झाला.

रात्री उभारलेल्या मंडपाची अज्ञातांनी नासधूस केली होती. त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली आणि सायंकाळी पाच वाजता वीस महिला बेमुदत उपोषणाला बसल्या. तीन दिवसांमध्ये जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर अन्य ठिकाणी जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला.

उपोषणाला बसल्यानंतर आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये 'सरकार नाही भानावर, महिला बसल्या पाण्यावर' आणि 'एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता' अशा विविध घोषणांनी नदीपरिसर दणाणून गेला. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर, शिरोलीचे किरण भोसले, गोकुळ शिरगावचे सुशांत चव्हाण, मनीषा नारायणकर, अतुल कदम आदी पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त होता. आपत्ती व्यवस्थापनची टीम, महापालिका अग्निशमन दलाचे जवान बोटीसह हजर होते. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही तैनात होते.

उपोषणाला बसलेल्या महिला

दिव्या मगदूम, बिस्मिला दानवडे, राणी कोळी, स्वाती माणगावे, माधुरी जाधव, शीला सोनारे, सुनीता मालिकवाडी, अलका बदामे, मनीषा कुंभार, अर्चना माळगे, प्रियांका दसते, प्रमिला कांबळे, नंदा गायकवाड, बेबी सौदे, मंगल नर्ले, सूर्या मुजावर, अलमास तांबोळी, वैशाली कांबळे, राणी कांबळे, पूजा कांबळे.

बैठकीनंतरही निर्णय नाही

गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात शिरोळ येथील पूरग्रस्त आंदोलक महिलांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. पूरग्रस्त महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय झाला नाही तर प्रथम पाण्यात बसून आंदोलन करू आणि त्यानंतर तीन दिवसांनी जलसमाधी घेऊ असा इशारा दिला होता. तरीही बुधवारी, १ जानेवारीला हजारो महिलांच्या उपस्थितीत आंदोलक होऊनही प्रांताधिकारी व तहसीलदार आंदोलनाच्या ठिकाणी फिरकलेसुद्धा नाहीत. त्याचा तीव्र निषेध आंदोलकांनी केला. आंदोलकांसाठी वैद्यकीय पथक, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे स्वयंसेवकांची तजवीज पोलिसांनी केली.

फोटो ओळ

गांधीनगर निगडे वाडी (ता.करवीर ) येथील पंचगंगा नदी घाटावर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीस बंदी घालावी आणि कर्ज माफी द्यावी ,या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या महिला

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक, कोल्हापूर जिल्हापरिषदेत भाजपला धक्का; आघाडीची सत्ता

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं बदलताच भाजपचे ग्रहही फिरले आहेत. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून या दोन्ही जिल्हा परिषदेत महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आली आहे. राज्यात नवी आघाडी अस्तित्वात आल्याने जिल्हास्तरावरील राजकारणात मोठ्याप्रमाणावर बदल होत असून त्याचा फटका भाजपला बसताना दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील यांनी भाजपचे अरुण इंगवले यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. बजरंग पाटील यांना ४१ तर इंगवले यांना अवघी २४ मते मिळाली. तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या राहुल आवाडे यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत पाटील यांना ४१ तर आवाडे यांना २४ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केलं नव्हतं. तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले होते. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष’

73070240

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण ७२ सदस्यांपैकी शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे १५ आणि काँग्रेसचे ८ सदस्य आहेत.

अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस आघाडी

कॉग्रेस - १४
राष्ट्रवादी - १०
शिवसेना -१ ०
शेतकरी संघटना - ०२
शाहू आघाडी - ०२
अपक्ष - ०१
चंदगड विकास आघाडी- ०१
ताराराणी आघाडी - ०१
एकूण- ४१
__

भाजप आघाडी

भाजप-१३
आवाडे गट - ०२
चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१
जनसुराज्य - ०६
ताराराणी आघाडी ०२
एकूण- २४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत युती; सेनेच्या मदतीने भाजपने गड राखला!

$
0
0

सांगली: महाविकास आघाडीने नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला दणका दिला असला तरी सांगलीत मात्र महाविकास आघाडीच्या पदरी पराभव पडला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मदतीने भाजपने सांगली जिल्हा परिषदेचा गड कायम राखण्यात यश मिळवले आहे.

राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणाचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसू लागले आहेत. शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे ठिकठिकाणी महाविकास आघाडी एकजुटीने भाजपचा पाडाव करत आहे. आज कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता महाविकास आघाडीने उलथवून टाकली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बजरंग पाटील यांनी भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले यांचा पराभव केला तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी भाजपचे राहुल आवाडे यांना पराभूत केले. नाशिकमध्ये तर पराभव डोळ्यापुढे दिसू लागल्याने भाजपच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली व जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर हे नवे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड हे नवे उपाध्यक्ष ठरले.

नाशिक, कोल्हापूर जिल्हापरिषदेत भाजपला धक्का

सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी

सांगलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सांगलीत भाजपने शिवसेना आणि रयत क्रांतीच्या मदतीने आपला गड राखला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्राजक्ता कोरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार कलावती गौरगोड यांचा १३ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी भाजपचेच शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे विजयी झाले. ६० सदस्यीय जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल लक्षात घेता अटीतटीची लढत अपेक्षित होती. शिवसेना व रयत क्रांतीची मते निर्णायक ठरणार होती. ही मते भाजपच्या पारड्यात गेल्याने महाविकास आघाडीची सत्तांतराची व्यूहरचना बारगळली. मुख्य म्हणजे जिल्हा परिषदेतील एक जागा रिक्त असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आज मतदानावेळी गैरहजर होता. त्याचाही फटका महाविकास आघाडीला बसला. ५७ पैकी ३५ मते भाजप आघाडीच्या उमेदवारांना मिळाली. तर २२ मते महाविकास आघाडीच्या पारड्यात गेली. जिल्हा परिषदेत भाजपचे २४ सदस्य आहेत. दोन अपक्षांचा भाजपला पाठिंबा आहे. याशिवाय शिवसेनेच्या ३, रयत क्रांतीच्या ४ व घोरपडे गटाच्या दोन सदस्यांनी आज भाजपला मतदान केले.

एकनाथ खडसेंचे आरोप निराधार: गिरीश महाजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात दर्जाची प्रतीक्षा कायम

$
0
0

लोगो : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी रंगनाथ पठारे समितीने २०१३ मध्ये केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. सात वर्षे उलटूनही या प्रस्तावावर केंद्र सरकारने निर्णय घेतलेला नाही. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला आला असून, यंदा तरी या कामाला मुहूर्त लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हा दर्जा मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेचे प्राचीनत्व, वाङ्मयीन श्रेष्ठत्व आणि भाषिक व्यवहाराचे महत्त्व सिद्ध होणार आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि प्राचीन वाङ्मयाच्या आधारावर अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल २०१३ मध्ये केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीकडे पाठवला होता. साहित्य अकादमीच्या तज्ज्ञ समितीनेही यावर अभिप्राय दिला आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारची चालढकल सुरू असल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, असा पत्रव्यवहार पठारे यांनी अनेकदा केला आहे. यानंतरही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नसल्याने मराठी भाषिकांसह साहित्यिक, अभ्यासकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अभिजात दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, असा रंगनाथ पठारे समितीचा दावा आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. या भाषेतील वाङ्मयीन कलाकृती दर्जेदार आहेत. साहित्य अकादमीसह अन्य पुरस्कारांवरही मराठीतील अनेक कलाकृतींनी आपली मोहोर उमटवली आहे. प्राचीन मराठी आणि सध्याच्या मराठी भाषेचा गाभाही एकच आहे. म्हणी, वाक्यप्रचार, भाषिक रचना, अर्थछटा, दळणवळणाचे सामर्थ्य ही मराठी भाषेची शब्दसंपदा आहे. ज्ञानभाषा म्हणूनही ती आपली उपयुक्तता स्पष्ट करीत आहे. आज देश-विदेशातील अनेक भाषांनी मराठी शब्द स्वीकारले आहेत. यामुळे मराठीला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारने विलंब लावू नये, अशी अपेक्षा मराठी भाषिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास तिच्या संवर्धनासाठी मदत होईल. अन्य भाषांच्या आक्रमणातही मराठीने आपले वैभव टिकवून ठेवले आहे. सोशल मीडियातही तिचा वापर वाढत आहे. आभिजात दर्जामुळे भाषेचे वैभव आणखी वाढेल.

- प्रा. डॉ. दत्ता पाटील, अध्यक्ष, मराठी भाषा अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा धोरणाला गती हवी

$
0
0

लोगो : मटा अजेंडा

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@:sachinpMT

कोल्हापूर : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला आजही मुलभूत सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू कोल्हापूरने घडवले. मात्र राजकीय अनास्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांत असणारी उदासिनता यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला ब्रेक लागला आहे. रखडलेले विभागीय क्रीडासंकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुर्दशा, सुविधांच्या प्रतीक्षेतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, शहर आणि उपनगरांतील मैदानांची दुरवस्था असे अनेक प्रश्न नूतन वर्षात मार्गी लागावेत अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या दहा वर्षे संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची पूर्तता होणे गरजेचे आहे. यात जलतरण तलावाचे काम अधिक काळ रखडले आहे. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हवा यासाठी तज्ज्ञ वास्तूविशारदांकडून त्याचा आराखडा बनविण्यात आला. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तलावात शेजारील ओढ्यातील अशुद्ध पाणी मिसळत असल्याचे आढळून आले. तलावाची गळती रोखण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. पंचवीस बाय पन्नास मीटर असलेल्या या तलावासाठी पुन्हा नव्याने आराखडा समितीची नेमणूक करण्यात आली. गेल्यावर्षी जुलै महिन्यामध्ये आयआयटीच्या तज्ज्ञांना बोलावून तलावाची पाहणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात तज्ज्ञ अभ्यासकांच्या पथकाने तलावाची पाहणी केली. पाहणीतून निघालेल्या निष्कर्षाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. तलाव बांधण्यासाठी ७१ लाख ६९ हजार ५९६ आणि डायव्ंहिग तलावासाठी १ कोटी ५ लाख २३ हजार ३१५ रुपये खर्च आला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही बांधकामात त्रुटी राहिल्या आहेत. तलाव बुजवून तो दुसरीकडे बांधावा असाही मतप्रवाह तयार झाला होते. सरकारच्या एका खात्याने जलतरण तलावाशेजारी विहीर बांधावी, त्यामुळे क्रीडा संकुलाच्या बाहेरील बाजूच्या नाल्यातून येणारे पाणी त्या विहिरीमध्ये जमा होईल असा अजब सल्ला दिला होता. मुंबई आयआयटीकडून आलेल्या अहवालात तलाव बुजविण्यातबाबत निष्कर्ष निघाला तर वाया गेलेल्या खर्चाच्या मोठ्या रकमेबाबत कोणाला जबाबदार धरले जाणार असा प्रश्न उरतो. क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट व अतिरिक्त व्हॉलिबॉल मैदानाची गरज आहे. त्याचबरोबर खो-खो, कबड्डी या क्रीडा प्रकारासाठी मैदान सुस्थितीत हवे. संकुलात शालेय स्पर्धा होतात. त्यानुषंगाने प्राथमिक सोयी सुविधांची गरज आहे.

हॉकी स्टेडियमची अवकळा संपणार का?

शहरात मध्यवर्ती असलेल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले आहे. फुटबॉल, कुस्ती आणि क्रिकेट या खेळांच्या तुलनेत हॉकी मागे पडत असल्याचे दिसते. गुणवत्तेच्या जोरावर अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकतात. जिल्हा हॉकी असोसिएशन, महानगरपालिकेने मैदानातील प्राथमिक सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मैदानावर स्वच्छतागृहाची सोय गरजेची आहे. अॅस्ट्रो टर्फ मैदानासाठी केंद्र सरकारने ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा योग्य तो विनियोग करत यंदा स्टेडियमवर अत्याधुनिक अॅस्ट्रो टर्फ मैदान तयार केले जावे अशी अपेक्षा आहे.

मैदानांचा व्हावा विकास

महापालिकेने टाकाळा, राजोपाध्येनगर येथे बॅडमिंटन व बॉक्सिंगसाठी हॉल उभारला आहे. मात्र, तेथे खेळाडूंसाठी चेंजिंग रुम, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जलतरण तलावांसाठी अधिक निधी उपलब्ध करून, चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे. शहरातील मैदानांची दुरावस्था कायम आहे. किमान मैदानावर खेळाडूंना प्राथमिक सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मैदानांना संरक्षणाची पुरेशी सोय केली जावी, उपनगरांमध्ये मैदाने उभारण्यात यावीत अशी अपेक्षा महापालिकेकडून आहे. शिवाजी स्टेडियमसाठी जिल्ह्यातील नूतन मंत्र्यांनी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे.

संघटनांतील वाद थांबेनात

कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला ओहोटी लागण्यामागे मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव यांसह विविध संघटनांतील पदाधिकाऱ्यांत होणारे वाद कारणीभूत आहेत. केवळ वैयक्तिक लालसेपोटी होणाऱ्या वादांमुळे मोठ्या प्रमाणात खेळाचे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील दोन जलतरण संघटनांत झालेल्या वादामुळे स्पर्धांवर त्याचा परिणाम झाला होता. किमान वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून शहराच्या क्रीडा विकासासाठी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने, सामंजस्याने भूमिका घेण्याची गरज आहे.

कोट

क्रिकेटसाठी चांगल्या दर्जाचे मैदान उपलब्ध व्हावे. अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. सुविधांअभावी खेळाडूंना सरावासाठी बाहेरगावी जावे लागते. अनेकांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे पायाभूत सुविधा शहरातच उपलब्ध होतील, याकडे अधिक लक्ष दिले जावे. पालक, विविध क्रीडा संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.

- अभिनंदन गायकवाड, क्रिकेटपटू

वैयक्तिक क्रीडा प्रकारात कोल्हापुरातील खेळाडू चमकत आहेत. राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीअभावी कोल्हापूरचा क्रीडा विकास खुंटला आहे. नवीन वर्षात लोकप्रतिनिधींनी क्रीडा क्षेत्रासाठी अधिकाधिक निधी खेचून आणावा. खेळाडूंना मैदानांवर प्राथमिक सोयी, सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विभागीय क्रीडासंकुलाचे रखडलेले काम पूर्ण करावे.

- रमेश मोरे, क्रीडा अभ्यासक

यंदा प्राधान्याने विभागीय क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण केली जातील. यासाठी अपूर्ण कामांची यादी तयार केली आहे. अधिकाधिक निधी आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील आहोत. तालुक्याच्या ठिकाणी खेळाडूंना दर्जेदार मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी काम चालू आहे. वर्षभरात नवीन खेळाडू तयार व्हावेत, यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे.

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

फोटो : अर्जुन टाकळकर

लोगो : मटा भूमिका

दर्जेदार सुविधांवर भर हवा

गेल्या पाच वर्षांत स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाचे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी वगळता जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला अपेक्षित यश लाभलेले दिसत नाही. यामागे प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी मैदाने उपलब्ध नाहीत ही कारणे आहेत. कालानुरूप बदलत्या क्रीडा धोरणांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नवी पिढी मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी विविध क्रीडा संघटना, खेळाडू, राजकीय प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नव्या वर्षात मैदानांचा विकासाबरोबर खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटविण्याचा धडाका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने गुरुवारी अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम राबवली. हॉकी स्टेडियम चौकात एका हॉटेलने पार्किंगच्या जागेत बांधलेला डायनिंग हॉल जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आला. तर हॉकी स्टेडियम ते पाचगाव रस्ता व आयटीआय कॉर्नरपर्यंत अनधिकृत ४० हातगाड्या, केबिन्सवर कारवाई करण्यात आली. या रस्त्यावरील छोटी-मोठी ९ शेड, २० फलकही हटवण्यात आले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी विक्रेत्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाशी वाद घातला.

महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित असलेल्या अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवली जात आहे. मध्यंतरी फेरीवाला संघटनांनी विरोध केल्याने मोहीम थंडावली होती. बंदिस्त पार्किंगबाबतही केवळ इशारा देण्यात आला होता. मात्र गुरुवारी हातगाड्या, केबिन्स तसेच फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढत असलेल्या हॉकी स्टेडियम चौकापासून पाचगाव रस्ता व तेथून आयटीआय कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर मोहीम राबवली.

गांधी मैदान विभागीय कार्यालयाने पहिल्या टप्प्यात हॉकी स्टेडियम चौकानजिक असलेल्या तारा हॉटेलवर जेसीबी चालवला. हॉटेलने फुटपाथपासूनच संरक्षक भिंत बांधली आणि तेथे पत्र्याचे शेड उभारून डायनिंग हॉल बांधला. मुळात ही जागा पार्किंगसाठी आरक्षित होती. पथकाने हा हॉल जेसीबीने पाडला आणि भिंतही पाडून टाकली. त्यानंतर चौकातील खाद्यपदार्थांच्या अनेक हातगाड्या वाढत चालल्या होत्या. उपशहर अभियंता रमेश मस्कर व अभियंता भाईक यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांनी अनधिकृत हातगाड्या जप्तीच्या कारवाईस सुरुवात केली. त्यामुळे अनेकांनी हातगाड्या काढून घेतल्या. या रस्त्यावर अनेकांनी दुकान, हॉटेल्ससमोर पत्र्याची शेड उभारली होती. तीही जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली.

नंतर पथकाने जरगनगरकडे जाणाऱ्या रामानंदनगर ओढ्याजवळील चौकात कारवाई केली. तिथे खाद्यपदार्थांच्या अनेक अनधिकृत हातगाड्यांची रांग होती. त्यातील काही जप्त केल्यानंतर अन्य विक्रेत्यांनी हातगाड्या काढून नेल्या. त्यामुळे ओढ्यालगतची मोठी जागा खुली झाली. हातगाड्यांमुळे खरेदीला येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. यावेळी काही विक्रेत्यांशी पथकाचा वादावादी झाला. तेथून पाचगावकडे जाणाऱ्या निर्मिती कॉर्नर चौकातही काही हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. नंतर आयटीआयकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली. शिंदे अंगण कॉलनीपर्यंतच्या रस्त्याशेजारीही हातगाड्यांची रांग होती. त्यातील काही अधिकृत हातगाड्या व केबिन वगळता इतर सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. आयटीआय कॉर्नरजवळील केएमटीचा बसस्टॉप कारवाईनंतर खुला झाला होता. अनेकांनी हातगाड्या, शेड स्वत:हून काढून घेतले. अनधिकृत छोटे व मोठे २० फलकही काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही सेवक संघाची निदर्शने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी गेली दोन वर्षे प्रशासकीय पातळीवर विनंती पत्रे तसेच अनेक वेळा समक्ष चर्चा झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद दिसून येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (ता. १ जानेवारी) मुख्य इमारतीच्या पाणपोईजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. गुरूवारी, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.

प्रशासन मागण्याच्या संदर्भात वेळकाढूपणाचे धोरण घेत असल्याच्या भावनेतून कर्मचारी संघटना आंदोलन करीत आहेत. उपोषणामध्ये कार्यकारिणी सदस्य सदानंद माने, शिरीष देसाई, महेश सणगर, राजू चव्हाण, अजय आयरेकर, राम तुपे, सुरेश पाटील, डॉ. राजेंद्र खामकर व महिला प्रतिनिधी देवयानी यादव, सीमा बुवा यांचा समावेश होता. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घ्यायचे नाही अशी भूमिका घेत कर्मचारी दुपारी सुट्टीच्या वेळेत सर्व कर्मचारी उपोषणस्थळी जमा झाले होते. त्यावेळी अध्यक्ष बाबा सावंत यांनी उपोषणाची रुपरेषा व प्रशासनाबरोबर बुधवारी झालेल्या चर्चेची माहिती दिली. मात्र, मागण्यांबाबत ठोस कृती नसल्याने साखळी उपोषण दिवसभर सुरू ठेवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकापलीकडे शिकवणाऱ्या सावित्रीच्या लेकी

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यान्हीला, ज्या काळात शिक्षण घेणे ही काही वर्चस्ववादी समाजाची मक्तेदारी मानली जायची, त्या काळात मुलींनी शाळेत यावे यासाठी झटणाऱ्या, समाजाची दूषणे झेलून पहिल्या शिक्षिका बनलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८८ वी जयंती. आजही काही शिक्षिका 'आम्ही सावित्रीच्या लेकी' असे म्हणत विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडील ज्ञान देत आहेत. कुणी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचे बीज रुजवत आहे तर कुणी त्यांच्या मनातील इंग्रजीचा बागुलबुवा काढून टाकण्यासाठी नवसंकल्पना राबवत आहेत. कुणी थेट मुलांच्या बौद्धिक विकासासाठी झटत आहे तर कुणी पाठ्यपुस्तकातील धड्यांवर नाटुकली बसवून शिक्षण रंजक बनवत आहेत.

पर्यावरणाचे धडे कृतीतून

सध्या शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण, निसर्गसंवर्धनविषयी अभ्यास आहे. मात्र पुस्तकातील अभ्यासक्रम केवळ परीक्षेपुरता किंवा प्रगती पुस्तकातील मार्कांपुरता मर्यादीत राहू नये तर तो मुलांच्या दैनंदिन जीवनातही आचरणात आला पाहिजे यासाठी नसीम जमादार या शिक्षिका काम करतात. पन्हाळा येथील बुधवार पेठेतील न्यू हायस्कूलमध्ये अध्यापनासोबत त्यांचा हा अवांतर उपक्रम सुरू आहे. पर्यावरणाचे धडे कृतीतून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अध्ययनपद्धती सुरू केली आहे. यासाठी वाढदिवशी मुलांना रोप लावण्यासाठी प्रेरित केले जाते. पर्यावरणात्मक पुस्तकांचे अभिवाचन, नाटुकली या माध्यमातून त्या काम करतात.

इंग्रजी कट्ट्यावरचा आगळावेगळा वर्ग

आजही मराठी माध्यमातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी भीती आहे. ही भीती जेव्हा शाहूपुरीतील वि. स. खांडेकर प्रशालेतील शिक्षिका हेमलता पाटील यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांच्या मनात वेगळा विचार आला. दर शनिवारी व रविवारी हेमलता या इंग्रजी कट्टा भरवतात. या कट्ट्यावर मुलांना एका विषय दिला जातो, ज्यावर त्यांनी इंग्रजीमध्ये चर्चा, गप्पा मारायच्या. यातून वर्गातला तास नसल्याने मुलं मोकळेपणाने इंग्रजीशी गट्टी करू लागली आहेत. या कट्ट्यावर कधी डॉक्टर येतात, तर कधी अधिकारी. इतकेच नव्हे तर मुलांना एकमेकांच्या मुलाखती घेण्याचा उपक्रमही रंगतो.

पुस्तकातील धड्यांचे जेव्हा नाटक होते...

प्राथमिक शाळेतील मुलांना त्यांच्या वयाचे होऊन शिकवणारे शिक्षक नेहमीच आवडतात. मग वर्गात नाचत, अभिनय करत शिकवण्यासाठी शिक्षिका आघाडीवर असतात. यालाच थोडेसे वेगळे रुप देत कसबा बावडा येथील जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका माधवी जोग-सौंदलगे यांनी पुस्तकातील धडे, कविता यावर छोट्या नाट्याची निर्मिती करत अध्यापनाची कल्पना मांडली आहे. मराठी, हिंदी आणि संस्कृत हे विषय त्या याच रंजकपद्धतीने शिकवतात. यामुळे मुलांकडूनच नाटुकले बसवले जाते, यातून मुलांचे पाठांतर, उच्चार सुधारतात.

मुलांसाठी 'ब्रेनगेम'चा तास

ताराबाई पार्क येथील वर्धमान प्रबोधिनी संचलित चाचा नेहरू बालभवनच्या प्रमुख प्रेमा चौगुले यांनी मुलांना शिकवताना नेहमीच चौकटीबाहेर विचार केला आहे. केवळ मुलांच्या नव्हे तर त्यांच्या पालकांच्याही बौद्धिक गरजा व कक्षा ओळखून प्रेमा यांनी नवोपक्रमांची मालिकाच सुरू केली आहे. पेरेंट स्कूल ही संकल्पना त्यांनी रुजवली आहे. मुलांच्या बौद्धिक विकासाला खाद्य देणारे व त्यांच्यातील जिज्ञासा वाढवणारे ब्रेनगेम देतात. या खेळांमधून मुलांची विचारशक्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चौगुले यांचा ब्रेनगेमचा तास मुलांसाठी पर्वणी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाआघाडीने डाव जिंकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यामुळे नाराज झालेल्या आमदार पी. एन. पाटील गटाच्या सदस्यांची काँग्रेस पक्षासोबतची कायम राहिलेली साथ आणि दोन्ही काँग्रेस, शिवसेनेचे दहा सदस्य व अन्य मित्र पक्षांची मोट बांधत भाजप विरोधातील डाव महाआघाडीने लीलया जिंकला.

भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण इंगवले यांच्या विरोधात त्यांचेच जावई व शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी केलेले मतदान, नूतन उपाध्यक्ष सतीश पाटील व आवाडे गटाचे सदस्य राहुल आवाडे यांच्यातील खडाजंगी आणि भाजपचे सदस्य विजय भोजे यांच्या मतदानाच्या हक्कावरून त्यांची आणि काँग्रेसचे सदस्य उमेश आपटे यांच्यामधील टोलेबाजी यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठीची विशेष सभा गाजली. महाविकास आघाडीच्या एकसंधपणामुळे भाजप पूर्णत: बॅकफूटवर गेल्याचे चित्र सभागृहात दिसले.

शिवसेनेचे सदस्य बुधवारी सायंकाळी महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर टोकाची बनलेली ही निवडणूक एकतर्फी बनली. सभेला प्रारंभ होण्यास काही मिनिटे अवधी असताना दोन्ही काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षाचे सदस्य आत्मविश्वासाने, कोल्हापुरी फेटे बांधून सभागृहात दाखल झाले. त्याउलट भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या सदस्यांनी दुपारी दीड वाजता सभागृहात येऊन आसनस्थ झाले होते. पीठासन अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज छाननी दरम्यान कोणीही आक्षेप घेतला नाही पण उमेदवारी माघारीच्या दहा मिनिटांच्या कालावधीत दोन्ही आघाडीच्या सदस्यांनी एकमेकांवर शाब्दिक कोट्या केल्या. तर गेल्यावेळी अनुपस्थित असलेल्या काँग्रेसच्या रश्मी देसाई यांनी महाविकास आघाडीला मतदान केले.

आधी सासऱ्यांसाठी प्रयत्न,

मतदान मात्र महाआघाडीला

भाजपचे उमेदवार अरुण इंगवले यांच्या विजयासाठी त्यांचे जावई व शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे हे प्रयत्नशील होते. गुरुवार सकाळपर्यंत ते भाजप आघाडीसोबत सक्रिय होते. शिवसेनेचे नऊ सदस्य महाविकास आघाडीसोबत आणि घाटगे भाजप आघाडीत. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबरिश यांनी सासरे अरुण इंगवले यांच्या बाजूने मतदानासाठी हात वर करण्याऐवजी काँग्रेसचे सदस्य बजरंग पाटील यांना मतदान केले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांच्या बाजूने मतदान केले. सासऱ्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अंबरिश यांना नाईलाजाने का होईना पक्षाच्या बाजूने मतदान करावे लागले.

भोजेंच्या उपस्थितीला आक्षेप

निवडणुकीला सुरुवात होण्याअगोदर काँग्रेसचे सदस्य उमेश आपटे यांनी भाजपचे सदस्य विजय भोजे यांना सुप्रीम कोर्टाने मतदान प्रक्रियेपासून लांब राहण्याविषयी निर्देश दिले असल्याबाबतची कागदपत्रे पीठासन अधिकाऱ्यांना दाखवली. भोजे यांनी त्याला आक्षेप घेत 'हा विषय दोन वर्षांपूर्वीचा आहे. सुप्रीम कोर्टाने माझे सदस्यत्व रद्द केले नाही. मला फक्त मतदान करता येणार नसल्याचे म्हटले आहे. माझ्या एका मताची काँग्रेसला एवढी का भीती वाटते? वास्तविक अरुण इंगवले हे बुधवारी सायंकाळीच अध्यक्ष झाले होते. पण काही घडामोडी घडल्यामुळे गणित चुकले.' असे सांगत काँग्रेसवाल्यांना डिवचले. आपटे यांनी त्याला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण पीठासन अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले.

सतीश पाटील-आवाडेंमध्ये खडाजंगी

ताराराणी आघाडीच्या सदस्या रेखा हत्तरकी यांनी उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप आघाडीचे उमेदवार आवाडे यांच्या बाजूने हात उंचावला. मात्र त्यांनी पाठिंब्याच्या पत्रकावर सही केली नव्हती. या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील यांनी हत्तरकी यांचा हात अन्य कुणी उंचावला आहे का? हे तपासा असे म्हणताच आवाडे यांनी त्याला आक्षेप घेतला. आवाडे यांनी सतीश पाटील यांच्यावर 'तुम्ही सदस्यावर दबाव आणत आहात. कन्नडमध्ये सही करू नका, असे सांगत होता. मलाही कन्नड समजते. असला प्रकार चालणार नाही. अधिकाऱ्यांनी चित्रीकरण तपासावे,' अशी मागणी केली. अखेर हत्तरकी यांची स्वाक्षरी घेऊन हा वादावर पडदा टाकण्यात आला.

सदस्य संख्या : ६७

महाआघाडीला पक्षीय मतदान

काँग्रेस: १४

राष्ट्रवादी: १०

शिवसेना: १०

स्वाभिमानी शेतकरी संघटना: २

शाहू आघाडी : १

अपक्ष: १

चंदगड विकास आघाडी : १

ताराराणी आघाडी : १

एकूण : ४१

भाजप व मित्रपक्ष आघाडीला मतदान

भाजप : १३

जनसुराज्य : ६

आमदार प्रकाश आवाडे गट: २

ताराराणी विकास आघाडी :२

चंदगड युवक क्रांती आघाडी: १

एकूण : २४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी-ट्रक धडकेत एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

केएमटी बसला आयशर ट्रकने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेने उद्धव सदाशिव पाटील (वय ५६, रा. विद्या कॉलनी, पेठवडगाव) हे शिक्षक जागीच ठार झाले, तर बसचालक हंबीरराव यादव (रा. वरणगे पाडळी) यांच्यासह सात जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वासातच्या दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीतील वीटभट्टी जवळ झाला. या अपघातातील ट्रकचालक बेपत्ता झाला आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उद्धव पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत कागल येथील शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील पारितोषिक वितरण समारंभासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

या अपघातात मधुकर यादव (वय ५०, रा. कणेरीवाडी), गौरू सुतार (५४, रा. सदरबाजार), रूपा सुतार (५५, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (६५, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (२६, रा. कागल), चालक हंबीरराव यादव (५७, रा. वरणगे पाडळी), वाहक सतीश कुंभार (५५, रा. बापट कॅम्प कोल्हापूर) हे जखमी झाले. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हापूर-कागल मार्गावर केएमटी बस (एमएच ०९ - बीसी ८५०९) तावडे हॉटेलमार्गे कागलकडे जात होती. यावेळी मागून आलेल्या भरधाव मालवाहतूक ट्रकने (आरजे- १९ जीजी १५२५ ) बसला वीट भट्टीजवळ जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, बसच्या मागील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी इतर वाहनाच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उद्धव पाटील बसच्या दरवाजातून बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली. याबाबतची फिर्याद उद्धव पाटील यांचे सहकारी शिक्षक कुतुबुद्दीन बाबासाहेब शिकलगार (रा. सुभाषनगर, मिरज) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, सांगलीत सत्ता कायम

$
0
0

टीम मटा, कोल्हापूर

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत सातारा आणि सांगली जिल्ह्यांत अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने आपापली सत्ता कायम राखली. सांगली जिल्हा परिषदेत भाजपच्या प्राजक्ता कोरे यांची अध्यक्षपदी आणि शिवाजी डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उदय कबुले यांची आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते यांची निवड झाली. दोन्ही परिषदांत सत्ताधारी पक्षांचे पूर्ण बहुमत असल्याने शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा परिणाम सत्तासमीकरणावर झाला नाही.

\Bसाताऱ्यात अध्यक्षपदी कबुले\B

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक शिरवळचे जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांची आणि उपाध्यक्षपदी खटावचे प्रदीप विधाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कबुले यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रथमच अपक्ष सदस्याला संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची आणि उपाध्यक्षपदासाठी मसूरे मानसिंगराव जगदाळे यांची निवड होण्याची चर्चा सकाळी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असतानाच सकाळी साडेदहाच्या सुमारास रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मोबाइलवर पक्षश्रेष्ठींकडून एसएमएसद्वारे कबुले आणि विधाते यांची नावे कळविण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या वतीने दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी सव्वा दोन वाजता निवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. उदय कबुले यांना सूचक संजीवराजे नाईक-निंबाळकर हे तर प्रदीप विधाते यांना सूचक धैर्यशील अनपट हे होते. निवडी जाहीर झाल्यानंतर मावळते अध्यक्ष संजीवराजे आणि उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला रामराजे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख उपस्थित होते. बापूराव जाधव, भीमराव पाटील, विजय पवार, भिमराव पाटील, अरुण गोरे, प्रतीक कदम, शिवाजीराव चव्हाण, निवास थोरात, अर्चना देशमुख यांचीही भाषणे झाली.

निवडीनंतर पंचायत समिती सभापतींचा सत्कार करण्यात आला. विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी या दहा दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे.

मकरंद पाटील आणि लक्ष्मणराव यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणारा मी कार्यकर्ता आहे. सर्वांना बरोबर घेऊन यापुढे काम करणार आहे.

उदय कबुले,

अध्यक्ष

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. यशवंतराव चव्हाण यांची ही जिल्हा परिषद असून या जिल्हा परिषदेला कुठेही गालबोट लागणार नाही याची मी काळजी घेईन. संजीवराजे आणि वसंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद विकासाभिमुख करू.

प्रदीप विधाते, उपाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ४१० कोटींची कर्जमाफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार, ४०१ शेतकऱ्यांना ४१० कोटी, ५९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जमाफीचे आकडेवारी आणि निकष यांची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. एक जानेवारी २०१५ ते ३१ मार्च, २०१९ पर्यंत ६० हजार, ४०१ शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेने विकास सेवा संस्थांना दिलेल्या ३५ हजार, ८९३ शेतकऱ्यांचे १८९ कोटी, १८ लाखांचे तर राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांचे २४ हजार, ५०८ शेतकऱ्यांचे २२१ कोटी, ४१ लाख रुपयांचे कर्ज थकलेले आहे. मुद्दल आणि व्याज मिळून दोन लाख रुपयापर्यंत थकीत कर्जाला लाभ मिळणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कर्जदारांची यादी बनवली असून ८४७२ थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेचे खाते आधार लिंक केलेले नाही. त्यामध्ये जिल्हा बँकेचे २९५६ तर व्यापारी बँकेच्या ५४७६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. २१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी आपली बचत खाती आधार खात्याशी जोडावीत. ३१ जानेवारीला अंतिम यादी जाहीर केली जाणार असून त्यानंतर एक फेब्रुवारीपासून कर्जदारांच्या याद्या अपलोड करण्याची यंत्रणा बँकांकडून होणार आहेत. ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज विकास संस्थांच्या कर्ज खात्यावर जमा होणार आहे. तर व्यापारी बँकेत मात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर रक्कम जमा होणार आहे. कर्जदारांनी आपले खाते आधार लिंक झाले आहे का? याची खातरजमा करून घ्यावयाची आहे.

कर्जाबाबत शेतकऱ्यांची तक्रार असेल तर त्यासाठी तक्रार निवारण समिती नियुक्त केली जाणार आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील तर जिल्हा उपनिबंधक सचिव असतील. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, सहकारी आणि व्यापारी बँकांचे नोडल अधिकाऱ्यांचा समितीत सहभाग असेल.

८५ टक्के शेतकरी भरतात नियमित कर्ज

जिल्ह्यात ८५ टक्के शेतकरी नियमित कर्ज भरतात. फक्त १५ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार निर्णय घेणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बनवण्याचे काम सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही थाळी २६ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने गरजू व्यक्तीसाठी दहा रुपयांत शिव भोजन थाळी उपक्रमाची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी शहरात चार ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रजासत्ताक दिनी महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. तसेच सीपीआर, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, गंगावेश, रंकाळावेशसह ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक, प्रवाशांची गर्दी असेल, त्या ठिकाणी हा उपक्रम भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या उपक्रमाचा नागरिकांना लाभ होणार आहे. १० रुपयांत दोन चपाती, भाजी, भात, वरण देण्यात येणार आहे. दोन तासांत प्रत्येक केंद्रात १५० नागरिकांना त्यांचा लाभ घेता येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणीही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्या ठिकाणी एकाच वेळी २५ व्यक्तींना जेवता येईल, अशी बैठक व्यवस्थेची अट घालण्यात आली आहे. बचत गट, सामाजिक संस्था, खासगी हॉटेल, खानावळींना या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images