Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्नाटकच्या बसवर लिहिले ‘जय महाराष्ट्र’

$
0
0

सोलापूर :

सोलापुरात सोमवारी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शहराध्यक्ष विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री नगर येथील दोन नंबर एसटी डेपोत थांबलेल्या कर्नाटकच्या बसवरील कन्नड पाट्या आणि नंबर प्लेटला काळे फासण्यात आले. बसवर जय महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, मराठी अस्मिता, युवा सेना, ठाकरे सरकार, असा मजकूर रंगवून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवे, कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठिशी राहू, असे संतापजनक वक्तव कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केले होते. त्यानंतर भीमाशंकर पाटलानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ही महाराष्ट्राला एक इंच ही जागा देणार नाही, असे विधान केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याच्या निषेधार्थ युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय आविष्कार अभियानातर्गत ७५० मुलांनी केली सफर

$
0
0

लोगो : शुभवार्ता

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश मुले ही सामान्य कुटुंबांतील. अनेकांना सहलीचा आस्वाद लुटता येत नाही. सरकारी शाळेतील अशा हुशार मुलांसाठी समग्र शिक्षा अभियानद्वारे राज्यातंर्गत पर्यटनस्थळे, विज्ञान केंद्र, ऐतिहासिक वास्तू, प्राणी संग्रहालय, अभयारण्याची सफर करण्याची संधी मिळाली आहे. समग्र शिक्षा अभियानच्या माध्यमातून यावर्षी ७५० मुले सहलीचा आनंद लुटत आहेत.

जिल्हास्तरावर शंभर मुलांनी गोवा येथील सायन्स सेंटरला भेट दिली. तर तालुकास्तरातंर्गत ६५० मुले शेजारील जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत यासाठी एक लाख ३० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून सहलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करताना निकष निश्चित केले होते. प्रगत शाळा व त्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांची प्राधान्यक्रमाने निवड झाली.

प्रत्येक तालुक्यातील पाच शाळेत मिळून ५० विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यार्थ्यांची निवड करताना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये चमकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांना सहलीचे बक्षीस मिळाले. या सहलीचा अहवाल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडे पाठविला जाणार आहे. या सहलींतर्गत भेट द्यावयाच्या ठिकाणाबाबतही मार्गदर्शन मिळत आहे. प्राणी संग्रहालय, विज्ञान केंद्र, चांदोली अभयारण्य, गडकिल्ले, पुस्तकांचे गाव भिलार, समुद्र पर्यटन, रत्नागिरी येथील मत्स्यालय या ठिकाणांचा समावेश आहे. तालुकास्तराव गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर नियोजन सुरू आहे.

१५ जानेवारीपर्यंत सहलीला मुदत

जिल्हा आणि तालुकास्तरावर गेली दोन महिने सहलीचे नियोजन सुरू आहे. जिल्हास्तरावर १०० मुलांची निवड करुन गोवा येथील सायन्स सेंटरला भेट दिली. राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील मुलांनी सहलीचा आनंद घेतला. हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील मुलांची सहल चार जानेवारीच्या दरम्यान काढण्यात येणार आहे. पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील मुले सात तारखेपर्यंत सहलीवर जातील, असे नियोजन आहे. प्रत्येक तालुक्याला सहलीसाठी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य आहे. दरम्यान सहलीसाठी जादा खर्च होत असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.स्थानिक पातळीवर नियोजन केले जात आहे.

प्राथमिक शाळेतील मुलांना या सहलीच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तू, विज्ञान सेंटर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुलांमध्ये पर्यटनाविषयी गोडी, विज्ञान केंद्रामुळे विज्ञान विषयक आवड वृद्धीगंत करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रगत शाळांना सामावून घेतले आहे.

शशिकांत कदम, कार्यक्रम अधिकारी

जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना शेजारील जिल्ह्यातील पर्यटनाची संधी

प्रत्येक तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड

महापालिकेच्या शाळेतील ५० विद्यार्थ्यांना संधी

१०० विद्यार्थ्यांची गोवा सायन्स सेंटरला भेट

प्रत्येक तालुक्याला दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन संकल्प - प्रशांत गायकवाड

$
0
0

प्रदूषण रोखण्यास प्राधान्य

उद्योग, महापालिका, नगरपालिका व गावांच्या माध्यमातून समोतल साधून स्वच्छ पर्यावरण जिल्ह्याला देण्याचा नववर्षात प्रयत्न राहील. विशेषत: पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याचे शंभर टक्के नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न राहील. त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्यामार्फत १३९ गावातील सांडपाण्याचे नियोजन करून नदीचे प्रदूषण रोखणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक सशक्त करण्याची पाठपुरावा करण्याबरोबरच जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजनाला प्राधान्य देणार आहे. कचरा प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकल्प प्रतिक्रिया.......

$
0
0

प्रवेश प्रक्रिया अधिक प्रभावी करणार

अकरावीचा प्रवेश हा विद्यार्थी व पालकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावीपणे राबविण्याबाबत नियोजन केले आहे. शहरातील ३५ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. याशिवाय दहावी व बारावीची परीक्षा निकोप वातावरणात पार पडाव्यात. भयमुक्त व कॉपीमुक्त असाव्यात यासाठी आमची सारी यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. यासह सरकारच्या विविध योजना या क्षेत्रांशी संबंधित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्राधान्यक्रम राहील.

सत्यवान सोनवणे, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ‘अमृत’ फुटले

$
0
0

फोटो आहे (अर्जुन टाकळकर - लाइन बझार येथील अमृत योजनेतंर्गत पिण्याच्या पाइप फुटल्यानंतर पुन्हा नव्याने खोदाई करण्यात आली.)

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : जीर्ण झालेली पाइपलाइन बदलण्याबरोबरच वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरात अमृत योजनेतंर्गत पिण्याची पाइपलाइन टाकली जात आहे. महापालिकेच्या ४६ प्रभागात सद्य:स्थितीत काम सुरू आहे. त्यापैकी तब्बल नऊ प्रभागातील पाइप नित्कृष्ट दर्जाची असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. तपासणीपूर्वीच अनेक ठिकाणी पाइप फुटण्याचे प्रकार घडत असून फुटलेल्या पाइप काढून पुन्हा नव्याने पाइप टाकली जात आहे. परिणामी एकाच प्रभागात दोन-दोनवेळा खोदाई रस्त्यांची अक्षरश: वाट लावली जात आहे. वारंवारच्या खोदाईमुळे प्रभागातील नागरिकांना मन:स्तापाला सामोरे जावे लागत असल्याने अनेक ठिकाणी काम बंद पाडले जात आहे.

५० वर्षांपूर्वी शहरात पिण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तत्कालीन लोकसंख्येनुसार असलेल्या पाइपमधून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक ठिकाणी वारंवार गळती लागत आहे. त्यासाठी अमृत योजनेतंर्गत जुन्या-नव्या प्रभागात नव्याने पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी ११६ कोटींचा निधी मंजूर झाला असून कामाच्या पूर्ततेनुसार निधी मिळत आहे. त्यानुसार आतापर्यंत १८ कोटीच निधी मिळाला असून पाइप टाकण्याचे काम दास ऑफशोअर कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने काम वेळेत पूर्ण करण्यासाठी अनेक उपठेकेदार नेमले आहेत.

या उपठेकेदारांमार्फत शहरातील ४६ प्रभागात एकाचवेळी काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सर्वत्र रस्ते उकरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. काम झाल्यानंतर रिस्टोरेशन योग्य पद्धतीने होत नसल्याच्या नगरसेवकांच्या नियमित तक्रारी असतानाच आता टाकलेल्या पाइप पुन्हा टाकण्याची वेळ आली आहे. प्रभागात खोदाई करून पाइप टाकल्यानंतर कनेक्शन ट्रान्सफर करून चाचणी घेतली जात आहे. मात्र चाचणीमध्ये तब्बल नऊ प्रभागातील पाइप नित्कृष्ट दर्जाची असल्याने फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या प्रभागात पुन्हा खोदाई करून नवीन पाइप टाकण्याची वेळ आली आहे. चाचणी दरम्यानच पाइप लाइन फुटण्याचे प्रकार घडत असल्याने अमृत योजनेच्या टिकाऊपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असताना ड्रेनेज व पिण्याच्या पाइपलाइनसाठी अंतर्गत रस्त्यांचीही खोदाई करण्यात आली आहे. एकदा खोदाई केल्यानंतर काम पूर्ण करण्यास भरपूर अवधी लागत असताना पाइप फुटल्यामुळे पुन्हा खोदाई केली जात अल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. एकाच कामासाठी दोनवेळा रस्त्याची खोदाई केल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी लाइन बाझार येथील नागरिकांनी त्याला विरोध केला. अशा प्रकारच्या घटना अनेक प्रभागात घडत आहेत. मात्र त्याला राजकीय विरोध म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र अशा घटनामुळे योजनेचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे, याकडे प्रशासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही.

११६ कोटी

पिण्याच्या पाइपलाइनसाठी मंजूर निधी

१८ कोटी

मिळालेला निधी

४२० किमी

एकूण पाइपलाइनचे अंतर

१२४ किमी

पूर्ण झालेले कामाचे अंतर

२९६ किमी

अपुऱ्या कामाचे अंतर

१२

एकूण पाण्याच्या टाक्या

पूर्ण झालेल्या टाक्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीविरोधात २० जानेवारीला मोर्चा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सातबार कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखाची थकीत कर्जमाफीची घोषणा करुन शेतकऱ्यांना अपेक्षाभंग गेला आहे,' असा आरोप जयशिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने व आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य कर्जदारांना लाभ मिळवून देण्यासाठी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माने म्हणाले, 'यावर्षीच्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होता. निवडणुकीतील घोषणेप्रमाणे कर्जमुक्तीच्या निर्णयाकडे त्याचे लक्ष लागले होते. मात्र कर्जमाफीची घोषणा करताना महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक करताना कमीत-कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशा जाचक अटींचा त्यामध्ये समावेश केला आहे. जिल्ह्यात १,९४१ सेवा सोसायट्या आहेत. सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २,२०३ कोटीचा कर्जपुरवठा केला आहे. सहकार कलम ४८ नुसार सेवा संस्था ऊस बिलातून कर्जाची परतफेड करून घेते. त्यामुळे उत्पादकांच्या हातात काहीच राहत नाही. कर्जमाफीची घोषणा करताना या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.'

चुंडमुंगे म्हणाले, 'सेवा संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने कर्जाची परतफेड न केल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन त्याचा सर्वाधीक फटका शेतकऱ्यांना बसेल. सेवा संस्था बंद पडल्यास त्यांना खासगी सावकारांच्या दारात उभे रहावे लागेल. सेवा संस्थांचे अस्तित्व अबाधित राखण्याबरोबरच कर्जमाफीचा पुनर्रविचार करण्यासाठी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांनी कर्जमुक्तीचे ठराव करुन सादर करावेत.' असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार बैठकीस धनाजी पाटील, अतुल पाटील, कृष्णा इंगळे, सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, उत्तम पाटील, रामदास वड्ड, उदय होगले, सुधाकर उदगाव, दत्ता शिंदे, रामभाऊ चव्हाण, शामराव माळी यांच्यासह दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई रुग्णालयाच्या ताफ्यात नवीन रुग्णवाहिका

$
0
0

गूड न्यूज - लोगो

फाइल फोटो रूग्णालयाचा

...

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड बनलेल्या महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या ताफ्यामध्ये सुमारे १२ लाख किंमतीची नवीन रुग्णवाहिका नव्या वर्षात दाखल होणार आहे. रुग्णवाहिकेमार्फत २४ तास रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने देण्यात आलेले डिजीटल एक्सरे मशिन नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून कार्यन्वित होईल. लवकरच २८ लाख रूपये किंमतीची अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत येणार आहे.

शहरातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले रुग्णालयाची १५ ऑगस्ट १९५१ रोजी सुरुवात झाली. नाममात्र शुल्कामध्ये रुग्णांवर उपचार केले जात असल्याने येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. विशेषत: प्रसुती व बालरोग विभागामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर ऑर्थोपीडिक व सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. दैनंदिन १५० ते २०० रुग्ण ओपीडीद्वारे तर ७० ते ८० निवासी रुग्णांवर उपचार केले जातात.

तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सावित्रीबाई रुग्णालयाकडे विशेष लक्ष दिल्यानंतर विद्यमान आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे देखील रुग्णालयामार्फत रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्णालयाच्या प्रसुती व बाल रुग्ण विभागामध्ये नेहमीच गर्दी असते. अनेकवेळा रुग्णवाहिकेची आवश्यकता भासते. सध्या एकच रुग्णवाहिका असल्याने अनेकवेळा रुग्णांना त्याची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यानुसार आयुक्तांनी नवी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठ‌वला. राज्य सरकारच्या जीएम पोर्टलवरुन ऑनलाइन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या फंडातून आयसीयू, ईसीजी, ऑक्सिजन, तज्ज्ञ डॉक्टर आदी अत्यावश्यक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. सर्वसामान्य रुग्णांना मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलप्रमाणे सुविधा देण्यासाठी महापालिका पदाधिकारी प्रयत्नशील असून त्यासाठी नवनवीन यंत्रणा खरेदी केल्या जात आहेत. याच प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे डिजीटल एक्सरे मशिन खरेदीसाठी निधीची मागणी केली होती.

...

चौकट

अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी

उपसंचालकांकडे प्रस्ताव

सावित्रीबाई रुग्णालयाच्या ताफ्यात दोन रुग्णवाहिका आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांसह सुमारे २८ लाखांची नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन विभाग पुणे कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यासाठी प्रयत्न केले असून त्याचा निधीही मंजूर झाला आहे.

....

सौरऊर्जेमुळे सव्वालाखाची बचत

'वीज बिलामध्ये बचत करण्यासाठी रुग्णालयाच्या डायग्नोस्टिक सेंटर इमारतीमध्ये गेल्या वर्षी सौर पॅनल बसवण्यात आले. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) मार्फत क्रिएटल कार्पोरेश कंपनीने ३० लाखांच्या निधीतून सौर पॅनल कार्यन्वित केले. याद्वारे दिवसाला दहा किलो वॅट वीजनिर्मिती होत असून त्यामुळे दरमहा सव्वा लाख रुपयांची वीजबिलामध्ये बचत झाली आहे,' असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

....

चौकट

१५० ते २००

दैनंदिन ओपीडी

...

७० ते ८०

निवासी रुग्ण

...

१४

एकूण विभाग

...

१४

वैद्यकीय अधिकारी

...

लॅब टेक्निशियन

....

कोट

'मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलप्रमाणे रुग्णांना 'सावित्रीबाई'मध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्लेटलेट तपासणीसाठी साडेचार लाखांचे मशिन खरेदी केले असून २८ लाखांची अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका लवकरच ताफ्यात येणार आहे.

डॉ. दिलीप पाटील, आरोग्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक आपल्या भेटीला

$
0
0

डॉ. पाटील यांचे व्याख्यान

कोल्हापूर: 'थोरामोठ्यांच्या चरित्रातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. वाचनामुळे जीवनाला योग्य दिशा लाभते. तरुण वयातच वाचन आणि लिखाण करण्याची प्रेरणा वाढवली पाहिजे,'असे मते प्रसिद्ध लेखक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाबासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातर्फे 'वाचन कट्टा' उपक्रमांतर्गत 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रम झाला. ग्रंथपूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संचालिका डॉ. नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. युवराज जाधव यांनी परिचय करून दिला. डॉ. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता ऑनलाइन होणार बोलीभाषांचे जतन

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

मराठीची ओळख समृद्ध भाषा अशी आहे. राज्यात अनेक बोलीभाषा आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक बोलीभाषा लोप पावण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्या भाषेचा वावर इंटरनेटवर अधिक असेल तीच भाषा यापुढे टिकून राहणार आहे. याच अनुषंगाने बोलीभाषांचे जतन व्हावे यासाठी शैलेश खडतरे या तरुणाने पुढाकार घेत बोलीभाषांचा ऑनलाईन संग्रह करण्याची सुविधा इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहे. याला अफलातून प्रतिसाद मिळत असून अवघ्या दोन दिवसांत बोलीभाषेतील पाचशेहून अधिक शब्दांचा संग्रह झाला आहे. शैलेशने ऑनलाइन शब्दकोशासाठी विशिष्ट गुगल फॉर्म तयार केला असून तो सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध आहे.

समृद्ध बोलीभाषांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. राज्यात वेगवेगळ्या भागानुसार भाषाही बदलत जाते. मात्र, गेल्या काही वर्षात इंग्रजीच्या अतिवापरामुळे मराठी भाषा मागे पडत आहे. त्याचा आपोआप बोलीभाषेवर परिणाम होत आहे. येणाऱ्या काळात मराठी मरणासन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती भाषा अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. भाषा वाचवण्यासाठी अधिक सजगतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. याच भावनेतून शैलेशने मराठी बोलीभाषेचा इंटरनेटवर वावर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले. या निमित्ताने मराठी बोलीभाषेचे वैभव जतन करण्याची संधी मिळणार आहे. त्याने ब्रोनॅटो संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले असून शब्दसंग्रहसाठी तयार केलेल्या ऑनलाइन फॉर्ममध्ये कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, वऱ्हाडी, सामवेदी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, खाल्ल्यांन्गी, नंदुरबारी, वर्ल्यांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी- अहिराणी, गोंड, भिल्ल, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया व अन्य भाषांचे पर्याय दिले आहेत. या भाषांमधील एका भाषेची निवड करुन बोलीभाषेतील शब्द व त्यांचे अर्थ यात समाविष्ट करायचे आहेत. शिवाय, यात बोलीभाषांतील म्हणीही नोंद करता येऊ शकतात.

याबद्दल शैलेश सांगतो, 'वर्षभरापासून बोलीभाषांचा अभ्यास करत होतो, त्यासंदर्भात कथा स्पर्धाही घेतली. बोलीभाषेतील प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, मात्र त्यांचे संदर्भ आढळून येत नाहीत. नव्या पिढीला बोलीभाषेतील काही शब्द माहिती असतील, परंतु त्यांनतरच्या पिढीला तर बोलीभाषांविषयी फारच तुरळक माहिती असेल. याच विचारातून `बोलीभाषांचे संकलन, संवर्धन आणि साहित्यनिर्मिती` हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. मराठीतून हा प्रकल्प सुरु केला आहे. अपेक्षित माहिती संकलित झाल्यानंतर सर्वांसाठी विनामूल्य शब्दकोश ऑनलाइन उपलब्ध करुन देणार आहे.'

...

कोट

'इंटनेटच्या विश्वात भाषा सहज, सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. मात्र मराठी भाषेत तसे काम झाले नसल्यामुळे आपल्याच मातीत भाषेची गळचेपी होते आहे. त्यात शासन दरबारी भाषेला न्याय मिळत नाही. आता आपणच मातृभाषा जगवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांनी एकाच वेळी अनेक शब्दांची नोंद केली आहे, त्यामुळे हा उपक्रम भविष्यात नक्कीच दस्ताऐवज होईल.

शैलेश खडतरे, भाषाविषयक अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅजिक फिगर’साठी धावाधाव

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चोवीस तासांचा कालावधी उरला असताना बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी नेत्यांना धावाधाव करावी लागत आहे. तर सत्ताधारी आघाडीसमोर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आव्हान उभे केल्यामुळे भाजप व मित्रपक्षाच्या नेत्यांची संख्याबळ जमविताना दमछाक होत आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसकडून आवश्यक संख्याबळाचा दावा करण्यात येत असला तरी शेवटच्या घटकापर्यंत सदस्यांना एकसंध ठेवताना कसोटी लागत आहे.

गुरुवारी (ता.२) दुपारी दोन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत काँग्रेस आघाडीकडे ३५ सदस्य संख्या असल्याचा दावा करण्यात आला तर भाजप आघाडीकडूनही बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही आघाड्यांकडून संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी अर्थपूर्ण घडामोडी वेगावल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे बुधवारी (ता. १) गोवा येथे सहलीवर गेलेल्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सहलीवरील सदस्य कोल्हापूरकडे रवाना होतील.

हुबळी येथे सहलीवर असलेले भाजप व मित्र पक्षाच्या सदस्यांना बुधवारी रात्री कराडला हलविण्यात येणार आहे. भाजप आघाडीकडून जि.प.तील सत्ता टिकवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसच्या एका गटात पसरलेली नाराजी, दुखावलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेतील नाराज घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपची यंत्रणा सक्रिय झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपची सत्ता हिसकावून घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. ताराराणी आघाडीच्या सदस्या राणी खमलेट्टी व चंदगड युवक क्रांती आघाडीच्या सदस्या विद्या पाटील यांना काँग्रेस आघाडीत सामील करून घेतल्याचा कारभाऱ्यांचा दावा आहे. मात्र भाजप व ताराराणी आघाडीकडून खमलेट्टी या स्वगृही परत येतील असा दावा केला जात आहे.

.......

शिवसेनेची आज बैठक

शिवसेनेच्या नेते मंडळीची बुधवारी (ता. १) बैठक होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांत एकसंधपणा नाही. नरके यांच्या प्रस्तावाला दोन्ही काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. करवीर पंचायत समितीत पद दिले नसल्यामुळे हा गट नाराज असून तो वेगळा निर्णय घेण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे हे भाजप आघाडीसोबत आहेत. खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर गटाचे चार सदस्य असून ते काँग्रेस आघाडीसोबत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर गट सहलीवर असून त्यांचा कल काँग्रेस आघाडीकडे झुकल्याचे चित्र आहे.

.....

'स्वाभिमानी'वर दोन्ही आघाडीचा दावा

स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे दोन सदस्य आहेत. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेस सोबत राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पूर्वीच घोषणा केली आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्वाभिमानीचा योग्य तो मान राखला नाही यामुळे संघटनेत धुसफूस सुरू आहे. दुसरीकडे भाजप आघाडीसोबत असलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर 'स्वाभिमानी'चा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी सोपविली आहे. शेट्टी यांच्या गटाचे दोन्ही सदस्य भाजप आघाडीसोबत राहतील असा दावा सत्ताधारी करत आहेत. दरम्यान, जयसिंगपूर येथे शेट्टी व त्यांच्या सदस्यांमध्ये चर्चा होऊन काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

.....

अरुण इंगवले विरुद्ध बजरंग पाटील ?

भाजप आघाडीकडून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांचे नाव आघाडीवर आहे तर काँग्रेसकडून पक्षाचे गगनबावडा तालुकाध्यक्ष व जि.प.सदस्य बजरंग पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी भाजप आघाडीकडून राहुल आवाडे तर काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे सदस्य जयवंत शिंपी अशी लढत अपेक्षित आहे.

...

कोट

'महाविकास आघाडीचे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे सगळे सदस्य एकसंध राहतील. मंगळवारी शिवसेना नेत्यांची बैठक होणार होती. मात्र अनेकजण बाहेरगावी असल्यामुळे आज, बुधवारी बैठक होईल. दोन्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला आहे, आघाडीच्या नेत्यांसोबत पद वाटपाबाबत चर्चा केली जाईल.

संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विस्कळीत;शाहूपुरीत रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशीनाका रिंगरोड येथे शिंगणापूर योजनेच्या पाइपलाइनला लागलेली गळती आणि बालिंगा पंपिंग हाउसमध्ये झालेल्या विद्युत बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारी दुपारी दोन्ही दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर सायंकाळनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे शाहूपुरी येथे रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

सोमवारी शिंगणापूर योजनेच्या पाइपलाइनला रिंगरोड येथे गळती लागली. गळती काढण्यासाठी शिंगणापूर उपसा केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे पुईखडी व साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागामध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. गळती काढण्यास सुरुवात केली असता बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये फ्यूजमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठप्प झाला. सोमवारी रात्रभर शिंगणापूर योजनेतील गळती काढण्यात आली. त्यानंतर बालिंगा पंपिंग स्टेशनमधीही दुरस्ती करण्यात आली. दुपारी दोन वाजता दुरुस्ती काम संपल्यानंतर सायंकाळी चारनंतर उपसा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात सहानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला.

दरम्यान, दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने शाहूपुरी येथे महिलांनी रास्ता रोका आंदोलन करून संताप व्यक्त केला. सुमारे तासभर आंदोलन सुरू होते. मात्र, जलअभियंत्याचा पदभार कोणत्याच अधिकाऱ्यांकडे नसल्याने संपर्क कोठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गळती व विद्युत बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद असून सायंकाळनंतर सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच फरार आरोपींना अटक

$
0
0

कराड :

बुधवार पेठेत मागील चार महिन्यांपूर्वी पवन सोळवंडे याचा खून झाला. या खून प्रकरणी जुनेद शेख टोळीतील फरार असलेल्या पाच संशयितांना मंगळवारी येथील शहर पोलिसांनी अटक केली. यांच्यावर याआधीच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना मोक्का न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाचही जणांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आकिब लियाकत पठाण (मलकापूर), अक्षय साहेबराव धुमाळ (मलकापूर), सॅम उर्फ समीर नुरमहंदम मोमीन (कराड), अल्फाज कासीम शेख (मलकापूर), आयुब अब्दुलगफार ब्याळी (मलकापूर), असे अटक केलेल्या फरारी संशयितांची नावे आहेत.

२१ ऑगस्ट २०१९ रोजी बुधवार पेठेत पवन सोळवंडेचा टोळी युद्धातून गोळ्या झाडून खून झाला होता. कालांतराने या खुनामागे जुनेद शेखसह त्याच्या टोळीचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी काही दिवसातच त्यातील संशयितांना अटक केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यातील पाच संशयित तब्बल चार महिने फरार होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरील पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

कराड प. स. च्या सभापतिपदी प्रणव ताटे

कराड :

कराड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवड मंगळवारी पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या अपेक्षेप्रमाणे सभापतिपदी राष्ट्रवादीचे सदस्य प्रणव ताटे यांची वर्णी लागली, तर उपसभापतिपदी विकासकाका उंडाळकर गटाचे रमेश देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली.

२४ सदस्य संख्या असणाऱ्या कराड पंचायत समितीत मंत्री बाळासाहेब पाटील गटाचे सात तर विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे सात सदस्य आहेत. भाजपप्रणित डॉ. अतुल भोसले गटाचे ६ तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सत्ता स्थापन करताना बाळासाहेब पाटील व विलासराव उंडाळकर यांनी आघाडी करीत सभापतिपद ठरवून घेतले होते. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षात पहिली सव्वा वर्षे राष्ट्रवादीच्या शालन माळी तर पुढची सव्वा वर्ष उंडाळकर गटाच्या फरीदा इनामदार यांना सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली. पुढील अडीच वर्षासाठीचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या अडीच वर्षांत आमदार बाळासाहेब पाटील व विलासराव उंडाळकर गट एकत्रित सत्ता स्थापन करीत असून, मंगळवारी सभापती निवडीत राष्ट्रवादीचे प्रणव ताटे यांचा सभापतिपदासाठी एकच दाखल झाला तर उपसभापती पदासाठी उंडाळकर गटाकडून रमेश देशमुख यांचा एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीतील फेरीवाले आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुनर्वसनाचे आश्वासन देवूनही पुनर्वसन न केल्याने राजारामपुरी खाऊ गल्लीतच बुध‌वारपासून (ता. १) व्यवसाय करण्याचा इशारा मंगळवारी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांना फेरीवाल्यांनी दिला. यामुळे प्रशासन व फेरीवाल्यांमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

राजारामपुरी येथील जनता बझारच्या जागेत सुमारे ३० ते ३५ बायोमेट्रिक कार्डधारक फेरीवाले होते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिक्रमण कारवाईदरम्यान त्यांच्या खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या. दोन महिन्यांपासून फेरीवाले महापालिका प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. मात्र त्यांचे पुनर्वनस अद्याप केलेले नाही. १९ डिसेंबर रोजी येथील फेरीवाल्यांचे पुनर्वसन रेल्वे फाटक येथे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. पण त्याच्यासाठी कोणतीही कार्यवाही महापालिकेने केलेली नाही. याबाबत वारंवार भेटून निवेदने दिली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी इस्टेट अधिकारी बराले यांची भेट घेतली. त्यांनी पुनर्वसनाचे नियोजन सुरू असून एकाच ठिकाणी पुनर्वसन होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याला विरोध करत राजारामपुरी येथील खाऊ गल्लीतच व्यवसाय सुरू करण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळामध्ये संदीप माळी, लक्ष्मण गुजर, श्रीकांत कोरे, कल्पना मुळीक, अब्दुल गणी सय्यद, रोहन नाईक, कुमार दावणे, रमजान जमादार आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणीवेळी मटण मार्केटमध्ये वादावादी

$
0
0

फोटो आहे - अर्जुन टाकळकर

(अन्न व औषध प्रशासनाने लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केटमध्ये तपासणीला सुरुवात केल्यानंतर विक्रेत्यांबरोबर त्यांचा वाद झाला. पोलिस निरीक्षक वसंत गुजर यांना हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला.)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन अधिकाऱ्यांनी मटण मार्केटमध्ये तपासणीस सुरुवात केली. ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या तपासणीमुळे अधिकारी आणि विक्रेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष उफाळला. जोरदार वादावादी झाल्यानंतर शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व वादावादीमुळे अनेक ग्राहक खरेदीविनाच परतले. गेल्या काही दिवसांपासून शहरात मटण दरावरुन विक्रेते व ग्राहकांमध्ये सुरू असलेला संघर्ष कमी न होता तो अधिकच चिघळू लागला आहे.

मटण विक्रेत्यांकडून मनमानेल त्यानुसार दर आकारणी करुन विक्री केली जात असल्याचा आरोप सातत्याने होऊ लागला आहे. मनमानी दरवाढीला विरोध करण्यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना नेमलेल्या समितीने शिफारस केलेल्या दरानुसार मटण विक्री करण्यास विक्रेत्यांनी नकार देताच वाद अधिकच विकोपाला गेला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मात्र प्रतिकिलो ४८० रुपयाचा दर निश्चित करुन मटण विक्री करण्याचा निर्णय घेतला. पण असे मटण विक्री करताना नित्कृष्ट दर्जाचे मटण विकले जात असल्याच्या तक्रारी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल केल्या. त्यानुसार सोमवारी काही दुकानांची तपासणी करण्यात याली. तपासणीमध्ये अक्षेपार्ह मटण असल्याचे निदर्शनास येताच फूड इन्स्पेक्टर आर. डी. पाटील दहा दुकाने सील केली. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

मंगळवारी सर्वत्र थर्टी फर्स्टची तयारी सुरू असताना अनेकांनी तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासह बेत आखला होता. नियोजनानुसार अनेक ग्राहक लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केट गर्दी केली होती. त्याचवेळी ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासनाने अधिकारी मटण, चिकन व मासे तपासणीसाठी दाखल झाले. विक्रेत्यांनी तपासणीला जोरदार विरोध करत अधिकाऱ्यांबरोबर वाद घालण्यास सुरुवात झाली. दरवाढीवर तोडगा निघालेला असताना कारवाई का,अशी विचारणा करत अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. शिक्के असलेली बकरी कापलेली असताना कारवाई का? असा प्रश्नही उपस्थित केला. 'प्रशासनाकडे तक्रारी आल्याने तपासणी करत आहे. त्यामध्ये सुडबुद्धीचा प्रश्नच नाही.' असे फूड अधिकारी विजय उनवडे यांनी स्पष्ट केले.

सुमारे दोन तास सुरू असलेल्या या गोंधळामुळे मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांना मटण खेरदी न करताच परतावे लागले. अखिल भारतीय खाटीक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुपारी अडीच नंतर पुन्हा मटण विक्रीला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे जल्लोषी स्वागत

$
0
0

मध्यरात्रीपर्यंत स्वागताची धूम , विविध संस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ठिकठिकाणी आयोजित केलेल्या स्वागत पार्ट्या, मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे उत्तरोत्तर वाढलेली रंगत, मोठ्या हॉटेलमधील गीत संगीताचा नजराना अशा जल्लोषी वातावरणात आणि एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची धूम मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि फटाक्यांची आतषबाजीमुळे सारा आसमंत प्रकाशमय बनला होता. विविध संस्था व संघटनांनी विधायक उपक्रमांची अंमलबजावणी करत नववर्षाच्या स्वागताचा वेगळा पायंडा पाडला. मोठ्या हॉटेलमध्ये गीत नृत्याचा माहौल टिपेला पोहचला होता.

नागरिकांच्या गर्दीने शहरातील उद्याने उशिरापर्यंत गजबजली होती. नागरिकांनी कुटुंबासोबत हॉटेल, लॉनवर भोजनाचा आस्वाद लुटला. दरम्यान, शहरातील प्रमुख मार्गांवर नववर्षाची एकच रेलचेल पाहावयास मिळाली. दुकाने, मोठमोठी हॉटेल्स, व्यापारी संकुलांवर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे स्वागत सोहळ्याचा झगमगाट उजळला. थर्टी फर्स्टनिमित्त मित्रमंडळींनी एकत्र येऊन बेत आखले जाते. शहरातील उद्याने, रंकाळा -तलाव चौपाटी परिसर, तपोवन मैदान, राजाराम तलाव परिसर या ठिकाणी एकत्र येत नागरिकांनी सामूहिकपणे भोजनाचा आस्वाद लुटला. दरम्यान, दिवसभरात शहरातील मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा होत्या. शहरातील काही भागात मटणाची टंचाई जाणवली. मटण, मासे व चिकनची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

....

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी

घेतली समाजसेवेची शपथ

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना समाजसेवा, निर्व्यसनी राहण्याची आणि युवा पिढीच्या प्रबोधनाची शपथ घेतली. याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरवासियांच्या सेवेचे व्रत अखंडपणे जोपासू ,अशी ग्वाही दिली. क्षीरसागरांच्या हस्ते मसाले दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, दीपक गौड, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, रणजित जाधव, धनाजी दळवी आदी उपस्थित होते. दरम्यान, पन्हाळगड येथे कोणीही मद्यप्राशन करुन धागडधिंगा घालू नये यासाठी युवा सेनेचे कार्यकर्ते सक्रिय होते.

.....

गायक परिवारतर्फे सुरेल स्वागत

गायक परिवारतर्फे रंकाळा पदपथ येथे हिंदी गीतांच्या मैफलीचे आयोजन केले होते. गायक कलाकारांनी जुन्या व नव्या गाण्यांचे बहारदार सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. मैफलीत डॉ. उदय भट, सरोज भट, सुभाष भाट, रमा नागवेकर, प्रसन्न गवळी, शक्ती कांबळे, जितेंद्र कुलकर्णी यांच्यासह अन्य कलाकारांनी मैफल सुरेल बनवली. तत्पूर्वी गायक परिवाराचे संस्थापक डॉ. राजकुमार पोळ यांनी स्वागत केले. महेश व्हटकर, प्रमोद शहा, सुषमा पोळ, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव यादव यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. देवेंद्र दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापुरातील कल्चर कट्टा ग्रुप व धुमधडाकातर्फे बालकल्याण संकुल येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सामावून घेत त्यांचा आनंद द्विगुणित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये धुसफूस; आमदार पाटील राजीनामा देण्याची शक्यता

$
0
0

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आमदारांमध्येही धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील हे मंत्रिपद न मिळाल्याने प्रचंड नाराज असून त्यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याने ते लवकरच राजीनामा देणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

पीएन पाटील हे काँग्रेसमध्ये गेल्या ४० वर्षांपासून सक्रिय आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पीएन पाटील यांना काँग्रेसने मंत्रिपद दिलं नाही. उलट कोल्हापूरमधून सतेज पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं पीएन पाटील यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काही कार्यकर्त्यांनी तर फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तराजू दाखवण्यात आला होता. तराजूतील एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात ४० वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली होती. शिवाय पैशांचं जड झालेलं झाड वाकलेलंही दाखवण्यात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठीने पैसेवाल्यांनाच मंत्रिपदाची खिरापत दिल्याचा अप्रत्यक्ष मेसेजच या फोटोतून देण्यात आला आहे. पाटील समर्थकांनी मोठ्याप्रमाणावर नाराजी व्यक्त केल्याने हळूहळू इतर आमदारांकडूनही नाराजीचे सूर उमटत असल्याचं बोललं जात आहे.

वाचा: प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर; राजीनाम्याचा निर्णय मागे

पहिला आलेल्या मुलाला वर्गाबाहेर बसवलं: देवेंद्र

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी पुणे येथील काँग्रेसच्या कार्यालयातच तोडफोड केली आहे. मात्र भोर यांची समजूत काढण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केला. दरम्यान, पीएन पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव केला होता. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नरके यांनी पाटील यांचा पराभव केला होता. पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदही भूषवलं होतं.

वाचा: संजय राऊत यांच्या 'या' फेसबुक पोस्टमुळं नवा संभ्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याचे जवान संदीप सावंत नौशेरा हल्ल्यात शहीद

$
0
0

सातारा:
मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होत. २५ वर्षीय संदीप यांच्यामागे पत्नी सविता या आहेत.

नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.

दरम्यान, यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. शोधमोहीम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज: नरवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे?

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, कुडित्रेः राज्याच्या मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज झालेले प्रदेश काँगेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या काँग्रेस पदाधिकारी पदाचे राजीनामे देण्याचा ठराव एकमुखाने करत मेळाव्यात पी.एन.पाटील यांच्या गटाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच युवक कार्यकर्त्यांनी 'सत्याग्रहातील गांधी हरला' अशा आशयाची भावना व्यक्त केली.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून गेली ४० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिलेल्या व गांधी घरण्यावर व काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या पी.एन.पाटील यांना मंत्री पद मिळणारच याचा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्री एक वाजेपर्यंत पी.एन. पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, रात्री दीड वाजता त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्याला असे अनपेक्षितपणे डावलल्याचे समजताच पी. एन. पाटील हे तर नाराज झालेच त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते संतापाने पेटून उठले. त्यातूनच आज फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉल येथे कार्यकर्त्यांच्या भावना जाणवू घेण्यासाठी पी. एन. पाटील समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कोल्हापूर: 'हे' काँग्रेस आमदार राजीनामा देणार?

मेळाव्यात अत्यंत संतप्त व आक्रमक मते मांडून आपल्या विचारांना कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करून दिली. मेळाव्यात महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया साळुंखे यांच्यावतीने त्यांचे पती सुधाकर साळुंखे, करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस पी. डी. धुंदरे, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, काँगेस कार्यकारिणी सदस्य अनिल ढवण, करवीर विधानसभा समन्वयक संदीप पाटील, करवीर तालुका सरचिटणीस प्रवीण पाटील यांनी आपल्या पदाचे तसेच करवीर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी आपले पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे जाहीर केले. तसेच राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे यावेळी जाहीर केले.

मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे १४ आमदार नाराज

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तर मेळाव्याच्या ठिकाणी पी. एन. पाटील यांच्या समर्थनाचे फलक झळकवतच सभागृहात प्रवेश करत पी. एन. पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच आपले सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मेल करून पक्षाला कळवले असल्याचे जाहीर करत 'सत्याग्रहातील गांधी हरला', अशा आशयाची भावना व्यक्त केली. यावेळी 'आमचा पक्ष पी. एन. पाटील' यासारखे कार्यकर्त्यांनी झळकवलेले लक्षवेधी फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वानुमते आमदार पी. एन. पाटील यांच्यासह सर्व काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे द्यावेत, असा ठराव मांडला. त्यास मेळाव्याचे अध्यक्ष भोगावती कारखान्याचे व्हा.चेअरमन उदयसिंह पाटील यांनी अनुमती दिली. सर्व कार्यकर्त्यांनी या ठरावाचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना आमदार पी. एन. पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आणि ते जे काय निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू महोत्सव उद्यापासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली सामाजिक एकात्मता वाढीस लागावी, त्याचबरोबर कला, उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा या हेतूने मराठा स्वराज्य भवन व मराठा महासंघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाचे तीन ते सहा जानेवारी कालावधीत आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.३) सायं. ४ वा. महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत पाटील व जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, सिनेअभिनेता आनंद काळे, उद्योगजक सतीश कडूकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत महोत्सव होणार आहे.

मुळीक म्हणाले, 'महोत्सवात वैद्यकीय, बांधकाम, व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक, इतिहास, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना 'राजर्षी शाहू सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात येईल. महोत्सवात गृहोपयोगी वस्तू, उद्योग व व्यवसाय, ग्रंथप्रदर्शन, फुलझाडे, फर्निचर, गाड्या इत्यादींचे ७५ स्टॉल लावण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी खेळ व खेळणी, खवय्यांसाठी विविध पदार्थांसह बिर्याणीचे स्टॉल व इतर खाद्य पदार्थांची रेलचेल असेल. यंदा खास महिलांसाठी विविध स्पर्धा, व्याख्याने, मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडा, रेकॉर्ड डान्स आदी सांस्कृतिक कार्यक्रम होतील,तरी अधिकाधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट द्यावी.' पत्रकार परिषदेस उत्तम जाधव, बबनराव रानगे, शंकरराव शेळके, सी. एम. गायकवाड, संग्राम चव्हाण, नितीन हरुगडे उपस्थित होते.

असे होतील कार्यक्रम

शुक्रवार ता. ३

दु. १ वा. लोककला सादरीकरण महिला (भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी, वासुदेव)

दु. ४ वा. महोत्सव शुभारंभ

दु. ५ वा. उखाणे स्पर्धा

सायं. ७ वा. शाहिरी कार्यक्रम

शनिवार ता.४

स. ११ वा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज मार्गदर्शन शिबिर

दु. १२ वा. फ्लॉवर डेकोरेशन, सॅलड डेकोरेशन

दु. १ वा. महिलांसाठी विविध स्पर्धा (संगीत खुर्ची, सुप नाचवणे, घागर फुकणे)

दु. ३ वा. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे.

दु. ४ वा. मर्दानी खेळ

सायं. ६ वा. मिमिक्री, सोलो डान्स,अजय अतुल गाण्याचा कार्यक्रम

रात्री ७ वा. हिंदी- मराठी गीत कार्यक्रम, दिव्यांग संभाजी यादव सादरीकरण

रविवार ता. ५

स. १० वा. फेटा बांधणे प्रशिक्षण

स. ११ वा. महिला स्पर्धा (फेस पेंटींग, हेअर स्टाईल, नेल आर्ट, मेहंदी)

दु. १२ वा. बिर्याणी-तांदळापासून बनवलेले तिखट-गोड पदार्थ

दु. २ वा. ऐतिहासिक वेशभूषा (लहान गट, मोठा गट, खुला गट)

सायं. ५ वा. हास्यविनोद कलाकार आत्माराम पाटील अँड कंपनी

सायं. ६ वा. युवक कलागुण (कल्चर कट्टा, धूम धडाका कलामंच)

रात्री ७ वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा (लहान गट, मोठा गट)

सोमवार ता. ६

स. ११ वा. सर्व समाज विद्यार्थी विविध दाखला शिबिर (जात दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला)

दु. २ वा. कविसंमेलन

दु. ५ वा. हिंदी मराठी गीत कार्यक्रम (कराओके) व शाहिरी

सायं. ६ वा. शाहू महोत्सव सांगता समारंभ (पुरस्कार प्रदान)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विभागात चार नवीन टँकर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा खंडीत झाल्यास नगरसेवकांच्या दबावामुळे टँकर पळवापळवीच्या घटना नेहमीच होत असतात. अशा प्रकारांना आळा बसावा आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी नऊ हजार लिटर क्षमतेच्या चार टँकरची खरेदी केली आहे. राज्य सरकारच्या जीएम पोर्टलद्वारे खरेदी केलेल्या टँकरची चाचणी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजकडून घेतली जात आहे. त्यानंतर हे चारही टँकर पाणीपुरवठा विभागाच्या ताफ्यात आल्यानंतर टँकरची संख्या १६ पर्यंत जाणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडे नऊ टँकर आहेत. त्यापैकी पाच टँकर दैनंदिन कामासाठी आरोग्य विभागाला द्यावे लागतात. त्याद्वारे शहरातील स्वच्छतागृह, चॅनेलवर पाणी मारणे, पुतळे स्वच्छता व अन्य कार्यक्रमांसाठी त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे दुरुस्ती किंवा अन्य कारणांने पाणीपुरवठा खंडीत झाल्यास केवळ चार टँकरद्वारे शहरवासीयांना पिण्याचे पाणी द्यावे लागते. टँकरच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेकदा नगरसेवक टँकरची पळवापळवी करतात. त्यामुळे अन्य प्रभागातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन खरेदीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे.

८० लाखांतून नऊ हजार लिटर क्षमतेच्या चार टँकरची खेरदी केली असून त्याची चाचणी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजकडून घेतली जात आहे. नवीन चार टँकरमुळे पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याचे पाणी देण्यासाठी आठ टँकरची संख्या होणार आहे. कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाउस येथे प्रत्येकी चार टँकरमधून आपत्कालीन परिस्थितीत या टँकरद्वारे पिण्याचे पाणी दिले जावू शकते. ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये पाणीपुरवठा विभागाचे तिनही उपसा केंद्रा पुरात बुडाली होती. त्यामुळे संपूर्ण शहराचा १३ दिवस पाणीपुरवठा खंडीत होता. त्यावेळी अनेक खासगी संस्थांचे टँकर भाड्याने घेऊन पिण्याचे पाणी दिले होते. सद्य:स्थितीत टँकरची संख्या वाढल्याने भविष्यात टँकर भाडेतत्त्वावर घेण्याची वेळ येण्याची शक्यता कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images