Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महावितरणसमोर आज आंदोलन

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारपासून (ता.३) बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. कंत्राटी कामगारांचे थकीत वेतनासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन पुकारल्याचे कामगार संघांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कामगार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष अमर लोहार, जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी आंदोलनाची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात आज खुली चर्चा

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्यावतीने आज तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 'स्त्रियांवरील हिंसा' या विषयावर विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिंनींची खुली चर्चा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये होणाऱ्या या चर्चेमध्ये अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा: शहीद संदीप सावंत अमर रहे! लष्करी इतमामात अखेरचा निरोप

$
0
0

सातारा: जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवार त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते. अवघे २५ वर्षे वय असलेस्या शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता आणि एक दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सातारा आणि परिसरातील जनतेने अलोट गर्दी केली.

पाक हद्दीत अमेरिकी विमानांवर हल्ल्याची शक्यता?

शहीद नाईक संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुण्याला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्यातील कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणले गेले. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद संदीप सावंत यांची चिमुकली:

73081849

इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संदीप सावंत सन २०११ ला भारतीय लष्करात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये देशाची सेवा केली. त्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात आले.

अमेरिकी हल्ल्यात इराणचा मेजर जनरल ठार

नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.

लोकल थांबवून मोटरमनने वाचवले प्रवाशाचे प्राण

दरम्यान, यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या पूर्वी काही दिवस आधी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय मजदूर संघाची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी उद्योगाचे खासगीकरण रद्द करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संघाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. संघाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सरकारी उद्योगांचे खासगीकरण रद्द करावे, सरकारी उद्योगात होणारी परदेशी गुंतवणूक रोखावी, एम्लाईज फॅमिली पेन्शन स्कीम कोशियारी समितीच्या शिफारशींसह लागू कराव्यात, बांधकाम कामगारांना अर्ज केल्यानंतर एक महिन्यात लाभ मिळावेत, रेल्वे, सरंक्षण, पोस्ट या उद्योगांचे कार्पोरेशनमध्ये होणारे रुपांतर रद्द करावे, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, स्टेट ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिकसिटी बोर्डाचे खासगीकरण थांबवावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

संघाच्यावतीने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चर्चा, आंदोलन आणि इतर माध्यमांतून काही मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. बोनस रकमेत वाढ, मातृत्व लाभात वाढ, ग्रॅज्युएटी कव्हरेजमध्ये वाढ आदी मागण्यांचा समावेश आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष एस.एन. पाटील, कार्याध्यक्ष मुकुंदराव जोशी, प्रदेश उपाध्यक्षा अनुजा धरणगांवकर, सचिव अभिजीत केकरे, श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

....

फोटो अर्जुन टाकळकर ९९७०

भारतीय मजदूर संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ उत्पादकांच्या मालकीचे करुया

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून म्हणून मुंबईला गेलो आणि मंत्री म्हणून परत आलो, ही अंबाबाईची कृपा आहे. राजर्षी शाहूंनी दिलेल्या समतेचा संदेशानुसार वंचित, शोषित घटकांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे. तीर्थक्षेत्रविकास आराखड्यासह शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू. विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर गोकुळच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. गोकुळ आमच्या नव्हे, तर सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या मालकीचा करायचा आहे. त्यामध्ये निश्चित यश मिळेल,' असा आशावाद कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील यांच्या जंगी स्वागतानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, '३५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदाच अशी जंगी मिरवणूक मी पाहिली. भाजपला रोखयचे हे नियतीच्या मनातच होते. त्यामुळे विरोध पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेलो असताना, मंत्री होऊन कोल्हापूरला परत आलो. आमच्या मंत्रिपदाचा उपयोग शोषित, वंचित घटकांसाठी करताना महिन्याच्या एका सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे सरकारी अधिकाऱ्यांसमवेत जनता दरबार घेणार आहे. यामध्ये आम्ही तिघे किंवा कुणीही एकजण उपस्थित राहून सरकारीपातळीवरील सर्व प्रश्नांची सोडवणूक करू. मोर्चा, आंदोलने करताना दडपशाही करणार नाही. पण प्रथम आमच्याशी चर्चा करा. त्यातून प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास आमच्या घरावर मोर्चा काढा. पण कायदा व सुव्यवस्था बिघडवू देवू नका.' तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, पूरग्रस्तांना मदत असे पाच वर्षात ज्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करू.'

'जिल्हा परिषदेची राहिलेली विकेट घ्यायची होती. ती घेऊनच ४० वर्षे पक्षनिष्ठा जपलेल्या बजरंग पाटील यांना अध्यक्षपदाचा मान दिला. जिल्हा परिषदेची विकेट पडल्याशिवाय कोल्हापुरात प्रवेश करण्याचा नाही निर्णय घेतला होता,' असे राज्यमंत्री पाटील म्हणताच कार्यकर्त्यांनी 'गोकुळ', 'गोकुळ' असा गलका करण्यास सुरुवात केला. पाटील म्हणाले, 'मंत्रिपदामुळे जबाबदारी वाढली आहे. काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेला प्राधान्य देताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा, सर्किट बेंच, शाहू समाधीस्थळ प्रश्न मार्गी लावणार आहे. विकाससाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबार घेणार आहे. आगामी गोकुळच्या निवडणुकीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सर्व नेते एकत्र असून आमचं ठरलंय काहीही करून गोकुळ घ्यायचं.'

राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'राष्ट्रवादीमध्ये दोन पिड्या काम करूनही अपक्ष लढावे लागले. निकालानंतर शिवसेनेच्या पाठीशी राहिलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला. त्या शब्दाप्रमाणे त्यांनी मंत्रिपद दिले. मुश्रीफ यांच्या पाठीशी राहून काम करणार आहे.'

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'आमचं ठरलंय तेच राज्यात पोहोचलंय. त्यामुळे नक्कीच चांगला विकास होईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगली वज्रमूठ बांधून विविध संस्थांमध्ये सत्ता मिळवू. 'आमचं ठरलंय' ही टॅगलाइन केवळ निवडणुकीपुरती न राहता राजर्षी शाहूंचा विचार देशभर पोहोवेल.'

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, 'महाआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली. हे तीनही मंत्री जिल्ह्याचा चांगला विकास करतील.'

महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून सर्व मंत्र्यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकल्प प्रतिक्रिया, सुरेश संकपाळ

$
0
0

इंग्रजी विषयाची स्पर्धा परीक्षा

मुख्याध्यापक संघातर्फे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची स्पर्धा परीक्षा राबविण्याचा मानस आहे. या परीक्षेची पूर्व तयारी झाली आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यासाठी केंद्र सरकारतर्फे एनएमएमएस परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नसंचाची निर्मिती तसेच सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक संघामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कशा होतील याकडे अधिक लक्ष देणार आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच वीस टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदानाचे पुढील टप्पे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सुरेश संकपाळ, चेअरमन, मुख्याध्यापक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार दिनानिमित्त सोमवारी कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जर्नालिझम अ‍ॅन्ड मास कम्युनिकेशन, राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात 'आपत्ती व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमे' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी असतील.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. जय सामंत यांचे 'नैसर्गिक आपत्ती -एक आव्हान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात पत्रकार निखिल पंडितराव यांचे'आपत्ती व्यवस्थापन आणि वृत्तपत्रे', जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचे 'आपत्ती व्यवस्थापन आणि सोशल मीडिया' तर पत्रकार संदीप राजगोळकर यांचे 'आपत्ती व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेत पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. निशा पवार संपादित 'वुमेन इन रिजनल टेलिव्हिजन चॅनेल्स' या पुस्तकाचे तर एम. जे. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या 'संज्ञापन' या रिसर्च जर्नलचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत पत्रकार, अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. निशा पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारणा’ ची साखर जप्त करण्याचा आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचवीस कोटी रुपयांच्या थकीत एफआरपीप्रश्नी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बगॅस जप्त करुन विक्री करण्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे.

वारणा कारखान्याने मागील हंगामात तीन मार्च २०१९ पर्यंत ८८ हजार ५०६ मेट्रिक टन गाळप केला असून २५ कोटी ७७ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे. एफआरपी कायद्यानुसार या रकमेवर १५ टक्के व्याजाची वसुली करण्यात येणार आहे. कारखान्याने एफआरपी थकवली असून यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाने कारखाना प्रशासनाला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंबधी नोटीस पाठवली होती. २०१९ - २०२० चा हंगाम सुरू होऊनही कारखान्याने थकीत एफआरपी न दिल्याने अखेर साखर आयुक्त कार्यालयाने वसुलीसाठी पाऊले उचलली आहेत. साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस या उत्पादनाची विक्री करुन एफआरपीची रक्कम वसूल करावी, असा आदेश काढला आहे. तसेच आवश्यकतेनुसार कारखान्याच्या जंगम, स्थावर मालमत्तेवर सरकारच्या नावाची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३(९) नुसार साखर जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलावाची एमजीपी करणार पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुरगूडमधील सर पिराजीराव घाटगे तलावाची पाहणी करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावा, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. या अहवालानंतर चर्चेद्वारे पाणीप्रश्न सोडवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुरगूडच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. शहराची पाण्याची मागणी आणि तलावातून होणारा पाणी पुरवठ्याची पाहणी करण्याचा निर्णय यावेळी झाला. बैठकीला सुहासिनीदेवी घाटगे, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे, मुरगूड नगराध्यक्ष राजेखान जमादार, तहसीलदार शिल्पा ठोकडे, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

मुरगूड शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पिराजीराव तलावातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवर तलाव व्यवस्थापन आणि मुरगूड पालिकेत समन्वय नसल्याने समस्या निर्माण होत आहे. पाणी प्रश्नावरुन होणारा संघर्ष टाळण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठक घेतली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांनी सद्यस्थिती मांडली. तलावातून दहा इंची पाइपलाइनद्वारे सायफन पद्धतीने फिल्टर हाउसला पाणी पुरवले जाते. सध्या पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने आठ लाख लिटर क्षमतेच्या टाक्या भरत नाहीत. शहरात पाण्याची मागणी १२ लाख लिटर असल्याने तलावातून जादा पाणी सोडावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी, बांधकामासाठी पाणी उपसा करणाऱ्या वीज मोटारी बंद करण्याचा आदेश यावेळी दिले. तसेच तलावातून किती पाणी जोडले जाते याची माहिती व्हावी यासाठी फ्लो मीटर बसवण्याची सूचना केली. शहराला पाणी मिळाले पाहिजे पण तलाव व्यवस्थापनावर ताण पडता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

तलावासंबधी सुहासिनीदेवी घाटगे यांनी भूमिका मांडली. शहराला पाणी मिळालेच पाहिजे पण त्यासाठी शास्त्रोक्त पद्धत अवलंबली पाहिजे. सध्या शहरातील वितरण नलिका जुनी असून जादा दाबाने पाणी सोडले तर त्या फुटू शकतात. जुलैअखेर शहराला पाणी पुरले पाहिजे असे नियोजन झाले पाहिजे. सध्या गावात पाण्याचे कनेक्शन वाढली असल्याने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे.

त्यावर नगराध्यक्ष जमादार म्हणाले, 'शहरात बांधकामाला पाणी पुरवले जात नाही. तलावातून कमी दाबाने पाणी सोडले असल्याने शहराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. तसेच नगरपालिकेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानाअंतर्गत दहा कोटी रुपये निधीतून पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. पुढील दोन वर्षात ही योजना कार्यान्वित होणार आहे. पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत तलावातून जास्त दाबाने पाणी सोडावे.'

००००००

शहरातच प्रश्न सुटला असता....

मुरगूडला पाणी पुरवठा झालाच पाहिजे अशी भूमिका समरजीत घाटगे यांनी मांडली. पाणीप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन आरोप झाले याकडे त्यांनी बैठकीच्या शेवटी नगरसेवकांचे लक्ष वेधले. सुहासिनीदेवी किंवा माझ्याशी संपर्क साधला असता तर शहरातच बैठक घेऊन पाणीप्रश्न सुटला असता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याची गरज भाजली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

.. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक वापरप्रकरणी चार व्यापाऱ्यांना दंड

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी प्लास्टिक वापर करणाऱ्या चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार प्रमाणे त्यांच्याकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, वितरण व साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. तरीही व्यापाऱ्यांकडून प्लास्टिकचा वापर आणि साठवणूक केली जात आहे. याविरोधात आरोग्य विभागाच्यावतीने सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून बाजारगेट परिसर येथील गुडलक, सहारा, इंडिया कटलरी व सागर नॉव्हेल्टीची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये प्लास्टिक आढळल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सहायक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, ऋषिकेश सरनाईक, महेश भोसले, राजेंद्र पाटील, अरविंद डाफळे, शुभांगी पोवार, गीता लखण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा ग्रंथ महोत्सव सुरू

$
0
0

जिल्हा ग्रंथ महोत्सव सुरू

सातारा :

सातारा येथे २१व्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले. जिल्हा परिषद मैदानावर पुढील चार दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सातारा शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग व सातारकर नागरिक उपस्थित होते.

..............

निवडी बिनविरोध

सातारा :

रहिमतपूर नगरपरिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. सभापती निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. स्थायी समितीचे लोकनियुक्त अध्यक्ष आनंदा शंकर कोरे हे पदसिद्ध सभापती असल्याने त्यांच्याकडे स्थायी समितीची जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी ज्योत्स्ना जितेंद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतिपदी चाँदगणी बादशहा आतार यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी ताराबाई निवृत्ती शिंदे व उपसभापतिपदी सुजाता तानाजी राऊत यांची निवड झाली. आरोग्य समितीच्या सभापतिपदी पालिकेच्या पदसिद्ध उपाध्यक्ष माधुरी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूस्खलन, दरडी कोसळणाऱ्या वस्तींचा अहवाल द्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यातील भूस्खलन, दरडी कोसळणे आदी आपत्तींबाबत ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे त्या परिसरातील प्रकल्प अहवाल सादर करावेत', असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भू वैज्ञानिक विभागाला दिले.

जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये भूस्खलनाचे प्रकार घडले असून भविष्यात या ठिकाणी पुन्हा घटना घडू शकतात. अशा आपत्तीबाबत जाणीव जागृती निर्माण करणे आणि आपत्तीला तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी देसाई यांनी, ज्या ठिकाणी मनुष्य वस्तीला धोका आहे ती ठिकाणे प्राधान्याने निवडावीत. त्यानंतर रस्ते आणि इतर ठिकाणांचे सर्वेक्षण करावे. याबाबत एक महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, असे आदेश दिले. भूवैज्ञानिक विभागाने यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला (जीएसआय) कळवून पाठपुरावा करावा, अशी सूचनाही केली.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, प्रातांधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, भुदरगड तहसीलदार अमोल कदम, शाहूवाडी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, पन्हाळा गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज अवकाश निरीक्षण

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्र येथे आज, शनिवारी अवकाश निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात ते रात्री साडेदहा यावेळेत हा उपक्रम होणार आहे. आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रे, राशी, तारका पुंज, नेबुली आणि आकाशगंगा कसे ओळखावेत आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे या बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सिलेस्टरॉन सी प्लस ५ दूरदर्शक दुर्बीणद्वारे चंद्र, ग्रह‌‌ व नेबुलीचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आकाश निरीक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भयमुक्त समाजातच स्त्री सुरक्षित असेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आज शाळेत गेलेली मुलगी सुरक्षित घरी येईल की नाही यांची चिंता पालकांना असते. खेळायला जाणारी इवलीशी पोर कुणाच्यातरी वासनांधतेचा बळी ठरेल का हा प्रश्न सतत पालकांना भेडसावत असतो. महाविद्यालयाच्या वाटेवर आपल्या तरूण मुलीची छेड काढली तर काय करायचे या विवंचनेत अनेक पालक आहेत. नोकरीसाठी घराबाहेर पडणारी मुलगी नराधमांच्या विळख्यात अडकणार नाही ना या विचाराने अनेक पालक अस्वस्थ असतात. लग्न करून सासरी पाठवलेल्या मुलीला अत्याचार सहन करावे लागू नयेत यासाठी पालकांचा आटापिटा सुरू असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांवरील हिंसा हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. स्त्रियांवरील अत्याचार व त्यातून होणारी त्यांची हिंसा याबाबत समाजात घडणाऱ्या घटनांचा आलेख इतका वाढत आहे की, भविष्यात भयमुक्त समाज आस्तित्वात आला तरच स्त्री व पर्यायाने तिचे कुटुंब सुरक्षित असेल, असा विश्वास 'स्त्रियांवरील हिंसा' या विषयी चर्चेच्या व्यासपीठावर व्यक्त झाला.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्यावतीने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'स्त्रियांवरील हिंसा' या विषयावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनीही या विषयावर आपली मते व्यक्त करत समस्येपेक्षा उपाय व मानसिक परिवर्तन याबाबत अनेक पर्याय खुले केले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

पवार अध्यासनाच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील म्हणाल्या, 'स्त्री व पुरूष हे समाजाचे घटक आहेत. स्त्री आज काही पुरूषांच्या विकृत नजरेपासून सुरक्षित नाही हा सामाजिक दोष आहे. काही समाजात स्त्रियांकडून पुरूषांवर अन्याय होतो हेही खरे आहे. त्यामुळे दोघांवरही अन्याय होणार नाही, दोघांनाही समान लेखले जाईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.'

विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ.मेघा पानसरे म्हणाल्या, 'कुटुंब व्यवस्था समाजवादी आणि लोकशाहीवादी झाल्यास समाजामधील स्त्रियांवरील हिंसेचे आणि अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.'

अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, 'समाजामध्ये स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार थांबवण्यासाठी सामाजिक जागृती निर्माण होणे गरजेचे आहे.'

.......

तुलना घरातूनच बंद व्हावी

सामाजिक कार्यकर्त्या तनुजा शिपूरकर म्हणाल्या, 'स्त्रियांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रथम आपल्यामध्ये माणूसपणाची शिक्षण व्यवस्था रुजली पाहिजे. स्त्री पुरूषांमध्ये होणारा भेदभाव, त्यांच्यामध्ये कामावरून केली जाणारी तुलना घरापासूनच बंद झाली पाहिजे. स्त्री ही शोषित आहे हा गैरसमज मुलांच्या मनात भरण्यासाठी आपली कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. घरातील मुलांना मुलींविषयी आदर करण्याची शिकवण दिली तर बरेच प्रश्न सुटतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

थोडक्यात

रहिमतपूर नगरपरिषदेच्या

सर्व निवडी बिनविरोध

सातारा : रहिमतपूर नगरपरिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. सभापती निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. स्थायी समितीचे लोकनियुक्त अध्यक्ष आनंदा शंकर कोरे हे पदसिद्ध सभापती असल्याने त्यांच्याकडे स्थायी समितीची जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी ज्योत्स्ना जितेंद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतिपदी चाँदगणी बादशहा आतार यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी ताराबाई निवृत्ती शिंदे व उपसभापतिपदी सुजाता तानाजी राऊत यांची निवड झाली. आरोग्य समितीच्या सभापतिपदी पालिकेच्या पदसिद्ध उपाध्यक्ष माधुरी सतीश भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

ग्रंथ महोत्सव सुरू

सातारा : सातारा येथे २१व्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते शुक्रवारी दिमाखदार उद्घाटन झाले. जिल्हा परिषद मैदानावर पुढील चार दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सातारा शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग व सातारकर नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावित्रिबाई रुग्णालयात डिजीटल एक्सरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात शुक्रवारी डिजीटल एक्सरे मशीन दाखल झाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने दिलेल्या निधीतून हे मशीन खरेदी करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते व समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी होते.

देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव म्हणाले, ' देवस्थान समितीच्यावतीने पंचगंगा हॉस्पिटलला १५ लाखांची मदत केली आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले रुग्णालयाला डिजीटल एक्सरे मशीन दिले आहे. या अत्याधुनिक मशिनचा लाभ रुग्णांना होईल. समितीच्यावतीने पॅथॉलॉजी लॅब सुरू करणार आहोत. देवस्थानकडे देणगी स्वरुपात येणारा निधी हा जनतेतून आला असून तो जनतेसाठीच खर्च झाला पाहिजे, अशी भूमिका आहे. दोन व्हेंटिलेटरसाठीही प्रस्ताव द्यावा. देवस्थान समितीकडून भविष्यात रुग्णालयाला व्हेंटिलेटर दिली जातील.'

याप्रसंगी महापौर अॅड. लाटकर, आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निरुपमा सखदेव, भूलतज्ज्ञ डॉ. कृष्णा केळवकर, प्रतिभा भोपळे, रेखा जाधव, क्षमा मुजावर, वनिता पाटील यांचा पदाधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका अश्विनी बारामते, देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, शिवाजी साळवी, उपअभियंता सुरेश देशपांडे, रुग्णालयाचे प्रशासनाधिकारी डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते. सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रुचिता यादव यांनी आभार मानले.


मागणीनंतर त्वरीत आश्वासन

देवस्थान समितीच्यावतीने मंदिर परिसरातील रस्ते व गटर्ससाठी पाच कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे. पंचगंगा रुग्णालयाला १५ तर प्राथमिक शिक्षण मंडळाला दहा लाखांचा निधी दिला आहे. शुक्रवारी फुले रुग्णायासाठी डिजीटल एक्सरे मशिन दिले. प्रास्ताविकामध्ये या सर्वांचा आढावा घेताना आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी रुग्णालयासाठी दोन व्हेंटिलेटर देण्याची मागणी केली. त्यावर जाधव यांनी त्वरीत प्रस्ताव द्या, व्हेंटिलेटर देवू ,अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आनंद’ ब्रँड

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२०' साठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अभिनेता आनंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली. ताराबाई पार्क येथील उद्यानामध्ये त्यांनी या पदाचा स्वीकार केला. छत्रपती संभाजीराजे मालिकेत काळे यांनी आपल्या भूमिकेची छाप पाडली होती. त्यांच्या वलयातून स्वच्छ सर्वेक्षणाला बळकटी देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. फाइव्ह स्टार मानाकंनासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेस यापूर्वी स्वच्छतेचा 'ओडीएफ प्लसप्लस' हा बहुमान मिळाला आहे. २०२० स्वच्छ सर्वेक्षणामध्ये फाइव्ह स्टार मानाकंनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये दैनंदिन कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, नागरिकांच्या मोबाइलमध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे, अॅपद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-लर्निंग सुविधा आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदींवर गुण अवलंबून आहेत.

याबाबत बोलताना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'स्वच्छ सर्वेक्षणासाठी जे सात निकष आहेत, त्यामध्ये शहरवासियांनी सहभागी होवून आपले अभिप्राय नोंदवावेत. महापालिका फाइव्ह स्टार मानाकंनासाठी प्रयत्नशील आहे.'

अभिनेता आनंद काळे म्हणाले, 'प्रत्येकाने आपल्या घरातून स्वच्छतेला सुरुवात केली तर शंभर टक्के परिसर स्वच्छ होईल. सर्वेक्षणामध्ये शहरवासियांना सात प्रश्न विचारले जातील. यासाठी तुम्हाला २०० गुण द्यावयाचे आहे. त्यासाठी नागरिकांना सहभाग महत्वाचा आहे.'

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रा. महादेवराव माळी, उपआयुक्त धनंजय आंधळे, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत महाआघाडीत बिघाडी; भाजपा, कॉग्रेस, शाहू आघाडी एकत्र

$
0
0

म.टा. वृत्तसेवा,
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेेन एकत्रित येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र इचलकरंजी नगपरिषदेत कॉग्रेसने भाजपाला पाठींबा देत विविध विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पाडून आघाडीत बिघाडी घडवली. भाजपाला साथ देणाऱ्या शाहू आघाडीचे नेते मदन कारंडे देखील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यामुळे इचलकरंजीत नव्या समीकरणाचे पडसाद अन्यत्र उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी चार दिवसापूर्वी पार पडल्या. त्यानंतर महाआघाडीच्या तिनही मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत पार पडल्यानंतर इचलकरंजीतील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले.
वाचा: अब्दुल सत्तार यांचा राजीनामा नेमका कशामुळे?

इचलकरंजी नगरपरिषदेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारंडे गटाने पाठिंबा दिल्याने महाआघाडीच्या समीकरणाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे यांच्यात समझोता होऊन नगरपालिकेतील विविध विषय समिती सभापती निवडी बिनविरोध करण्यात आल्या. पुढील दोन वर्ष ही युती एकत्रित राहिल अशी आशा या नेत्यांनी व्यक्त
केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यतेलाला दरवाढीची ‘फोडणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकी, सूर्यफूल, शेंगतेल या प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. ऐन हिवाळ्यात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे. रवा आणि मैद्याच्या दरातही प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाम तेलाचे दर वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेतही खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. पाम तेल परदेशातून आयात होते. पण, सरकी, सूर्यफूल आणि शेंगतेलाची निर्मिती भारतात होत असताना या तेलाचे दर का वाढत आहेत? असा प्रश्न किराणा दुकानादारांकडून उपस्थित केला जात आहे. सरकी तेलाच्या दरात चार रुपये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात सरकीने शंभरी गाठली असताना सध्या प्रतिकिलो १०४ दराने विक्री होत आहे. सूर्यफूल तेलाच्या दरातही दोन ते चार रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो १०४ ते ११० रुपयांनी विक्री होत आहे. शेंगतेलाच्या दरात प्रतिकिलो एक रुपयांनी वाढ झाली आहे.

ज्वारी, गहू आणि कडधान्याचे दर स्थिर असताना रवा आणि मैद्याच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे. दोन्ही खाद्यपदार्थाचे दर प्रतिकिलो ३४ रुपये झाले आहेत. गेल्या काही दिवसांत वेलदोड्याच्या दरात पुन्हा वाढ झाली असून प्रतितोळा ५० रुपये तर प्रतिकिलो पाच हजार रुपये दराने विक्री होत आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४ ते ४६

साखर : ३८

शेंगदाणा : १२०

मैदा : ३४

आटा : ३४

रवा : ३४

गूळ : ५०

साबुदाणा : ७५ ते ८०

वरी : ९२

डाळींचे दर

तूरडाळ : ९५

मूगडाळ : ९२ ते १००

उडीद डाळ : १२० ते १४०

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६८

मसूर : ६० ते १५०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६ ते १००

काळा वाटाणा : ६८ ते ७२

मूग : ९० ते ९२

मटकी : १२०

छोले : १००

धान्याचे दर

बार्शी शाळू : ४० ते ५२

गहू : ३० ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर

शेंगतेल : १३६

सरकी तेल : १०४

खोबरेल : २४०

सूर्यफूल : १०४ ते ११०

मसाले दर

तीळ : १८०

जिरे : २८०

खसखस : ९०० ते १४००

खोबरे : १८०

वेलदोडे : ५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या जीवावर आंदोलनाचा ‘खेळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीला सवलत मिळावी यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन झाले. मात्र, विद्यार्थ्यांच्या जीवावर आंदोलनाचा 'खेळ' मांडण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आवारात विविध खेळ खेळून प्रशासनाचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्याच्या नादात काही कार्यकर्त्यांनी चक्क दोन गाढवांवरून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी आणले. विविध खेळ, निदर्शने आणि घोषणाबाजीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना एक तासाहून अधिक काळ आंदोनलस्थळी थांबून राहावे लागले.

हायकोर्टाने सुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेवून चालू शैक्षणिक वर्षात या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये, रिक्षातून विद्यार्थी वाहतूक थांबल्यास लांब अंतरावरुन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. जून २०२०पासून, नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी वाहतुकीसाठी सोयीची नियमावली तयारी करावी अशी मागणी केली आहे.

२० जानेवारी रोजी हायकोर्टात याप्रश्नी सुनावणी होणार आहे. या कालावधीत शिक्षण विभाग व सरकारने काही हालचाली केल्या नाहीत तर विद्यार्थी वाहतूक बंद होण्याची भीती आहे. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक बंद झाली तर शाळेत जाणे गैरसोयीचे होईल याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यासाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात पालक विद्यार्थ्यांना घेऊन सहभागी झाले. शिक्षक संघटनांच्या नेत्यांचाही यात समावेश होता. दुपारी सव्वाबाराच्या आंदोलनासाठी बारा वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांना आणण्यात आले. दुपारी एक वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. कार्यालयाच्या आवारात लहान मुलांनी विविध खेळ खेळत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, जयंत आसगावकर, एस. डी. लाड, सुधाकर सावंत, विलास पिंगळे, राजेंद्र कोरे, विजय सुतार, विनोद डुणुंग, अजित सासने, भाऊ घोडके, लालासाहेब गायकवाड, चंद्रकांत सूर्यंवंशी, एस. के. माळी आदींचा समावेश होता. कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू असताना काही हौशी कार्यकर्त्यांनी दोन गाढवांवरुन बसवून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी आणले. मात्र आंदोलनात विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे वापर करण्याचा प्रकार योग्य नसल्याच्या भावना काहींनी मांडल्या. मात्र उघडपणे बोलण्याचे धाडस ना शिक्षकांनी केले, ना शिक्षक नेत्यांनी. पालकही हाती फलक घेऊन, घोषणा देत आंदोलनात सहभागी झाले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना निवेदन दिले.

आंदोलनात अंजूम देसाई, रामभाऊ कोळेकर रमा यादव, मेघा हावनूर, स्नेहा मोरे, सीमा जोशी, आयेशा मुजावर, साहिल मुजावर आदींचा समावेश होता.

लक्षवेधी घोषणा

- वीस जानेवारीनंतर होणार काय, आम्ही शाळेला जाऊ शकणार काय?

- शिक्षणावर आमचा हक्क, तुम्ही का करताय आमची वाहतूक ठप्प?

- तुम्ही जर करणार आमची रिक्षा बंद, तर आमची शाळा होणार बंद

- तुम्ही करणार स्कूलबसचे कायदे, त्यामुळे होणार हायफाय शिक्षण संस्थांचे फायदे

- रिक्षावाला मामा येतो गल्लीबोळात, स्कूल बस अडकेल ट्रॅफिकच्या घोळात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images